उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्र : एकाग्र..
वैद्य
March 14, 2009 - 2:26 am
नाशिकच्या काळाराम मंदीरात एकाग्र चित्ताने पठण करत असलेले साधुबाबा.
चित्राविषयी अभिप्राय/ सुचना/ टिका जरूर लिहा
![]() |
तांत्रिक माहिती :
ऍपर्चर : ५.६
शटर : १/१००
फोकल लेंथ : २४८ मिमि
आयएसओ : २००
दुवे:
Comments
सुंदर चित्र
समजा ऍपर्चर वाढवले असते, तर साधुबाबांची दाढी कमी क्रिस्प आली असती का ? ती अधिक भावली असती का ? ते एकाग्र नसून आजूबाजूच्या बायकांकडे चोरून बघताहेत, आणि एकाग्र नाहीत, हे कळले असते का ? आय एस ओ हे फिल्म साठी बनवलेले प्रमाण डिजिटल क्यामेरांसाठी कसे उपयुक्त आहे ?
--- उपक्रमी
उत्तरे
फोकल लेंथला जितके वाईड ओपन ठेवाता येईल तितके ओपन ठेवले आहे. ह्याहुन अधिक ते वाढवता येणार नाही.
मला अजून शार्प/क्रिस्प भावली असती. तुमचे मत काय आहे?
नाही ते चोरुन बघत नाही आहेत हे कळण्याइतकी स्पष्टता चित्रात आहे असं मला वाटतं.
डिजीटल क्यामेर्यांमध्ये आयएसओ बदलायला फिल्म बदलावी लागत नाही. प्रत्येक चित्रात वेगळा आयएसओ ठेउन काढता येते त्यामुळे डिजिटल क्यामेर्यांमध्ये हे फारच उपयुक्त आहे.
आय एस ओ
डिजीटल क्यामेर्यांमध्ये आयएसओ बदलायला फिल्म बदलावी लागत नाही. प्रत्येक चित्रात वेगळा आयएसओ ठेउन काढता येते त्यामुळे डिजिटल क्यामेर्यांमध्ये हे फारच उपयुक्त आहे.
माझ्या माहितीप्रमाणे फिल्म वर असणार्या सिल्व्हर आयोडाईडच्या घनतेनुसार (डेन्सिटीनुसार) फिल्मचा आय एस ओ बदलतो. जास्तीत जास्त क्रिस्प छायाचित्रे काढण्यासाठी अधिकाधिक आय एस ओ ची फिल्म असावी लागते. मग डिजिटल क्यामेर्यात, उगाच आय एस ओ चे सेटिंग का असावे ? येथे आय एस ओ म्हणजे पिक्सेल्स् डेन्सिटी (सर्वाधिक, क्यामेर्याच्या क्षमतेप्रमाणे) का नसावी ? बाकी रिसोल्युशन कमी करायचे असल्यास फोटोशॉप उपलब्ध आहे.
--- उपक्रमी
आय एस ओ
माझ्या माहिती प्रमाणे आयएसो हा प्रकाशाच्या उपलब्धतेचा योग्य वापर करुन घेण्यासाठी असतो. शार्पनेस/क्रिस्प/रेजोल्युशन ह्याच्याशी त्याचा थेट संबध नाही.
कमी उजेडात (उदा. देवळाच्या गाभार्यात) आयएसो वाढवावा लागतो. पण लख्ख प्रकाशात तो कमी ठेवावा लागतो कारण वाढवलेला आयएसो नॉइजही वाढवतो. डिजिटल क्यामेर्यांमध्ये प्रकाशाच्या उपलब्धतेनुसार सेन्सरमध्ये बदल करण्यासाठी आयएससो दिलेला असतो.
आपण दोघेही बरोबर
आय एस ओ रेटिंग हे प्रकाशग्राही कणांच्या फिल्मवरील घनतेवर, आणि त्या कणांच्या प्रकाशग्राह्यतेवर अवलंबून असते. कणांची प्रकाश ग्राह्यता (अथवा प्रकाश ग्रहणशक्ती) ही त्या कणांच्या आकारावर अवलंबून असते असे कळले.
गूगल वरून हे मिळाले.
