टर्बो सी ते लायनक्क्स

मी जुन्या 'टर्बो सी' एडिटर / पॅकेज / कंपायलिंग एन्व्हिरॉन्मेंटमधे सी भाषेचे प्राथमिक धडे गिरवले होते. 'टर्बो सी' वर 'सी' किंवा 'सी प्लस प्लस' मधला कोड कंपाइल करताना सगळ्या हेडर फाईल्स सतत हाताशी असल्याने कोड लगेच कंपाइल होत असे.
'सी / सी++' आणि 'युनिक्स' हे नातं फारच जवळचं असल्यामुळे युनिक्सवर सी कोड लिहून तो कंपाइल करून पाहण्याची इच्छा होती. युनिक्समधे ( किंवा हल्ली 'लायनक्स'मधे) सी/सी++ कोड कंपाइल करायची सवय असली तरी संपूर्णपणे स्वत:चा कोड कधी लिहून पाहिला नव्हता. असाच चाळा म्हणून एक अगदी जुना , प्राथमिक अवस्थेतला आज्ञावली संच लायनक्सवर कंपाइल करून पाहिला असता लायनक्सवर 'कोनिओ' नावाची हेडर फाईल अस्तित्त्वात नसल्याचं कळलं. (conio.h)
मला clrsrc() आणि त्याहून जास्त म्हणजे gotoxy() ही फंक्शन्स वापरून पहायची आहेत. कोनिओ ही तशी सी परिवारातली पायाभूत हेडर फाईल असून ती सगळीकडे उपलब्ध असायला हवी असे मला वाटत होते.
आता माझ्या शंका अशा आहेत
१. कोनिओ पुरवत असलेली सी लायब्ररी फंक्शन्स लायनक्सवर कुठल्या हेडर फाईल(स्)मधे उपलब्ध होतात?
२. टर्बो सी / मायक्रोसॉफ्ट प्लॅटफॉर्म( फलाट म्हणणे अगदी जिवावर आले ) वरच्या अशा इतर कुठल्या गोष्टी आहेत ज्या लायनक्सवर मिळू शकत नाहीत?
३. यामागची कारणे इ. कुठे वाचायला मिळू शकतील?

यासंबंधी 'गूगल' विद्यापिठात माझे संशोधन सुरू आहेच (!) पण इतर कोणाला अधिक माहिती असेल तर मला मदत कराल का?

धन्यवाद.
--अदिती
ता. क.
वरील चर्चेशी संबंधित पण विषयांतर ठरू शकेल असा एक मुद्दा म्हणजे पोसिक्स ( posix )लायब्ररीबद्दल कोणी अधिक माहिती देऊ शकेल का?
पुन्हा एकदा धन्यवाद.
--अदिती

लेखनविषय: दुवे:

Comments

हे पहा

इथे पहा -
http://www.gerald-friedland.de/fractor/linux-conio-1.02.tgz

ही फाईल माझ्या आय-ई ला डाऊनलोड करता आली नाही. पण फायरफॉक्समधून डाऊनलोड झाली.
बाकी 'कन्सोल आय-ओ' म्हणजे ऑपरेटिंग सिस्टिम आणि सी++ यांच्यातील (इन्पुट आऊटपुट हार्डवेअरकडे जाणारा) पूल आहे हे आपणास माहित आहेच.
त्यामुळे ती ओएस् नुसार बदलणार हे निश्चित.
बाकी युनिक्स/लायनक्स(लिनुक्स) हे माझे विषय सध्यातरी नाहीत. :)

धन्यवाद विसुनाना

इथे ऑफिसमधे आय ई ७ आहे. घरून डाउनलोड करून बघते .
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
( लायनक्स माझाही विषय अलिकडेपर्यंत नव्हता. पण आता एकदा उडी मारली आहे म्हटल्यावर पोहणं आलंच ना! )

--अदिती

जीसीसी

मी उबंटुवर जीसीसी वापरले आहे. पण फारसे काही केलेले नाही.


बोरलँड् ची

खाजगी फाईल असावी असे वाटते आहे - फक्त विंडोजसाठी, तुम्हाला तुमची फंक्शन्स् दुसरीकडे मिळतात का ते बघा - म्हणजे [stdio.h] मधे वगैरे
किन्वा [build-essential] हे पॅकेज उतरवून बघा - कळवा
ही लिंक् सुद्धा बघा libconio

क्षमस्व..

ए सॉरी.. मी काही मदत करू नाही शकत आहे.
पण सी/सी++ इत्यादी विषय काही वर्षांपूर्वी फार जिव्हाळ्याचे होते! म्हणून डोकावले.. :)
काय सोल्युशन मिळतंय ते नक्की लिही इथे!

कर्सेस / सी++

कॉनिओ ही एमएसडॉसवरच उपयुक्त आहे. लिनक्स किंवा युनिक्समध्ये कर्सेस वापरण्याची पद्धत आहे.

लिनक्ससाठी एनकर्सेस - http://www.linux.org/docs/ldp/howto/NCURSES-Programming-HOWTO/index.html

पॉजिक्स मध्ये बहुतंतुक आज्ञायन कसे करावे? - http://www.yolinux.com/TUTORIALS/LinuxTutorialPosixThreads.html

अत्यंत महत्त्वाचे - सी आणि सी++ या भाषा दोन स्वतंत्र भाषा आहेत. तुम्हाला सी++ शिकण्याची इच्छा असेल तर, आधी सी आणि मग सी++ असे करण्याऐवजी, थेट सी++ शिका. उदाहरणार्थ पुढील सी++ आज्ञावलीच्या सारखा कृका (code) सी मध्ये देखभालीच्या दृष्टीने सुगम पद्धतीने लिहीणे जवळ-जवळ अशक्यच आहे - http://vidagdha.wordpress.com/2009/05/08/cncpp/

स्नेहांकित,
शैलेश

धन्यवाद

शैलेश,
माहितीबद्दल धन्यवाद.
मला सी++ येते. फक्त युनिक्सवर मेकफाईलसकट स्वत। सगळे ( प्रोग्राम् लिहिण्यापासून तो पळवण्यापर्यंत) मी स्वत:चे स्वत: कधी केले नव्हते. विन्डोज एन्व्हिरॉन्मेटमधे काम करताना माय्क्रोसॉफ्टचे कंपायलर्स तर अगदीच सोपे आहेत वापरायला. ते नाही तर टर्बो सी असतोच सतत हाताशी.
कामाच्या संदर्भात, युनिक्सवर बिल्ड घेताना जी++ केले की काम होत असे. मेकफाईल वाचून, एडिट करून वापरता येते. या सगळ्यामागे काय लॉजिक असते, ते कसे वापरले जाते हे प्रत्यक्षात वापरल्यावरच समजू लागले आहे. कारण कामाच्या ठिकाणी काय पायर्‍या वापराव्या याची यादी आणि बहुतेकवेळा त्या पायर्‍याही तयार हातात मिळतात.
कुतूहल म्हणून त्या स्वतः बांधायला गेल्यावर हे शोध लागतात :)
या पार्श्वभूमीवर तुम्ही दिलेली माहिती बरीच उपयुक्त आहे. आणि ज्ञानात बरीच भर घालणारी देखिल आहे.

--अदिती

 
^ वर