उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
फॉक्स ग्लोव्ह
सृष्टीलावण्या
June 15, 2009 - 6:34 am
डिजिटालिस परपरिया किंवा फॉक्स ग्लोव्ह ह्या नावाने ओळखल्या जाणार्या व वर दर्शविलेल्या फुलांचे मराठी / संस्कृत नाव हवे आहे.
मला लवणवल्ली / हृतपत्री / तीलपुष्पी अशी नावे आतापर्यंत सापडलेली आहेत. पण ह्या नावांचा एकमेकांशी संबंध कळत नाही
आणि व्युत्पत्ती सुद्धा. तरी कोणाला वेगळे नाव ठाऊक असल्यास सविस्तर माहिती द्यावी.
दुवे:
Comments
भारतात डिजिटॅलिसची लागवण
पहावे "चोप्रा'ज् इंडिजिनस ड्रग्स् ऑफ इंडिया" (दुवा) पान १३८.
मला वाटते की या वनस्पतीची भारतीय नावे त्या मानाने आधुनिक असावीत. "हृत्पुष्पी" याची व्युत्पत्ती "हृत्+पुष्प+ई(प्रत्यय)"="हृदय-फुले-असलेली". परंतु जर हा शब्द आधुनिक असेल, तर या व्युत्पत्ती पूर्वीच्या बोली-संस्कृतच्या काटेकोर नियमांनी तोलता येणार नाहीत असे वाटते. त्यामुळे पाणिनीय नियम शोधण्याबाबत मला उत्साह होत नाही. ज्या कोणी नाव ठेवले, त्यांनी उपयोगाच्या दृष्टीने उत्तम नाव ठेवले आहे. त्यांच्या प्रतिभेबद्दल कौतूक वाटते.
(विनंती : गुलाबी फुलांचे चित्र जरा लहान करून लावावे. ते पटावर मावत नसल्यामुळे खालील मजकूर वाचायला त्रास होत आहे.)
चित्राचा आकार
लहान करण्यासाठी "संपादक मंडळाला" सकाळीच वि. वि. केलेली आहे.
आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
गोंधळाचे कारण असे की एकाच वनस्पती बाबत तीन नावे ते पण प्रत्येकी वल्ली, पत्र आणि पुष्प असा उल्लेख असलेली. त्यामुळे काहीच कळत नाही आहे.
--------------------------X--X-------------------------------
सिंह एकटाच प्रतिसाद देतो. डुकरे मात्र त्या प्रतिसादावर कळपाने टीका करतात.
महानवल : एका झोपडपट्टी संकेतस्थळावर केवळ डुकरेच प्रतिसाद देतात.
पुस्तकाचा दुवा
वर चिकटलाच नाही :-(
हा घ्या दुवा.
तीलपुष्पी
हा शब्द सर्वाधिक योग्य वाटतो कारण तो शब्द देणारे संकेतस्थळ ह्या विषयातील अधिकारी वाटते.
--------------------------X--X-------------------------------
सिंह एकटाच प्रतिसाद देतो. डुकरे मात्र त्या प्रतिसादावर कळपाने टीका करतात.
महानवल : एका झोपडपट्टी संकेतस्थळावर केवळ डुकरेच प्रतिसाद देतात.
सिंह
सिंह कळपाने शिकार करणारा प्राणी आहे असे ऐकून आहे. एकट्याने शिकार करतो वाघ. डुकरांबद्दल फारशी माहिती नाही.
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
चूक
"केवळ ऐकिव माहितीवर जो विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.... "
असो.
जमले तर वरील लेखाशी संबंधित सुद्धा कधीतरी, काहीतरी माहितीपूर्ण येऊ दे. नेहेमीच अवांतर लिखाण करणे बरे नव्हे.
--------------------------X--X-------------------------------
सिंह एकटाच प्रतिसाद देतो. डुकरे मात्र त्या प्रतिसादावर कळपाने टीका करतात. महानवल : एका झोपडपट्टी संकेतस्थळावर केवळ डुकरेच प्रतिसाद देतात.
शक्य आहे.
"केवळ ऐकिव माहिती वर जो विसंबला 'त्या'चा कार्यभाग बुडाला.... "
शक्य आहे.
