शाळांमधे क्रियेटीव्हीटी जोपासली जात नाही?

ही २० मिनिटांची फित मुलांच्या क्रियेटीव्हीटीबद्द्ल अनेक चांगले मुद्दे मांडते. खुसखुशीतपणे श्री. रॉबिन्सन हे त्यांचे विचार मांडतात ते आपल्याला ही फित २० मिनिटांची असुनही त्यात मनोमन् गुंतवतात. [इतर वेळी १० मिनिट झाले की, फित एकाग्रतेने पहाणे अशक्य होते.]
श्री. रॉबिन्सन ह्यांनी मांडलेल्या विचारांपैकी काही विचार/किस्से खाली दिले आहेत.

१. साक्षरता व कलात्मकता ह्या दोन्ही बाबी समान महत्वाच्या मानल्या जाव्यात.
२. मुलिचा आणि शि़क्षकाचा संवाद- ती जेव्हा देवाचे चित्र काढत असते...
३. मुलं चुका करायला घाबरत नाही- खरं म्हणजे त्यांना चुका झाल्यानंतर शिक्षेच्या भितीने घाबरावयाचं नसतं व ते का?...त्याबद्दल...जर त्यांना चुका करु दिल्या नाहीत तर "ओरिजनल" असे काही निर्माण होत नाही...
४. आपण क्रियेटीव्हीटी कशी शिकून आपल्या मनातून बाहेर घालवतो ...
५. जगभरातील शिक्षणपद्धतीत कलेला कसा उतरंडीच्या सगळ्यात खालचा अग्रक्रम मिळतो...
६. जगभरातील शिक्षणपद्धतीचे ध्येय युनिव्ह्र्सिटी प्रोफेसर निर्माण करण्याचे आहे का?...
७. "आउट ऑफ बॉडी" अनुभवाच्या बाबतीतले मत तर अगदी अफलातून आहे
८. सध्याची शिक्षणपद्धत १९०० व्या शतकाच्या आधी अस्तित्वात नव्हती..ती औद्योगिककरणानंतर अस्तित्वात आली...
९. स्त्रीया मल्टीटास्कींग का करु शकतात...
१०. इंटेलिजन्सबाबत ३ महत्वाच्या माहिती

अशा अनेक बाबी त्यांनी अत्यंत रसाळपणे उलगडून दाखवल्या आहेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

फितीचा दुवा

मस्त

रॉबिन्सन यांचे भाषण मस्त आहे.

प्रेझेंटेशन" स्किल्स

खरय. ज्यांना शिक्षण वगैरे विषयात रस नाही त्यांनी ही फित "प्रेझेंटेशन" स्किल्ससाठी जरी पाहिली तरी त्यांना आवडेल.

वा!

सुंदर चित्रफित. इथे दिल्याबद्दल अनेक आभार.
टेडमधली जवळजवळ सर्वच व्याख्याने ऐकण्याजोगी असतात असा अनुभव आहे.
यातील सर्व मुद्दे मान्य आहेत फक्त एकाबद्दल शंका आहे. रॉबिन्सन यांच्या म्हणण्याप्रमाणे जगातील सर्व शिक्षणसंस्था कलेपेक्षा शास्त्राला जास्त महत्व देतात. शांतिनिकेतनबद्दल जे ऐकले आहे त्यावरून तिथे परिस्थिती वेगळी होती/आहे असे वाटते. जाणकारांनी खुलासा करावा.
रॉबिन्सन यांच्या विनोदबुद्धीवर फिदा आहे. सर्वांनी ही चित्रफित पहावी आणि पालकांनी तर जरूर पहावी असे सांगावेसे वाटते.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

झोल्तान कोदॉय

अजुन तु नळी फित बघितलेली नाहि. मात्र राजेंद्रचा प्रतिसाद वाचून विषेशतः

जगातील सर्व शिक्षणसंस्था कलेपेक्षा शास्त्राला जास्त महत्व देतात

हे वाचून पु.लंनी "हंगेरी-माझा नवा मित्र" मधल्या झोल्तान कोदॉय यांची आठवण झाली.
त्यानी केवळ पुस्तकी अभ्यासालाच अभ्यास न मानता संगीत, खेळ आदि गोष्टीनाहि प्राधान्य दिले. संगीत, क्रीडा यासाठी अख्खी विश्वविद्यालये स्थापन केली.

मुळे लेखातील फीत बघून मत देईनच

ऋषिकेश
------------------
तुमच्या वाद्यावर जरूर प्रेम करा, मात्र प्रेम करण्यासारखे ते एकच वाद्य आहे असे समजु नका - झोल्तान कोदॉय

सबस्क्राईबच

सर्वांनी ही चित्रफित पहावी आणि पालकांनी तर जरूर पहावी असे सांगावेसे वाटते

अगदी खरे. मी तर जो दिसेल त्याला सांगत सुटलोय की ही फित पहा. टेडला तर आता सबस्क्राईबच केले आहे.

हसत खेळत

आणि चुटक्यांनी खुसखुशीत केलेले भाषण.

विद्यार्थ्याला साचात बसवणारी शिक्षणपद्धती नसावी, काही मुलांची प्रगती वेगळ्याच दिशेने होते, त्यासाठी वाव द्यावा, हे त्यांचे मत पटण्यासारखे आहे.

फीत दिल्याबद्दल धन्यवाद.

("सर्व किडे नाहिसे झाल्यास वि. सर्व मनुष्यप्राणी नाहिसे झाल्यास जगाचे काय होईल?" वगैरे अनेक चुटके गमतीदार वाटले, पण त्यातून वक्त्याला बोध द्यायचा होता तो समजला नाही.)

सर्व किडे नाहिसे झाल्यास

("सर्व किडे नाहिसे झाल्यास वि. सर्व मनुष्यप्राणी नाहिसे झाल्यास जगाचे काय होईल?"

किटकांच्या विविधतेची क्रियेटीव्हीटीशी तुलना करुन जर आपण मुलांमधील क्रियेटीव्हीटी मारली तर त्याचा परिणाम...असे त्यांना म्हणायचे होते असे मला वाटले.

चित्रफित पाहिली. छान आहे.

चित्रफित पाहिली. छान आहे. त्यांचे इंग्रजी पहिल्यांदा ऐकताना डोक्यावरुन जात होते. अनेकदा प्रेक्षक हसले की विनोद झाला हे समजत होते. पण पुन्हा ती फित पाहिली तर अजून काही डोक्यात प्रकाश पडेल.

किटक आणि माणूस हा हास्य फुलवणारा दृष्टांत मला सुद्धा नीटसा समजला नाही.
--लिखाळ.

 
^ वर