गमभन फायरफॉक्स एक्स्टेंशन

नुकत्याच ओंकार जोशी यांच्याकडून हाती आलेल्या बातमीनुसार गमभन या लोकप्रिय टंकलेखन प्रणालीसाठीचे फायरफॉक्स एक्स्टेंशन आता उपलब्ध आहे.

दुवाः http://www.gamabhana.com/?q=node/32

फायदेः

फायरफॉक्स वापरकर्त्यांना गमभनचे फायरफॉक्स एक्टेंशन वापरुन विंडोज-उबुंटू-मॅकवर कुठेही गमभनची कळयोजना वापरुन मराठी टंकलेखन करणे सहजशक्य होईल. उदा. उपक्रमावर मराठीसाठी गमभन आणि जीमेल-जीटॉक मध्ये मराठीसाठी बरहा अशी कसरत करण्याची गरज नाही. जीमेल, ब्लॉग, गूगल सर्चसह जिथेजिथे टेक्स्ट खिडकी असेल तिथे गमभनची कळयोजना काम करेल.

नव्या वापरकर्त्यांना हे एक्स्टेंशन वापरण्यात काही अडचण आली तर त्याला आपण सर्व जण मदत करुया.

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर्

फारच फायद्याचे आहे की हे फायरफॉक्स् आधिक्य.
आता जी-टॉक वर पण मराठी थेट टंकन करता येतेय.

- चंबा

मस्तच!!!

जमलं बॉ एकदाचं. लई बुंगाट आहे :) ग-पत्र वर चॅटिंग करताना लई धम्माल येते आता
श्री. वाचक यांचे अनेक आभार

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

छान!

छान बातमी. ओंकार जोशींचे अभिनंदन!

झकास!

आवडले, झकास आहे!

आपला
गुंडोपंत

एक विनंती

"गमभन" सारखा सुंदर प्रयोग करणार्‍यांनी कृपया अनुवादकांसाठी वर्डफास्ट, ट्राडोस च्या धर्तीवर एखादे भाषांतर स्मरण-संसाधन (Translation Memory Tool) विकसित केले तर फारच बरे होईल. कारण १) ही उपरोल्लेखित संसाधने युरोपीय भाषा डोळ्यापुढे ठेऊन घडविण्यात आली आहेत. २) त्याच्यासाठी परकीय चलनात पैसे मोजताना सर्वच भारतीय अनुवादकांना दु:ख होते. एकदम रु. १०,०००+ चे सॉफ्टवेअर खरेदी करायला पटकन् मन धजावत नाही. तेच जर रु. ३-४००० पर्यंत उपलब्ध झाले तर सर्व भारतीयांना बरे वाटेल.

--------------------------X--X-------------------------------
आला पह्यला पाऊस,
शिपडली भूई सारी,
धरत्रीचा परमय,
माझं मन गेलं भरी ।।

एक प्रश्न

सर्वप्रथम ओंकारचे अभिनंदन आणि आभार! तसेच अजानुकर्णाचेपण येथे माहीती दिल्याबद्दल आभार! सुविधा आवडली एकदम मस्त आहे. काही प्रश्न/अडचणी:

  1. मला उटूंबू मधे ड्रॅग अँड ड्रॉप करता आले नाही. विंडोज् मधे जमले.
  2. फायरफॉक्सच्या एक्स्टेंशनच्या डिरेक्टरीत हे उपलब्ध झालेले दिसले नाही. तसे करावे असे वाटते.
  3. मी याहू मेल मधे वापरून पाहीले तर मराठी टंकता आले पण गुगलमेल मधे जमले नाही.

या संदर्भात काही सुचना अथवा अधिक माहीती असल्यास कळवावी.

धन्यवाद.

मला वाटते

1. मला उटूंबू मधे ड्रॅग अँड ड्रॉप करता आले नाही. विंडोज् मधे जमले.

उटूंबू? :)

2. फायरफॉक्सच्या एक्स्टेंशनच्या डिरेक्टरीत हे उपलब्ध झालेले दिसले नाही. तसे करावे असे वाटते.

मला वाटते ओंकारने तशी विनंती केली असावी. त्याचा कोड रिव्ह्यू वगैरे झाल्यावर ते तिथे दिसू लागेल.

3. मी याहू मेल मधे वापरून पाहीले तर मराठी टंकता आले पण गुगलमेल मधे जमले नाही.

याहू मेलचे दोनतीन इंटरफेस आहे. एखादा इंटरफेस फ्लॅश वापरत असेल तर तिथे कधी कधी कोणत्याही प्लगिनला अडचणच येते. तुम्ही एकदा बेसिक इंटरफेस वापरुन जमते का ते पाहा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

जीमेल

>>>उटूंबू? :)

क्षमस्व! उबुंटू :-)

>>तुम्ही एकदा बेसिक इंटरफेस वापरुन जमते का ते पाहा. <<

हा प्रश्न जीमेल संदर्भात उद्भवला. पण "रिच टेक्स्ट"च्या ऐवजी जेंव्हा "प्लेन टेक्स्ट" वापरले तेंव्हा काही प्रश्न आला नाही.

अर्थात जीमेल मधे आता "ट्रान्सलीटरेशन"ची कळ आहे. ती क्लिक केली आपोआप मराठीत लिहीता येते. पण ते गमभनस्टाईल मधे होत नाही...