एकेकाळी सिल्व्हर आयोडाईड हे प्रकाशग्राही कण म्हणून वापरत असत. हल्ली सिल्व्हर ब्रोमाईड वापरतात असे कळेल.
--- उपक्रमी
वा!
चित्र एका बाजूलाच झाले आहे. ते मध्य भागात हवे होते का?
काळाराम मंदिरापेक्षाही गंगेवर अजून एक से एक साधू पहायला मिळतात.
(नाशिक?
अरे वा!
कधी आला होतास? फोन करायचास भेटलो असतो ना आपण.)
आपला
गुंडोपंत
मला असे वाटत नाही
ते मध्य भागात हवे होते का?
मला असे वाटत नाही. कारण साधूच्या समोर जे करडे आऊट ऑफ फोकस वातावरण आहे, त्यातून कोलबेर काही तरी दाखवू इच्छितात, असे वाटते. एकाग्र असलेला साधूच्या पुढील सर्व काही धूसर आहे, हेच कोलबेरांना सुचवायचे असावे असे वाटते.
--- उपक्रमी
मध्य
नाही सौंदर्याच्या दृष्टीने साधुबाबा मधोमध ठेवले असते तर रसभंग होईल असे मला वाटते.
मागच्या वर्षी आलो होतो. तुम्ही नाशकात आहात माहित नव्हते नाहीतर नक्की फोन केला असता.
अर्धवट?
मला हे चित्र उभे पाहायला जास्त आवडले असते.. म्हणजे साधूबाबा कशात पाहून वाचत आहेत.. किंवा त्यांची आख्खी आकृती मी अपेक्षित होते.
मला नीट सांगता नाही येते, पण हे चित्र पाहता पाहता मधेच अर्धं कट् केल्यासारखे वाटले..
असेच वाटले
साधूबाबांनी पूर्ण कपडे घातले आहेत की नाही, हे कळायला उभे चित्र अधिक उपयुक्त असते. अन्यथा कशावर एकाग्रता करताहेत, हे कळणे अवघड आहे. कदाचित कोलबेर ह्यांना हे गुपीतच ठेवायला हवे असेल.
--- उपक्रमी
कुंभमेळा
कुंभमेळ्याला असे साधु चिलिम गांजा मारीत असतात. उभ्या चित्रात कदाचित चिलिम आली असती. कोलबेर यांना ते गुपीत ठेवायचे असेल.
प्रकाश घाटपांडे
साईड पोर्ट्रेट
साधुबाबांचे एकाग्रचित्त साईड पोर्ट्रेट काढायच्या विचाराने काढले होते. त्यामु़ळे त्यांनी खाली कपडे घातले आहेत का, किंवा काय वाचत आहेत ह्या गोष्टी दाखवण्यावर भर दिलेला नाही.
आवड..
मला त्यांच्या कपडयांशी काही देणं-घेणं नाहीए.. मला तो फोटो उभा आवडला असता इतकंच्..
याचा अर्थ मला तुम्ही काढलेला फोटो आवडलाच् नाही असेही नाही...
कदाचित मी हे नमूद करायला हवे होते की बाकीच्या सर्व् गोष्टी अफलातून आहेतच.. सुंदर, उत्तम फोकस आणि काय् काय् असलेला फोटो काढणे तो तुमचाच प्रांत् आहे ! :)
छायाचित्र
आवडले, प्रकाशयोजनेमुळे म्हणा किंवा पार्श्वभूमी कृष्णधवल केल्यामुळे म्हणा चित्राला थोडासा 'ड्रीमी' पोत आल्यासारखा वाटला. खाली पाहणारा डोळा बरोबर मध्यावर येतो, तेव्हा 'एकाग्र' हे शीर्षक अगदी समर्पक आहे.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
लँडस्केप स्वरूप पटले नाही..
भाग्यश्रीशी सहमत. सदर प्रकाशचित्राचे लॅडस्केप स्वरूप पटले नाही. पोर्ट्रेट स्वरुपात हे चित्र अधिक परिणामकारक ठरले असते असे वाटते!
नाशिकच्या काळाराम मंदीरात एकाग्र चित्ताने पठण करत असलेले साधुबाबा.
कुठलेही प्रकाशचित्र हे स्वत:बद्दल अधिकाधिक बोलणारे असे सेल्फ एक्सप्लनेटरी असावे. साधुबाबा एकाग्र चित्ताने काही पठण करत आहेत याची कल्पना येते. परंतु स्थल-काल आणि आसपासच्या परिसराची कल्पना चित्रावरून येत नाही. कोलबेरने काळाराम मंदिराची माहिती पुरवली आहे हे ठीकच आहे परंतु चित्र तसे काहीच सांगत नाही!
आता एक उदाहरण पाहू. खालील चित्र पाहा -
रात्रीचे प्रकाशमान गेटवे ऑफ इंडिया अशी कुठलीही माहिती या चित्राबाबत पुरवावी लागत नाही. चित्रात रात्र दिसते आहे, आणि प्रकाशमान गेटवेही दिसते आहे.
सांगायचा मुद्दा इतकाच की कोलबेरच्या चित्रात नाशिक, काळाराम मंदीर-परिसर या बाबत काहीच खुलासा होत नाही. हे त्याने सांगितले म्हणून आम्ही मानले इतकेच!
असो..
आपला,
(एडिटर) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
गैरसमज
तात्या तुमचा गैर समज झालेला दिसतो. चित्राचे शिर्षक/विषय काळाराम मंदीर नाशिक नाही. 'एकाग्र' हा आहे. जो चित्रातुन दिसुन येतो.
काळाराम मंदीर नाशिक ही माहिती चित्रातुन कळत नाही म्हणुनच सुरुवातीला दिली आहे. (चित्र कुठं काढलं ? हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न असतो म्हणून) आणि मी सांगितलेले तुम्ही मानायलाच पाहिजे अशीही आवश्यकता नाही, हे चित्र न्युयॉर्कमधले आहे असेही तुम्ही समजल्यास माझी हरकत नाही.
अवांतर : तुम्ही दिलेल्या सेल्फ एक्स्प्लनेटरी चित्रात कुठल्यातरी वास्तूचे चित्र आहे हे समजते पण ते गेटवे ऑफ इंडियाच आहे असे स्पष्ट करणारे काहीच नाही (किमान एखादी पाटी वगैरे तरी?). बर हा गेटवे ऑफ इंडीया भारतात कुठे आहे त्याविषयीही काही माहिती नाही. कोणत्या तारखेला चित्र काढले? (चित्रात रात्र आहे हे समजत असले तरी) पौर्णीमा आहे का? चंद्राची कला कोणती आहे? ही माहिती मिळत नाही.
मुद्दा लक्षात आला असावा!
धन्यवाद..
कोलबेरा,
सदर चित्राच्या लॅडस्केप स्वरुपाविषयी तुझ्याकडून खुलासा व्हावा अशी अपेक्षा आहे.
इतर खुलाश्याबदल धन्यवाद..
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
लॅडस्केप स्वरुपाविषयी
लॅडस्केप/पोर्ट्रेट स्वरुप ही वैयक्तिक रुची आहे. माझ्या रुची प्रमाणे मला हे लँडस्केपच आवडले (पोर्ट्रेट स्वरुपहीही छानच दिसेल पण मला अश्या स्वरुपात अधिक नाविन्यपूर्ण वाटले)
अर्थात आणखी कुणाची रुची ह्याबाबतीत भिन्न असू शकते ह्याची जाणीव आहे, म्हणूनच त्यावर टिप्पणी केली नाही.
प्रताधिकार
वरील चित्र नक्की प्रताधिकारमुक्त आहे ना?
कारण त्यावर ट्रॅव्हलजर्नलडॉटनेट अशी अक्षरे दिसत आहेत.
हे चित्र तुम्ही काढले आहे का?
कोलबेराने दिलेले साधुबाबाचे चित्र कोलबेरानेच काढलेले असावे असे वाटते.
आपला
गुंडोपंत
एकाग्रता
कोलबेराला एकाग्रता हा मुद्दा दाखावायचा आहे?
मग जरा अवघड आहे. कारण हेच चित्र भांगेच्या अंमला खालील अध्यात्म,
झोप आलेला साधुबाबा, अशा शीर्षकाखालीली चालून जाईल.
परंतु चित्रात ही एकाग्रता कशावर आहे, म्हणजेच पुस्तक अथवा
पुजेची मूर्ती इत्यादी दिसले तर त्या चित्रातला भाव जास्त स्पष्ट होणार असे वाटते.
गंगेची माहिती असेल तर,
भांगेच्या अंमला खालील अध्यात्म या शीर्षकाशी
जास्तच जवळ जाणारे आहे हे असे कोणाही जुन्या नाशिककराला वाटले तर नवल नाही.
आपला
स्पष्ट
गुंडोपंत
दृष्टीकोन
पहाणार्याचा दृष्टीकोन.
मला एकंदरीत ह्या बाबाची बैठक, गंभीर मुद्रा हे सगळे (भांगेने झिंगलेला किंवा झोप आलेला ह्यापेक्षा) कशावर तरी चित्त एकाग्र झाल्यासारखे वाटतात. कशावर तो मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. (समोर मुर्ती किंवा पुस्तक ठेवुन बसल्यास भांगेने झिंगलेला किंवा झोपाळू वाटू शकत नाही का? माझ्या मते त्याने काहीही फरक पडत नाही. )
हे ही!
समोर मुर्ती किंवा पुस्तक ठेवुन बसल्यास भांगेने झिंगलेला किंवा झोपाळू वाटू शकत नाही का?
हे पण खरेच आहे म्हणा,
काही लोक तर येथेही भलते भलते आव आणून
भांगेच्या अंमलाखाली असल्या सारखेच बेताल पणे वागतात.
त्यापेक्षा हा एका ठिकाणी एकाग्रपणे बसलेला साधू खुपच चांगला आहे.
आवडला!
आपला
गुंडोपंत
चित्र आवडले
पोर्ट्रेट की लँडस्केप या वादात मला पडायचे नाही मात्र चित्र सुरेख आले आहे. रंगसंगती चांगली जमली आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
असेच म्हणतो
असेच म्हणतो.
असेच
म्हणतो. मी देखील!
-सौरभ.
==================
रंगसंगती छान, मांडणी पटली
दोन्ही आवडल्या.
साधूपुढची ("रिकामी") जागा मला तरी अर्थपूर्ण वाटली. मांडणी पटली.
कदाचित उभे चित्रही बनवता आले असते, पण ते वेगळे चित्र असते - या चित्रातली सुधारणा नव्हे.
असेच म्हणतो!!!
मलाही हे चित्र आहे तसेच आवडले. साधू मध्यभागी वगैरे घेतला असता सामान्य वाटले असते.
बिपिन कार्यकर्ते
वा!
प्रकाशचित्र आवडले.. पार्श्वभुमी संस्कारीत करून कृष्णधवल केली आहे का?
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
धन्यवाद मंडळी
प्रतिसाद देणार्या सगळ्यांचे आभार.
(कृतज्ञ) कोलबेर
छायाचित्र सुरेखच आहे!
'एकाग्र' असे शीर्षक असल्याने काळ्यापांढर्या रंगात असते तर पगडीवरच्या लाल पिवळ्या सरंगसंगतीकडे लक्ष न जाता फक्त चेहेरा आणि डोळ्यावरच लक्ष केंद्रित झाले असते का? असे वाटल्याने तसे चित्र करुन पाहिले आहे
चतुरंग
छान
मस्त! पूर्ण कृष्णधवलही छानच दिसत आहे.
धन्यवाद चतुरंग!
चित्र....
चित्र सुरेखच! उभे काढले असते तर अधिक आवडले असते की नाही हे आत्ता नाही सांगता येणार. निवडक भागातले रंग छानच दिसत आहेत. याबद्दल अजून काही माहिती देता येईल का? म्हणजे फोटोशॉप वापरले का? अथवा फोटोशॉपमध्ये सिलेक्टिव कलरींग कसे केले असे.
चित्र अजून शार्प असायला हवे होते. तसेच दंडांवरील लाकडी मण्यांचा दागिना दिसला असता तरी आवडले असते.
-
ध्रुव