हातभार
गेल्या महिन्यात काही कारणाने दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात जाणे झाले. नेहेमी प्रमाणेच त्यांनी दर्जेदार कार्यक्रम आयोजित केला होता. सहज त्या संस्थेचे ध्येयवाक्य पाहून मनात आले की खरोखरच ही संस्था आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून चाललेली आहे. ते ध्येयवाक्य आहे, कलायै हि यतेमहि । लगेच हे वाक्य मी टिपून घेतले.
तेव्हा आठवले की बी.ए. च्या शेवटच्या वर्गाला असताना निरनिराळ्या संस्थांची संस्कृत ध्येयवाक्य / बोधवाक्य शोधून काढून वेचण्याचा / संकलित करण्याचा प्रकल्प मी तेव्हा केला होता आणि त्या प्रकल्पाला पैकीच्या पैकी गुण तर मिळाले होतेच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे चि. द्वा. देशमुख / श्री. भि. वेलणकर यांच्या सारख्या विद्वानांची सुंदर शब्दक्रीडा अनुभवण्याचा एक नितांत सुंदर आनंद मिळाला होता. सुमारे ८०-९० संस्कृत ध्येयवाक्य / बोधवाक्य मी त्या वेळी संकलित केली होती. त्यातील वेचक ध्येयवाक्य / बोधवाक्य मी अनुवादासह वेळोवेळी प्रसिद्ध केली.
ज्यात राजपुताना रायफल्सचे वीरभोग्या वसुन्धरा तसेच आयएनएस हमला चे शत्रुन् हि जहि सारखी मनाला स्पर्शून जाणारी वाक्ये आहेत.
असो. तरी आपल्या सारख्या दर्दी, गुणग्राही वाचकांना विनंती की आपल्याला माहित असलेली संस्कृत ध्येयवाक्य / बोधवाक्य व ती ज्या संस्थांची आहेत त्याची माहिती देऊन माझ्या ह्या संकलनाला यथोचित हातभार लावावा.
उदा. बँक ऑफ महाराष्ट्र - मुद्रेयं लोकमङ्गला - ही मुद्रा लोकांच्या मांगल्यासाठी.
सोमैय्या संकुल - ज्ञानादेव तु कैवल्यम् - ज्ञानाद्वारे मोक्ष.
आयएनएस दिल्ली - सर्वतो जयम् इच्छामि - मी नेहेमी विजयाची कामना करतो.
Comments
सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालयाचे
मुद्रावाक्य "सर्वे सन्तु निरामया:" असे आहे.
गंमत म्हणजे सेनेच्या वैद्यकीय विभागाचे मुद्रावाक्यही तेच आहे, पण मुद्रेतले चित्र वेगळे आहे. सेनेतील डॉक्टर इलाज करताना मित्र-शत्रू असा रुग्णामध्ये भेद करत नाहीत. त्यामुळे मुद्रावाक्यातले "सर्वे" हीच उदात्त नीती सांगते, असे वाटते.
ह्या वरून
डॉक्टर कोटणीसांची आठवण झाली.
अवांतर : वैद्यकीय पदवी घेताना केवळ शत्रु मित्र नव्हे तर गरीब श्रीमंत असा भेद करू नये असे सुद्धा सांगितले जाते असे ऐकून आहे. पण नंतर काही डॉक्टर ही पदवी आणि ती मार्गदर्शक तत्वे दोन्ही बासनात गुंडाळून ठेवतात असे दिसते.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
माझी भर!
भारतीय आयुर्विमा निगमः योगक्षेमं वहाम्यहम
मुंबई पोलिसः सद्रक्षणाय खालनीघ्रहणाय
मुंबई अग्निशमन दल : शौर्यम्, आत्मसंयमम्, त्याग:
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
महाराष्ट्र पोलिस दल
हे महाराष्ट्र पोलिस दलाचे आहे. मुंबई पोलिस दलाचे स्वतंत्र अस्तित्व काही अंशीच आहे.
महाराष्ट्र पोलिस दल- सद्रक्षणाय खलनिग्रहणाय|
पोलिस खात्यातील लोकांना जर हा प्रश्न विचारला तर बहुसख्यांना त्याचे उत्तर देता येणार नाही. उरलेल्या पैकी अनेकांना उच्चारण्यासाठी जीभेशी फारच झटापट करावी लागेल. अर्थाची पाळी ही त्यानंतरचा टप्पा आहे. माजी पोलिस महासंचालक श्री अरविंद इनामदार यांनी पोलिस दैनंदिनी काढून हा प्रश्न काही अंशी सोडवला होता.
प्रकाश घाटपांडे
मझीसुद्धा!
डी आर डी ओ चे बोध वाक्यः
बलस्य मूलं विज्ञानं
संस्कार भारती
संस्कार भारतीचे वाक्य - या कला सा विमुक्तये|
अवांतर - निरनिराळ्या संस्थांची संस्कृत ध्येयवाक्य / बोधवाक्य शोधून काढून....., सुमारे ८०-९० संस्कृत ध्येयवाक्य / बोधवाक्य......., आपल्याला माहित असलेली संस्कृत ध्येयवाक्य / बोधवाक्य......
