मराठी शुद्धलेखन

मित्रहो

सध्या मराठीतून केलेले खूपच नवनवीन लेखन अनेक ब्लॉग्ज मधून वाचायला मिळते.
एक गोष्ट मला नेहमी खटकते ती म्हणजे शुद्धलेखन. इतक्या प्राथमिक दर्जाच्या चुका आढळतात की वैताग येतो. या बाबतीत काहीतरी करणे आवश्यक आहे. तरच इंटरनेट वरील मराठी लेखांचा दर्जा सुधारेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

पहिले पाढे पंचावन्न

सध्या मराठीतून केलेले खूपच नवनवीन लेखन अनेक ब्लॉग्ज मधून वाचायला मिळते.

हो हे खरेच

एक गोष्ट मला नेहमी खटकते ती म्हणजे शुद्धलेखन. इतक्या प्राथमिक दर्जाच्या चुका आढळतात की वैताग येतो.

काहि "प्राथमिक" दर्जाच्या चुकांची उदाहरणे द्याल का? चर्चा करायला सोपे जाईल.

या बाबतीत काहीतरी करणे आवश्यक आहे. तरच इंटरनेट वरील मराठी लेखांचा दर्जा सुधारेल.

शुद्धलेखनाने लेखांचा दर्जा ठरतो हि नवी माहिती मिळाली. तुम्हाला काय वाटते यावर काय उपाय करता येईल?

'इंटरनेट' वरील मराठीचा दर्ज आपणास कसा वाटातो?

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

ही घ्या उदाहरणे

शुद्धलेखनाने लेखांचा दर्जा ठरतो हि नवी माहिती मिळाली.
'इंटरनेट' वरील मराठीचा दर्ज आपणास कसा वाटातो?
सन्जोप राव
"मूढांचे सम्राटपद मिरवतांना आम्हाला प्रज्ञावंतांच्या पंक्तीत स्थान नाही याचे शल्य सतत विद्ध करत असते. उत्तरनगरात चालणारी मीमांसा आमच्या आकलनाबाहेरची असली तरी तिथली आभा आम्हाला नित्य आकर्षित करत असते." - निशापती महाराज

धन्यु!

धन्यु!
ह्या चुकांचा दर्जा प्राथमिक आहे हे कसे कसे आणि कोणी ठरविले?

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

मराठी शुद्धलेखन

चन्द्रशेखर

उदाहरणार्थ आपल्या प्रतिसादात आपण लिहिलेला हि. माझ्या मते ही पाहिजे.

एक उदाहरण

>> काहि "प्राथमिक" दर्जाच्या चुकांची उदाहरणे द्याल का? चर्चा करायला सोपे जाईल.

उदाहरण म्हणून हा ब्लॉग पाहा
बोलने कमी लिहिने जास्त..

जोश्यांचा कार्टा

अहो जोश्यांचा कार्टाच असे लिहू लागल्यावर इतरांनी काय करावे?

-राजीव.

लेखकाने

आधी आपले सदस्यनाम मराठीत लिहावे.

आणि मला वाटते...

मला वाटते की चन्‍द्रशेखर हे सदस्यनाम मराठीतच आहे, फक्त ते रोमन लिपीत आहे. तत्त्वत: कुठलीही भाषा कुठल्याही लिपीत लिहिता येते. आणि, तसे लिहिणे अशुद्ध समजले जात नाही.
पूर्णविरामानंतर 'आणि' लिहिता येते हे दाखवण्यासाठी वरील उदाहरण पुरेसे आहे.
खालील उदाहरणांत 'आणि' विविध विरामचिन्हांच्या नंतर आले आहे. :
राम गेला शाळेत, आणि गोविंदा गेला फिरायला.
राव राहतो वाड्यात; आणि रंक झोपडीत.
हा आजारी माणूस, अंगात ताप असताना प्रवासाला गेला? आणि तेही एकट्याने? --वाचक्‍नवी

एक गोष्टच

एक गोष्ट मला नेहमी खटकते ती म्हणजे शुद्धलेखन.

एकच गोष्ट मला पण नेहमी खटकते. ती म्हणजे इथे पात्रता नसलेल्या काही काही ढुढ्ढाचार्या माझ्या लेखनातील व्याकरणाच्या असलेल्या व नसलेल्या चुका काढतात. हे त्यांचे व्याकरण प्रेम की लांगुलचालनाच्या हेतुने केलेली अंतरजालीय कंपुबाजी?

मी तर प्रत्येकाने स्वतःचे व्याकरण केवळ मराठी भाषेवरील प्रेमापोटी स्वत: जमेल तसे सुधारावे ह्या विचारांची आहे जेणेकरून इतर भाषिक जे मराठीचा अभ्यास करीत असतील त्यांच्या पुढे चांगल्या मराठीचा एक आदर्श उभा राहिल. मात्र इतरांनी फारच वाटले तर व्य.नि. पाठवावेत पण कंपुबाजीचा भाग म्हणून जाहिर आरोप करणे टाळावे. त्यातून मराठीवरचे प्रेम न दिसता वेगळाच कुजकटपणा दिसतो. असो.

मराठी लेखन व्याकरणशुद्ध असावे असे मला पण वाटते. खरोखरच मायमराठी चिंध्यांचे वस्त्र लेऊन उभी असलेली मला तरी आवडणार नाही.

____________________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद

करण्यात आला आहे महाराज."

"संतोष. परम संतोष."

जाहिर?

जाहिर हा शब्द जाहीर असा लिहा.

आणि कंपुबाजी नाही, कंपूबाजी असे हवे.

- राजीव.

मात्र

पूर्ण विरामानंतर "आणि" लिहायची पद्धत ज्याक ह्यांनी विकसित केलेली दिसत आहे., का बिचार्‍याने इंग्रजी व्याकरणाकडून उधार घेतली?

_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद

करण्यात आला आहे महाराज."

"संतोष. परम संतोष."

काही मजकूर संपादित.

:)

दिसत आहे., का

पुर्णविरामानंतरच्या स्वल्पविरामापेक्षा बरे नाहि का?

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

पण

तो तर अर्धविराम होतो ना? वरदाताईंचे मत ह्यावर लक्षात घेणे उचित ठरेल.

जाता जाता : मागे मिसळपावावर आपली खरडचर्चा झाली होती तेव्हा मी आपल्याला म्हटले होते की ऋषिक म्हणजे हीन प्रतीचा आणि त्याचा ईश म्हणजे.... तरी आपले नाव हृषिकेश करावे हे चांगले.
_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद

करण्यात आला आहे महाराज."

"संतोष. परम संतोष."

मी ऋषिकेश

हीन प्रतीचा ईश असा त्याचा अर्थ न होता.. हीन प्रतीच्या लोकांचा ईश..
हीन आणि श्रेष्ठ हे माणसाने माणसाला चिकटवलेले गुण आहेत. काहि स्वतःला विनाकारण श्रेष्ठ समजणारे लोक इतरांना हीन समजतात ( काहि दीडशहाणे तर कधी कधी तर हीन ईश म्हणून इतरांची जाहिर हेटाळणीसुद्धा करतात).. अश्यावेळी त्या हीन समजल्या जाणार्‍यांकडे जो आपुलकीने पाहतो, त्यांना मदत करतो.. त्याच्यातच इश्वरी अंश असतो...

वैष्णव जन तो तेणे कहिए जे पीड पराई जाने रे....

तेव्हा असे काहि श्रेष्ठत्त्वाचा टेंभा अकारण मिरवणारे मुठभर लोक जेव्हा एखाद्याला हीन म्हणतात तेव्हा त्या श्रेष्ठ म्हणवणार्‍यांचे हीनत्त्व दाखवण्यासाठी ऋषिकेशचा जन्म होतो..

(मी!)ऋषिकेश
------------------
; हे चिन्ह मी अर्धविराम म्हणून वापरतो. "., "हे नव्हे

+१ सहमत

काय बोललात... व्वा !

काहि स्वतःला विनाकारण श्रेष्ठ समजणारे लोक इतरांना हीन समजतात

व्यक्तिगत स्वरूपाचा मजकूर संपादित. कृपया व्यक्तिगत टीका टिप्पणी करू नये.
_________________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? ““नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

वरदाताई?

ह्या वरदाताई म्हणजे मी नसून कोणी वेगळ्या असतील तर ह्यापुढील मजकूर कृपया खारीज समजावा.
मात्र ही वरदाताई म्हणजे मी असल्यास माझ्या नावाच्या उल्लेखाचा संदर्भ काय? सृष्टीलावण्या ह्या व्यक्तीशी माझा आजवर व्य. नि. तून, इमेलमधून, चॅटद्वारे, फोनवर वा प्रत्यक्ष असा कोणताही संपर्क, संबंध आलेला नाही व विरामचिन्हांच्या बाबतीत माझे ज्ञान किती आहे ह्याबद्दल त्यांना काही कल्पना असण्याचे कारण नाही. तेव्हा माझे नाव विनाकारण मध्ये आणू नये ही सृष्टीलावण्यांना विनंती.

खुलासा

मात्र ही वरदाताई म्हणजे मी असल्यास माझ्या नावाच्या उल्लेखाचा संदर्भ काय?

आपले नाव घेण्यामागे कोणताही व्यक्तिविशेष उल्लेख नसून कोणत्यातरी खरोखरच्या तज्ज्ञ व्यक्तीचे मत विचारात घ्यावे अशी ह्या मागची भूमिका आहे. तसेच केवळ आपलेच नाव उपक्रमावर मी घेतलेले नसून आपल्या बरोबरच मीराताई फाटक व श्री. महेश वेलणकरांचे नावही वेळोवेळी घेतलेले आहे. (संदर्भासाठी कृपया वाचक्नवी यांची खव पाहावी). ही भूमिका घ्यायचे कारण की मनोगतावर मला आपण तिघेही मराठी व्याकरणाचे उत्तम जाणकार वाटलात. बाकीचे "उथळ पाण्याला खळखळाट फार" ह्याचाच प्रत्यय देणारे वाटले. असो.

अनावश्यक वाद टाळण्यासाठी पुढील वेळेपासून मी आवश्यक ती काळजी घेईन. :)

सृष्टीलावण्या ह्या व्यक्तीशी माझा आजवर व्य. नि. तून, इमेलमधून, चॅटद्वारे, फोनवर वा प्रत्यक्ष असा कोणताही संपर्क, संबंध आलेला नाही

खरे आहे आणि तो तसा यावा ह्याची आवश्यकता पण नाही. समजा, उद्या जर मी कोणत्याही शिवकालीन मराठ्यांच्या इतिहासावर निनाद बेडेकर / बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे मत विचारात घ्यावे असे म्हटले तर त्याचा अर्थ असा नव्हे की आमचे एकमेकांशी बोलणे होते, आमचा घरोबा आहे किंवा ते मला ओळखतात.

त्याचा सरळ, सोपा, सुस्पष्ट अर्थ इतकाच की मला ते त्या विषयातील अधिकारी / जाणकार वाटतात. त्यांच्या नुसत्या उल्लेखाने जर कोणाच्या नाकाला मिरच्या झोंबल्या तर मी म्हणेन की हा शुद्ध बालिशपणा आहे. अशी लोकं पुलंच्या भाषेत वैषम्ययोगावरच जन्माला आली आहेत असे म्हणावे लागेल. तरी आपणांस विनंती की आपण आपला केलेला उल्लेख व्यक्तिगत घेऊ नये. (Nothing personal)

तेव्हा माझे नाव विनाकारण मध्ये आणू नये ही सृष्टीलावण्यांना विनंती.

वर म्हटल्याप्रमाणेच मी इथून पुढे काळजी घेईन. आपले नाव घेण्याऐवजी तज्ज्ञ / अधिकारी व्यक्तिचा सल्ला घ्यावा असे म्हणेन ;) (मग "जलने वाले अपने आप जलके खाक हो जाएँगे" ) कृपया गैरसमज नसावा. कळावें.

__________________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? ““नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

वा!वा!

वरदाताईंचे मत ह्यावर लक्षात घेणे उचित ठरेल.
वरदाताई या विरामचिन्हे कशी काढावीत हे सांगणार्‍या विशेषज्ञ आहेत ही माहिती नव्यानेच समजली.
आपले नाव हृषिकेश करावे हे चांगले.
परत शुद्धलेखनाची चूक! निदान, हृषीकेश हा शब्दतरी शुद्ध लिहायला हवा होतात. सृष्टिलावण्यातला 'ष्टि' कसा काढायचा हेही वरदाताई/मीराताई/महेशभाऊंना विचारावे ही नम्र विनंती.
हरिणाक्षी म्हणजे हरिणासारखे डोळे असणारी, चारुकेशी म्हणजे सुरेख केस असणारी, तर ऋषिकेश म्हणजे ऋषीसारखे केस असणारा का असू नये? फार काय, गंगाकाठच्या त्या तीर्थक्षेत्राचे नाव, मला वाटते, ऋषिकेश आहे, हृषीकेश नाही.--वाचक्‍नवी

वा, वा, वा!

वरदाताई या विरामचिन्हे कशी काढावीत हे सांगणार्‍या विशेषज्ञ आहेत ही माहिती नव्यानेच समजली.

आयुष्य प्रत्येक क्षणाला काहीतरी शिकवतच असते. आपण शिकलात हे पाहून मी धन्य झाले. आपली ज्ञानतृष्णा थोर आहे.

सृष्टिलावण्यातला 'ष्टि' कसा काढायचा हेही वरदाताई/मीराताई/महेशभाऊंना विचारावे ही नम्र विनंती.

ह्या बाबतीत आपली खरडचर्चा चालूच आहे. नव्याने काय लिहिणे...

_________________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? ““नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

हुं

परत शुद्धलेखनाची चूक!

चुका एक का अनेक सापडतील. मात्र त्याचे कारण माझी मायमराठीविषयी उदासिनता नसून माझ्यात असलेला "लेखन अक्षमता" (डिस्ग्राफिया) हा अंगभूत दोष आहे. ज्यामुळे देवनागरी लिखाणात ठ, ढ, द, किंवा रोमन लिपी लिखाणात b, d, p, q ह्यांमध्ये गल्लत होणे, र्‍हस्व-दीर्घाच्या चुका घडतात. बरेचदा लिहिताना शब्दातील अक्षरांची अदलाबदल सुद्धा होते. इतर व्यवहारात स्त्रीलिंग-पुल्लिंग, डावे-उजवे ह्यात गोंधळ होणे तसेच व्यक्तिंचे चेहरे लक्षात न ठेवता येणे अश्या गोष्टी घडतात. तरीही मी जमेल तितके शुद्ध लेखन करण्याचा प्रयत्न करतेच करते. त्यासाठी जमेल तितके काळजीपूर्वक लिहिते. तरीही कधी कधी चुका घडतातच.

मात्र ह्याच कारणासाठी मी कोणाच्याही अशुद्धलेखन चुका काढल्याचे आपण आजपर्यंत पाहिले नसेल.
___________________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? ““नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

व्यक्तिविशेषांची नावे, लेखन आणि उच्चार तो व्यक्ती सांगतो तसा

याबद्दल मराठीमधील नियम असाच असावा असे वाटते.

पण संस्कृतात तरी या प्रकारची चर्चा व्याकरणकारांनी केलेली आहे. पस्पशाह्निकात पतञ्जली कथा सांगतात, की ज्यांचे नाव नियमाप्रमाणे "यद्वान" आणि "तद्वान" असावे, त्या माननीय ऋषींची नावे "यर्वाण" आणि "तर्वाण" आहेत - ते योग्य आहे. तर व्यक्तींची नावे कशी असावीत ते व्युत्पत्तीवरून ठरत नसल्याचे पतञ्जलींचे मत दिसते. तसेच दुसर्‍या आह्निकात लृफिड आणि लृफिड्ड अशी काहीसुद्धा व्युत्पत्ती नसलेली व्यक्ति-विशेष-नावे कोणी वाटल्यास ठेवू शकतो, याबद्दल पतञ्जलींनी चर्चा केली आहे.

पाणिनींनी "संज्ञायाम्" असे विशेष सांगून कित्येक शब्द दिले आहेत - ते फक्त विशेषनाम म्हणून वापरात वेगळे दिसतात, आणि त्यातील घटकांचा अर्थ त्या संज्ञेच्या व्यक्तीला लागू होत नाही. त्या अर्थाने व्युत्पन्न शब्दांची रूपे मात्र नेहमीच्या नियमाप्रमाणेच होतात.

विशेषनाम असले, तर नाम धारण करणारा व्यक्ती जसा सांगेल तसा उच्चार आणि तसे लेखन इष्ट. नाहीतर आमच्या शेजारच्या हळदणकर काकांना "तुमचे मूळ गाव 'हळदोणे' आहे, म्हणून आम्ही तुम्हाला 'हळदोणकर' म्हणू!" अशी गडबड व्हायची. कोणी 'साठ्ये', कोणी 'साठे', कोणी 'साठये' आडनाव लावत असेल, त्यांना "तुम्ही चूक-नाव बदला" म्हणायचा अधिकार कोणाला आहे?

आता उदाहरणादाखल "ऋषिकेश" नाव घेतले - ऋषिकेश या व्यक्तिविशेष नावाला अर्थ असावा किंवा हे नाव ऐकून कुठला स्फूर्तिकारक बोध व्हावा, याबद्दल त्या व्यक्तीचे मत सर्वात महत्त्वाचे. ऋषिकेश नावाचे अनेक लोक असतील, तर ऋषिकेश क्रमांक ४ चे मत ऋषिकेश क्रमांक ५ यालाही लागू नाही.

