उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मला पडलेला प्रश्न
शरद् कोर्डे
March 28, 2009 - 11:49 am
तस्लिमा नसरीन ही बंडखोर बांगला देशी लेखिका सर्वांना ठाऊक असेलच. तिच्या लेखनामुळे तिने कट्टरतावादी मुस्लिमांचा रोष ओढवून घेतला. परिणामी तिला आपला देश सोडणे भाग पडले. काही काळ तिचे वास्तव्य युरोपात होते. त्यानंतर भारतात होते. आज (२८ मार्च) 'टाइम्स् ऑफ् इंडिया'त आलेल्या बातमीनुसार ती सध्या अमेरिकेत आहे.
ही महिला स्वतःचा देश सोडून जगभर फिरत आहे व परक्या देशात ठिकठिकणी वास्तव्य करीत आहे. या भ्रमंतीसाठी व परदेशी वास्तव्यासाठी बराच पैसा लागत असणार हे उघड आहे. ती कुठल्याही सत्तास्थानावर नाही अथवा तिचे कुठल्या संघटनेशी लागेबांधे असल्याचेही ऐकिवात नाही. मग तिच्याकडे एवढा पैसा कुठून येतो? की ती घरची इतकी श्रीमंत आहे की जगांत केव्हाही कुठेही जाऊ शकते व कुठेही कितीही दिवस राहू शकते?
तुम्हाला याबाबतींत काही सांगता येईल?
दुवे:
Comments
मस्त
हाच प्रश्न मलाही पडला आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
एनजीओ
असा पैसा एनजीओ मार्फत यथाशक्ती उपलब्ध होतो. स्त्रीवादी चळवळींकडुन पुरोगामी चळवळींकडून अहो बुवा महाराज यांना भक्तांकडून जमीन पैसा सेवा सहज उपलब्ध होते. लिटल चॅम्पसना त्यांच्या पालकांसह युरोप टुर केसरी टुर्स ने प्रायोजित केले आहे.
प्रकाश घाटपांडे
वेगवेगळ्या देशांच्या/अंतरराष्ट्रीय संस्थाचे साहाय्य
तस्लीमा नसरीन यांच्या संकेतस्थळावर त्यांना मिळालेल्या वेगवेगळ्या पारितोषिकांचा उल्लेख केला आहे. पैकी काही पारितोषिकांच्या बरोबर पैशाची रक्कम असते. फ्रान्सच्या सरकारने तिथे त्यांच्या वास्तव्याच्या वेळेला शैक्षणिक अनुदान दिले होते, ... वगैरे तपशील दिसतात.
त्यांच्या पुस्तकांना सुद्धा काही (वेगवेगळ्या भाषांत बराच?) प्रमाणात खप असावा, आणि त्या विक्रीतील काही टक्केवारी त्यांना मिळत असावी.
(संकेतस्थळाचा दुवा.)
पुस्तके
पुस्तकांची रॉयल्टी पुष्कळ असावी.
तस्लिमा नसरीन यांची पुस्तके
तस्लिमा नसरीन यांची पुस्तके वादग्रस्त असल्यामुळे त्यांच्यावर अनेक देशांत बंदी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुस्तकांची रॉयल्टी किती मिळत असेल याची शंका आहे. शिवाय तस्लिमा नसरीनना मदत करण्यात कट्टरतावादी मुस्लिमांचा रोष ओढवण्याचा धोका असल्यामुळे किती एन् जी ओ त्यांना मदत करायला पुढे येत असतील याबद्दलही शंका वाटते.
तस्लीमा
तस्लीमा नसरीन यांची पुस्तके इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, डच, स्विडीश, नॉर्वेजियन, इटालियन, आइसलँडीक, फिनिश, सर्बो-क्रोएशियन, पर्शियन इ. भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. त्यांना स्वीडनने नागरिकत्व दिले आहे. याशिवाय त्यांना वीसएक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. २००८मध्ये त्या भारतात आल्या होत्या पण नंतर त्यांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आले.
त्यांची कारकिर्द बघता एका महिलेविरूद्ध इस्लामने सतत केलेल्या अन्यायाचे दाखले दिसतात. त्यांना भारतात रहायची इच्छा आहे पण भारत सरकारची याला मान्यता नाही. चर्चेतील दुसर्या परिच्छेदाच्या 'टोनशी' सहमत नाही. त्यांना जी भ्रमंती करावी लागत आहे ती अन्यायापासून दूर रहाण्यासाठी. चर्चाप्रस्ताव वाचून असे वाटते की फुकट पैसे मिळत आहेत म्हणून त्या जगभर मजेत हिंडत आहेत. सत्यपरिस्थिती मात्र दारूण आहे.
----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.
