उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
दादोजी कोंडदेव
चंद्रशेखर
June 6, 2009 - 3:56 am
आजच बातमी वाचली की शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून असलेले दादोजी कोंडदेव यांचे नांव पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आले आहे. हा सगळा वाद निर्माण करून शेवटी काय साधले गेले? हा प्रश्नच आहे.
दुवे:
Comments
याबाबत यू.एस.मधील निर्णय - प्रत अधिकाराचे उल्लंघन नाही
याबाबत आजानुकर्ण यांच्याशी खरडचर्चा झाली. थोडीच शोधाशोध करता असे दिसून आले, की या बाबतीत संयुक्त राज्यांच्या (यू.एस.च्या) केंद्रसरकारच्या ९व्या मंडळाच्या उच्च न्यायालयाने (नाइन्थ सर्किट कोर्ट ऑफ अपीलस् ने) निर्णय दिला आहे. (विकी दुवा)
२००७ सालच्या Perfect 10, Inc. v. Amazon.com खटल्याच्या निकालात न्यायलयाच्या निर्णयातील भाषा अशी (मूळ कोर्टाच्या निकलाचा कोर्टाच्या संकेतस्थळावरील पीडीएफ दुवा) :
प्रश्न हा आहे, की उपक्रम स्थळाचे चालक आणि पुढारी स्थळाचे चालक दोघांचे पत्ते भारतात आहेत. (बहुधा. अलेक्सा मध्ये उपक्रमबद्दल माहिती नाही.) उपक्रमाचा सेवादाता संयुक्त राज्यांमध्ये आहे (ओरेम, यूटाह, सं.रा. येथे). पुढारी वर्तमानपत्राचा डॅलस, टेक्सस, सं.रा. येथे आहे. आजानुकर्ण यांनी दुवा दिला तेव्हा ते कुठल्या देशात होते? म्हणजे कुठल्या देशाचा प्रत-अधिकार कायदा इथे लागू आहे? हा प्रश्नच आहे.
"उपक्रम" आणि "पुढारी" दोघांचे सेवादाते संयुक्त राज्यांमध्ये आहेत म्हणून बहुधा सं.रा. मधील कायदा लागू होईल. (असे माझे मत आहे.) असे असल्यास वाटल्यास आजानुकर्ण यांनी अंतर्गत उपचौकटीमधला दुवा दिला तरी हरकत नाही.
(विशेष : ९व्या मंडळाच्या न्यायालयाचा निर्णय कायदा म्हणून सं.रा.पैकी पश्चिमेकडच्या ९ राज्यांनाच लागू होतो. या राज्यांपैकी यूटाह नाही, टेक्ससही नाही. परंतु अशा परिस्थितीत कुठल्याही उच्च न्यायालयाचा निर्णय बाकी प्रदेशात मार्गदर्शक ठरतो. प्रत्यक्षात जर कोणाला स्वत:च्या प्रदेशात खटला भरायचा नसेल, तर हे मार्गदर्शन म्हणजे जवळजवळ कायदाच होऊन जाते.)
पूर्णपणे अवांतर कीस: कोणता कायदा लागू असण्याबाबत...
हा एक गहन प्रश्न आहे हे मान्य. आणि याबाबत काही निश्चित मत मांडण्याइतके कायद्यातल्या खाचाखोचांचे ज्ञान मला नाही. तसेच मुळात असा खटला उभा राहण्याची शक्यता किती, असा खटला उभारण्यात "पुढारी"ला कितपत स्वारस्य किंवा फायदा राहील हाही एक (पूर्णपणे वेगळा) प्रश्न आहे.
परंतु,
या प्रश्नाचे उत्तर
या प्रश्नाच्या उत्तराचा निवाडा करताना विचार करण्याचा एक घटक म्हणून कितपत ग्राह्य आहे याबद्दल थोडा साशंक आहे.
एक समांतर उदाहरण म्हणून, क्यूबाला जाऊन तेथे पैसे खर्च करण्यास (असा खर्च करण्यासाठी लागणार्या सामान्य अथवा विशेष परवान्याअभावी) बंदी घालणार्या अमेरिकेच्या कायद्याकडे पाहू. (असा परवाना काही मर्यादित परिस्थितीमध्येच देण्यात येतो. पर्यटन हे कारण त्यात मोडत नाही.)