आता "ऋषिकेश" या ऐतिहासिक नावाबद्दल आणि संस्कृतातील त्याच्या वेगवेगळ्या व्युत्पत्तींबद्दल. हे माझ्या मते अवांतर असले, तरी हे अवांतर का आहे? हे सिद्ध करण्यासाठी तपशील देत आहे.

वर वाचक्नवी यांनी काही वेगवेगळ्या व्युत्पत्ती दिल्याच आहेत. गंगेच्या काठावरती एक मोठे गाव आहे, त्याचे नाव "ऋषिकेश" असे आहे - त्यांनी सांगितलेला हा तपशील योग्यच आहे. या गावातील कित्येक संस्कृत पंडितही त्याचे नाव "ऋषिकेश" असेच लिहितात. तसेच वाचक्नवी यांनी दिलेली ऋषीचा केश = ऋषिकेश ही व्युत्पत्ती सोपी आणि मनात प्रथम येणारी आहे.

ऋषिक शब्दाचा अर्थ "हीन" असा सृष्टिलावण्या यांनी दिलेला आहे. ऋषिक या शब्दाची ऋषि+ (निंदार्थक) क (अर्थ - हीन ऋषी) अशी फोड करता येते. (पण ऋषिक म्हणजे केवळ हीन - ऋषी नाही - अशी फोड मला माहीत नाही.) मोनिएर विल्यम्स यांच्या शब्दकोशातही हा "हीन ऋषी" अर्थ सापडतो. परंतु त्याच शब्दकोशात "ऋषिका" हे एका नदीचे नाव होते, असेही सापडते.
ऋषिका+ईश = ऋषिकेश -> ऋषिका नदीचा अधिपती असाही अर्थ निघतो.

ऋषिक नावाचे एक लोकविशेष होते, असे आपल्याला दिसते. दिग्विजय करताना अर्जुनाने या लोकांवर विजय मिळवला (तसा खूप-खूप देशांवर विजय मिळवला - ते सर्व वाईट लोक नव्हते). हे लोक शूर असावेत. बाकी राज्यांबद्दल सभापर्वातील २४व्या सर्गात फक्त नामोनिर्देश केला आहे. ऋषिक लोकांबाबत मात्र दोन श्लोक आहेत :
२.२४.२४ :
लोहान्परमकाम्बोजानृषिकानुत्तरानपि ।
सहितांस्तान्महाराज व्यजयत्पाकशासनिः ॥
२.२४.२५
ऋषिकेषु तु संग्रामो बभूवातिभयंकरः ।
तारकामयसंकाशः परमर्षिकपार्थयोः ॥
२.२४.२६
स विजित्य ततो राजन्नृषिकान्रणमूर्धनि ।
शुकोदरसमप्रख्यान्हयानष्टौ समानयत् ॥

अर्जुनाला युद्ध देण्याच्या लायकीचा ऋषिकांचा हा तेजस्वी राजा सुद्धा ऋषिकेशच म्हणावा.
हे युद्ध झाल्यानंतर ऋषिक लोक नाहिसे झाले नाहीत. व्याकरणमहाभाष्यात ऋषिक लोकांचे जनपद "आर्षिक" आहे, असे उदाहरण दिले आहे. (पा.सू ४.२.१०४वरील भाष्य) महाभारतानंतरही टिकलेल्या या ऋषिकांचे सर्व नेते "ऋषिकेश" म्हटले जाऊ शकतात.

- - -

सारांश : विशेषनामांसाठी मला वाटते त्या-त्या व्यक्तीलाच विचारून अर्थ, लेखनाची पद्धत आणि उच्चाराची पद्धत स्वीकारावी. कुठल्याशा एका व्युत्पत्तिजन्य अर्थाचा आरोप करून विशेषनाम चुकले आहे, असे म्हणणे कित्येकदा पटण्यासारखे नसते.

हेच म्हणते...

व्यक्तिविशेषांची नावे, लेखन आणि उच्चार तो व्यक्ती सांगतो तसा - याबद्दल मराठीमधील नियम असाच असावा असे वाटते.

माझ्या टोपणनावातील लावण्या हा शब्द मराठी भाषेतीलच आहे. म्हणून सृष्टीलावण्या हा शब्द पण मराठीच आहे. मराठीत सृष्टी हा दीर्घच लिहितात. मात्र आजपर्यंत तरी मी मराठीत कुठेही नदीकिनारी हा संधी नदिकिनारी लिहिला गेलेला पाहिलेला नाही. त्यामुळे सृष्टीलावण्याचे अट्टाहासाने सृष्टिलावण्या करण्याची गरज मला तरी वाटत नाही.

तसेच ह्या शब्दावर आक्षेप घेणार्‍यांना लावण्या हा शब्द कसा काय चालतो? कारण लावण्या हा शब्द पिकाच्या लावण्या ह्या अर्थीही योजला जातो. तो शब्द लावण्ण्या असा लिहा अशी कोणत्याही व्याकरण ढुढ्ढाचार्याने सूचना केल्याचे मी पाहिले नाही. ;)

___________________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? ““नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

लावण्या

'लावण्या' जर मराठी असेल तर तो शब्द लावणीचे अनेकवचन असला पाहिजे. लावणी म्हणजे एक मराठी काव्यविशेष किंवा लागवड किंवा मोजणी किंवा रचना. याशिवाय, हा मराठी शब्द 'लावणे' या नामधातूचे सामान्य रूप असू शकते वा लावणे या नामाचे संबोधन. व्यक्तिनामाचा जो अर्थ ती व्यक्ती सांगेल तो मान्य केला पाहिजे. सृष्टीबाईंना यांतला कुठला अर्थ अभिप्रेत आहे? ऋषिकेशांनी जो अर्थ संगितला तो आम्ही मान्य केला. इथेही तसेच व्हावे.
अवान्‍तर: 'दुढ्ढाचार्या' असा लिहितात. दोनतीनदा चुकलेला दिसला म्हणून शेवटी सांगावे लागते आहे. माफी असावी.--वाचक्‍नवी.

अभिप्रेत अर्थ

सृष्टीबाईंना यांतला कुठला अर्थ अभिप्रेत आहे?

महानोरांच्या ओळी आहेत -

आषाढाला पाणकळा,
सृष्टी लावण्याचा मळा.

ज्यांना ह्या ओळींच्या मागची सौंदर्य दृष्टी कळेल त्यांना त्यातील अर्थही कळेल.

____________________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? ““नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

आता समजले..

महानोरांच्या कवितेत लिहिल्याप्रमाणे सृष्टी आणि लावण्या हे न जोडलेले दोन स्वतंत्र शब्द आहेत. केवळ डिस्ग्राफ़ियामुळे ते सलग उमटतात. आता मात्र महानोरांची कविता मिळवून वाचायला पाहिजे. त्यांना सृष्टी 'लावणे'मध्ये काय अभिप्रेत असावे? पेटवणे, टेकवणे, मांडणे, जुळवणे, पाठवणे, हाकलून देणे, बंद करणे, उरकणे, करणे, खोचणे, अडकवणे की अन्य काही? हे एकदा समजले की प्रस्तुत विशेषनामाचा अर्थ स्पष्ट होईल.--वाचक्‍नवी

एक उपाय

आता मात्र महानोरांची कविता मिळवून वाचायला पाहिजे. त्यांना सृष्टी 'लावणे'मध्ये काय अभिप्रेत असावे? पेटवणे, टेकवणे, मांडणे, जुळवणे, पाठवणे, हाकलून देणे, बंद करणे, उरकणे, करणे, खोचणे, अडकवणे की अन्य काही?

आपण ना. धों. महानोर ह्यांना मु. पो. पळासखेड, ता. जामनेर, जि. जळगाव येथे पत्र पाठवून त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ विचारू शकता. ते वाचकांच्या बालिश शंकाना पण न कंटाळता, न वैतागता उत्तर देतात असे ऐकिवात आहे. म्हणजेच तुमच्या शंकाना पण ते सविस्तर उत्तर देतील असे समजण्यास प्रत्यवाय नाही.

केवळ डिस्ग्राफ़ियामुळे ते सलग उमटतात.

लेखन अक्षमतेमुळे संधि होत नसतो. कार्यबाहुल्यातून वेळ मिळताच डिस्ग्राफियाचा अधिक अभ्यास करून मगच यथोचित विधाने करावीत म्हणजे अन्यजनांची दिशाभूल होणार नाही. आता खरे तर आमिरने आपल्यासाठी "तारे जमीन पर - भाग २" काढावा हेच उत्तम :)

ता. क. : सुरवातीला मी मिपावर सृष्टीलावण्य असे नाव घेतले होते. एका सन्माननीय सदस्याच्या विनंतीवरून त्याचे आकारान्त रूप केले कारण सृष्टीलावण्य हा मुलगा आहे असा त्यांचा गैरसमज झाला होता. असो. त्यांना अंतरजालीय राजकारणाचा त्रास होऊ नये म्हणून केवळ त्यांचे नाव इथे देण्याचे टाळत आहे. कलोअ.
________________________________________________________
गुरुदेव वैद्यराजांचे मुख शिखापतित झाले होते. त्यांच्या चक्षुंच्या परीघांवर जलसंचय झाल्यासारखा वाटत होता. क्षीण स्वरात ते उद्गारले, "महाराज, उत्तरनगरीचा मोह मला नाही, असे असत्यवदन मी तरी का करावे? पण महाराज, त्या नगरीतले ‘धरित्रीसौष्ठव’ मला सहन होत नाही."

