तुम्ही ठरवा....

पुण्यात जनसंसद नावाचा कार्यक्रम झाला. लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवारांना व्यासपीठावर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाटी आमंत्रित केले होते. कार्यक्रम सुंदर च झाला. समारोपाला संवेदनशील व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर बोलले. त्यांचे हे मतदारांना आवाहन.

From लेख
From लेख
From लेख
From लेख
लेखनविषय: दुवे:

Comments

तेंडुलकरांचे आभार

मंगुआण्णा तेंडुलकरांचे विशेष आभार. त्यांचा कुंचला सचिनच्या बॅट इतकाच सफाईने फिरतो. त्यामुळे नाकर्त्या,भ्रष्ट उमेदवारांना सीमेपार धाडायला त्याचा चांगलाच उपयोग होईल.
कार्यक्रमाचा गोषवारा दिला असता तर बरे झाले असते.

हसून हसून पुरेवाट

त्यामुळे नाकर्त्या,भ्रष्ट उमेदवारांना सीमेपार धाडायला त्याचा चांगलाच उपयोग होईल.

आज आम्च्या सर्व हमाल बंधूंना हे वाक्य वाचून दाखवले. सर्व जन खूप हसले. अहो, हा कोन मंगेश ? अख्खा सचिन आला तरी पन एका बॉलशिवाय कोनी पन सीमापार होनार नाही. उलट सचिन तडीपार होईल. मग हा मंगेश कोन ? तुमी शिकली सवरलेली मान्स आपल्या हातात लोकशाहीची पावर आहे म्हन्ता, आनि असले काहीतरी मनाचे खेळ करता. तस काय पन नाही. तुम्ही ३ टक्के लोकं. जिंकायला किती मतं लागतात ? गनित मांडा की राव !

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

वृत्तांत

कार्यक्रमाच वृत्तांत आज सकाळच्या बातमीत इथे पहा.
प्रकाश घाटपांडे

अल्पसंख्य सुशिक्षित मतदाराची शोकांतिका

निवडून कोण येणार?
डीएस्के? अनिल शिरोळे? रणजीत शिरोळे? विक्रम बोके? की -

या कार्यक्रमाला धाब्यावर बसवणारे - आम्हाला तुमच्या सुशिक्षित मतांची गरज नाही - फारफारतर माझ्या पित्त्याशी बोला - तेवढीच तुमची लायकी आहे - हे जाणवून देणारे सुरेश कलमाडी?

एक वस्तुस्थिती

कार्यक्रमाची शिस्त रहावी म्हणुन श्रोत्यांना कार्यक्रमात काहीही बोलता येणार नाही हे अगोदरच सुचित केले होते. सर्व प्रश्न जनते कडून अगोदरच मागवले होते. त्यावर आधारित प्रश्न घेतले होते. अभय छाजेड हे कलमाडींचे प्रतिनितधी म्हणुन एक तर उशीरा आले व थेट व्यासपीठावर् बसले. इतक्या वेळ शांत राहिलेल्या लोकांनी एकच गदारोळ केला. संयोजक विवेक वेलणकरांनी लोकांना शांत होण्याचे आवाहन केले ; चुक असेल तर ती माझी आहे असे सांगितले. ही आपली भारतीय संस्कृती नाही असे भावनिक आवाहन करुन पाहिले पण त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी छाजेड यांची माफी मागितली. कारण कलमाडींनी अगोदरच मी येउ शकणार नाही पण प्रतिनिधी पाठवतो असे सांगितले होते. त्यावर् संयोजकांनी पक्षाची भुमिका सांगण्यासाठी 'चालेल' असे सांगितले होते.पण लोकांनी छाजेड यांनी प्रेक्षकात बसलेले आम्हाला चालेल असे एकमुखाने संयोजकांना सांगितले. परंतु त्यावर् छाजेड न थांबता निघुन गेले व कार्यक्रम पुढे चालु झाला.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर