उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
पत्राद्वारे (टपाल पाठवून) मतदान कसे करावे?
रंगासेठ
March 5, 2009 - 1:00 pm
नमस्कार,
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली की यावेळी सत्तेवर कोण येणार?
एक नागरिक म्हणून, मतदान करणे, हे माझे कर्तव्य समझतो. पण आमच्या गावाकडे मतदान आहे २३ एप्रिलला, नेमका गुरूवार आहे. मी सध्या पुण्यात काम करतो व कामामुळे सुट्टीही घेता येणार नाही. त्यामुळे मतदान करावयाची इच्छा असूनही प्रत्यक्ष मतदान करता येणार नाही हे नक्की.
त्यामुळे आपल्याकडे पत्राद्वारे मतदान करू शकतो का? करू शकत असू तर त्याचे काही नियम वगैरे आहेत् काय? पत्राचा मजकूर कसा असावा? पत्र कोणाला पाठवावे? असे मतदान कितपत गुप्त राहते?
क्रुपया जाणकारांनी आधिक माहिती द्यावी, ही विनंती.
दुवे:
Comments
दुर्दैवाने
अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.
दुर्दैवाने असे पोस्टाने मतदान करणे सर्वसामान्य नागरिकाला शक्य नाही असे दिसते.
त्यासाठी तुम्ही सैन्यात असायला हवे, भारत सरकारच्या अधिकारीपदावर असायला हवे, इलेक्शन ड्यूटीवर असायला हवे अथवा प्रतिबंधक अटकेत असायला हवे असे वाचनात आले.
इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर अधिकृत माहिती मिळू शकेल.
महत्त्वाचा प्रश्न
मतदानाच्या दिवशी सुट्टी असते ना? का तुमच्या गावाकडे आणि पुण्यात वेगवेगळ्या दिवशी मतदान आहे?
सैनिक आपले मत पोस्टाने पाठवतात असे वाचले होते. विसुनाना म्हणतात तसे असेल तर हा प्रश्न गंभीर आहे. भारतात गेल्या काही वर्षात अंतर्गत स्थलांतर खूप झाले आहे आणि भविष्यातही ते होत राहील. तेव्हा पत्राने मतदान किंवा कुठल्याही केंद्रावर मतदान (एनिवेअर बँकिंग सारखे एनिवेअर वोटिंग) असे काही उपाय करावे लागतील.
नुकतेच वाचले भारताच्या निवडणुकीचा खर्च अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीहून जास्त आहे.
जागोरे
ही माहिती उपयुक्त ठरावी
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
धन्यवाद
विसुनाना, नविन, ऋषिकेश माहिती व प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
नविनसेठ मतदानाच्या दिवशी आयटी मध्ये काम करणार्या लोकांना सुट्टी असते का नाही ते विचारून बघतो.
ऋषिकेशराव अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
मतदार राजा रंगासेठ