उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मोगरा फुलला...
प्रणित
March 29, 2009 - 5:38 am
मित्रांनो,
गेल्या वेळी प्रकाशित केलेली छायाचित्रे काही तांत्रीक अडचणी मुळे दिसू शकली नाहीत.
तिच छायाचित्रे पुन्हा प्रकाशित करतोय.
सर्वांना घरच्या मोगर्याची भेट !!
झाली फुले कळयांची
दुवे:
Comments
सल्ला!
प्रणित, कृपया लेखात एक किंवा जास्तीत जास्त दोन चित्रे दिली तर चर्चेस, सुचवण्या करण्यास सोपे जाते असे माझ्यासह अन्य सदस्यांनी आपणास सुचवले आहे त्याचा परत विचार करावा. शिवाय चित्रांची तांत्रिक माहितीही द्यावी अशी विनंती. किंबहुना या माहितीशिवायचे छायाचित्र लेख प्रसिद्ध होऊ नयेत असेच मला वाटते. आपण समजून घ्याल अशी आशा आहे.
" छायाचित्रण-प्रकाशचित्रण समुदाय उपक्रमाच्या धोरणात बसतो की नाही याबाबत आधीच विवाद आहेत. अशी कोणत्याही माहितीशिवायची, अनेक चित्रे टाकून त्यास हातभार लागत आहे"
-सौरभ.
==================
कारण
सौरभदा !!
१ किंवा २ छायाचित्रांनी मोगर्याच्या बागेचा फील नसता आला, म्हणुन इतकी छायाचित्रे टाकली.
पुढल्यावेळी नक्की या बाबींची काळजी घेईन .
प्रणित..
http://pranitgharat.blogspot.com/
झकास!
दृष्य डोळ्यांना सुखावणारे आहे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
मस्त !
फुललेल्या मोग-यापेक्षा कळ्यांचे फोटो सुंदर वाटताहेत !
पहिल्या छायाचित्रात मोग-याचे झाड फार उंच वाढले वाटतं ;) (ह.घ्या )
-दिलीप बिरुटे
सुरेख..
वा!
अत्यंत मनमोहक आणि एकापेक्षा एक सुरेख चित्रे..!
सर्वांना घरच्या मोगर्याची भेट !!
प्रणितराव, भेट मिळाली! :)
आभारी आहे!
आपला,
(मोगराप्रेमी) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
मोगर्याची बाग!
वा! मोगर्याची बाग या कल्पनेनेच मनात सुवास दरवळला.
बाकी छायाचित्रणाविषयी चर्चा / मार्गदर्शन हा या चित्रांचा हेतू नसावा असे वाटते.
प्रसन्न वाटले
प्रसन्न वाटले. सुंदर कळ्या आहेत.
बिपिन कार्यकर्ते
बागेचा फील
बागेचे प्रवासवर्णन आणखी थोडे विस्तृत द्यावे, असे वाटते. (म्हणजे "या बागेतली वैशिष्ट्ये म्हणजे ताडाच्या झाडांच्या मध्ये मोगर्याची झुडुपे आहेत" असे काही.)
फोटो-कथा असेल तर फोटोंची निवड कशी केली, जुळवाजुळव कशी केली, याबद्दल आस्वादात्मक मार्गदर्शन द्यावे. म्हणजे "उंच ताडामाडातून आकाशाचे चित्र बघितल्यामुळे सूक्ष्माची उत्कंठा वाढते," वगैरे असे काही.
छायाचित्र म्हणून आस्वाद अपेक्षित असेल तर सौरभदा यांच्या सूचनेशी मी सहमत आहे.
पुढील छायाचित्रांबाबत शुभेच्छा.
विषयः मोगरा
मित्रा तुझा घरचा मोगरा आवडला..
माझ्यासह आपल्या जिज्ञासू सदस्यांना प्रश्न पडला असेल की या लेखाला माहितीपूर्ण कसा म्हणायचा. ;-) तो प्रश्न सोडवण्याचा एक प्रयत्न...
हे शेत तुमच्या घरचेच असल्याने खालील माहीती एका वेगळ्या लेखात किंवा मला व्यनीतून कळवली तरी चालेल..
१. व्यवसाय म्हणूनच करत आहात हे दिसतच आहे. शेत एकूण किती एकर/गुंठे आहे?
२. देखभालीला खर्च किती येतो?
३. तोडता कधी?विकता कुठे? खर्च आणि प्राप्तीचे प्रमाण काय आहे?
४. दर कशावर असतो? म्हणजे प्रती किलो/प्रती गोणी वगैरे?
५. पिकाची काळजी कशी घेता? म्हणजे किटकनाशके वगैरे?
६. एकंदरीत लाईफ सायकल सांगीतले तर उत्तम..म्हणजे बियाणे/कलमे/तरु/रोपे कुठुन आणता पासून विकेपर्यंत.
७. मोगरा वगैरे तत्सम झुडुपांत साप आढळतात असे ऐकले होते. ते किती खरे आहे? काही अनुभव?
८. गजरा माळणे आणि देवाला चढवणे(!) याखेरीज कुठल्या केमिकल इंडस्ट्रिला एक्स्ट्रॅक्ट/इसेन्स काढण्यासाठी कच्चा माल म्हणून पुरवता का? त्या अनुषंगाने काही माहिती असेल तर पुरवावी...
बाकी ठीक...
अभिजित यादव...
ता. कर्हाड जि. सातारा
गजरा
ह्या मोगर्याचा गजरा केला तर तो असा दिसेल असे वाटते. एका ट्रेकला जाताना काढलेला हा फोटो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