उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मनसे
अभिजित
April 16, 2009 - 4:20 am
मनसेने आपले संकेतस्थळ काढले आहे..
त्याची लिंक इथे आहे..
यातला जय महाराष्ट्र विभाग नक्की पहा..महाराष्ट्राबद्दल बरीच माहिती आहे.
राज ठाकरे, मनसे वगैरेंबद्दल चर्चा व्हावी असा उद्देश नाही. झाली तरी मला हरकत नाही.
अभिजित यादव
कर्हाड
दुवे:
Comments
हो चांगली
होय रे अभिजीता,
हो चांगली माहिती आहे इतिहासाची आणि संयत पणे दिलेली आहे.
शिवाय अनेक काँग्रेसी नेत्यांचे व त्यांच्या निर्णयांचे गुणगानही आहे, शिवसेने विषयी ब्र ही नाही!
आपला
गुंडोपंत
कालच पाहण्यात आले
मनसेचे संकेतस्थळ कालच पाहण्यात आले.
माझ्या लेखात नंदनचा प्रतिसाद आहे त्यावरून अफझल खानाचे मुंडकेही प्रतापगडाच्या बुरूजावर दर्शनी भागात ठेवले असल्याची गोष्ट आठवत होती पण ती कितपत खरी हे आठवत नसल्याने शोधाशोध करत असता मनसेचे संकेतस्थळ दिसले.
गुंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे चांगली माहिती आहे. अजून विस्तृत असती तरी आवडली असती.
स्थळ आवडले
संस्थळ आवडले..अनेक प्रमुख पक्षांच्या स्थळापेक्षा अनेक बाबतीत उजवे वाटले
+१
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
मनसेचे संकेतस्थळ आणि अनुभव...
राज ठाकरेंच्या अटकेच्या दरम्यान मी मनसेचे संकेतस्थळ पाहिले होते. आत्ता जे आहे ते थोड्या नवीन रुपात आहे. संकेतस्थळावर सुचना करा असा एक विभाग आहे. पुर्वी सुचना करताना मराठी लिहिण्याची सोय नव्हती. त्यावेळी मी सुचना केली होती कि, "मराठीसाठी लढणार्यांच्या संकेतस्थळावर मराठी लिहिण्याची सोय नाही हे थोडे विचित्र वाटते. मराठी लिहिण्यासाठी ॐकारने तयार केलेले गमभन वापरा. तसेच उदाहरण म्हणून उपक्रम पहा. आणि शक्य असल्यास राज ठाकरेंना उपक्रमाला भेट द्यायला सांगा." त्या नंतर काही काळाने अभिप्राय आला कि, आता तुम्हाला विचित्र वाटणार नाही. मराठी लिहिण्याची सोय केली आहे. मी तत्काळ तपासले असता हि सोय खरोखरच केली होती. मराठी लिहिण्याची सोय आता उपलब्ध आहे. मी सुद्धा माझा अभिप्राय पाठवा आणि राज ठाकरेंना भेट देण्याची विनंती परत एकदा केली. आश्चर्य म्हणजे त्याला देखील उत्तर आले. "सध्या निवडणुकीच्या कामामुळे जमणार नाही. पण ते होताच अवश्य भेट देऊ." हा सर्व सुखद धक्काच होता.
खरोखर ...
असे जर खरोखर असेल तर मात्र तो भारतीय राजकारण्यांमधला एक अमुलाग्र बदल म्हणायला हवा.
हे लोक आता चक्क लोकांना "किंमत देत" आहेत हे खरोखर सुखद आहे ...
नायतर आम्हाला सरकारी ऑफीसात "पहिले लायसन्स दिखाव" आणि राजकीय नेत्यासमोर "आधी बाहेर व्हा, साहेब सध्या बिझी आहेत" अशाच सन्मानांची सवय. असो.
संकेतस्थळ पाहिले आणि आवडले ...
बरेच लेख वाचावेसे वाटले, सवडीने वाचुन संकेतस्थळाच्या कंटेन्टवर ( मराठी शब्द ?) प्रतिक्रिया देऊ ...
आत्तापर्यंत पाहिलेल्या राजकीय पक्षांच्या संकेतस्थळामधले सर्वात सुलभ आणि सुटसुटीत स्थळ मनसेचे असावे असे म्हणायला हरकत नाही.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
विशेष नाही
मराठी लिहिण्याची सोय केली हे उत्तम. पण लगोलग उत्तर आले ह्यात काही फारसे विशेष नाही. संकेत स्थळावर येणार्या विनंत्या/प्रश्नांना उत्तर द्यायला खास लोकांचे चमू नेमलेले असतात.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीवेळी मी असेच बराक ओबामांच्या साईटवर जाऊन काहीतरी खरडले होते, आणि लगेच उत्तर आलेले पाहुन (तुमच्या सूचनेवर नक्की विचार करू इ.इ.) मला थोडे आश्चर्य वाटले पण नंतर मला वरचेवर खुद्द ओबामांच्या इमेल्स (पैसे मागायला) यायला लागल्या तेव्हा लक्षात आले. :)
मनसेलाही
मनसेलाही पैशांची गरज आहे असे राजसाहेब वारंवार म्हणताना ऐकले आणि वाचले आहे. :))
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
राजसाहेब...?
