वायुविजन

मुंबई प्रदेश कोकणपट्टीत येतो. इथे पूर्वी उतरत्या छपराची घरे बांधली जायची. कारण एकुणच कोकणात पाऊस धुवाँधार. मात्र गेले काही दशकात पाश्चिमात्य धाटणीची धाब्याची घरे बांधली गेली. त्याचा परिणाम भिंतीत प्रचंड ओल आणि शेवटच्या मजल्यावरील लोकांना घराच्या चार भिंतीत सुद्धा पावसाचा (नाईलाज) अनुभव. ही स्थिती केवळ निकृष्ट पद्धतीने बांधलेल्या इमारतींचीच नव्हे तर अगदी हिरानंदानी समुहाने बांधलेल्या इमारतींची सुद्धा आहे.

तसेच वायुविजनाच्या बाबतीत माझा अनुभव असा की दक्षिणोत्तर जर खिडक्या असतील तर वायुविजन चांगले होते. मात्र दरवाजे दक्षिणोत्तर असतील तर तेव्हढ्या प्रमाणात वारा खेळत नाही. असो.

सांगायचा मुद्दा हा की लवकरच आमच्याकडच्या काही स्थावर मालमत्तेचा विकास होणार आहे. त्यावेळी नवीन वास्तु बांधताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक वायुविजनासाठी काय उपाय करता येतील हे सुचवावे.

मात्र "वातानुकुलन यंत्रे विकत घ्यावीत" हा सोपा उपाय सुचविण्याचे कष्ट घेऊ नयेत ही विनम्र विनंती. आपल्या उपायांच्या पुष्ट्यर्थ काही छायाचित्रे टाकलीत तर फारच मस्त :) नाहीतर गेला बाजार रेखाटणे पण चालतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

वरील लेख

कृपया पर्यावरण ह्या विभागात वर्ग करावा ही वि. वि.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

सहमतीबद्दल

आम्ही आपले भारी आहोत.

जाता जाता : विठ्ठल कामतांनी त्यांच्या ऑर्किड हॉटेलमध्ये काही वायुविजनाचे प्रयोग केले आहेत असे ऐकून आहे. कृपया माहिती काढून इथे लिहाल का?

आगाऊ धन्यवाद.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

काही अनावश्यक मजकूर संपादित.

प्रतिसादाची जागा राखून ठेवते

नैसर्गिक वायु विजनासाठी (ventilation) तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वार्‍याच्या तुलनेत योग्य दिशेला खिडक्या असल्या पाहिजेत. तुम्ही मुंबईत बांधायच्या इमारतीबद्दल विचारत आहात असे धरून लिहीते :
मला आठवते त्याप्रमाणे मुंबईत साधारणतः वारे हे नैऋत्येकडून आणि इशान्येकडून येतात. अर्थात स्थानिक जमिनीच्या वैशिष्ट्यांमुळे, हवेसाठी असलेल्या अडथळ्यांमुळे या दिशा म्हणजे शेवटचा शब्द नाहीत तर केवळ एक साधारण मार्गदर्शक आहेत, एवढे लक्षात ठेवावे. तसेच मुंबईकडच्या हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे हवा काहीशी जड, आर्द्र अशी असते. हवेचा वेग त्यामानाने कमी असतो. शिवाय रात्री आणि दिवसाच्या तापमानात विशेष फरक नसतो. अशा पद्धतीतील घरांसाठी शक्यतोवर घरे बंदिस्त बांधू नयेत. यासाठी जुन्या घरांकडून थोडी स्फूर्ती घेता येऊ शकते असे वाटते.