मराठी शुद्धलेखन

मराठी शुद्धलेखन हा चर्चेचा प्रस्ताव मी मांडला, या मागे माझ्या मनात दुसर्‍यांच्या चुका काढणे अभिप्रेत नव्हते. इंग्रजीमधून टंकलेखन करताना 'टेक्स्ट एडिटर' जसे कोणत्याही शब्दाचे बरोबर 'स्पेलिंग' सुचवत जातो तशी सुविधा मराठी टंकलेखन करताना मिळाली तर कोणालाही शुद्ध मराठी लिहिता येईल. अशी सुविधा कोणाला माहिती आहे का? एवढेच मला जाणून घ्यावयाचे होते.
चन्द्रशेखर

मराठी हन्स्पेल पॅक

This comment has been moved here.

शुद्धलेखन ठेवा खिशात

वरील पुस्तक(संपादन : अरुण फ़डके) १०सें.वर्ग आकाराचे असून त्यात ११००० शब्द दिले आहेत.
मी हे छोटे पुस्तक खिशात नाही पण संगणकाशेजारी ठेवतो. मला ते फ़ार उपयोगी पडते.
शरद

प्रतिसादासाठी

जागा राखून ठेवत आहे. २-३ दिवसांत फुरसतीच्या वेळेत सविस्तर उत्तरे लिहिन.

कलोअ.
_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

"संतोष. परम संतोष."

शुद्धलेखन्

अय्योयो.
उपक्रमावर असे प्रतिसाद?

अनेक लोकांना नव्याने मराठी टंकताना अडचणी येत असतील. तसेच प्रत्येक संकेतस्थळाची कळवैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. तुम्ही कोणत्या संकेतस्थळावर आधी लिहायला लागलात यावरही बरेच अवलंबून असते. उदा. मी मिसळपाववर आधी लिहायला सुरुवात केली त्यामुळे अकारान्त शब्दाच्या शेवटी ए अक्षर टंकण्याची सवय नाही. त्यामुळे उपक्रमावर् माझे लेखन् असे दिसते. मला विशेष काळजी घ्यावी लागते.
सृष्टीलावण्या यांनी म्हटल्याप्रमाणे हळूहळू सुधारणा होत असते (मनात इच्छा असेल तर).
तसेच ज्ञ हे अक्षर मिसळपाववर मराठी उच्चारानुसारी द् + न्+ य् असे टंकता येते तर उपक्रमावर ज्+न् असे शुद्ध टंकावे लागते.

बाकी र्‍हस्व दीर्घाचे म्हणाल तर उच्चारानुसारी लेखन केल्यास र्‍हस्व दीर्घ योग्य होतात.

वा

शंतनू यांनी दिलेली माहिती नव्याने समजली. फारच चांगला उपक्रम आहे.
मनोगतावर शुद्धलेखन चिकित्सक आहे. पण तो कसा काम करतो या बद्दल माहिती नाही.

शुद्धलेखनाच्या चुका सदस्याच्या नजरेस आणून द्याव्यात (खरडितून अथवा व्यनीतून) आणि सदस्याने पुढल्या वेळेस त्या सुधाराव्यात हे मला फार चांगले वाटते. पण तसे अनेकदा होते असे नाही. माझे लेखन शुद्ध नाही पण ते शुद्ध असावे असे मला वाटते. कुणी चुक लक्षात आणून दिली आणि त्या मागचा काही नियम वगैरे सांगीतला तर मला फायदाच होतो.
--लिखाळ.

+१

शंतनू यांनी दिलेली माहिती नव्याने समजली. फारच चांगला उपक्रम आहे.