त्यांना राजकुमारचंद्रसाहेबजी म्हणत नाहीत हे किती बरे आहे ना? ;-)
==================
मा.जी.
संकेतस्थळ अगदी नवेनवे होते त्यावेळी राज ठाकर्यांचा उल्लेख भविष्यातही मा.राजठाकरेसाहेबजी असा करू नका अशी सूचना मी केली होती. माझ्या त्या सूचनेचा आदर करू असे आश्वासन तेव्हा मला मिळाले होते. आता काय परिस्थिती आहे ते बघायला पाहिजे.-वाचक्नवी
विषेशच!
सर्व राजकीय पक्षांच्या संकेतस्थळांपैकी एका उत्तम संकेतस्थळाबद्दल अभिनंदन केलेच पाहिजे. यातील मसुदा खरोखर वाचनीय आहे. केवळ भाषणबाजी आणि पोकळ प्रचार न करता महाराष्ट्राची नेटकी आणि सूत्रबद्ध माहिती दिली आहे हे पाहून आनंद झाला.
संकेतस्थळ एकदा बनवले की झाले असे न करता सतत नवनवीन माहिती, पक्षाचे कार्यक्रम, घडामोडी, महत्वाच्या प्रश्नावर पक्षाची अधिकृत भूमिका इथे मिळेल अशी अपेक्षा आहे.
विषेश कसे नाहि? भारतातील इतर पक्षांची स्थळे बघता असा चमु जरी नेमला तरी विषेशच की! बाकी इतर श्रीमंत पक्षांचे हात कोणी बांधले आहेत चमु नेमायला?
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
विशेष
निवडून यायच्या आधी, निवडणुकीच्या रणधुमाळीत उत्तरे येणे ह्याचे काहीच विशेष नाही. असे केल्याने उलट त्यांचाच फायदा आहे. निवडणुकी संपल्यावरही हे चमु ह्याच तत्परतेने उत्तरे देत राहिले तर मात्र नक्कीच विशेष वाटेल.
सहमत
या बद्दल सहमत....
+१
जे आहे तेहि मला विषेश वाटले.
अर्थातच निवडणुकीनंतरहि अशी तत्पर उत्तरे आली तर अधिक (आनंद + आश्चर्य + विषेश) वाटेल
बाकी मनसे कडून आजच आलेल्या प्रतिक्रियेत "संकेतस्थळ प्रतिसाद कक्ष" असे स्पष्टपणे म्हटलेले आहे.. त्यामुळे स्वतः राज उत्तरे देत नाहित हे सिद्ध आहे.
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
नसेल
विशेष नसेल कदाचित काही जणांसाठी. पण आम्ही ज्या राजकिय समाजात आहोत ती अमेरिका नाही आणि राज म्हणजे ओबामा नाही. भाषणा सोबत कृती आहे याची जाणीव झाल्याने विशेष वाटले.
मनसे तसा नवजात पक्ष आहे. त्या मानाने हा प्रयत्न स्तुत्य वाटतो.
अवांतरः हि बातमी काहींना विशेष वाटली काहींना नाही. असा काहीसा प्रकार आहे.
जयललिताकाकूंचे याली
राज ठाकरेंनी काढलेली व्यंगचित्रे खुमासदार आहेत. विशेषतः जयललतिकाकूंचे याली मस्तच. ;-)
उमेदवार....
उमेदवारांनी पण संकेतस्थळे सुरु केली आहेत.
अनिल शिरोळेंची वेबसाईट
ला.कृ. अडवानी.... वितळणारे लोहपुरुष.
सुरेश कलमाडी.......अ लाईफटाईम इन पुणे सर्व्हिस याचा काय अर्थ आहे? पुण्यात सर्व्हिसला आहेत काय हे?
==================
अ लाईफटाईम इन
सुरेशभाई कलमाडींच्या साईटची पंचलाईन ही 'अ लाईफटाईम इन साई सर्विस ऑफ पुणे' अशी वाचावी.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
लाईफटाईम
हा हा हा हा हा....
कलमाडी २५ वर्षे खासदार आहेत तरी त्यांचे पुण्याच्या विकासाचे स्वप्न पुरे झालेले नाही असं कोण्या नेत्याने त्याच्या भाषणात म्हटलंय. :-))
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
कोतेपणा
सन्केतस्थळ छान आहे पण राजकारण लहान आहे. भाषणे पाहताना रमेश किणी प्रकरणाची आठवण झाली. 'हे सगळे कशासाठी?' हास्यास्पद आहे.