उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
ऍल्कट्रॅझ तुरुंगातील खिडक्या
धनंजय
April 29, 2009 - 1:23 am
ऍल्कट्रॅझ तुरुंगातील एकांतवासाची (सॉलिटरी कनफाइनमेंट) झालेल्या कैद्यांना 'डी' ब्लॉकमध्ये ठेवत. त्यांच्या छोट्या-छोट्या पिंजर्यांच्या गजातून संध्याकाळी त्यांना हे दृश्य दिसले असू शकेल.
![]() |
ऍल्कट्रॅझ तुरुंगातील खिडक्या |
फोटो तपशील :
कॅमेरा : ऑलिंपस ई-५००
कृष्णधवल करण्यासाठी प्रणाली: गिंप २.६.२
छिद्रमान : एफ्/५
उघड-वेळ : १/६०
आयएसओ : १००
दुवे:
Comments
तुरुंग
हा तुरुंग आहे? फोटोमध्ये तर लायब्ररी दिसत आहे. कि तुरुंगातील लायब्ररी आहे?
ऍल्काट्रॅझ
ऍल्काट्रॅझ हा अमेरिकन सिविल वॉरपासून चालत आलेला एक जुना तुरूंग आहे. थोडाफार आपल्या अंदमान निकोबारसारखा. एकाकी बेटावर बांधलेला. त्याच्या कहाण्या, अख्यायिका वगैरे अमेरिकेत प्रसिद्ध आहेत.
धनंजय, हा गजांतून पाहण्याचा उल्लेख मलाही कळला नाही. गजांतून त्यांना बाहेरचे जग न दिसता तुरुंगातील काही भाग दिसत असे, असे काहीसे आहे का? जर गज खाली दाखवल्याप्रमाणे असतील तर त्यातून कॅमेरा किंवा लेन्स बाहेर काढून फोटो काढणे शक्य आहे. खोलीला दुसरी खिडकीही दिसत नाही तेव्हा कैद्यांच्या नशिबी बाहेरचे जग पाहणे नसावे.
ऍल्काट्रॅझच्या सफरीचे अनुभववर्णन वाचायला आवडेल.
अवांतर : वरील फोटोत दिसणार्या गुलाबी रंगाला ब्लॉब असे म्हणतात. काहीजणांच्या मते जेथे आत्म्यांचा निवास असतो तेथे कॅमेरा असे ब्लॉब पकडतो. ;-) ऍल्काट्रॅझवरील भुतांच्या गोष्टीही बर्यापैकी प्रसिद्ध आहेत. ;-)
संदिग्ध रॉक
धनंजयांना या फोटोमधून नक्की काय प्रतीत करायचे आहे ते स्पष्ट होत नाही.
अंधारकोठडीतल्या कैद्याच्या दृष्टीकोनातून टिपलेले हे चित्र आहे हे स्पष्ट आहे. पण त्याला कृष्ण-धवल का केले आहे ते समजले नाही.
खिडक्यांतून येणारा स्वच्छ प्रकाश (स्वातंत्र्य) आणि कोठडीतला अंधःकार (कैद) यांच्यातला विरोध त्यांना अधोरेखित करायचा असावा.
पण उघड्या दाराने आणि त्यावरील 'लायब्ररी' या पाटीने चित्रातला मूक संदेश बिघडवून टाकला आहे असे वाटले.
(ते दार बंद असते आणि ती पाटी नसती तर तुरुंगाची भीषणता स्पष्ट झाली असती. खिडकीवरील बलदंड गज मात्र भावले.))
अवांतर :
अल्काट्राझ म्हटले की शॉन कॉनरी, निकोलस केज चा द रॉक आठवला. त्यातल्या एड हॅरिसची (ब्रिगेडियर जनरल) भूमिका मला आवडली होती. त्याच्या निळ्या डोळ्यातील संदिग्ध भावांनी तिची खुमारी खूपच वाढवली होती. बाकी सो,सो.
मधे येणारे गज ?
चित्र आवडले.
मात्र
हे कसे ते कळले नाहि. गजांतून दिसणार्या दृश्यात मधे येणारे गज कुठे आहेत?
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
गज्
>>हे कसे ते कळले नाहि. गजांतून दिसणार्या दृश्यात मधे येणारे गज कुठे आहेत?