ह्या वाक्यांमध्ये ध्येयवाक्ये/बोधवाक्ये असे अनेकवचन का वापरलेले नाही?
हुं, खरे आहे.
ह्या वाक्यांमध्ये ध्येयवाक्ये/बोधवाक्ये असे अनेकवचन का वापरलेले नाही?
पण ह्याला उपसंपादक जबाबदार आहेत. त्यांनी बहुदा डुलक्या काढल्या असाव्यात. :)
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
अनुच्चारित अनुस्वार
दोन्ही क्यंवरती स्पेशल पर्पज़ अनुच्चारित अनुस्वार असावेत, ते टंकलेखन करताना गळाले.
या शुद्धलेखनाच्या नियमांचे असेच असते. सरकारी नोकरांना फाइलींवर आणि पत्र लिहायला अडचण होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने साहित्य महामंडळाचा वापर करून मराठी लेखनातले तथाकथित अनुच्चारित अनुस्वार परस्पर काढून टाकले. पण झाले विपरीतच. बोली भाषेच्या नावाखाली ते दुप्पट जोमाने उसळी मारून परत आले. आणि मग असले अनुस्वार टंकलेखन करताना गळाले की उपसंपादकाच्या नावाने सहज खडी फोडता येते.--वाचक्नवी
उपसंपादक कोण?
इथे उपसंपादक कोण आहेत? आणि ते लोकांच्या लेखनावर अनुस्वार किंवा काने-मात्रे देतात काय?
-राजीव.
भाऊ
हा विनोद होता. :) असे चिह्न मूळ प्रतिसादात पाहिले नाहीत का? अरे देवा, निष्ठुर नियती हल्ली लोकांमधील विनोद समजण्याचा वकूब पण चिरडून टाकते असे दिसत आहे.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
धन्यवाद
मुद्दा कळला.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
खडी/खडे फोडणे
मग असले अनुस्वार टंकलेखन करताना गळाले की उपसंपादकाच्या नावाने सहज खडी फोडता येते.--वाचक्नवी
»
मला वाटते आपल्याला "खडे फोडता येतात " असे म्हणायचे असावे. खडी फोडणे (फोडायला लावणे) याला मराठीत वेगळा अर्थ आहे असे वाटते.
पुन्हा मुद्रणदोष.
खडे ऐवजी खडी पडला. मुरावि समजून माफ करावे. मराठी फारच नाजुक भाषा, जरा चूक झाली की माफी मागायची पाळी येते.
पण घोडचूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.--वाचक्नवी
भारतीय टपाल खाते
"अहर्निशं सेवामहे"
भारतिय रक्षासेवा...
भारतिय नौदल - शं नो वरूणः
भारतिय तटरक्षक दल - वयम् रक्षामः
भारतिय हवाईदल - नभ स्पर्शम् दीप्तम्
सत्यमेव जयते
भारत सरकारः सत्यमेव जयते
महाराष्ट्र सरकारच्या शिक्क्यावरही काही बोधवाक्य आहे असे विकीवर दिसते. ते बोधवाक्य संस्कृतातच असेल असे वाटते. (मराठीत असले तर मला आश्चर्य वाटेल.)
विद्या विनयेन शोभते हे वाक्य बालभारतीचे होते का?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.
ह्या पुढे पण जाता येता, दिसतील तशी ही संस्कृत ध्येयवाक्ये / बोधवाक्ये
टिपून घेत रहा आणि इथे न विसरता डकवा.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
पुलकित
याहुग्रुपच्या सदस्यांनी लावलेला हातभार -
विश्वेश्वरैय्या नॅशनल इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपुर - योग: कर्मसु कौशलम् ।
आयआयटी, पवई - ज्ञानं परमं ध्येयम् ।
बिर्ला इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पिलानी - ज्ञानं परमं बलम् ।
कॉग्निशा कन्सल्टंसी प्रा. लि. - अथातो धर्मजिज्ञासा ।
इंडियन कोस्ट गार्ड - वयं रक्षाम: ।
मुंबई विद्यापीठ - शीलवृत्तफला विद्या ।
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
आणखी काही .....
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ - तमसो मा ज्योतिर्गमय
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिति व संशोधन मंडळ - सा विद्या या विमुक्तये
"नवशक्ति" (वर्तमानपत्र) - सा शक्तिर्या विमुक्तये
यंत्रतंत्रादीविज्ञानम् लोककल्याणसाधनम्
कोथरुड पुणे येथील माइर्स एमआयटी महाविद्यालायाचे यंत्रतंत्रादीविज्ञानम् लोककल्याणसाधनम्
जी एस स्पिरिच्युअल कन्सल्टन्सी
आविर्भूतंच सृष्ट्याद्यौ प्रकृते: पुरुषत्परम्
--- उपक्रमी
भगवद्गीतेचे योगदान
आयएएफ स्क्वाड्रन नं. २२२ - विनाशाय च दुष्कृताम् ।
११ गोरखा रायफल्स - यत्राहं विजयस्तत्र ।
द गढवाल रायफल्स - युद्धाय कृतनिश्चय: ।
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।