शिफ्ट हॅपन्स....

शिक्षक असाल तर, किंवा शिकवण्याची आवड असेल तर, ही फ़ित जरुर बघा...
http://www.youtube.com/watch?v=pMcfrLYDm2U

ही फित तुम्हाला येणारे बदल किती वेगाने येणार आहेत व त्यासाठी विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये ह्यांनी स्वतःत काय बदल घडवून आणणे आवश्यक आहे ते समजते.

पाहून तुमची मते जरुर कळवा.

आजच मी ही फित मी एका महाविद्यालयात माझ्या पेपर रिडींग साठी वातावरण निर्मिती साठी वापरली व त्याचा अत्यंत चांगला परिणाम झाला.

लेखनविषय: दुवे:

Comments

फीत्

खरोखरच छान फीत शोधून काढलीत. उपक्रमच्या संकेतस्थळावर अशा गोष्टी नेहमीच यायला हवेत.

माहितीपूर्ण

चांगलीच माहितीपूर्ण फीत आहे. यातील काही मुद्दे हे कळीचा प्रश्न सोडवायला (फंडिंग) साठी मांडले गेले असले तरी त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याकडच्या तांत्रिकी शिक्षणातून ह्युमॅनिटीज आणि इतर शिक्षण हे पूर्णपणे बाद झालेले असते. चारपाच वर्षांच्या अभ्यासक्रमात सगळे विषय ठासून भरलेले असल्यामुळे सर्वांगिण प्रगती घडत नाही. असे एकेरी शि़क्षण मिळालेली जनता आपण तयार करतो आहोत ह्याकडे लक्षच जात नाही.

जगाचा चेहरामोहरा बदलण्याची लक्षणे दिसत असताना मुख्य गोष्ट या चित्रफितीतील की यावरून बोलणे झाले पाहिजे, याच्याशी सहमत. तसे भारतात तरी मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही. (किंवा निदान मला माहिती नाही).

इंग्रजी बोलू शकणार्‍यांची संख्या चीनमध्ये सर्वाधिक होणार तर जोवर इंग्रजी ही भाषा व्यापारासाठी वापरली जाते तोवर चीनचे स्थान बळकट राहणार. भारतासारख्या देशांना याचा अर्थातच विचार करावा लागेल. ह्याचा दैनंदिन व्यवहारातला अर्थ असा आहे की स्थानिक भाषांना काहीशी माघार घ्यावी लागणार. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे शाळेत लहानपणापासूनच इंग्रजी शिकवण्याचे धोरण भविष्यकाळात कदाचित महाराष्ट्राच्या पथ्यावर पडणार असे वाटते. या माहितीमुळे एक फायदा असा झाला की महाराष्ट्र सरकारच्या धोरणांबद्दल परत एकदा विचार करावा असे वाटू लागले आहे.

उद्देश साध्य झाला.

तुम्ही प्रतिक्रिया देण्यास दिलेल्या वेळेबद्दल् अभार्. ह्या फितीबद्दल उपक्रम वर माहिती देतांना जो हेतू होता तो साध्य झाला.

+१

अतिशय माहितीपूर्ण फीत आहे.

आपल्याकडच्या तांत्रिकी शिक्षणातून ह्युमॅनिटीज आणि इतर शिक्षण हे पूर्णपणे बाद झालेले असते.

+१
"ह्युमन" मशिन बनवता बनवता स्वतः मशिन होऊ लागला आहे.. जर हे एककल्ली शिक्षण चालु रहिले तर एक पिढी अत्यंत डीप्रेस्ड बनेल असेल वाटते... माणसाला केवळ तंत्रिक शिक्षण हेच शिक्षण वाटते असेल तर या फितीत सांगितलेल्या समस्या नक्कीच उद्भवतील.. मात्र तंत्रज्ञान हे माणसाच्या इतर अंगभुत कलांना सपोर्ट देणारे रहिले तर चित्र बदलेल असे वाटते.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

भंपक

फितीत भरपुर माहिती आहे,
पण मला काही खुप भारी वाटली नाही.

कारण बदलत्या परिस्थितीशी आणि ज्ञानाशी जुळवता येणे हा फार मोठा मानवी (आणि झुरळी) गुणधर्म आहे.
त्यामुळे माझे शिक्षण होतांना संगणक माहितीच नसला तरी आज मला वापरता येतोच ना?
या शिवाय ऋषीकेशला कुठे ओरॅकल ऍप्लिकेशन्स विषयी काही शिकवले होते त्याच्या विंजिनियरींग मध्ये?
तो कॉनफिगरेशन करू शकतोच ना?

मला वाटते की शिक्षणातून नवीन ज्ञान कसे मिळवायचे याची युक्ती लक्षात आली की झाले.
म्हणजे शिक्षणाची प्रमुख तत्वे आली की बाकी काही शिकण्याची आवश्यकत नाही.

थोडक्यात काय तर पदव्युत्तर शिक्षण घ्यायलाच पाहिजे असे काही नसते. (घेतल्याने हाता काही खुप भारी लागते असेही नसतेच!)
आपल्याला काय करायचे आहे याचा अंदाज येई पर्यंत शिकणे महत्त्वाचे. एकदा हेच आपल्याला करायचे आहे आयुष्यात असे सापडले की मग त्या दिशेकडे आपला ओढा, ज्ञानार्जन आपोआपच सुरु होते असे वाटते.
असो,
त्या फीतीतली काही माहिती उदा. भारतातील १००% पदवीधर इंग्रजी बोलतात हा तर धडधडीत खोट माहितीचा तुकडा आहे, हे तुम्हा-आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे!
त्यामुळे,
उगाच माहितीच्या तुकड्यांचे आणि आकडेवारीचे संच बनवून
भलतेच निष्कर्ष काढून
भारत आणि चीन विषयी गैरसमज पसरवणार्‍या या फीतीत तसा काही फारसा अर्थ मला वाटत नाही.

हे काम न्युयॉर्क टाईम्सच्या थॉमस फ्रीडमन नामक एका भंपक अमेरिकन पत्रकाराच्या लिखाणापेक्षा काहीच वेगळे नाही!

आपला
गुंडोपंत

थॉमस फ्रीडमन

थॉमसपंत फ्रीडमन म्हणजे वर्ल्ड इज फ्लॅटवाले का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत + असहमत

भारतातील १००% पदवीधर इंग्रजी बोलतात हा तर धडधडीत खोट माहितीचा तुकडा आहे, हे तुम्हा-आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे!
हे अगदी खरे. फितीमधे ही दिलेली माहिती खूप्च वरवरची आहे.

पण मला वाटते की, खालील मते युजरला लागु पडतात पण जी लोकं ह्या सिस्टीम्स तयार करातात त्यांना ह्या सततच्या बदलांना तोंड देणे अवघड होईल.
संगणक माहितीच नसला तरी आज मला वापरता येतोच ना?
तो कॉनफिगरेशन करू शकतोच ना?

नुसते वापरणे शिकणे वेगळे व् निर्माण करणे वेगळे.

"मला वाटते की शिक्षणातून नवीन ज्ञान कसे मिळवायचे याची युक्ती लक्षात आली की झाले."

मलाही असेच वाटते. हे ज्यांनी आत्मसात केलेले नाही, त्यांना ते जास्तच गरजेचे बनेल.

असहमत ह्यासाठी की, सगळीच माहिती भंपक नाही.

 
^ वर