छायाचित्र - घुमट-घुमट्या
हल्लीच विजापुरला गेलो होतो तेव्हा तेथील गोलघुमटाच्या मिनारावरील छोट्या घुमट-घुमट्यांचे हे छायाचित्र काढले.
![]() |
घुमट-घुमट्या |
याबाबत विदा असा :
कॅमेरा : ऑलिंपस E-५००
उघड-वेळ : ०.००८ सेकंद (१/१२५)
छिद्रमान : f/६.३
आयएसओ : १००
यात काही त्रुटी मला अशा वाटतात :
१. यात कसले चित्र आहे? तीन वेगवेगळे विषय असू शकतात तीन्ही अर्धवट आलेले आहेत :
(अ) वेगवेगळ्या आकाराचे घुमट घुमट्या : असे असल्यास छिद्रमान आणखी एक पायरी लहान करून उघडवेळ एक पायरी वाढवायला हवी होती.
(आ) वायव्य एकतृतीयांशबिंदूवरील मध्यम आकाराचा घुमट मुख्य विषय, बाकी घुमट-घुमट्या पार्श्वभूमी : असे असल्यास छिद्रमान आणखी एक-दोन पायर्या मोठे करून उघडवेळ एक-दोन पायर्या उतरवायला हवी होती.
(इ) नक्षीदार कातरलेले आकाश : असे असल्यास छिद्र खूप लहान करून घुमट्या काळोख्या (पण कमालीच्या रेखीव) करून टाकायला हव्हा होत्या.
२) हे चित्र बहुधा कृष्णधवल चांगले दिसेल.
Comments
:(
स्वारी.. पण चित्र आवडले नाहि. :(
डावीकडील तटबंदी सदृश भिंत रसभंग करत आहे असे वाटले.
तटबंदी वगळली असती तर वरील पैकी एका विषयावर विचार करता आला असता.
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
अरे - मुद्दाम घेतली आहे
मुख्य घुमटाचा तटबंदीसारखा दिसणारा भाग मुद्दामून घेतला आहे. :-)
कातरेदार महिरप विषय (इ) साठी खास.
छान चित्र
चित्रातली घुमटांची मांडणी आणि तटबंदी आवडली.
सगळ्यात मोठ्या घुमटावरील सावली मात्र थोडीशी खटकत आहे. वेगेळ्या वेळेला चित्र घेऊन ही सावली टाळता आली असती का?
सुरेख
चित्र सुरेख आले आहे. कृष्णधवल बघायला आवडेल.
कोलबेर यांच्याशी सहमत आहे, सावलीमुळे थोडा रसभंग होतो आहे असे वाटते.
----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.
सावली
छायाचित्र ठीक आहे. एखाद्या कडेच्या खिडकीतून कधीतरी अगदी चिंचोळे बाहेरचे दृष्य दिसते तसे वाटले. चित्र गवाक्षातून/झरोक्यातून/ असे काही काढले आहे का?
कधीकधी छायाचित्रात काय दाखवले आहे पेक्षा काय दाखवले नाही ह्याचा विचार करणे सोपे असते तसे आहे.
वरील छायाचित्र इब्राहिम रोजा येथील असावे असे गूगलवरून कळले. बरोबर आहे का?
विजापूरची इतर छायाचित्रे पहायला आवडली असती.
चित्र
चित्र मोठ्या घुमटाचे आहे असेच् वाटते. घुमटावर पडलेल्या सावलीमुळे चित्राचा निम्म्यापासून खालचा भाग जास्त डार्क आहे. कृष्णधवल इतके चांगले दिसले नसते असे वाटते. त्यात मातकट रंग समजला नसता. सेपिया मोड मध्ये कन्व्हर्ट करुन् बघायला हरकत नाही.
घुमटावर पडलेली सावली महिरपीची नाही अशी शंका येते. महिरपीपलिकडे अजून मोठा घुमट आहे का?
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
सावली, सीपिया, घुमट
हा चित्र गोल घुमट इमारतीतलाच आहे. मिनारातील जिना चढून गेल्यावर आधी परिघाभोवतीच्या एका सज्जात (बाल्कनीत) आपण पोचतो, मग तिथून पुन्हा मुख्य घुमटाच्या आतल्या बाल्कनीमध्ये जायला दार आहे. त्या बाहेरच्या सज्जातून मिनाराच्या वरच्या घुमटा-घुमट्यांचे हे चित्र वेगळेच टिपले.
