चौकशी

नमस्कार मंडळी,

मला एका प्रकल्पासाठी ७५ वर्षे किंवा अधिक वयाच्या मराठी भाषिक व्यक्तीकडून थोडा विदा गोळा करायचा आहे. मी सध्या महाराष्ट्रात नसल्यामुळे अशी व्यक्ती शोधणे कठीण जाते आहे. उपक्रमावरील कोणी या वयोगटातले असल्यास, कृपया कळवावे. या वयोगटातल्या व्यक्ती आंतरजालाचा वापर करत असण्याची शक्यता फार कमी आहे, याची कल्पना आहे. परंतू या वयोगटाच्या व्यक्तींशी दूरध्वनीवरून संभाषण करण्यापेक्षा आंतरजालावरून संभाषण करणे जास्त सोपे पडेल. म्हणून हा प्रयत्न करून बघत आहे.

धन्यवाद.

राधिका

लेखनविषय: दुवे:

Comments

ज्येष्ठ नागरिक

माझे दोन मित्र श्री. भागवत आणि श्री. भावे याच्याशी आपण माझ्यातर्फ़े संपर्क साधू शकता कारण आम्ही रोजच भेटत असतो.
कामाचे स्वरूप कळल्यास आणखी काही मोठे स्रोत म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ. पुण्यात असे डझनांनी संघ आहेत व त्यातले अनेक नागरिक जाल वापरतात.( विषेशत: अमेरिकेतील मुला-मुलींशी संपर्क साधावयाकरिता.)

शरद

अरे वा

आपण माझे बरेच मोठे काम केले आहेत, धन्यवाद. मी व्य. नि. तून आपल्याला अधिक माहिती कळवते.

राधिका

 
^ वर