कॅमेरा निवडीबाबत मदत -
नमस्कार,
सर्वप्रथम मी माझी त्रुटी मान्य करतो की मला या प्रस्तावामधे लिहायला फार कमी मराठी शब्द सापडतील.
माझ्याकडे पॅनासोनिक डीएम् सी एफ् झेड् २८ हा सूपर झूम आणि ब्रिज या प्रकारामधला कॅमेरा आहे. यामधे DSLR सारखी बरीच Functions आहेत.
पूर्णतः मॅन्युअल मोड हे मुख्य.
मी हा कॅमेरा निवडण्याचे कारण म्हणजे २८ मिमि ते ४८६ मिमि (३५ मिमि Equivalent) एवढी फोकल लेंग्थ आणि HD Movie.
आता जवळजवळ एक वर्ष हा कॅमेरा वापरल्यावर काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि त्यामुळे DSLR घेतल्यास उत्तम असे वाटले. त्या अगोदर आपल्या काहीजणांकडे DSLR असेल त्यांचे मत मला खूप उपयोगी पडेल. बरेच Reviews वाचल्यावर कॅनॉन ४५० डी हा एक उत्तम कॅमेरा आहे असे वाटते. परंतू कॅनॉन ४० डी पण त्याहीपेक्षा आकर्षित करतो असे वाटते.
वरील २ मॉडेल्स् वर आपले मत द्यावे. माझे अजून काही प्रश्न असे -
१) कॅनॉन की निकॉन ?
२) ऑटो फोकस हा DSLR मधे खूप गतिमान असतो का? कारण साधारण कॅमेरामध्ये तो Contrass Base असतो असे वाटते.
३) माझ्या कॅमेराची Sensor Size - १/१.८" आहे. साधारणतः DSLR ची Sensor Size - १/२.३३"असते. त्यामुळे Image Quality मधे खूपच फरक असेल का? विशेषतः कमी उजेडाच्या छायाचित्रणामधे?
- मित्र
Comments
मदत
मला सुद्धा अशीच मदत हवी आहे. :) मी स्वत: सुपर झुमकडे जास्त ओढला गेलो आहे. पण सगळे अभ्यासू मित्र डिएसएलार घे म्हणतात. माझ्याकडे निकॉन फिल्म एसएलाआर आहे. एफ ५५ आणि तो विकायचा आहे. (कोणी घेणार असेल तर :)).
या प्रस्तावावरचे प्रतिसाद मार्गदर्शक ठरतील असे वाटते.
+१
मलाहि अशीच मदत हवी आहे ते या प्रस्तावावरचे प्रतिसाद मार्गदर्शक ठरतील असे वाटते....
+१ :)
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
चार आणे....
मित्रा, आपल्याकडे असलेला प्रोझ्युमर कॅमेरा कधीच डीएसएलआरच्या गुणवत्तेचे फोटो देऊ शकत नाही. माझे उदाहरण द्यायचे झाले तर माझ्याकडे कॅनन एस टू आयएस कॅमेरा आहे. त्याने खूप उत्कृष्ट फोटो येतात असे मला बरेच दिवस वाटत होते. मान्य करायला वेळ लागला पण नंतर ३५० डी विकत घेतल्यावर सत्य समोर आले. दोन्ही कॅमेर्यांनी काढलेल्या फोटोत दिसताक्षणी फरक दिसून येतो. (सर्वात जास्त फरक डिटेल्स मध्ये, मोठ्या सेन्सरमुळे पडला.) कुणा तज्ञ्जाची आवश्यकताच नाही.
कॅमेरा निवडताना आपण कितीपर्यंत खर्च करायला तयार आहात हेच सगळ्यात महत्त्वाचे आहे. खर्चाची फारशी अट नसेल तर ४५० डी ऐवजी ४०डी अवश्य घ्यावा.( फारसा खर्च करायची इच्छा नसल्याने आम्ही साधा ३५०डी सेकंडहँड घेतला आणि बाकी पैसे बर्यापैकी लेन्स घेण्यात खर्च केले. काही वर्षांनी अपग्रेड करु :-) तुम्हाला देखील खूप व्यावसायिक नाही पण उत्तम फोटोग्राफी करायची असल्यास डीएसेलारचे एखादे बेसिक मॉडेल घेऊन लेन्सवर खर्च करु शकता. लेन्सवरच बहुतांश खेळ चालतो पण खर्चाची अट नसल्यास ४०डी घ्यायला हरकत नाही.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे! १)कॅननच...( माझे मत :-) भारतात ते निकॉनच्या खूपच पुढे निघून गेले आहेत) दोन्हीतला कोणता चांगला हा वाद जगाच्या अंतापर्यंत चालू ठेवता येईल.) २) ऑटो फोकसचा संबंध कॅमेर्याशी नसून लेन्सशी असतो. ऑटो फोकस आणि फोटोत दिसणारे रंग वगैरे लेन्सवर अवलंबून राहते.तर डिटेल्स वगैरे कॅमेर्यावर. ३) या प्रश्नाचे उत्तर वर दिलेच आहे. इमेज क्वालिटीत फरक पडतोच पडतो.
चाणक्य, तुम्हाला सूपरझूमचे आकर्षण का बरे वाटते आहे? जसे मेगापिक्सेलचे युद्ध कंपन्यांमध्ये सुरु आहे तसेच आता झूममध्ये सुरु झाले आहे. कॅननचे बरेच कॅमेरे सध्या २० एक्स झूम पुरवतात. निकॉनदेखील २४ झूमचा कॅमेरा आणला आहे. पण एवढे झूम वापरल्यावर फोटो हलण्याच्या शक्यतेचा विचार केलाच पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही २४ एक्स पूर्णपणे वापरत फोटो काढता तेव्हा हातातला कॅमेरा काही सेमी इकडेतिकडे हलला तर तिकडे फोटो फुटभर हललेला असतो. एसटूआयएसच्या १२ एक्सलाच ही समस्या जाणवत होती तर २४एक्सने काय होईल? शिवाय इमेज क्वालिटीतही फरक पडणारच! तुम्हीदेखील कॅमेरर्याचा वापर कसा करणार आहात याचा विचार करुनच निवड करण्याचा सल्ला मी देईन. मित्र म्हणतात म्हणून डीएसेलारच घ्यायला हवा असे नाही. डिएसेलारला लेन्सचा खर्च करावा लागतो हे लक्ष्यात जरुर घ्यावे. घरगुती सणसमारंभ, सहली अशांकरता फोटोग्राफी करायची असल्यास एखादा ब्रिज/प्रोझ्यूमर कॅमेरा घेण्यास काहीच हरकत नाही. (परत बजेट आणि तुमच्या गरजा हाच मुद्दा येतो )
हुश्श्...थोडीफार मदत झाली असेल अशी आशा करतो.
-सौरभ.
==================
नक्कीच
मदत नक्कीच झाली. डीएसएलआर सरस आहे हे मान्य आहेच. पण आपणा ऐवजी घरातल्या कोणाला वापरायचा असेल तर सुपर झुम असा एक विचार डोकावतो. पण आता मन डीएसएलआर कडे वळले आहे. तसे ही निकॉन पी ९० आणि डि ४० यांची किंमत आता जवळपास सारखीच आहे.
पी९० नको (माझे मत)
माझ्या एका मित्राकडे निकॉन पी ८० आहे. तो तितकासा चांगला नाही वाटला. त्यापेक्षा डी४० नक्कीच सरस आहे.
निकॉनने डी३०० बाजारत आणला व डी२०० बंद केला. तरीही डी२०० बाजारत नवा मिळतो. तो साधारण डी४०च्याच किंमतीला. तो मिळाल्यास तो नक्की घ्या. चांगला कॅमेरा आहे.
-
ध्रुव
:)
माझे सुद्धा मत आता असेच होत चालले आहे. डी ४० घ्यावा जमेल तेंव्हा आणि जोवर फिल्म मिळत आहेत तो वर मजा म्हणून एफ ५५ वापरावा.
माझेही चार आणे...
१) कॅनॉन की निकॉन ?
कोणताही. मी स्वत: निकॉन डी ४० वापरतो. या कॅमेराबद्दल माझं मत उत्तम आहे. पण या मध्ये एकच मोठा तोटा मला जाणवला तो म्हणजे, कॅमेर्यामध्ये फोकसींग मोटार नसणे. हेच डी४०क्ष व डी६० बाबत. कॅमेरा उत्तम आहे, पण काही स्वस्त किमतिच्या लेन्स (उदा: सिग्मा ७०-३००) यावर ऑटो फोकस होत नाहीत.
पण तुम्ही नवाच घेणार आहात (म्हणजे तुमच्या कडे जुन्या लेन्स नसतील तर)तर कॅनॉनचा ४०डी अथवा निकॉनचा डी९० हे दोन्ही कॅमेरे चांगले आहेत. थोड्या कमी बजेटमध्ये हवे असतील तर निकॉनचा नवा डी५००० अथवा कॅनॉनचा ४५०डी.
