संध्याकाळ

एका संध्याकाळी काढलेला ह्या टेकडी चा फोटो. प्रतिक्रिया कळवा.

सुर्य मावळत होता आणि माझ्या मागे होता.
ISO - 100
Shutter Speed - 1/320
Aperture 8.0

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

अमूर्तवादी (ऍब्स्ट्रॅक्ट) रचना आवडली. शिवाय झाडाझुडुपांचा S-आकाराचा मार्ग छानच. (क्षितिजावरती कथानकाला पूर्णत्व देणारा काही तपशील असता, तर अधिक खुलला असता.)

पोस्ट-प्रोसेसिंग करून रंग बदलून बघितलेत काय?

रंग

होय....रंग तर नाही बदलले पण व्हाईट ब्यालंस बदलला.
थोडा काँट्रास्ट वाढवला.....
रॉ फोर्माट मधे खेचला होता. हि रंगसंगती सायंकाळाच्या वेळेला शोभून दिसते म्हणून ठेवली.

अवांतर.. ऍ कसा लिहियचा? त्यामुळे ब्यालंस बदलला. :)

छान

अनुप,
फोटो आवडला. जियो...!!!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

छायाचित्रात बदल

छायाचित्रात बदल

श्री.अनुप यांच्या सुरेख छायाचित्रावर प्रतिसाद देतांना आ. धनंजय यांनी सुचना केली आहे की चित्रावर नंतर बदल करून पहावेत; म्हणजे फोटोशॉप सारख्या प्रणालीचा उपयोग करून बघावा. मी त्याप्रमाणे काही बदल करून पाहिले व चित्र कसे दिसते ते पुढे देत आहे.

असे बदल का व केंव्हा करावेत? किती करावेत? फोटोशॉपवर काय वाटेल ते करता येईल. आकाश निळे करून त्यात संध्यारंग भरता येतील,सुरेख ढग दाखवता येतील, टेकडीवर हिरवळ व त्यात रानफ़ुले भरता येतील. पण असे करावे का? मी म्हणेन " नाही, कारण हे करावयाचे असेल तर तुम्हाला टेकडीपाशी जावयाची गरजच नाही. पण तुम्ही काढलेल्या फोटोत काही कमीजास्त करण्यास हरकत नाही. उदा. दरवेळी तुम्ही कलर टेंपरेचर, अपर्चर, स्पीड निरनिराळे वापरत नाही वा फ़िल्टरही वापरलेले जात नाहित. मोड्सचा योग्य वापर होतोच असेही नाही. तर या गोष्टी संगणकावर बदलून चित्र कसे दिसेल ते बघावयास हरकत नाही."

श्री. अनुप यांच्या चित्राचा विचार करावयाचा तर काय दिसते ? फोटो संध्याकाळी काढला, ऍपर्चर बदलून पाहिली का, स्पीड ब्रॅकेटिन्ग केले का, कास्ट दुरुस्त करावयास फ़िल्टर वापरला का,असे अनेक प्रश्न उभे रहातात.हे सर्व जागेवर करणे शक्य आहे पण अवघड आहे. पण या सर्वांचा काय परिणाम होईल ते घरी आरामात, सोयिस्कर वेळी बघता येईल. वरील प्रत्येक गोष्ट एकेकटी किंवा संयुक्तिक रीतीने काय बदल करते ते पाहून आपल्याला काय आवडले तसा फोटो मिळवता येईल. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, असे करण्यात फ़सवणूक नाही. मी जागेवर स्पीड बदलून फोटो काढणॆ किंवा फोटोशॉपवर लेव्हल चा उपयोग करणे या माझ्या सोयी प्रमाणे करावयाच्या गोष्टी आहेत. येथे विमानातून काढलेल्या फोटोत चंद्र डकवलेला नाही. तर या सर्वाचा विचार करून बदल करून बघा, मॉनिटरवर कसे दिसते, प्रिंट कसा दिसतो ते बघा व निर्मितीचा आनंदही मिळवा

श्री. अनुप यांनी raw format वापरला असल्याने त्यांनी वरील,सर्व गोष्टी संगणकावरच केल्या आहेत. या फॉर्मॅट्मध्ये तुमचा स्वत:चा बदल करावयाचा हक्क अनिर्बंधीत असतो. त्यामुळे त्यांना आवडलेली रंगसंगती, उदा. कलर कास्ट, त्यांनी निवडली. संध्याकाळचे वातावरण अचूक टिपले. आपण फोटोशॉपवर काय बदलता येणे शक्य आहे ते बघणार आहोत.

मी दोन बदल केलेले दाखवत आहे. त्या मुळे छायाचित्र जास्त चांगले दिसते का? तसा दावा मुळीच नाही. काय करता येणे शक्य आहे तेवढेच पहावयाचे आहे. तसेच असे बदल सगळ्या फोटोत करावेत का? नाही. असे बदल तुम्हाला महत्वाच्या वाटणा‍ऱ्या फोटोंकरताच मर्यादित ठेवावेत.

(१) स्पीड ब्रॅकेटिन्ग. प्रकाश कमीजास्त करावयास Levels चा उपयोग करा. मी फोटो काळपट केला आहे. श्री अनुप अर्धा तास उशिरा पोचले असते तर कसा फोटो मिळाला असता त्याचा अंदाज बांधता येईल. तुम्ही फ़िल्टरचाही उपयोग करू शकला असता.
IMG_0868
(२) कलर फ़िल्टर . कलर कास्ट बदलण्याकरिता Hue/Saturation command वापरा किंवा नवीन transperant layer तयार
करून त्यात पाहिजे तो रंग बकेटने ओता. रंगाचा फ़िकेपणा कमीजास्त करता येतो. मी curves चा उपयोग केला आहे. या जागी
तुम्ही एक-दोन पाऊस झाल्यानंतर गेला असता तर थोडी हिरवळ उगवलेली दिसली असती.

IMG_0868 copy curves copy

एक विनंती. raw format वापरणार्‍या लोकांनी याची माहिती उपक्रमवर द्यावी. आता बर्‍याच कॅमेर्‍यात ही सोय उपलब्ध होत आहे. जास्तीत जास्त वापर वाढावा.

शरद

वा!

मुळ फोटो जास्त आवडला असला.. तरी तुम्हि दिलेले प्रयोग करून बघणे बरेच काहि शिकवून जाते हे नक्की... अनेक आभार

श्री. अनुप, आपला मुळ फोटो मस्त आला आहे. अजून येऊ द्या

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

पहिल्या पावसा नंतरची संध्याकाळ

पहिल्या पावसा नंतरची एक संध्याकाळ

Sandhyaakal - kale dhag
surya mavaltana

हे फोटो मोबाईल कॅमेर्‍याने काढले आहे.

 
^ वर