वाचू आनंदे-२

वाचू आनंदे-२

आज ह्या पुस्तकांमधील तीन उतारे देत आहे. पहिले गाणे एका लोकगीतावरून बेतलेले आहे. दुसरा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे,नाही, त्यांची एक वात्रटीका आहे. तीसऱ्यामध्ये बोली भाषा कशी रूपे घेते त्याची उदाहरणे आहेत.

बहुरुप्याचे आमंत्रण उघड उघड एका भारुडावरून बेतलेले दिसते. आता फ़ारसे आठवत नाही पण लहानपणी " चला काकू चला काकू लगिनाला चला" नक्की वाचलेले आहे. त्यात चिंचेच्या पानाच्या पत्रावळी होत्या हे स्मरते. काय कल्पना आहे! आज पत्रावळीच कोणाला माहीत नाहीत तेंव्हा यातली मजा किती जणांना कळणार म्हणा. तरी या सुट्टीत कोकणात गेल्यावर वहिनीला पत्रावळी-द्रोण तयार करावयास सांगून, त्यांचे फ़ोटो काढून उपक्रमवर देईनच. आजी-आजोबांची आणखी एक गोष्ट.

माणसाच्या वागणुकीचे सूक्ष्म निरिक्षण तुकाराम महाराज करतात. म्हातारी सासू पंढरपूरला चालली खरी; पण संसारात गुंतलेले मन घरातच.शेवटी तर सुनेवर रागावून ती घरातच विठोबा शोधते!

शेवटचे दोन उतारे "भाषा" या गटातले आहेत. लहानानाच काय पन मोठ्यांना देखील भुरळ घालावयास समर्थ. कोल्ह्याची गोष्ट अमेरिकेतही मुलांना आवडेल तर स्त्रीहट्ट जनावरातही असतो हे पाहून सर्वांनाच ( विषेशत; पुरषांना! ) हसू आल्याशिवाय रहाणार नाही.

vacoo-1

vacoo-4

vacoo-3

शरद

Comments

अशी भानगड आहे तर

म्हातारी सासू पंढरपूरला चालली खरी; पण संसारात गुंतलेले मन घरातच.शेवटी तर सुनेवर रागावून ती घरातच विठोबा शोधते!

आम्हाला वाटल परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे हे म्हातारीला मनोमन पटल्याने ती कशाला पंढरपुरला जायचे असे म्हणाली असेल.
प्रकाश घाटपांडे

वाचू आनंदे

चांगलाच आणि देखणा संग्रह आहे. माझ्याकडे यातील दोन पुस्तके आहेत.

पण कुमार/किशोर गटातील किती मुलांपर्यंत पोचला आहे याची कल्पना नाही.

चित्रेही आवडली

लेखनाच्या बरोबर आलेली चित्रेही चांगली निवडलेली आहेत.

संग्राह्य पुस्तकसंच आहे असे जाणवते आहे.

 
^ वर