कॅनॉन ४५० डी/कॅनॉन ४०डी:
माझ्या अनेक मित्रांकडे कॅनॉन ४०डी आहे. मला तो ४५०डी पेक्षा खालील बाबींमध्ये सरस वाटतो:
१. high ISO performance
२. high fps
३. मजबूत बांधणी (alloy body)
बाकी फरक तुम्हाला येथे कळतील
२) ऑटो फोकस हा DSLR मधे खूप गतिमान असतो का? कारण साधारण कॅमेरामध्ये तो Contrass Base असतो असे वाटते.
ऑटो फोकस तुम्ही वापरणार्या लेन्सवर ठरतो. कॅनॉनच्या L प्रकारच्या लेन्सेस गतिमान आहेत. निकॉनबद्दल कल्पना नाही. गतिमान ऑटो फोकस असण्याची गरज बर्याचदा क्रिडा क्षेत्रात छायाचित्रण करणार्यांना जास्त उपयोगी ठरते. तसेच पक्ष्यांच्या छायाचित्रणातही फायदा होतो. आपले छायाचित्रण कोणत्या प्रकारात आहे हे बघा व तश्या लेन्सेस घ्या. सौरभ यांचे म्हणणे पटते. स्वस्त कॅमेरा व उत्तम लेन्सेस असणे फायदेशीर आहे.
३) माझ्या कॅमेराची Sensor Size - १/१.८" आहे. साधारणतः DSLR ची Sensor Size - १/२.३३"असते. त्यामुळे Image Quality मधे खूपच फरक असेल का? विशेषतः कमी उजेडाच्या छायाचित्रणामधे?
कमी उजेडाच्या छायाचित्रणामधे तुमच्या लेन्सची उघडीप(Aperture) किती आहे यावर सगळा खेळ आहे. f/1.4, f/1.8, f,2.4, f,4 अश्या लेन्स कमी प्रकाशात फार चांगल्या प्रकारे फोकस होतात.
-
ध्रुव
छान
मस्त :)
चर्चेकडे लक्ष ठेऊन आहे. प्रतिसाद उपयुक्त आहेत.
पुढे मागे काधीतरी डी४० किंवा त्यावरचा कॅमेरा घ्यायचा विचार आहे.
--लिखाळ.
बरीच मदत होत आहे............
सौरभदा आणि ध्रुव तुमच्या लिखाणामुळे खुपच मदत होत आहे.
४०डी हा ४५० डी पेक्षा मला नक्कीच सरस वाटतो. "पण स्वस्त कॅमेरा व उत्तम लेन्सेस असणे फायदेशीर आहे. " हे मला अतिशय पटले आहे. मी पण सेकंडहँड च घेणे पसंत करेन.
४०डी , ४५० डी किंवा ४००डी घेईन असे वाटते. आता बजेट प्रमाणे कोणता चांगला मिळतो बघू.
एक शंका -
कॅमेर्यामध्ये फोकसींग मोटार नसणे - ही उणीव ४०डी , ४५० डी किंवा ४००डी यामधे नाही का?
- मित्र
फोकसींग मोटार
कॅमेर्यामध्ये फोकसींग मोटार नसणे - ही उणीव ४०डी , ४५० डी किंवा ४००डी यामधे नाही का?
नाही. कॅनॉन घेण्याचा हा ही एक फायदा आहे. कॅनॉनच्या सर्वात कमी किंमतीच्या कॅमेर्यामध्येपण फोकसींग मोटार आहे. सिग्मा ७०-३०० सारख्या स्वस्त लेन्सेस यावर वापरता येतात.
सेकंड हँड कॅमेरा घेणार असाल व पुण्यात अथवा मुंबईत असाल तर येथे नक्की भेट द्या. कदाचित ओळखीतुन चांगला कॅमेरा स्वस्तात मिळेल.
-
ध्रुव
म्हणजे?
म्हणजे मी कॅनॉनच्या त्या कॅमेरावर माझ्या निकॉनची लेन्स वापरु शकेन का? प्रश्न खुपच बाळबोध आहे. पण शंका आहे म्हणून विचारले.
नाही...
