पिझ्झा संकृति

सध्या पिझ्झा संकृतिने भारतात खुपच आघाडि मारली आहे.

२-३ दिवसा पुर्वि मुंबईच्या "निर्मल लाईफ" मॉलच्या पिझ्झा हट ला भेट दिली. गेली १० दिवस तिथल्या दुकानाचा वातानिकुल म शिन चालु नाही तरी पण लोक ... खुप उकडत.. गरम होत म्हणत... मीटक्या मारत पिझ्झाचा फडशा पाडत होती.

काहीजण वातानिकुल मशिन चालु नाही म्हणुन बाहेर पडत होती.....

मुद्दा हा की... आपल्या भारतिय खाद्य पदार्थाच्या हॉटेल मध्ये असे झाले असते तर.... हॉटेल बंद ठेवण्याची लोकांनी वेळ आणल असती...

हॉटेलचे नुकसान केले असतथे वेगळेच!!!

तुमचे या प्रसंगा बद्द्ल काय म्हणने आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

पिझ्झा संकृति

हा निर्मल मॉल मुंबईच्या कोणत्या भागात आहे?
चन्द्रशेखर

निर्मल मॉल

मुलुंड (वे). LBS पथ.

निर्मल लाईफ् स्टाईल् मॉल

निर्मल लाईफ् स्टाईल् मॉल

पिझ्झा संकृति

मुलुंड हे चांगले सुसंस्कृत गाव आहे. तिथले लोक रानटीपणे वागले नाहीत यात मला तर काही आश्चर्य वाटत नाही.
चन्द्रशेखर

सुसंस्कृत?

मला वाटते दोन तीन वर्षांपूर्वी या निर्मल लाईफ स्टाईल जवळच्या आर मॉल मध्ये झोपडपट्टीतील एका अल्पवयीन मुलाने चोरी केल्याची शंका आली म्हणून मुलुंडमधील सुसंस्कृत जमावाने त्याला तुडवून मारुन टाकले होते. मृत मुलाजवळ नंतर सापडलेली चोरीची वस्तू साधारण पन्नास रुपयांची होती. गूगलवर ही बातमी शोधायचा प्रयत्न केला पण काही सापडले नाही. मात्र या घटनेनंतर कुमार केतकर यांनी लिहिलेला अग्रलेख आठवतो आहे.

रानटीपणाची काही दुसरी व्याख्या असल्यास मला माहिती नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संस्कृती ?!

मुद्दा हा की... आपल्या भारतिय खाद्य पदार्थाच्या हॉटेल मध्ये असे झाले असते तर.... हॉटेल बंद ठेवण्याची लोकांनी वेळ आणल असती...
हॉटेलचे नुकसान केले असतथे वेगळेच!!!

असे लोकांनी केले असते असे वाटत नाही. मला असा काही अनुभव नाही.

घराबाहेर मौज-मजेसाठी गेल्यावर नेहमी न मिळणारे पदार्थ चाखून पाहावे असे वाटणे स्वाभावीक आहे. पिझ्झा संस्कृती वगैरे म्हणून याचे सामान्यीकरण करावे असे मला वाटत नाही. लोक पोळी-भाजी सारखे पारंपारिक पदार्थ टाळून घरात रोज पिझ्झा खायला लागले तर चिंता करणार्‍यांनी ती करावी :)
परंतू बहुराष्ट्रीय दुकान कंपनीच्या दुकानात मराठी मुलखात गेलो असतानासुद्धा तिथल्या विक्रेत्यांशी (जे मराठी/भारतीयच असतात), इंग्रजीत बोलावे असे ग्राहक-विक्रेते दोघांनाही वाटते याचे वाईट वाटते.
--लिखाळ.

काहीतरी गडबड होते आहे..

प्रकाटाआ

द्वेशबुद्धी

मुद्दा हा की... आपल्या भारतिय खाद्य पदार्थाच्या हॉटेल मध्ये असे झाले असते तर.... हॉटेल बंद ठेवण्याची लोकांनी वेळ आणल असती...


असं कांहीसुद्धा झालं नसतं. असा विचार करणे हे निव्वळ कुणाबद्दल तरी विनाकारण द्वेशबुद्धी बाळगणे आहे.

या प्रसंगाबद्दल माझे म्हणणे

वातानुकूलन व्यवस्था बंद असूनही लोकांनी घाम पुसत पिझ्झा खाल्ला म्हणजे बहुतेकांना अतिशय भूक लागली असावी असे वाटते. लोक मिटक्या मारत पिझ्झ्याचा फडशा पाडत होते म्हणजे पिझ्झा चविष्टही असावा असे वाटते. एकंदर चराचराचा विसर पाडणारा हा पिझ्झा भलताच स्वादिष्ट असावा असे वाटत आहे. पिझ्झा हटचा पिझ्झा तितका चांगला नसतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. निदान पुण्यात तरी स्मोकिन् जो'ज् पिझ्झा हा डोमिनो किंवा पिझ्झा हट यांच्यापेक्षा बराच बरा मिळतो.

हिंजवडी गावातील एक स्थानिक पिझ्झावालाही उत्तम पिझ्झे बनवतो असा अनुभव आहे. विशेषतः समोरच पीठ वगैरे मळून पिझ्झा बनवत असल्याने त्याला सूचना देऊन हवा तसा पिझ्झा बनवून घेता येतो.

It's a pizza place where you make your own pie! They give you the dough, the sauce, the cheese...you pound it, slap it, you flip it up into the air...you put your toppings on and you slide it into the oven! Sounds good, huh?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

साईनफेल्ड् मधलं वाक्य उचललत्..

तर् त्याचा नामोल्लेख तरी करायचात हो!

लोकांना हे वाक्य तुमच स्वःताचं वाटेल्.

नाही वाटणार

अहो हे वाक्य इतके प्रसिद्ध आहे की अगदी कोणालाही ते साईनफेल्डमधले आहे हे ओळखता येईल.

लोकांना हे वाक्य माझे स्वतःचे आहे असे वाटण्याची सुतराम शक्यता नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पुस्ती

माझ्या स्वाक्षरीतील बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥ हे वाक्य संत तुकारामांचे आहे. गैरसमज नसावा. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पुस्तीतील वाक्य तुमचं असू शकत नाही

याची खात्री होती म्हणून त्याचा उल्लेख् टाळला.

साईनफेल्ड मधलं वाक्य तस सरळ् आहे. क्रेमर ते कसं सजवतो याला महत्त्व आहे नाही का?

सहमत

साईनफेल्ड मधलं वाक्य तस सरळ् आहे. क्रेमर ते कसं सजवतो याला महत्त्व आहे नाही का?

सहमत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर