उपक्रमरावांना सप्रेम भेट! ;)
आदरणीय उपक्रमराव,
राम राम!
हां हां, कृपया गैरसमज करून घेऊ नका. माझा लेख म्हणजे बहुतेक आपल्याला काहितरी नावेच ठेवलेली असणार असं कदाचित आपल्याला वाटलं असेल! पण तसं नाही. आज जालावर मुशाफिरी करत असताना अचानक काही फुलं नजरेस पडली. ही फुलं आपल्याला सप्रेम भेट म्हणून द्यावी, असं उगीचंच वाटून गेलं! ;)
काय आहे बरं का उपक्रमराव, गेले अनेक दिवस आम्ही 'उपक्रमची ध्येयधोरणं' या विषयावर आपल्याशी वाद घालतो आहोत, भांडण करत आहोत. अलिकडे बर्याचदा आपल्याशी फक्त वादच होतात.
वाद, भांडणं, मारामार्या ह्या आपल्या जागी चालूच राहतील. त्याचं विशेष काही नाही. पण आपण ज्या व्यक्तिशी रोज फक्त वादच घालतो, भांडण करतो, नावे ठेवतो त्या व्यक्तिबाबतही अचानकपणे कधितरी, कुठेतरी मनात एखाददा ओलावाही निर्माण होतो. किंबहुना, तो आत कुठेतरी असतोच! :)
आज ही काही फुलं पाहिली आणि अचानक मन कुठेतरी हळवं झालं.
'उपक्रमरावांना आपण ही फुलं सप्रेम भेट म्हणून देऊयात का? आपण रोज त्यांच्याशी उपक्रमच्या ध्येयधोरणाविषयी वाद घालतो, भांडतो. आज जर ही फुलं आपण त्यांना दिली तर त्यांनाही जरा बरं वाटेल. च्यामारी जो उठतोय तो त्यांना बोलतोय, पण शेवटी त्यांनीही मायमराठीच्या प्रेमाखातरच हे संकेतस्थळ निर्माण केले आहे ना?'
असे काही विचार मनात आले आणि ह्या चार ओळी लिहायला बसलो! ;)
तेव्हा उपक्रमराव, आमच्या या भेटीचा कृपया स्वीकार करा. अहो आम्ही कोकणी लोक असेच असतो. बाहेरून फणसासारखे काटेरी आणि आतून गर्यासारखे गोड! बोलण्यात तोंडाळ आणि शिवराळ, पण मनात काही न ठेवणारे! ;)
ता क - वर म्हटल्याप्रमाणे भांडणं, वादविवाद, मारामार्या यापुढेही सुरूच राहतील. काळजी नसावी!! :)) आणि हो, सदर लेखात माहिती आणि विचारांची देवाणघेवाण नाही म्हणून हे लेखन उडवून लावू नका. तात्याने प्रेमाने दिलेली फुलं अशी पायदळी जाऊ देऊ नका!! :)
तुमचाच,
तात्या.
Comments
फुलवाले,दिलवाले असतात.
फुलवाले, दिलवाले असतात.फुले देणारे ही चांगलीच असतात.(आठ्वा:- ती फुलराणी) सर्व फुले सुंदर असताताच.पण ती घेणा-याला आवडतीलच हे कशावरुन.माझी एक मैत्रीण आहे(नसली तरी म्हणनन्याचा प्रघात आहे म्हणुन)तीला सुंदर फुले नाही आवडायची.ती म्हणायची.तु सुंदर फुले देशील,मग मी तुझ्या प्रेमात पडेन,आणि मग तु जसे म्हणशील तसे मला वागावे लागेल.( आठ्वा:- आरती प्रभुं चे नाही कसे म्हणु तुला म्हणते रे गीत)म्हणजे मी ठरवलच आहे .मोजुन मापुन प्रेम करायचं ?तर तुझी ही फुले काय कामाची .?
(यातली सर्व वाक्य काल्पनीक आहेत.याचा कोणत्या ही घटना ,प्रसंगाशी संबध नाही ,तसे वाटत असल्यास तो केवळ योगायोग समजावा)
आपला
फुलाची टोपली घेऊन् बसणारा.
क्लास..;)
फुलवाले, दिलवाले असतात.
अरे वो तो हम पेहेलेसे है! ;)
ती म्हणायची.तु सुंदर फुले देशील,मग मी तुझ्या प्रेमात पडेन,आणि मग तु जसे म्हणशील तसे मला वागावे लागेल.
ओहोहो! क्या बात है बिरुटेसाहेब! मार डाला..
आपला
फुलाची टोपली घेऊन् बसणारा.
हे बाकी क्लासच! मान गये बिरुटेसाहेब..
आपला,
(फुलवाला-दिलवाला!) तात्या.
हे बरं केलंस!
त्यासंबंधी माहितीपर दुवे देउन मी ह्या प्रस्तावाला अधिक माहितीपूर्ण बनवतो.
हे एक बरं केलंस बाबा! ;)
बाय द वे, नुकतीच माझी आणि उपक्रमरावांची मांडवली झाली आहे. भावीकाळात आमदारांचा पाठिंबा वाढवण्याच्या दृष्टीने मी पुन्हा राष्ट्रवादी पक्ष सोडून मेन स्ट्रीममधल्या (मुख्य प्रवाहातील) काँग्रेस पक्षात दाखल झालो आहे! ;)
आपला,
तात्या पवार!
इद मुबारक हो
बक्री इद मुबारक हो उपक्रम राव
सांभाळा बरे इद च्या बकर्याला धुष्ठ पुष्ठ बनवून कापायची रीत असते.
(मटणखाऊ) मुंजा
सुरेख फुलं.
तात्या,
फुलं खरंच खूप सुरेख आहेत. पाहून प्रसन्न वाटले. उपक्रम प्रशासनाला माझ्याही शुभेच्छा.
वाद, भांडणं, मारामार्या ह्या आपल्या जागी चालूच राहतील. त्याचं विशेष काही नाही. पण आपण ज्या व्यक्तिशी रोज फक्त वादच घालतो, भांडण करतो, नावे ठेवतो त्या व्यक्तिबाबतही अचानकपणे कधितरी, कुठेतरी मनात एखाददा ओलावाही निर्माण होतो. किंबहुना, तो आत कुठेतरी असतोच! :)
खास तात्यांच्या शैलीतल्या वरील ओळी खूप आवडल्या!
-माधवी.
मस्त फुले
एक से एक फुले!
उपक्रम जिंदाबाद