नेहेमीच अवांतर लिखाण करणे बरे नव्हे.
मान्य. जमल्यास माहिती देईल.
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
तिलपुष्पी
या वनस्पतीचे हिंदी नाव तिलपुष्पी(ति र्हस्व!) आहे असे एकॉनॉमिक प्लॅन्ट्स ऑफ़ इन्डिया या ग्रंथात दिले आहे. ही बाकीची दोन नावे कुठे मिळाली? डिजिटॅलिस हे हृद्रोगावर औषध आहे हे सर्वज्ञात आहे, म्हणून कुणीतरी हृत्पुष्पी हे नाव बनवले असावे. वनस्पती भारतासाठी त्यामाने नवीन असल्याने हिला संस्कृतमध्ये नाव असण्याची शक्यता नाही.-वाचक्नवी
म्हणजे तिळाच्या फुलांसारखी फुले म्हणून असेल
तिळाची फुले ही थोडीशी वरील फुलांसारखी दिसतात. म्हणून तर "तिलपुष्पी" नाव नसेल ना?
वरील चित्रात तिळाची दोनच फुले आहेत, पण माझ्या आठवणीप्रमाणे एका वेळी खूप फुले लागतात.
फॉक्सग्लोव्ह वनस्पतीला फुलांचे घोस वरच्या लागतात, पण माझ्या आठवणीप्रमाणे तिळाचे प्रत्येक फूल मुख्य दांड्यातून निघते, फुले/शेंगा अगदी मध्यापासून वरपर्यंत असतात.
अंदाज़ बिलकुल सही!
फ़ॉक्सग्लोव्हची फुले आणि तिळाची फुले यांत साम्य असल्यानेच त्या वनस्पतीला तिलपुष्पी म्हणतात. तिळाच्या झुडुपाची उंची अडीच मीटरपेक्षा कमीच असते. खोड अंगठ्याइतपतच जाड असते. फुले झाडाच्या शेंड्याला, तसेच खोड आणि पान यांच्या बेचक्यात येतात. एका वेळेला अनेक फुले असू शकतात. फूल पूर्ण उमलून मोठे झाले की ते आपल्या वजनाने खाली झुकते. --वाचक्नवी
धन्यवाद :)
ही बाकीची दोन नावे कुठे मिळाली?
बाकीची नावे त्या त्या नावाच्या बरोबर दिलेल्या संकेतस्थळ दुव्यावर मिळाली. नावांवर टिचकी मारली की ते संकेतस्थळ दिसेल. दुर्दैवाने माझ्याकडे छापील ग्रंथांचा फारसा साठा नाही म्हणून अंतरजाल माहितीवर अवलंबून राहावे लागते. आपल्याला अधिक माहिती मिळाली तर इथे जरूर सांगा.
वनस्पती भारतासाठी त्यामाने नवीन असल्याने हिला संस्कृतमध्ये नाव असण्याची शक्यता नाही.
हृत्पत्री हा शब्द रोमन लिपीत गुगलून पाहिला तर बर्याच आयुर्वेद विषयक ग्रंथात त्याचा उल्लेख आढळला. म्हणजे ही वनस्पती आयुर्वेदाला पूर्वीपासून ज्ञात असावी का?
--------------------------X--X-------------------------------
सिंह एकटाच प्रतिसाद देतो. डुकरे मात्र त्या प्रतिसादावर कळपाने टीका करतात.
महानवल : एका झोपडपट्टी संकेतस्थळावर केवळ डुकरेच प्रतिसाद देतात.
हृत्पत्री आणि लवणवल्ली
हृत्पत्री सापडले. वाळवलेल्या पानांपासून हृद्रोगावर औषध बनवत असल्याने नावही यथार्थ आहे. लवणवल्ली मिळाले नाही. आणि फ़ॉक्सगोव्ह हा वेल नसल्याने नाव योग्य वाटत नाही.--वाचक्नवी
पण
भारतीय फुलांविषयीच्या अधिकृत संकेतस्थळावर लवणवल्ली असे स्पष्ट लिहिलेले दिसले.
