उत्पादन संशोधन - ड्रुपल मोड्युल बनवता येईल का?

नमस्कार मंडळी,
सध्या उपक्रमावर चर्चा आणि लेख हे दोन लेखन प्रकार उपलब्ध आहेत आणि अनेक समुदाय सुद्धा आहेत. या पैकी छायाचित्रण-प्रकाशचित्रण समुदायात एखादे छायाचित्र टाकायचे असेल तर लेखन प्रकार निवडताना लेख-चर्चा या पैकी कोणता निवडावा हे ठरवणे थोडे असंबद्ध ठरते असे माझे वैयक्तिक मत आहे. तांत्रिकदृष्ट्या फार फरक पडत नाही. पण या प्रकारचे लेखन करताना अप्रत्यक्षपणे एक साचा बनला आहे. जसे कि,

  • छायाचित्र बद्दल माहिती
  • छायाचित्राचा दुवा
  • छायाचित्र - कॅमेरा बद्दल तांत्रिक माहिती

आता हे लिहिणे अपेक्षीत आहे प्रत्येकाला माहित असेलच असे नाही. त्यामुळे एक विचार असा आला कि जर लेखन करा विभागात छायाचित्र हा प्रकार टाकता आला तर सदस्याना लेखन करणे आणि शोधणे सोपे जाईल. यासाठी ड्रुपलचे एखाचे मोड्युलच बनवता आले तर?

हा झाला एक प्रकार. याच सोबत पुस्तक परिक्षण लिहिताना सुद्धा असाच साचा बनवता येऊ शकतो. म्हणजे पुस्तका बद्दलची प्रकाशन संबंधीत माहिती आणि परिक्षण.

तसे असे काही लेखन प्रकार जे उपक्रमावर वेगळेपण राखुन आहेत आणि त्यांना एक ठराविक साचा आहे अशा प्रकारांसाठी मोड्युल्स बनवता येतील का? तांत्रिकदृष्ट्या ते नक्कीच शक्य आहे. पण त्यासाठी काय करावे लागेल? तज्ञ लोकांची मते आणि मार्गदर्शन लागेल. सदर गोष्ट बनवण्यासाठी उत्साही तंत्रज्ञ लागतील. जर सदस्य यामध्ये सहभागी होणार असतील तर अशी मोड्युल्स बनवण्यासाठी उत्पादन संशोधन समुदायांतर्गत एखादा प्रकल्प राबवता येईल. हे सर्व शक्य होण्यासाठी उपक्रमाच्या व्यवस्थापनाचे सुद्धा सहकार्य लागेल हे वेगळे सांगण्याची गरज नाहीच :). आता हे झाले माझे विचार. तुम्हाला काय वाटते?


लेखनविषय: दुवे:

Comments

चांगली कल्पना

चांगली कल्पना.

माझ्या आठवणीनुसार, मनोगतावर असा साचा 'पाकक्रिया' विभागासाठी उपलब्ध होता/आहे. साहित्य, कृती, माहितीचा स्त्रोत, अधिक टीपा असे मुद्दे होते.

त्यावरुन ड्रुपल मध्ये हे सहज शक्य असावे असे वाटते.

बरोबर

होय. सहज शक्य असणारच आहे. सध्या गमभनची मोड्युल्स सुद्धा उपलब्ध आहेत. कदाचित ॐकार मदत करु शकेल.


सिसीके

अश्या एखाद्या साचेबंद गरजेसाठी वेगळे मॉड्युल बनवण्याची गरज नाही. सिसीके नावाचे एक मॉड्युल ड्रुपल मध्ये उपलब्ध आहे. ज्या मध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही वेगळा साचा बनवू शकता.

सिसीके टाकल्यावर नवीन साहित्य प्रकार बनवा, त्यासोबतच हवा तसा साचा बनवण्यासाठी त्याचा वापर करा.

नीलकांत

अरे वा

नीलकांत आणखीन काही माहिती देऊ शकशील का?


त्यापुढे...

त्यापुढे काही खास नाहीये.
साहित्य प्रकार >> नवीन साहित्य प्रकार बनवा >> मॅनेज फ्लिड >> ऍड फ्लिड >> यापुढे त्यासाच्यातील इनपुट घेणार्‍या चौकटी ज्या प्रकारचे इनपुट घेणार असतील तो प्रकार निवडावा.

आणि काही चौकटी बनवायच्या असतील तर हेच पुन्हा करावे. आणि शेवटी तयार झालेल्या साहित्य प्रकाराची चाचणी करावी.

नीलकांत

हा धडा वाचावा

आधीच्या प्रतिसादांत नीलकांत ह्यांनी म्हटल्याप्रमाणे मोड्यूल बनविण्याची गरज नाही. हा धडा वाचावा.

 
^ वर