सावलीचा मुद्दा बरोबर आहे. सावली हलण्यासाठी अर्धा तास थांबावे लागले असते असे वाटते. (पण घाई होती.)
गंमत म्हणजे सीपिया चित्र केल्यानंतर हे त्या सावलीचेच चित्र होते, आणि तीच उत्सवमूर्ती झाल्यानंतर ती तेवढी बोचतही नाही. डेप्थ ऑफ फोकस बर्यापैकी लांब आहे - मोठ्या घुमटावरच्या चुन्याच्या खपल्या दिसत आहेत, सीपियामध्ये हा तपशील उठून दिसतो - मुद्दामून मोठ्या चित्राचा दुवा येथे देत आहे.
हा
हा फोटो खूप आवडला...! तुम्ही सांगितलेले सगळे डिटेल्स उठून दिसत् आहेत!
सहमत
भाग्यश्री यांच्याशी सहमत. किंबहुना धनंजयरावांनी सांगितलेले डिटेल्स मला तर बसूनही दिसत आहेत.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
:))
:)))
काय् वेगळं आहे तुमच्या संगणकावर?? मीही बसूनच पाहीन म्हणते..
सीपीया मस्त!
मी असे क्रॉप करुन बघीतले. कसे वाटते बघा. थोडासा काँट्रास्ट वाढवल्याने घुमटावरचे नक्षीकाम वगैरे डीटेल्स अजुन ठळक वाटत आहेत.
वाह मजा आली
सेपिया मोड मध्ये सावली झकास दिसते. चित्र कशाचे आहे हा प्रश्न मिटला. कोलबेर यांच्या चित्रात मोठ्या घुमटाचे शिखर कट झाले आहे. ते जरा खटकते.
यादवतात्या कर्हाडकर
शिखर
हो तसे मुद्दामच केले आहे.
मनोर्या सारख्या घुमटावर लक्ष अधिक केंद्रित व्हावे ह्या उद्देशाने ते केले आहे.
मोठ्या घुमटाचे टोक तसेही फिक्कट आहे आणि त्यावरची सावली डिस्ट्रॅक्ट करते म्हणून एंफसीस त्या मनोर्यावर येण्यासाठी असे क्रॉपींग केले.
"कथा काय आहे" या तत्त्वाचे उत्तम उदाहरण
ती सावलीच जर "विषय" करायची असली तर शिखर कापून रसभंग होतो, पण जर मागचा मोठा बुरूज पार्श्वभूमीत टाकयचा असेल तर शिखर कापून तो परिणाम साधतो.
चित्राची "कथा काय आहे" यावर मांडणीच्या निर्णयांचे बरोबर-चूक ठरते, या तत्त्वाचे हे उत्तम उदाहरण आह
शिखर कापुन निगेटिव्ह स्पेसचा (आकाशाचा) महिरपी आकार थोडाच बदलतो. ते उद्दिष्ट्य असेल तर शिखर जास्तीतजास्त ठेवलेले बरे, पण पुर्ण ठेवलेच पहिजे असे नाही.
सीपिया
हा सिपिया फोटो आवडला. आता ह्याच्यापुढे तो पहीला फोटो कमी वाटतोय :-)
कुठल्या तरी फोटोग्राफी विषयावरच्या जाड पुस्तकातील एका पानावर शोभेल असा फोटो. :-)
मस्तच..
धन्याशेठ,
घुमटाचा फोटो मस्तच रे!
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
ओहो, सुंदर चित्र खेचलंय !
फोटो सुंदर आला आहे. आम्हाला फक्त छायाचित्रातले इतकेच कळते की पाहताक्षणी चित्र आवडलं का ?
जेव्हा त्याचे उत्तर हो असते ते चित्र सुंदरच !
बाकी छायाचित्रांचे तपशील सांगत बसणे म्हणजे, एखादी सुंदर असलेली स्त्री, कशामुळे अधिक सुंदर दिसली असती असे उगाच कल्पना करुन सांगितल्यासारखे वाटते.
अर्थात आमची काही हरकत नाही...चालू द्या ! :)
अन्य काही प्रतिक्रिया
सदस्य क्रमांक १४५६ (हल्लीची आयडी "प्रकाश लालपोतू") यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया या धाग्यात जाहीर देण्याबाबत मी त्यांना विनंती केली. त्यानंतरही दुर्दैववश त्यांचे मला अजून व्य.नि.च येत असल्याकारणाने प्रतिसाद देण्यात काही तांत्रिक अडचणी असल्याची शंका येते.