कदाचित छायाचित्रकाराने छोट्या-छोट्या पिंजर्यात बसुन छायाचित्र काढले असावे !! (गजातुन क्यामेरा काढुन)
एक निरिक्षण
मला फाफॉ मध्ये फोटो दिसत नाही आहे. पण एक निरिक्षण. जर गजाला लेन्स टेकवून फोटो काढला तर गज येत नाहीत. उदा. प्राणी संग्रहालयात जर आतील प्राण्याचा फोटो काढायचा असेल तर कॅमेरा लेन्स गजाला / जाळीला चिकटवून फोटो काढा. फोटोत गज येणार नाहीत.
_______________________________________________
भो भद्र: कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
बरोबर गज दिसणार नाही
गजाला टेकून कैदी उभा राहिला आणि बाहेर बघितले तर त्याला स्वतःचे गज दिसणार नाही.
कैदी प्रियाली यांनी दाखवल्यासारख्या छोट्या पिंजर्यात बंद असत. अशा पिंजर्यांच्या ओळीच्या ओळी आहेत. शेवटच्या ओळीच्या पिंजर्यातल्या कैद्यांना तुरुंगाच्या इमारतीची जी बुलंद भिंत दिसली असती, तिचे हे चित्र आहे.
पिंजर्यांच्या ज्या ओळी एकासमोर एक असत, त्यापेक्षा ही शेवटची ओळ अधिक खडतर मानली जाई. (म्हणजे तुरुंगातही काही त्रास झाल्यास या ओळीत पाठवले जाणे ही शिक्षा.) भिंतीत दिसणार्या खिडक्यांतून अत्यंत थंड वारा घोंघावत असे. त्या थंडीने जीव नकोसा होत असे.
हहपुवा....
कैदी प्रियाली यांचे अनुभव वाचायला आवडतील. :-)
-सौरभ.
==================
उसंडु
कितीही काळजी घेतली तरी असे माझ्या बाबतीत सुद्धा होतो. नुकतेच वाचक्नवीच्या खव मध्ये लिहिताना विशेषण आणि विशेष्य यांच्यामध्ये दुसरा एक भलताच शब्द येऊन एक घोडचुक कशी झाली ते पहा....
"तुम्ही अश्या क्षुद्र मराठीच्या अभ्यासकांना फाट्यावर मारून स्वत:ची नवी मराठी व्याकरण संहिता तयार करणार असाल तर शब्दच खुंटले."
खवमध्ये हा संदेश टाकला आणि तत्काळ चुक लक्षात आली पण संदेशाचे संपादन करण्याची सोय नव्हती. मनात म्हटले, वाचकाच्या लक्षात आले नाही म्हणजे झाले :) :))
_______________________________________________
भो भद्र: कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
जग हे बंदिशाळा ;-)
हे मी पण वाचले होते. ;-) आणि हसलेही. मग म्हटले जाऊ दे. जग हे बंदिशाळा असा भलामोठ्ठा विचार करून बाकी सर्वही माझ्यासारखेच तुरुंगातल्या पिंजर्यांत बंद आहेत असं समजून गप्प राहिले. :)))))))
शब्दकैद :-(
खुद्द प्रियालींना शब्दकैद केले :-(
पण हे अनावधानानेच मला जमू शकले. मुद्दामून शह द्यायला गेलो तर प्रियाली काटशह द्यायला समर्थ आहेत :-)
चित्र
कैदी पिंजर्यातुन बघत आहे अशी कल्पना केली तर, तुरुंग भीषण वाटत आहे. (लायब्ररी हाच काय तो थोडा दिलासा.) कृष्णधवल करण्याची कल्पना सुद्धा आवडली.
ऍल्काट्रॅझच्या सफरीचे अनुभववर्णन वाचायला आवडेल.
असेच म्हणतो.
- सूर्य.
तुरूंग
आहे असे सांगितले नसते, तर चटकन कळले नसते.
कलत्या उन्हाची कोमलता आणि त्या तुरूंगाच्या कठीण भिंती यांच्यातला फरक अंगावर आला. दिवसा बाहेरचे जरासे आकाश दिसल्यासारखे वाटल्यानंतर रात्री याच भिंतीवर अंधार होत जाताना बघणे, हे अवघड असावे. लायब्ररीची पाटी त्यातल्या त्यात बरी, पण कैद्यांना त्या लायब्ररीचे फारसे पडले नसावे.
ह्म्....
फारच टाईट क्रॉप वाटते.. खालच्या खिडकीच्या उजव्या बाजूला आणि भिंतीवरच्या सावलीच्या डाव्या बाजूला जरा थोडीशी जागा हवी होती. असा फोटो आहे का? कदाचित अशा क्रॉपमुळेही काही जणांना बंदिस्तपणा वाटू शकेल.
उघड्या दारामुळे चित्राचा तोल गेला आहे हे विसुनानांचे निरीक्षण फारच पटण्याजोगे आहे. जाडजूड गज, कृष्णधवल रंग, भिंतीवरचे काळाचा ओघ आणि वास्तूची शेकडो वर्षांची वाटचाल दाखवणारे रंग यामुळे चांगला जुळून आलेला परिणाम (इंम्पॅक्ट) उघड्या दाराने एकदमच कमी होतो (असे मला वाटते) या जागेतूनही सुटका होण्याचा मार्ग आहे अशी भावना तयार होते (जीची काही गरज नाही)
मात्र कृष्णधवल करण्याचा निर्णय खूपच योग्य!
खूपच लिहून झालं. :-)
-सौरभ.
==================
वेगळे शीर्षक
समजा असे शीर्षक मी दिले तर बघा -
"ऍल्कट्रॅझ तुरुंगातील लायब्ररीचा दरवाजा"
दरवाजा मुद्दामून घेतला आहे. तो केविलवाणा वाटावा, किंवा आशादायक वाटावा, हे माझ्या दृष्टीने तरी संदिग्ध आहे. काही का असेना - तो दरवाजा हे फोटोचे कथानक आहे, खिडक्या वगैरे ही वातावरणनिर्मिती. ("लायब्ररी" ही पाटी मुद्दामून ~१/३ आकर्षण बिंदूवर [जमेल तितकी] घेतल्यामुळे ते मला पुन्हा शीर्षकात सांगायचे नव्हते.)
(फोटो कातरलेला नाही. काढताना तसाच चौकटीत बसवला आहे -म्हणजे जास्तीत जास्त वाईड-अँगल करून जवळात जवळ गेलो.)
छान
फोटोची कल्पना आणि एक्झेक्यूशन दोन्ही आवडले. कृष्णधवल रंगसंगतीमुळे अधिक परिणामकारक झाले आहे.
लायब्ररीच्या दाराबद्दल किंचित असहमत आहे. तुरूंगातून उघडा दरवाजा दिसणे ही गोष्ट फारच 'इमोशनली चार्जड' असावी. त्याचा यायला हवा तितका परिणाम येत नाही असे वाटते.
----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson
पूर्वीचा प्रतिसाद मागे घेतो.
असे मी पूर्वीच्या प्रतिसादात म्हटले होते.
पण तो क्लीशे होता.(असेही म्हणणे आता क्लीशे झालेले आहे.)
इतरांच्या नव्या प्रतिसादांनंतर आणि पुन्हा विचार केल्यावर तुरुंगाची भीषणता एवढा एकच विषय या प्रकाशचित्रामुळे दृगोचर होतो असे म्हणता येणार नाही. हे चित्र त्याहून व्यामिश्र आहे. तुरुंगातील कैदी, त्यांचे जीवन, तुरुंगाधिकारी आणि तुरुंग व्यवस्थापनाची कैद्यांना सुविधा पुरवण्याची (कदाचित कृत्रिम, वरवरची) इच्छा, आकाश - प्रकाश आणि भिंती यांचा (संवेदनशील) कैद्याच्या मनावर होऊ शकणारा परिणाम, उघडे दार आणि लायब्ररी बघून त्याच्या मनाची होणारी घालमेल अशा अनेक अंगांनी हे चित्र पाहता येईल.
वेगवेगळ्या विचारप्रक्रियांना उत्तेजन देणे हे कोणत्याही कलाकृतीचे यश असते. (उदा. एखादा वरवर सोप्या शब्दांचा शेर पण त्याला अर्थांचे अनेक पदर.) हे यश या प्रकाशचित्राने मिळवले आहे असे वाटते.