कायद्यान्वये ही बंदी "अमेरिकेचे कायदे ज्यांना लागू आहेत अशा सर्व व्यक्तींना" लागू आहे. याचा अर्थ हा कायदा लागू होण्यास अमेरिकन नागरिक असणे अथवा क्यूबाला जाताना अमेरिकन भूमीवर हजर असणे आवश्यक नाही. भारतीय पासपोर्टधारी ग्रीनकार्डधारक मेक्सिकोला जाऊन तेथून पर्यटक म्हणून क्यूबास गेल्यास, तेथे त्याने पैसे खर्च केल्यास आणि नंतर (अमेरिकेत परत येताना किंवा आल्यानंतर कधीही) पकडला गेल्यास त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. "क्यूबास जाणारे विमान पकडताना मी मेक्सिकन भूमीवर होतो" अथवा "पैसे खर्च करताना मी क्यूबन भूमीवर होतो", आणि "मी अमेरिकन नागरिक नाही, क्यूबास जाणारे विमान पकडतानाही नव्हतो आणि क्यूबात पैसे खर्च करतानाही नव्हतो" यांपैकी कोणताही युक्तिवाद अशा व्यक्तीने केल्यास तो येथे ग्राह्य धरला जाणार नाही. केवळ "ग्रीनकार्डधारक" अर्थात "अमेरिकेचा कायम रहिवासी" या नात्याने "अमेरिकेचे कायदे ज्यांना लागू आहेत अशा सर्व व्यक्तीं"मध्ये ती व्यक्ती मोडते, एवढेच येथे ग्राह्य धरले जाईल. अमेरिकेतील परदेशी विद्यार्थी आणि एच१-बी व्हिसाधारक हे अमेरिकेचे कायम रहिवासी नसले, तरी या कायद्याचा विचार करताना "दीर्घकाळाकरिता सामान्य रहिवासी आणि/किंवा करदाते" या नात्याने त्यांची गणना "अमेरिकेचे कायदे ज्यांना लागू आहेत अशा सर्व व्यक्तीं"मध्ये होईल की नाही याबद्दल खात्री नाही, परंतु बहुधा व्हावी असे वाटते. (टीप: ही बंदी क्यूबास जाण्याकरिता नाही; केवळ क्यूबात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पैसे खर्च करण्यावर आहे.)
दुसरे समांतर उदाहरण घ्यायचे झाल्यास, अमेरिकेच्या प्राप्तिकरनियमांप्रमाणे अमेरिकेचे नागरिक आणि प्राप्तिकरआकारणीकरिता अमेरिकेचे रहिवासी मानल्या गेलेल्या व्यक्ती (ग्रीनकार्डधारी आणि कोणत्याही एका करआकारणीच्या वर्षात निम्म्याहून अधिक काळ अमेरिकन भूमीवर उपस्थित असलेल्या किंवा सामान्य रहिवास असलेल्या सर्व व्यक्ती) या जगाच्या पाठीवर कोठेही राहत असल्या आणि जगाच्या पाठीवर कोठेही त्यांचे उत्पन्न असले, तरी त्यांनी (त्यांचे एकूण उत्पन्न हे रिटर्न फाइल करण्याची आवश्यकता नसण्याकरिताच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक असल्यास) अशा सर्व उत्पन्नाकरिता अमेरिकन करअधिकार्यांकडे रिटर्न फाइल करणे आणि त्यावर आकारणीयोग्य असलेला कर भरणे (अथवा त्या मिळकतीवर इतर देशातही करआकारणी होत असल्यास आणि अमेरिकन कराची रक्कम अधिक असल्यास त्या देशातील कर आणि अमेरिकन कर यांच्यातील फरक भरणे) हे आवश्यक ठरते. (कायद्याच्या तपशिलांच्या समजुतीत माझ्या काही त्रुटी निघाल्यास चूभूद्याघ्या.) अशी कोणतीही व्यक्ती ही "असे उत्पन्न मिळवताना मी अमेरिकन भूमीवर नव्हतो" (आणि त्याचबरोबर "अशा उत्पन्नाचा स्रोतही अमेरिकन भूमीवर नाही") या सबबीखाली पळवाट काढू शकत नाही.
थोडक्यात, कायद्याचे उल्लंघन झाले की नाही याचा विचार करताना, असे उल्लंघन मानले जाऊ शकणारी कृती घडत असताना ती कृती करणारी व्यक्ती ज्या ठिकाणी उपस्थित होती, त्या ठिकाणी तो कायदा लागू आहे की नाही हा मुद्दा कितपत ग्राह्य आहे, हे प्रत्येक कायद्यावर अवलंबून रहावे. कोणतेही सरसकट अनुमान काढता येईल असे वाटत नाही. काही कायद्यांच्या बाबतीत हे कृती जेथे घडली त्यावर अवलंबून रहावे, तर काही कायद्यांच्या बाबतीत कृती कोणी केली यावर अवलंबून रहावे. (भारत आणि अमेरिका यांपैकी कोणत्या देशाचा प्रताधिकारकायदा यांपैकी कोणत्या प्रकारात मोडतो याबद्दल निश्चित कल्पना नाही. आणि यदाकदाचित दोन्ही कायदे लागू होऊ शकत असल्यास आणि त्यांच्यात तफावत असल्यास नेमक्या कोणत्या कायद्याचे प्राधान्य मानले जाईल, याबद्दलही कल्पना नाही.)
प्रस्तुत उदाहरणात "आजानुकर्ण यांनी दुवा दिला तेव्हा ते कोणत्या देशात होते" आणि "एक भारतीय नागरिक म्हणून या बाबतीतील भारतीय कायदे आजानुकर्ण यांना लागू होऊ शकतील का" यापैकी कोणता मुद्दा या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल, हा कठीण प्रश्न आहे. (याशिवाय "असा खटला (उभा राहिल्यास) कोणत्या देशाच्या न्यायालयात दाखल झालेला आहे" यानेही या प्रश्नाच्या उत्तरात फरक पडावा असे वाटते. "पुढारी" हे -प्रकाशनाचा सर्वर कोणत्याही देशात असला तरी - मूलतः भारतातील प्रकाशन असल्यामुळे, खटला उभा करायचा झालाच, तर तो भारतातील न्यायालयातही विनाअडचण उभा करू शकते असे वाटते.)
आंतरजालाबाबत जटिल प्रश्न पण पुस्तकांबाबत सोपा
भारत आणि सं.राज्ये दोन्ही देश बेर्न करारात सहभागी आहेत.
बेर्न कराराच्या अनुसार सभासद देश एकमेकांनी दिलेले प्रत-अधिकार (म्हणजे "अमुक व्यक्तीपाशी अमुक कृतीचा प्रत-अधिकार आहे") मान्य करतील. पण तपशीलवार कायदा मात्र ज्या देशात प्रकाशन किंवा प्रकटन झाले आहे, त्या देशाचा लागू होईल.
म्हणजे पुस्तकाचा लेखक किंवा चित्रपटाचा निर्माता भारतात असेल, तर सं.राज्यांत त्या मालकाची मालकी मान्य केली जाईल. पण जर सं.राज्यात कोणी ते पुस्तक विनापरवाना प्रकाशित केले, त्याच्या प्रती काढल्या, किंवा चित्रपट विनापरवाना प्रदर्शित केला, तर कायदा सं.राज्यांचाच लागू होईल.
(म्हणजे मालकी-हक्काचे मूळ भारतात असले, तरी कायद्याचे तपशील, दंड वगैरे सं.राज्याच्या कायद्याप्रमाणे.)
म्हणजे तपशीलवार कायदा लागू होतो जिथे कृती घडली त्या ठिकाणचा. (कृती कोणी केली त्याच्या नागरिकत्वाचा संबंध नाही. मालकाच्या नागरिकत्वाचा संबंध नाही.)
पुस्तक, चित्रपट यांच्याबाबतीत "प्रत कुठे काढली" हा प्रश्न सोपा आहे. मात्र आंतरजालीय देवाणघेवाणीमध्ये "कृती कुठे घडली?" हा प्रश्न जटिल आहे. म्हणून बेर्न करारानुसार काय सांगितले जाते, ते स्पष्ट नाही.
परंतु - जर अनुदिनी लिहिणारा सं.राज्यांत असेल, वाचणारा सं.राज्यांत असेल, सेवादाता सर्व्हर सं.राज्यांत असेल, समजा. "पुढारी"चा निर्माता भारतात असला, त्याच्या हक्काचा स्रोत भारताचा कायदा आहे, समजा. तरी बेर्न करारानुसार खटला भारतात भरला जाऊ शकणार नाही. पण "पुढारी निर्मात्यांचा हक्क आहे" इतपतच भारताच्या कायद्याचा संबंध लागू होतो. सं.राज्यांचे सरकार बेर्न करारानुसार "असा हक्क आहे" असे मान्य करून पुढे स्वतःचा राष्ट्रीय कायदाच तपशीलवार लागू करेल.
प्रकाशन आणि प्रत काढण्याची कृती, म्हणजे जर "सेवादात्या संगणकावर आकडेप्रत साठवणे" असेल, तर कृती बहुधा सेवादात्या संगणकाच्या देशात होत आहे. पण हा सर्व प्रकार अजून गढूळ आहे - मान्य.
भारताचा कायदा याबाबतीत काय म्हणतो? भारतीय न्यायालयांनी कुठले निकाल दिले आहेत? भारतातील कायदा जर साधारणपणे सं.राज्यातील कायद्याला समांतर असेल तरी प्रश्न मिटला.
जर भारतीय कायदा आज काहीच म्हणत नसेल, तर सं.राज्यांतील खटल्याचा निकाल मार्गदर्शक ठरावा. (भारतातील न्यायालयांमध्ये परदेशी न्यायालयांमधले निकाल उपयुक्त सहायक माहिती म्हणून ग्राह्य मानले जातात.)