तुम्हाला कॅननच्या कॅमेर्यावर निकॉनची लेन्स वापरता येणार नाही. निकॉन फिल्म कॅमेर्याच्या लेन्सेस निकॉन डिजीटलला वापरता येतात पण तेदेखील तपासून बघावे लागेल. थर्ड पार्टी लेन्स बनवणारे जसे की सिग्मा, टॅमरॉन यांच्या निकॉन आणि कॅनन माऊंटच्या लेन्स बर्याचदा वेगळ्या असतात किंवा मग त्या त्या त्या कॅमेर्यावर पूर्ण काम करत नाहीत. सिग्मा ७०-३०० तुम्ही निकॉनवर वापरली तर निकॉनला फोकसिंग मोटर नसल्याने ती ऑटोफोकस होणार नाही. तुम्हाला दरवेळेस मॅन्युअली फोकस करावे लागणार. कॅननचा मोठा फायदा फोकसींग मोटरचा आहेच शिवाय त्यांच्यासाठी लेन्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत शिवाय निकॉनच्या लेन्स महाग असतात असेही वाटते. निकॉन लेन्सच्या किंमतींबाबत ध्रुव अधिक माहिती देऊ शकतील.
-सौरभ.
==================
असे म्हणता येईल का?
मग असे म्हणता येईल का, की, निकॉनपेक्षा कॅनॉन लेन्सच्या बाबतीत थोडा उजवा आहे. फिल्म कॅमेराच्या लेन्स डिजीटला ऑटोफोकस मोड मध्ये वापरता येतात.
असंच काही नाही
निकॉनच्या आत्तापर्यंतच्या सर्व लेन्सेस डिजीटल एसएलआर वर वापरता येतात. फक्त मॅन्युअल मोड मध्ये. पण जुन्या लेन्सेस वाया जात नाहीत.
येथे वाचा
कॅनॉनचे तसं नाही हे इथे कळले.
लेन्सच्या बाबतीत कोण सरस हे सांगणे अवघड आहे. निकॉनच्या f/२.८ अथवा f/४ या लेन्सेस कॅनॉनच्या याच लेन्सेस पेक्षा शार्प आहेत असं ऐकलं आहे. पण अश्या लेन्स (दोन्ही कॅमेर्याच्या) वापरल्या नाहीत त्यामुळे नक्की सांगता येणार नाही.
एक नक्की - कॅनॉनच्या मध्यम प्रकारच्या लेन्सेसमध्ये बर्यापैकी पर्याय जास्त आहेत ते निकॉनमध्ये कमी आहेत.
कॅनॉनच्या prime व zoom या दोन्ही प्रकारात f/२.८, f/४ अश्या लेन्सचे पर्याय जास्त आहेत, व कॅनॉनच्या या लेन्सेस निकॉनपेक्षा जरा स्वस्त आहेत. सर्वसामान्यांना थोड्या प्रतिक्षेनंतर या लेन्सेस परवडतात. निकॉनच्या जरा आवाक्याबाहेरच्या वाटतात.
-
ध्रुव
येतील...
कॅनॉन च्या फिल्म व डिजीटल दोन्ही कॅमेर्यांवर निकॉनच्या सर्व लेन्सेस वापरता येतात.
येथे वाचा व येथे बघा
फक्त हा पर्याय छायाचित्राच्या image quality साठी किती चांगला हे माहित नाही कारण असं सहसा कोणी वापरलेले नाही.
सौरभ, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, सिग्मा अथवा टॅमरॉनच्या लेन्सेस दरवेळीच मॅन्युअल फोकस कराव्या लागतात असे नाही. डी४०, डी६० वर काही लेन्स मॅन्युअल फोकस कराव्या लागतात. सगळ्या नाही.सिग्मा, टॅमरॉन व टॉकिना या कंपनीच्या काही लेन्सेस निकॉन डी४० वर ऑटोफोकसही होतात, व चांगल्याही वाटतात. सिग्माची जुनी ७०-३०० मॅन्युअल आहे पण नवी लेन्स मात्र ऑटोफोकस होते.
तुम्हीच म्हणल्याप्रमाणे, बजेट व गरज या दोन गोष्टी बघून हवी ती वस्तु घेणे योग्य आहे. छंद म्हणून बघता निकॉन व कॅनॉन दोन्हीही माझ्या मते चांगले.
-
ध्रुव
धन्यवाद....
दुव्यांबद्दल धन्यवाद. अडॅप्टर लावून अशा प्रकारे लेन्स वापरता येतात हे माहित नव्हते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असे कोणी करणारच नाही. बर्याचदा लोकांना कॅनन आणि निकॉन यातले एकच काय तरी आवडते, त्याचा ते कट्टर पुरस्कार करतात आणि दुसर्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. :-)
सिग्मा आणि टॅमरॉनच्या लेन्सेस दरवेळी मॅन्युअल फोकस कराव्या लागत नाही हे खरेच! अन्यथा निकॉनला कसे परवडले असते?
-सौरभ.
==================