+१

शुद्धलेखनाच्या चुका होण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे खराटा यांनी सांगितल्याप्रमाणे की बोर्डवर हात बसायची पद्धत.. अथवा उसंडु प्रमाणे शब्द पुढे मागे होणे.. किंवा पुनरावलोकनाचा कंटाळा इ.अश्यावेळी हा शुद्धीचिकित्सक खूप मोलाची भुमिका बजावतो

माझे लेखन शुद्ध नाही पण ते शुद्ध असावे असे मला वाटते. कुणी चुक लक्षात आणून दिली आणि त्या मागचा काही नियम वगैरे सांगीतला तर मला फायदाच होतो.

+१
हे अगदी बरोबर.. मात्र चुक दाखवणार्‍याचा हेतू , स्थळ आणि भावना यावरून माझी चुक दाखवणार्‍याप्रती प्रतिक्रीया मात्र वेगळी असते.

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

बरोबर

हा हा .. खरे आहे ते..
व्यनीतून, खरडीतून माहिती म्हणून असे नियम,चुका सांगीतल्या तर बरे असे मी सुद्धा वर म्हणालो. :)
तुझ्या नावाबाबतचा धनंजयचा प्रतिसाद फारच छान आहे.
--लिखाळ.

पूर्वीच मांडलेला मुद्दा

व्यनीतून, खरडीतून माहिती म्हणून असे नियम,चुका सांगीतल्या तर बरे असे मी सुद्धा वर म्हणालो. :)

माझ्या ह्या लेखावरील अगदी पहिल्याच प्रतिक्रियेत मी हेच म्हटले आहे. माझा मुद्दा आपण दोघांनी अधोरेखित केल्याबद्दल शतश: धन्यवाद.

___________________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? ““नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

"संतोष. परम संतोष."

त्यात काय?

मराठी लेखन व्याकरणशुद्ध असावे असे मला पण वाटते. खरोखरच मायमराठी चिंध्यांचे वस्त्र लेऊन उभी असलेली मला तरी आवडणार नाही.

जे आपल्या शुद्धलेखनाच्या अज्ञानाच्या टिमक्या जाहीर वाजवतात त्यांना जाहीर चुका सांगण्यात कोणतीही चूक नाही. किंबहुना, अशा लोकांना जाहीरच सांगायला हवे आणि ते या किंवा मनोगत या संकेतस्थळावर सर्रास चालते.

संजोपरावांचे याबाबत आम्हाला कौतुक वाटते. त्यांना मराठीची इतकी कळकळ आहे की वाईटपणा घेऊन ते लोकांच्या चुका जाहीर दाखवतात.

-राजीव.

विशेष आभार

संजोपरावांचे याबाबत आम्हाला कौतुक वाटते. त्यांना मराठीची इतकी कळकळ आहे की वाईटपणा घेऊन ते लोकांच्या चुका जाहीर दाखवतात

या वैयक्तिक नामोल्लेखाबद्दल विशेष आभार. आपल्यासारखे स्नेही असल्यावर वैरी नसले तरी त्याचे शल्य वाटणार नाही.
सन्जोप राव
"मूढांचे सम्राटपद मिरवतांना आम्हाला प्रज्ञावंतांच्या पंक्तीत स्थान नाही याचे शल्य सतत विद्ध करत असते. उत्तरनगरात चालणारी मीमांसा आमच्या आकलनाबाहेरची असली तरी तिथली आभा आम्हाला नित्य आकर्षित करत असते." - निशापती महाराज

ऋषीक..

हृषीकेशमधला 'षी' र्‍हस्व लिहिण्याची हिंमत कुणी करीत असेल तर आपणही ऋषिकमधला षि दीर्घ करून पहावा असे मनात आले. तसे करून कोशांत शब्द पाहिला. काय मिळावे? ऋषीक म्हणजे एक प्रकारचे गवत. त्याला संस्कृतमध्ये काश, काशा, काशी किंवा काशतृणम्‌ असेही म्हणतात. इंग्रजीत हॅचग्रास; मराठीत कसाई, कसाड; हिंदीत कास, काही; गुजराथीत कांसडो आणि बंगालीत केशेघास. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Saccharum spontaneum असून या गवताचा उपयोग इतर प्रकारच्या गवतांबरोबर चटईसाठी केला जातो. वाळूत मिसळून बांधकामाला बळकटी आणण्यास आणि कागदनिर्मितीसही हे गवत कामाला येते.--वाचक्‍नवी

आवडले प्रतिसाद ! :)

चर्चा प्रस्तावापेक्षा प्रतिसाद अधिक माहितीपूर्ण वाटले ! :)

-दिलीप बिरुटे
(उगाच आनंदीत झालेला)

सुरेख चर्चा..!

सुरेख चर्चा..!

आपला,
(शुद्धलेखनप्रेमी!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर