निसर्गदत्त महाराजांच्या प्रवचनातील् एक् उतारा

"आत्मज्ञानाचे महात्म्य"

सर्व प्राणिमात्र देह सोडतात तसेच सर्व माणसेही देह सोडतात. पण माणसातील आत्मजागृती ज्याची झालेली आहे तो सुद्धा देह सोडतोच.

अज्ञानी देह सोडताना "मी मरतो...मी मेलो...मी खलास झालो" असा अर्थ घेऊन..... नाराजीने मरतो.
देहाची आठवण उणी झालीच पाहिजे कारण ती आधी नव्हती म्हणून ती आताही रहाणार नाही.
जे-जे तुमच्या अनुभवात नव्ह्ते आणि आता अनुभवात आहे..ते-ते तुम्ही असल्याच्या व्यक्त ज्ञानाच्या अभावी नष्ट होणार आहे.

त्याठिकाणी ज्याने आपल्याला ओळाखलेले आहे म्हणजे आत्मा ओळखलेला आहे...
तेव्हा तो आत्मा....काया सोडल्याने अनंत अपार होतो आहे हे फक्त तो "ज्ञाता" जाणतो स्वरूपज्ञानाने.
आता आपलेच रूप असे आहे..अनंत-अपार आहे..आता हे संपणार नाही.
मग त्याला त्य वेळी काय अनुभव येतो आहे...
"आता मी अनंत-अपार झालो"..अनंतच अर्थ काय्..अंत नाही...संपला असा अर्थ नाही त्याचा..... !!!

ज्ञान्याने प्राण सोडला म्हणजे काया बाजूला गेली...ज्ञानी काही नाही झाला...."ज्ञानी आला न गेला".
ज्ञानी काया सोडतो तेव्हा तो अनंत-अपार आहे या शुद्ध ज्ञानाने,
शुद्ध स्वरूपाने, शुद्ध स्वरूपामध्ये मिळून राहतो.

मुख्य विषय काय आहे..!?? आपण असल्याचे शुद्ध ज्ञान आहे....त्या ज्ञानाने देह मी म्हटले हाच अपघात झाला आहे.
जेव्हा देह मी नव्हे हे त्या ज्ञानाला कळेल तेव्हा पूर्वीचाच तो मोकळा आहे म्हणजे त्याला आता मोक्षाची आणखीन गरज नाही...
मोकळा आहे एवढेच नव्हे तर तो अनंत-अपार आहे.

तुम्ही आपल्याला काय समजून मरता एवढेच बघा...देह सोडताना तुम्ही आपल्याला काय समजून सोडता एवढच बघा....बाकी व्यवहार तुम्ही करणार्..
तो तुम्ही केला नाहीत तरी होणारच आहे आणि होतोच आहे....

गुरुभक्ती... हरीभक्ती... देवभक्ती....आत्मभक्ती केल्यानंतर तुम्हाला स्पष्ट कळते आहे कि हे सर्व कसं काय झालेले आहे..अन ह्याच्यामध्ये माझ्यावेगळे काहिही नाही......!!
आत्मज्ञानाचे महात्म्य फार मोठे आहे !!!!

मोक्ष-मुक्ति म्हणजे काय .....तर्....
मुक्ति म्हणजे......कल्पनेच्या बंधनातून मुक्ति आहे...बंधनाच्या कल्पनेतून मुक्ति आहे....आणि मुक्तिच्याही कल्पनेतून मुक्ति आहे.....!!!
बाकी काहीच नाही.....
फक्त "जाणा".......!!

लेखनविषय: दुवे:

Comments

हे कोण महाराज?

हे निसर्गदत्त महाराज कोण? त्यांचे कार्य काय? ते कोठे भेटतील?

आम्हाला फक्त सुनील दत्त, संजय दत्त, प्रिया दत्त आणि नर्गीस दत्तच माहित. तसे जे पी दत्ताही माहित आहेत पण एक कान्हा अधिक असल्याने ते येथे अवांतर असावेत.

-राजीव.

@निसर्गदत्त महाराज्

http://en.wikipedia.org/wiki/Nisargadatta या वायकीपेडिया वरील पानावर आपल्या शंकेचे समाधान होइल एवढी माहिती उपलब्ध आहे.संजय दत्त/ सुनिल दत्त या वर्गात हे मोडत नाहीत.

अजून

वा! सुंदर आहे.
पण प्रवचन फार त्रोटक झाले, वरचा भाग फारसा खरं तर कळलाच नाही. कारण काही पूर्वपीठीकाच तयार नव्हती वाचायला.

पण शेवटी
मोक्ष-मुक्ति म्हणजे काय .....तर्....
मुक्ति म्हणजे......कल्पनेच्या बंधनातून मुक्ति आहे...बंधनाच्या कल्पनेतून मुक्ति आहे....आणि मुक्तिच्याही कल्पनेतून मुक्ति आहे.....!!!

हे फार आवडले!
"स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्र असल्याच्या कल्पनेची गुलामगीरी " हे वाक्य आठवले.

या विषयी खरं तर अजून विवेचन हवे होते.
असे विवेचन महाराजांचे नसेल तर इतरही कुणाचे चालेल.

आपला
गुंडोपंत

विकिवरील लेख मराठीत नाही...

या शिवाय,
महाराजांच्या जीवन विषयक ओळखीचा एक लेख द्या ना इथे.
विशेषतः महाराजांची पुस्तके व लेखन कार्य यावर वाचायला आवडेल.

आपण दिलेला दुवा इंग्रजी भाषेत असल्याने म्या पामराला वाचण्याची अडचण आहे. किमान तो मराठी विकिमध्ये भाषांतरीत तरी करा.

आपला
गुंडोपंत

अहाहा !

मुक्ति म्हणजे......कल्पनेच्या बंधनातून मुक्ति आहे...बंधनाच्या कल्पनेतून मुक्ति आहे....आणि मुक्तिच्याही कल्पनेतून मुक्ति आहे.....!!!

क्या बात है ! अजून येऊ द्या.

आत्मा....काया सोडल्याने अनंत अपार होतो आहे हे फक्त तो "ज्ञाता" जाणतो स्वरूपज्ञानाने.
आता आपलेच रूप असे आहे..अनंत-अपार आहे..आता हे संपणार नाही.

नेमका अर्थ काही कळला नाही. पण उत्सूकता म्हणून विचारतो, मरणानंतर माणसाचा आत्मा नेमका कुठे कुठे जातो, माहिती कुठे वाचायला मिळेल ?

-दिलीप बिरुटे
(धार्मिक )

???

मोक्ष-मुक्ति म्हणजे काय .....तर्....
मुक्ति म्हणजे......कल्पनेच्या बंधनातून मुक्ति आहे...बंधनाच्या कल्पनेतून मुक्ति आहे....आणि मुक्तिच्याही कल्पनेतून मुक्ति आहे.....!!!
बाकी काहीच नाही.....

काहीच कळाले नाही.

कुणाचा आत्मा मुक्ती पावला असल्यास त्यांचे अनूभव ऐकायला आवडतील.

आत्म्याला मुक्ती ?

>>कुणाचा आत्मा मुक्ती पावला असल्यास त्यांचे अनूभव ऐकायला आवडतील.
असा अनुभव लौकिक जीवनात घेता येत नसावा. 'आत्मा' कायेतून निघून गेल्यानंतरही त्यावर झालेले संस्कार तसेच राहतात असे म्हणतात. तेव्हा आत्मा असे पूर्वसंस्कार कसे टाकतो आणि मुक्त कसा होतो आणि मुक्त होतो म्हणजे नेमके काय होते, आत्म्या हेच जर चैतन्य असेल तर आत्मा का भटकतो, अशा विषयात माहीत नसतांना बोलणे अवघडच आहे बॉ ! :(

-दिलीप बिरुटे

मराठीमध्ये माहिती वाचायला आवडेल.

लेख छान आहे.
निसर्गदत्त महाराजांबाबत यु-ट्युबवर काही फिती आहेत पण मराठी मध्ये काही माहिती वाचायला मिळाली नाही.
मराठीमध्ये माहिती वाचायला आवडेल.
-- लिखाळ.

छान लेख...

छान लेख आहे. माझ्याकडे त्यांचे काही साहित्य होते. अतिशय थोर संत होऊन गेले अलिकडच्या काळात.

बिपिन कार्यकर्ते

आत्मा, मुक्ति आणी पुन्हा चक्र्

प्रथम नमस्कार,
आत्मद्न्यानि माणुस मेल्यानन्तर त्याचा आत्मा मुक्त होउन परम धामात जातो, कि तो मुक्त होउन शुन्यात जातो, का पुन्हा जन्म घेउन कोणत्या न कोणत्या ग्रहावर शरिर धारण करतो?

कृपया मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे, हि विनंती.

 
^ वर