तस्लीमा नसरीन ह्यांच्या
संकेतस्थळावर स्पष्ट उल्लेख आहे की त्या १९९५ पासून पॉपलिटिकल रेफ्यूजी आहेत. रेफ्यूजी हे स्टेटस भयानक असते. आपला मूळ देश सोडून गावोगाव एखाद्या भटक्याप्रमाणे जात रहाणे हे अतिशय दुर्दैवी आणि मानहानीकारक जिणे असते. कोणताही देश ही एक जबाबदारी ह्या अर्थाने त्याकडे बघत असतो. आमच्याकडून ही ब्याद बाहेर जाऊदे मग तुम्ही कुठेही जा पण आमच्याकडे नको असा बहुतांश देशांचा दृष्टिकोन दिसतो. भारतानेही त्यांना हाकलून द्यावे ह्याचे खरोखर वाईट वाटले. त्यांचा खर्च हा त्या त्या ठिकाणची सरकारे करत असणार. पण हे जिणे दु:सह असणार हे नक्की नाहीतर त्यांनी सातत्याने बांग्लादेशाला पासपोर्टसाठी निदान वीसासाठी विनवण्या केल्या नसत्या. शेवटी मातृभूमी ही प्रत्येकाला प्यारी असते. मृत्यूशय्येवर असलेल्या वडिलांनाही त्यांना भेटता येऊ नये हे मात्र कमालीचे दुर्दैवच म्हणायला हवे!
चतुरंग
'प्रत्येकाला' ? ,
शेवटी मातृभूमी ही प्रत्येकाला प्यारी असते
भारतातुन युरोप, अमेरीकेत गेलेले पुष्कळ लोक तिथे कायमचे कसे रहाता येईल ह्याच्या ज्या निरनिराळ्या कृलुप्त्या अवलंबतात , त्यावरुन तरी असे वाटत् नाही.
तस्लीमा नसरीन
ह्यांना त्यांच्याच मातृभूमीत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जाताहेत. बाहेरच्या देशात रहातांना त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवायची जबाबदारी त्या त्या सरकारची ठरते. तिथे त्यांच्या जिवाला धोका निश्चितच कमी आहे. तरीदेखील हे राजकीय परागंदा जिणे असह्य होऊन त्यांनी बांगलादेशकडे पासपोर्ट वीसा साठी अर्ज करणे सुरुच ठेवले आहे. आपल्या जिवाला धोका असूनही तिथे जाणे त्या पसंत करताहेत कारण शेवटी ती त्यांची मातृभूमी आहे हे मला सांगायचे असताना माझ्या विधानाचा असा विपर्यास केला गेलाय. असो, तुम्हाला तसे वाटत असेल तर ते बरोबर.
चतुरंग
विधान
ते तुमचे विधान सर्वसामान्य होते व्यक्ती सापेक्ष वाटले नाही
निषेध
श्री. राजेंद्र व श्री. चतुरंग यांचे प्रतिसाद माहितीपूर्ण असले तरी त्यातले काही भाग विषयाला धरून नसल्याने ताबडतोब काढून टाकावेत. लेखाचा विषय फक्त तस्लीमा नसरीन उदरनिर्वाहाकरता पैसे कुठून आणतात इतकाच आहे.
आता माझा प्रतिसाद अवांतर ठरू नये म्हणून माझे मत देतो.
या भ्रमंतीसाठी व परदेशी वास्तव्यासाठी बराच पैसा लागत असणार हे उघड आहे.
भारत किंवा बांगला देशात वास्तव्यासाठी पैसा लागत नाही? आज अमेरिकेत डॉलरमध्ये पैसे भरून घर घेणे मुंबई/पुण्यात रुपयात पैसे भरून घर घेण्यापेक्षा स्वस्त पडते.
मग तिच्याकडे एवढा पैसा कुठून येतो? की ती घरची इतकी श्रीमंत आहे की जगांत केव्हाही कुठेही जाऊ शकते व कुठेही कितीही दिवस राहू शकते?
जोपर्यंत ती माझ्याकडे पैसे मागत नाही तोपर्यंत मी काळजी करत नाही.
विनायक
जाता जाता - या बाईंना भारताने दिलेली वागणूक पाहून माझी मान शरमेने खाली जाते.
'टोन' नव्हे गैरसमज!
श्री. राजेन्द्र यांस,
चर्चेतील दुसर्या परिच्छेदाच्या 'टोनशी' सहमत नाही. त्यांना जी भ्रमंती करावी लागत आहे ती अन्यायापासून दूर रहाण्यासाठी. चर्चाप्रस्ताव वाचून असे वाटते की फुकट पैसे मिळत आहेत म्हणून त्या जगभर मजेत हिंडत आहेत. सत्यपरिस्थिती मात्र दारूण आहे.
चर्चाप्रस्तावाच्या पहिल्या परिच्छेदांतील "तिला आपला देश सोडावा लागला" हे विधान विचारांत घेतले तर कथित 'टोन' जाणवणार नाही. मात्र दुसर्या परिच्छेदात 'तस्लिमा नसरीनच्या घरची आर्थिक स्थिति भक्कम असावी त्यामुळेच तिला बंडखोरी करणे परवडत असावे' अशी शक्यता सूचित करण्याचा माझा हेतु होता हे खरे.
आभार
शरदराव,
खुलासा केल्याबद्दल आभारी आहे. नसरीन यांना आर्थिक अडचणी कदाचित नसतील पण मानसिक पातळीवर त्यांना अत्यंत हलाखीचे आयुष्य काढावे लागते आहे. ही जाणीव चर्चाप्रस्तावातून जाणवली नाही म्हणून वरील वाक्य लिहीले.
----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.
आणखी काही "अवांतर"
अवांतर : गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांच्या संदर्भात , तस्लीमा नसरीन यांच्याबद्दलची भारतीय उपखंडातील लोकांची मते-मतांतरे.
दुवा १
दुवा २
दुवा ३
दुवा ४