--------------------------X--X-------------------------------
सिंह एकटाच प्रतिसाद देतो. डुकरे मात्र त्या प्रतिसादावर कळपाने टीका करतात.
परंतु दुव्यावरील चित्रातील वनस्पती लेखापेक्षा वेगळी
या दुव्यावर दाखवलेली वनस्पती मात्र वर लेखात चर्चिलेल्या वनस्पतीपेक्षा वेगळी आहे. संकेतस्थळावर हिचे अधिकृत वनस्पतिशास्त्रातले नाव Asystasia gangetica असे दिले आहे.
वर चर्चा केलेल्या वनस्पतीचे नाव Digitalis purpurea असे आहे.
इतकेच काय, या दोन वनस्पतींची कुळेही खूप वेगळी आहेत. दुव्यावरील लवणवल्लीची family: Acanthaceae तर दुसरी तिलपुष्पीची family: Plantaginacea.
असे असल्यामुळे त्या दोन वनस्पतींचा जवळचा संबंध नसावा.
हेच लिहिण्यासाठी...
हेच लिहिण्यासाठी संगणक उघडला होता. 'लवणवल्ली' विविध स्पेलिंगे करूनही जालावर मिळाला नाही. लवण वल्ली असे शब्द तोडून शोधायची बुद्धी झाली नव्हती. बाईंनी दिलेल्या दुव्यावर जाऊन पाहिले तर तो लवण वल्ली आहे असे दिसले. पण धनंजय म्हणतात त्याप्रमाणे ही वनस्पती वेगळी आहे. शास्त्रीय नाव ऍसिस्टेशिया गॅन्जेटिका. ही पूर्णपणे भारतीय वेल दक्षिणी भारतात किनारपट्टीवर आढळते. म्हणून लवण आणि वल्ली. हिला शोभिवंत जांभळी फुले येतात. समुद्रकिनार्यालगतच्या बगिच्यांत किंवा दगडाधोंड्यांनी सजवलेल्या उद्यानांत छान वाढते. (हिला गॅन्जेटिका का म्हणतात? तसे या वनस्पतीचे दुसरे नाव ऍसिस्टेशिया कॉरॉमन्डेलियाना आहे!) फ़ॉक्सग्लोव्ह हिमालयाच्या परिसरात आणि मुळात परदेशी. ज्ञात औषधी उपयोग काहीही नसावेत. लवण वल्ली हे नाव मराठी आहे असे जालावर म्हटले असले तरी माझ्याकडील तद्विषयक मराठी पुस्तकांत हे नाव सापडले नाही.
अवांतर:-डिजिटॅलिस परपरिया, की पुर्पुरिया, की परप्यूरिया? मला शेवटचे योग्य वाटते.--वाचक्नवी
मात्र
त्याच दुव्यात सदर वनस्पतीला क्रिपिंग फॉक्सग्लोव्ह असे म्हटल्याने जेव्हा फॉक्सग्लोव्ह असे गुगलले तेव्हा अचानक तो दुवा सापडला. मात्र त्या दुव्यावर लेखाचा आणि चित्राचा पण एकमेकांशी काही एक संबंध दिसत नाही. असो. आज त्या संस्थळाला पत्र टाकायचा विचार करीत आहे.
--------------------------X--X-------------------------------
सिंह एकटाच प्रतिसाद देतो. डुकरे मात्र त्या प्रतिसादावर कळपाने टीका करतात. महानवल : एका झोपडपट्टी संकेतस्थळावर केवळ डुकरेच प्रतिसाद देतात.
पत्र टाकाल तेव्हा हेही विचारा...
पत्र टाकाल तेव्हा, हृत्पत्री, लवण वल्ली ही नावे किती जुनी आहेत हेही विचारा. प्रत्येक वनस्पतिशास्त्रीय नावापाठोपाठ ते नाव ज्याने ठेवले त्या शास्त्रज्ञाच्या नावाचे लघुरूप असते. तसे या नावांबद्दलही कळायला हवे. ही नावे आयुर्वेदिक शब्दकोशग्रंथांत सापडली नाहीत, म्हणून ही सूचना. तिलपुष्पी हे नाव मात्र दोन पुस्तकांत मिळाले.--वाचक्नवी