त्यांच्या समीक्षणाची चर्चा व्हावी, मला आणि समुदायातील अन्य सदस्यांना अधिक उद्बोधन व्हावे म्हणून ते येथे देत आहे :
व्य. नि. १
> एव्ह्द्या मोथ्या वास्तूत फोटो घेन्यासारखे दुसरे खूप काही आहे .
व्य. नि. २
> गोल्घुमटाचे आणाखी चान्गले फोटो घेता आले असते .प्रयत्न केला नाही का ?
व्य. नि. ३
> फोटो खास् वाटला नाही.
माझे उत्तर :
(त्यांना उघड प्रतिसाद देण्याबद्दल आधीच लिहिल्यामुळे, अजूनही त्यांचे निरोप उघड नसून व्यक्तिगत असणे, हे केवळ दुर्दैववश असावे असे मानण्यास मला जागा आहे. त्यांना तसे सांगितल्यानंतर त्यांचे प्रतिसाद येथे देण्यात कुठलाच अनैतिक गौप्यस्फोट होत नाही, असे मला वाटते.)
मस्त! :)
त्यानंतरही दुर्दैववश त्यांचे मला अजून व्य.नि.च येत असल्याकारणाने प्रतिसाद देण्यात काही तांत्रिक अडचणी असल्याची शंका येते.
हा हा हा! :)
याबाबत तुमचे विचार लेखाच्या प्रतिसादातच मांडा, त्यामुळे सर्वांनाच तुमच्या चर्चेचा लाभ होऊ शकेल, आणि उपप्रतिसादांमधून मलाही मार्गदर्शन मिळेल.
म्हणणे वाजवी वाटते!
असो,
'अनैतिक गौप्यस्फोट' हे शब्द अतिशय आवडले! :)
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
अनैतिक
अनैतिक गौप्यस्फोट आणि नैतिक गौप्यस्फोट ह्यांत नक्की काय फरक आहे ?
--- उपक्रमी
(मराठी संकेतस्थळांवरील सर्व सदस्य तमाशाप्रेमी असतात. काही उघडपणे तमाशा बघतात/करतात, तर काही चोरून, एवढाच फरक!)
अपेक्षा/अपेक्षाभंग या बाबतीत सामान्य नैतिकता
"व्यक्तिगत निरोप" या शब्दप्रयोगामध्ये "व्यक्तिगत" हा शब्द वापरल्यामुळे, वेगळे काही ठरले नसल्यास, मजकूर व्यक्तिगत राहील ही अपेक्षा असते. अशा परिस्थितीत मजकूर उघड करणे अपेक्षाभंगाचे असते, आणि सामान्य समाज-वावरातील नैतिकता त्यास प्रतिबंध करते.
पण या विशिष्ट बाबतीत मी असे व्यक्तिगत निरोप नकोत, प्रकट प्रतिसाद द्यावेत, असे सांगितले होते. अशा परिस्थितीत पत्रव्यवहारकापैकी एकाने हे व्यक्तिगत नको, अशी अपेक्षा स्पष्ट सांगितली आहे. त्यामुळे दुसर्याचे मत "हे गौप्य आहे" असे असले तरीही "हे गौप्य राहील" अशी अपेक्षा राहू शकत नाही. त्यामुळे मजकूर उघड केला तरी कुठला अपेक्षाभंग नाही आणि त्या प्रकारची अनैतिकता नाही. अशा एकतर्फी गौप्याचा स्फोट अनैतिक नसतो.
माझ्या मते माझ्या वरील प्रतिसादात काही ठिकाणी शब्द अधोरेखित करून हा मथितार्थ स्पष्ट होता. सर्वच बाबतीत अशा प्रकारे मूळ-तत्त्वे काय असे प्रश्न विचारण्यात आलेत, तर समाजात वावर नामुष्कीचा होईल. अशा प्रश्नांची उत्तरे वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे देणे न देणे एवढेच काय माझ्या हातात आहे.
अडचन्
मला पण फोटो पाटवायचे आहेत् .काय करू ?
छान
छान चित्रे. मला सगळीच आवडली.
(फोटोग्राफर) माधवी
लय भारी
लय भारी. आमच्या हमाल बंधूंची चित्र पण टाकावी.
- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है