उबंटू साठी

एक्स पी आय फाईल फायरफॉक्स च्या फाईल मेनू मधून 'उघडून' बघा
ही लिंक बघा - फायरफॉक्स अधिक्य

मला तरी ही अडचण आली नाही

मी उबुंटूच वापरत आहे. मला ही अडचण आली नाही. वरील सूचना उपयुक्त आहे, किंवा उबुंटूचा ऍडऑन मेनू चालू करुन त्यात हे एक्स्टेंशन खेचून आणा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मराठी इंडिक आयएमई

गमभन/बरहा यांना पर्याय म्हणून मराठी इंडिक आयएमई चे संस्करण करुन इतर कोणत्याही भाषेप्रमाणे मराठी फोनेटिक कळफलक बनवता येतो आणि तो हव्या त्या खिडकीला, हवा तिथे सक्रिय करता येतो.


जी टॉक

ओंकारचे आभार.

काही जणांनी वर लिहिले आहे हे जीटॉक मध्ये पण चालेल.
माझ्याकडे चालत नाही आहे. खरे तर फायरफॉक्सचा आणि जीटॉकचा काय संबध?

जीटॉक

इथे जीटॉक म्हणजे जीमेल मधे असलेली चॅट सुविधा असे म्हणायचे असावे. तिथे हे एक्सटेन्शन चालते (फायरफॉक्समधून) हे वापरून बघितले.

अमित

धमाल

गमभन घेतले. आता जीटॉक वर धम्माल येते आहे ! ते बारहा मला आवडले नाही कधी. हे लई भारी काम झाले राव. गमभनकर्त्यांचा जयजयकार ! :-)

अभिनंदन.....

बरहामध्ये एकदा मराठी निवडले, परत इंग्रजी केले की जसे तुम्ही टॅब/विंडो बदलत रहाल तसे आपोआप इंग्रजीचे मराठी होते. याने खूपच चिडचिड होते. गमभनबाबत सांगायचे झाले तर ते नोटपॅडमध्ये वापरता नाही आले. संकेतस्थळावर पाठवण्याआधी संगणकावरच लेख लिहण्यासाठी बरहा कमालीचे उपयोगी आहे.
बरहामध्ये कॅमेरा लिहण्यासाठी k + shift `(1आकड्याच्या डावीकडे)+ e वापरा.
कॉम लिहण्यासाठी k + shift ` ( 1आकड्याच्या डावीकडे) + o (ओ) वापरा.
र्‍या लिहण्यासाठी r + shift 6 + ह किंवा य वापरा. र्‍ह किंवा र्‍य लिहण्यासाठी.

उपक्रमावर भाषा बदलायची झाल्यास दरवेळेस पानाच्या वरच्या भागात जाऊन बदलावे लागते. लांबलचक लेखात हे खूपच त्रासदायक ठरते. यावर उपाय म्हणून उपक्रमावर येऊन इंग्रजी भाषा निवडा. आता बरहा सुरु करुन एफ११/१२ दाबून हव्या त्या भाषेत लिहा.:-) मात्र यात पण त्रास असा होतो की दुसर्‍या लेखात तुम्ही गेलात की पान रिफ्रेश झाल्याने उपक्रमावरची भाषा मराठी झालेली असते. ती परत इंग्रजी करावी लागते. :-(

असो. ओंकार जोशी यांचे अभिनंदन या कामगिरीसाठी. आजानुकर्ण, बातमीबद्दल धन्यवाद.
पाच सेकंदही लागले नाहीत उतरवून घेऊन वापरायला. काही लोकांना अडचणी का येतात देव जाणे! :-)
असो. आम्हाला बरहामध्येही सगळ्या प्रकारे मराठी लिहता येते आणि गमभनमध्ये पण! तुम्हाला काय येतं? ;-)

-सौरभ.

==================

नविन आवृत्ती

ह्या एक्सेंशनची नविन आवृत्ती ह्या दुव्यावर उपलब्ध आहे.

नव्या आवृत्तीत -
प्रत्येक टॅबवर गमभन जोडण्या- न जोडण्याचा पर्याय आहे.
प्रत्येक टॅबनुसार गमभन आहे/नाही हे कळण्याची सोय आहे.
सध्या इंग्रजीसोबत कोणती भाषा निवडलेली आहे ते कळण्याची सोय आहे.
गमभन जोडलेले असलेल्या टॅबमध्ये नविन वेबपेज उघडल्यास गमभन आपोआप जोडले जाण्याची सोय आहे.

ह्या चर्चेत एक्स्टेंशनच्याबाबतीत आलेल्या त्रुटी आणि सुचवण्यांनुसार वरील बदल केले आहेत :)

शुद्धलेखन चिकित्सेसह...

गमभनमध्येच शब्द तपासणी अंतर्भूत करून एक नवीन एक्स्टेंशन बनविले आहे. त्यात मराठी, गुजराथी व उर्दु या भाषांत लिहिलेल्या मजकुराची शुद्ध चिकित्सा करून मिळेल. गमभनमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी ओंकारची परवानगी घेतली आहे. ही सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल.

Beta version of gamabhana Pro with Dic
Beta version of gamabhana Pro with Dic
 
^ वर