शिल्पा शेट्टी चुकली का आम्ही चुकतो आहोत.?

अमेरिकेचा अभिनेता रिचर्ड गेर याने शिल्पा शेट्टी चे चुंबन घेतल्याचे विविध दैनिकातले छायाचित्रे,अनेकांनी पाहीलीत.(चोखंदळ उपक्रमींनीही या विषयाकडे कानाडोळा का केला ? माहीत नाही.)आणि एक नवा वाद उफाळुन आला.आम्ही संस्कुती ऱक्षक वैगरे च्या प्रतिक्रीयेच्या शोधात होतो,पण त्यात वावगे ते काय असा चर्चेचा सुर दिसतो आहे.आहे का कुणाला काही माहीती.आपल्या मताची /चर्चेची गांभीर्याने वाट पहात आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

संस्कृतीच्या र्‍हासाबद्दल .........

शिल्पा शेट्टीने चुम्बनाला विरोध न केल्या मुळे, रिचर्ड गेरने हिम्मत दाखवली. यात रिचर्ड तात्यान्चा काय दोष? गुळ दिसला की, मुन्गळे आणि माश्या येणारच! प्रसिध्धी आणि पैश्यापुढे, संस्कृतीच्या र्‍हासाचा कोण विचार करतो? मग ती, शिल्पा असो कि, रिचर्ड तात्या असोत.

'रिचर्ड तात्या!', माझे मत.

प्रसिध्धी आणि पैश्यापुढे, संस्कृतीच्या र्‍हासाचा कोण विचार करतो? मग ती, शिल्पा असो कि, रिचर्ड तात्या असोत.

रिचर्ड गेर यांचे 'रिचर्ड तात्या' हे नामकरण आवडले. :)

तात्यांचाही (रिचर्ड तात्या नव्हेत, आपले विसोबा तात्या!) प्रतिसाद इथे पाहिला होता. आता कुठे दिसत नाही.

माझे मत -

माझ्या मते शिल्पाच्या चुंबनप्रकरणाला वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले गेले आहे. रिचर्ड गेर यांनी शिल्पाचे चुंबन घेतले आणि तिने ते घेऊ दिले. त्या बाबत तिची काहीच तक्रार नसताना तथाकथित संस्कृतीरक्षक आणि मिडियावाले उगीच आगपाखड करत आहेत असे मला वाटते. आज अनेक हिंदी/इंग्रजी चित्रपटात आपल्याला सर्रास चुंबनदृष्ये पाहायला मिळतात.

-माधवी.

संस्कृती

हे केल्याने संस्कृतीचा र्‍हास होतो किंवा ते केल्याने असे बर्‍याच वेळा ऐकायला मिळते. नक्की आपली संस्कृती म्हणजे काय हे जाणून घ्यायला आवडेल.
कामसूत्र आणि खजुराहो हे ही आपल्याच संस्कृतीमध्ये आहेत. त्यांचे काय?

संस्क्रूती.....!

एकूण चर्चेचा सूर असा दिसतो कि, ' शिल्पा आणि गेअरची काही हरकत नसताना आपण का नसती उठाठेव करा ?' थोडक्यात 'आम्हा काय त्याचे'.. ?
सर्व ठिकाणी हीच उदासीनता नडत्ये आहे. चारचौघात कसे वागावे यासाठी काही लेखी नियम नसले तरी थोडा धरबंध असावा. यात संस्क्रुतीच्या नावाने नगारे पिटण्यात काही अर्थ नाही. चॅनेल वरील द्रुष्ये बघितली असता जो काही प्रकार झाला तो किळसवाणाच म्हणायला पाहिजे.[ तुम्ही म्हणू नका पाहिजेतर] हि दोघे एड्स विरोधी प्रचार करत होते कि .........
आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या एवढ्या गप्पा मारायच्या तर पोलीस प्रेमी युगूलांवर का कारवाई करतात ?
समाजाने या वर्तनाचा निषेध केला पाहिजे.
मी या सर्व प्रकाराचा जाहीर निषेध करतो.

यार हसीन गले मिल जा..

यार हसीन गले मिल जा
मेरी उमर गुजरती जाये...
असेच काहीसे रिचर्ड गेरला म्हणायचे असावे. अर्थात त्याच्या बाहुपाशात शिल्पा शेट्टीला बघून संस्कृतीसंरक्षकांच्या तुपात भिजवलेल्या शेंडीचे केस जळाले यात नवल ते काय? एका सज्ञान माणसाने एका सज्ञान तरुणीला मिठीत घेणे यापेक्षा किळसवाणे आणखी काय असू शकते? शिल्पा शेट्टी या गुळावर गेररुपी मुंगळा झेपावला याची नवसागराचे फसफसते रसायन पिणार्‍या खेकड्यांना असूया वाटणार नाही तर कुणाला? टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरशी झुंजणार्‍या असहाय तरुणीवर बलात्कार होतो, निठारीमध्ये कैक बालकांचा क्रूर लैंगिक छळ होतो, पण त्याचे काय हो एवढे? गेरला, शिल्पाला झोडा... आपल्या दिव्य संस्कृतीचा र्‍हास करताहेत ते!
सन्जोप राव

टाटा हॉस्पिटल

संजोप राव,

टाटा हॉस्पिटल बद्दल आपण केलेले विधान अत्यंत चूक आहे. त्या असहाय अल्पवयीन मुलीवर तिचा प्रियकर म्हणवणार्‍या एका मोहम्मद फिरोझ खान नावाच्या तरूणाने बलात्कार केला आहे. याच्याशी टाटा हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांचा संबंध नाही.

त्या मोहम्मदला अटकही करण्यात आलेली आहे.

वास्तवाला धरून मुद्दे मांडा.

धोंडोपंत

व्यक्तिगत रोखाचा भाग काढून टाकण्यात येत आहे. - उपसंपादक

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

हा हा हा....

बलात्कार कुणी केला हे महत्त्वाचे नसून त्या असहाय पीडीत तरुणीलाही वासनेची शिकार व्हावे लागले हा मुद्दा आहे.मोहम्मद फिरोझ खान हा अनावश्यक उल्लेख हा भावना पेटवण्याचा (तुमचा) प्रकार आहे हे कुणालाही समजेल. त्या मोहम्मदला अटकही करण्यात आलेली आहे. हेही तसेच अनावश्यक वाक्य.

लैंगिक संबंधामध्ये निकोपता नसणे आणि लैंगिक भुकेचे शमन योग्य त्या मार्गाने न होणे या कारणांचे हे परिपाक आहेत. त्याचेच प्रतिबिंब शिल्पा शेट्टीच्या चुंबनप्रकरणात आपण संस्कृतीची कावड खांद्यावर घेऊन वर्षानुवर्षे चालत आलेलो आहोत या आविर्भावात दिलेल्या प्रतिसादांत दिसते. हे तथाकथित संस्कृतीसंरक्षक हीच समाजविकासातली प्रमुख धोंड आहे. त्यांच्याकडून सुसंगत विचारांची अपेक्षा करणेही फोल आहे.

सन्जोप राव

खरे आहे

टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरशी झुंजणार्‍या असहाय तरुणीवर बलात्कार होतो

हा गैरसमज आहे- टाटा हॉस्पीटल च्या बाहेर जम्माडी गम्मत करुन विष्ठा टाटा हॉस्पीटलवर (वसुलीसाठी) फेकल्या जात असल्याचे समोर आलेले आहे.

बलात्कार कुणी केला हे महत्त्वाचे नसून त्या असहाय पीडीत तरुणीलाही वासनेची शिकार व्हावे लागले हा मुद्दा आहे.

हेच वाक्य अनावश्यक वाटते.

तथाकथित संस्कृतीसंरक्षक हीच समाजविकासातली प्रमुख धोंड आहे

खरे आहे- बापाने पोरासमोर दारु प्यावी की नाही ? आक्षेपार्ह्य सिन असलेले सिनेमे मुलासोबत/ वडिलांसोबत बघावे का ?
आपले काय म्हणणे आहे ? समाज विकास ह्यानेच होत असेल तर तसे करायला ऑब्जेक्शन का ?

दुवा?

हा गैरसमज आहे- टाटा हॉस्पीटल च्या बाहेर जम्माडी गम्मत करुन विष्ठा टाटा हॉस्पीटलवर (वसुलीसाठी) फेकल्या जात असल्याचे समोर आलेले आहे.

या बातमीचा दुवा मिळेल का? ही बातमी कोणत्या वृत्तपत्रात आली आहे?

अरेरे, शेट्टी......हा काय विषय आहे?

मोहन पाठक

पेपरवाले वाटेल तो विषय मोठा करतात
आणि आपण टाइमपास करत रहातो.

इति अलम

चुंबन्

एका ठिकाणी गोरे लोकांनी टोमणे मारले म्हणून रडायच आणि दुसऱ्या ठिकाणी चुंबन द्यायच. हा काय प्रकार.हा तर खेळ झाला भारतीय लोकांशी.

माझे वैयक्तिक मत

नव्या पिढिची असल्यामुळे असेल्, मला नाही काही फार वाईट नाही वाटल बुवा.

आता आपली सन्स्क्रुती (प्लीज मला कोणीतरी अनुस्वार कसा द्यायचा ते सान्गा ) तीला धक्का तेव्हा बसला असता जर ती भारताची प्रतिनिधी म्हणून गेली असती. पण ती personal capacity मध्ये गेली होती, त्यामुळे ती तिची सन्स्क्रुती दाखवत होती, भारताची नाही.

 
^ वर