हे असंच चालायचं. ( आंदोलन मासिक फेब्रु.२००९).

* जगात ज्यांना पुरेसे स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही असे ३३% म्हणजे ६५ कोटी लोक भारतात आहे.

* अमेरिकेतही १३% लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत आताच्या मंदीमुळे हे प्रमाण २०% पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

* १९८० च्या उत्त्पन्नात जी काही वाढ झाली, त्यातली ७० % वाढ फक्त १% कुटूंबीयांनाच मिळाली, त्यानंतर ही विषमता अधिक वाढत गेली.

* १९९० च्या सुमारास १% श्रीमंत लोकांकडे ४२.२% शेअर्स, ५५.७ % बाँडस्, लहानमोठ्या उद्योगातील ७१.४ % उद्योग होते.

* जगातील सर्वात जास्त श्रीमंत तिघाकडे जगातील ४८% पेक्षा जास्त श्रीमंती आहे.

* जगातील सर्वात श्रीमंत अशा २२५ लोकांच्या उत्पन्नातील ४% अतिरीक्त कर वाढवला तर जगातल्या प्रत्येकाला अन्न, स्वच्छ पाणी, शिक्षण आणि आरोग्यसेवा देता येईल.

* भारतात ५०% मुले कुपोषित आहे.

* भारतातील बालमृत्यूचे प्रमाण बांगलादेशापेक्षा जास्त आहे.

* २००३ साली भारताचा विकास क्रमवारीत १७५ देशात आपला क्रमांक १४७ वा होता.

* १९९१ मध्ये टिस्को मध्ये ८५००० कर्मचारी १० लाखटन पोलादाचे उत्पादन करित. २००५ साली उत्पादन ५० लाख टन आणि कर्मचारी वर्ग मात्र ४४००० इतका झाला.

हे असेच चालायचे.

सौजन्य : आंदोलन मासिक, फेब्रु-२००९.

वार्षिक वर्गणी रु. १५० फक्त, संपादक - मेघा पाटकर.

अवांतर : मुकेश अंबाणी आणि अनिल अंबाणी यांनी आपापल्या बायकांना विमान आणि जहाजाची भेट दिली त्यात तिनचार महानगराच्या पूर्ण रस्त्याबांधणीचा खर्च निघाला असता.

भारतातील सर्व सोने आणि परदेशातील भारतीयांचा काळा पैसा जर विकास कामासाठी वापरला तर भारतात कोणीच गरिब राहु शकत नाही.

विनंती : या मासिकाच्या संपादक मेघा पाटकर आहे असे म्हटल्यावर या विचाराची बाजू अथवा या मागची विचारधारा समजण्यासाठी वेगळे कष्ट पडणार नाही. ( कृपया मासिकाची वर्गणी पाठवावी आणि सभासद व्हावे ही विनंती.) ( आंदोलन-शाश्वत विकासासाठी , ६, राघव, श्री रघुराज सोसायटी, ११८-अ, सिंहगड रस्ता, पुणे - ४११०३०, दुरध्वनि ०२०-२४२५१४०४).

विसू : http://www.misalpav.com/node/6229

या विषयावर काही चर्चा धाकट्या भावंडाच्या "मिपा" या संकेतस्थळावर झालेली आहेच. उपक्रमी काही वेगळे पैलू जोडतील अशी आशा आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

अपेक्षा

चर्चा कशी व्हावी अशी अपेक्षा आहे? असे मुद्दे काढले तर बरेच मिळतील ज्याला अंत नसेल. इतर उपक्रमींची मते वाचायला आवडतील.
अवांतरः भाउबंदकीची उदाहरणे देण्यामागचा हेतु काय?
अरे हो, पाटकरबाई सिनेमामध्ये काम करत होत्या असे ऐकले होते. त्या नक्की काय काय करतात? तसेच

या मासिकाच्या संपादक मेघा पाटकर आहे असे म्हटल्यावर या विचाराची बाजू अथवा या मागची विचारधारा समजण्यासाठी वेगळे कष्ट पडणार नाही.

हे लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही.


परदेशांतील भारतीयांचा काळा (?) पैसा

परदेशांतील भारतीयांकडून भारतात येणारा पैसा काही लाख कोटी रुपये असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत लक्षणीय भर पडते असे वाचल्याचे आठवते. ही सकारात्मक बाजू आपण का विसरतो?

कशी?

देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत लक्षणीय भर पडते
देशाच्या म्हणजे 'सरकार'च्या? (भर पडते) कशी?

सरकारचा फायदा

देशाच्या म्हणजे 'सरकार'च्या? (भर पडते) कशी?

वरकरणी विचार करता परदेशी पैसा मिळवून तो भारतात पाठवला तर त्याचा फायदा फक्त त्याला इथे आल्यावर किंवा त्याच्या इथल्या नातेवईकांनाच मिळतो, देशाचा यात काही संबंध नाही असे वाटते. पण रिझर्व बँकेत परकीय चलन विभागात काम करणार्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार येणारा पैसा परकीय चलनांत असल्यामुळे तो देशाच्या तिजोरीत परकीय चलन म्हणून जमा होतो ज्याचा उपयोग आंतररष्ट्रीय व्यवहारांत जी पेमेंट्स् करावी लागतात त्यासाठी होतो. मात्र परकीय चलन पाठवणार्‍याला व त्याच्या इथल्या नातेवाईकांना इथे वापरासाठी स्थानिक चलनच दिले जाते, ज्याचा उपयोग आंतराष्ट्रीय पातळीवर होत नाही. उदाहरणार्थ समजा डॉलरचा भाव ५० रुपये आहे तर येणारा डॉलर आंतररष्ट्रीय व्यवहारासाठी सरकार वापरू शकते. मात्र डॉलरच्या बदल्यात जे ५० रुपये इथे दिले जातात त्यांचा उपयोग फक्त स्थानिक पातळीवरच होऊ शकतो. या माहितीची एखाद्या रिझर्व बँकेच्या परकीय चलन विभागात काम केलेल्या माणसाकडून शहानिशा करून घेऊ शकता.

अवांतर

१. मुकेश अंबानींची भेट २४० कोटी, अनिल अंबानींची भेट ४०० कोटी.
२. कोल्हापूर शहराच्या रस्त्यांच्या उर्ध्वश्रेणीकरणाचा खर्च ४०० कोटी.

हम्म

अंबानींबद्दलचे मत संपूर्ण पटले नाही. त्यांनी केलेला खर्च उधळपट्टी वाटू शकते हे मान्य, ती मलाही वाटते. माझ्याकडे इतके पैसे असते तर मी बायकोला नक्कीच ही भेट दिली नसती.* पण त्या खर्चाचा आणि इतर सोयींचा संबंध पटत नाही, कारण छोट्या प्रमाणावर हीच गोष्ट माझ्या बाबतीतही लागू होते. मी मल्टिप्लेक्समध्ये शिणेमा, नंतर हाटेलात जेवण असा बेत केला तर ही नक्कीच चैन आहे आणि तेवढ्या पैसे एखाद्या गरीबाला दिले तर त्याला नक्कीच त्याचा जास्त उपयोग होईल. पण याचा अर्थ मी जितके पैसे कमवतो ते सर्व दानधर्माला द्यावेत का? असे सर्वांनी आपापले पगार लोकोपयोगी कार्यांना द्यावेत का? (मला कम्युनिझमची फारशी ओळख नाही पण हे त्यासदृश वाटते आहे का?)
अंबानींची संपत्ती त्यांनी कशी खर्च करावी हे ठरवण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे, त्यावर मी माझे वैयक्तिक मत देऊ शकतो पण त्याला काही अर्थ नाही.

या विषयावर काही चर्चा धाकट्या भावंडाच्या "मिपा" या संकेतस्थळावर झालेली आहेच.
संकेतस्थळांची वंशावळ बघायला आवडेल. :)

*पैसे आणि बायको दोन्ही नसल्याने सध्या असे म्हणायला काहीच हरकत नसावी. :)

अंदाजे १० किमी अवांतर : बायको या शब्दाची व्युत्पत्ती काय?

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

मेघा की मेधा?

या मासिकाच्या संपादक मेघा पाटकर आहे असे म्हटल्यावर या विचाराची बाजू अथवा या मागची विचारधारा समजण्यासाठी वेगळे कष्ट पडणार नाही.

या मेघा (Megha) पाटकर कोण?
आम्हाला एक मेधा (Medha) पाटकर म्हणून आहेत त्या माहित आहेत.

हाहाहाहाहा...

विसुनाना, मेधा! मेधा पाटकर याच 'आंदोलन'च्या संपादक आहेत!!

 
^ वर