झुरळांची प्रजनन क्षमता

झुरळांची प्रजनन क्षमता ह्यावर कोणी माहिती देऊ शकेल का? मागे एकदा वसतिग्रहाच्या खोलीत राहताना झुरळांचा खूप त्रास झाल होता. अनेक उपाय करुनही झुरळांचा उपद्र्व आटोक्यात येत नव्हता. झुरळांची असामान्य प्रजनन क्षमताच ह्यामगे असावी असा माझा अंदाज आहे. तेव्हा ह्यवर कोणी संशोधन केले असल्यास त्याविषयी माहती मिळू शकेल का?

लेखनविषय: दुवे:

Comments

सुरेख विषय!

वरूणराव,

आपण फार सुरेख विषय चर्चेकरता मांडला आहे, त्याबद्दल 'माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीचा एक भुकेला उपक्रमी' या नात्याने मी आपले मनापासून अभिनंदन करतो.

झुरळांच्या प्रजननक्षमतेबद्दल गेल्या बर्‍याच दिवसांपासून मलाही ज्ञानलालसा होतीच, ती आता या चर्चेच्या निमित्ताने काहीशी पूर्ण होईल असे वाटते!

अनेक उपाय करुनही झुरळांचा उपद्र्व आटोक्यात येत नव्हता. झुरळांची असामान्य प्रजनन क्षमताच ह्यामगे असावी असा माझा अंदाज आहे.

अगदी खरं. माझाही तोच अंदाज आहे.

पण वरूणराव, आपण बेगॉन वापरून पाहिलंत का? बेगॉन वापरून झुरळं मरतात अशी माझी माहिती देवाणघेवाणीकरता मी येथील पटलावर ठेवत आहे!

तात्या.

धन्यवाद..

..पण तिथली माहिती ही इंग्रजीत आहे. मराठीतून ह्याविषयी माहिती मिळाल्यास बरे होईल.. खरतर म्हणूनच ही चर्चा इथं टाकली हो! असो दुव्या बद्दल पुनश्च आभार!!

- वरूण

एक माहिती ...

मी कुठेतरी असं वाचलंय की जगातील इतर सजिव अण्वस्त्रांच्या वापराणे मरण पावल्यावरही अंतिम बाकी राहिल ते झुरळ. (अर्थात येथे पृथ्वी अजून बाकी असेन मात्र किरणोत्सारितेने सजिवांचा नाश ही कल्पना केलेली आहे.)

याला कारण असे दिले जाते कि झुरळाचे अंडे खुप मजबुत असते , ते खुप काळ गोठलेल्या स्थितीत राहू शकते, आणि वातावरण अनुकुल झाल्याशिवाय परिपक्व होत नाही. म्हणजेच ही किरणोत्सारिता संपल्यावर त्या अंड्यांतून पिले बाहेर पडतील.

अर्थात ही केवळ ऐकिव माहिती आहे. जाणकार अधिक माहिती देतील.

नीलकांत

विंचू

अशीच माहिती विंचवांबद्दल वाचली होती. कार्यरत या अनिल अवचटांच्या पुस्तकात डॉ. हिम्मतराव बाविस्करांवर लिहिलेल्या लेखात याचा उल्लेख आहे.

चू.भू.दे.घे.

?

---मी

कोडगि झुरळे

हिरोशिमा आणि नागासाकि मधे बोमस्फोटानन्तर उत्खनन् केले असता तेथे फक्त झुरळे आणि उन्दिर सापडले.
बोध घ्या.

उडणारी झुरळे

काही काही झुरळे फार उडतात. त्यांना पकडायला जो गेला त्याचा दम काढतात. उडणार्‍या झुरळांची वेगळी जात असते का हो वरुण महोदय ?

 
^ वर