१०० एक वर्षांपूर्वीच्या इमारतींचे निरीक्षण केले तर कदाचित आढळेल की मुंबईतील / कोकणातील जुन्या घरांच्या बहुसंख्य खिडक्या पश्चिमेला तसेच उत्तरेला असत. त्यामुळे अधिकाधिक खिडक्या याच दिशांनी ठेवलेल्या बर्‍या. पण सध्याच्या अपार्टमेंट बांधण्याच्या प्रकारात हे बसणार नाही. शिवाय अपार्टमेंट बिल्डिंगमधून चारी बाजूंनी फ्लॅट (सदनिका) असल्याने सगळ्या सदनिकांमध्ये सारख्याच प्रकारे वायुविजन होणार नाही हाही एक प्रश्न आहेच. यासाठी अनेकदा मुंबईत चाळींमध्ये मधल्या बाजूस एक चौक असे. त्यामुळे जशी या चौकाभोवती घरे बांधली जात, दरवाजे असत, त्याचप्रमाणे प्रत्येक घराला हवा मिळण्याचीही सोय होई. आजही पुण्यात काही नवीन इमारतीत असे चौक नाही, पण बिल्डिंगच्या मध्यभागी जिन्याला लागून अशी एक प्रकारची विहीर (पाण्याची नव्हे, जिन्याची) (well) आढळते. शिवाय आपल्याकडच्या जुन्या वाड्यांमध्येही मधल्या भागात चौक असेच की. इमारतींच्या पूर्णा चौकोनी काडेपेट्या करण्यऐवजी, अशा पद्धतीने वार्‍याला थोडे आतल्या बाजूला वळवता येऊ शकते असे वाटते. यासाठी जागा मात्र लागेल, किंवा थोडी फार प्रायव्हसी घालवण्याची तयारी ठेवावी लागेल. शिवाय आजकाल बांधत असलेल्या इमारतींमध्ये असे दिसून येते की दारावरील आणि खिडक्यांवरील शटर्सना फाटा मिळाला आहे. (चला, अजून एक गोष्ट फाट्यावर!) कदाचित सुरक्षिततेच्या कारणांमुळे. परंतु पूर्वी मुख्य दार बंद असले तरी असे हे उंचावर असलेले शटर उघडे ठेवता यायचे. आणि त्यातूनही थोडीफार हवा आता खेळायची.

मला असे अनेकदा वाटते, की पूर्वीच्या काही इमारती बांधण्याच्या पद्धतींचा अभ्यास सध्याच्या आर्किटेक्टांनी केला पाहिजे. तुम्हाला कितीही वाटले तरी तुम्ही इमारतीच्या रचनेसंबंधी पूर्ण अधिकारी असू शकणे अनेक कारणांनी शक्य होणार नाही. म्हणूनच तुमच्या मताशी काही प्रमाणात तरी सहमत होऊ शकेल असा चांगला/ली आर्किटेक्ट निवडावा/वी. हल्ली अनेक आर्किटेक्ट हे केवळ म्युनिसिपाल्टीतून छाप आणण्यासाठी स्वतःचा वापर करू देतात. असे आर्किटेक्ट शक्यतो टाळावे.

सध्या

इमारतीच्या विकासकाशी वाटाघाटी चालू आहेत. व्यावसायिक जागा असल्याने मुख्य प्राधान्य दरवाजा सरकत्या जिन्यांच्या समोर येईल ह्याला असेल जेणेकरून येणारा ग्राहक आपल्याकडे नक्की येईल. त्यामुळे खिडक्या नक्की कुठे असतील सांगता येत नाही पण मी पश्चिम आणि उत्तर विशेषकरून लक्षात ठेवेन.

दुसरे म्हणजे चौक असण्याची शक्यता धूसर आहे कारण दादर भागात सर्वत्र "इंच इंच लढवू" ही स्थिती आहे. पण आपण शटर म्हणालात त्यावरून आठवले की पूर्वी खिडक्या आणि दरवाजांवरती काचेचे उघडछाप करणारे तावदान असलेल्या छोट्या आयताकार खिडक्या असायच्या. तो पण पर्याय आजमाऊन पाहता येईल.

(क्रमश:)
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

आता तर अशी स्थिती आहे की

मला असे अनेकदा वाटते, की पूर्वीच्या काही इमारती बांधण्याच्या पद्धतींचा अभ्यास सध्याच्या आर्किटेक्टांनी केला पाहिजे.

२०-३० वर्षांपूर्वीच्या तुलनेने नव्या इमारतींपेक्षा ७०-८० वर्षांपूर्वी बांधलेल्या चाळी तुलनेने जास्त मजबुत आहेत. कारण त्या चाळी बांधताना विचारात घेतलेले हवामान, जमिनीचा प्रत, उतार-चढाव आणि वापरलेले चांगल्या दर्जाचे बांधकाम साहित्य उदा. लाकुड, पोलाद, सिमेंट इ.इ. उदा. पालनजी सोजपाल चाळ, जयराम जगमल चाळ, रावजी सोजपाल चाळ इ.इ.

_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

दुर्लक्ष

हवामान/पर्यावरण, जमिनीची प्रत या संबंधीची माहिती व त्याचा बांधकामावर परिणाम तसेच बांधकाम साहित्याचा दर्जा सातत्याने सुधारत गेला असावा.
नव्या इमारती कमकुवत असल्यास याचे कारण अशा माहितीकडे दुर्लक्ष, निकृष्ट बांधकाम असावा.
याही पलिकडे तुलनात्मक दृष्ट्या बांधकाम खर्च उत्तरोतर कमी होत गेला असावा. अपेक्षित आयुष्यमर्यादेपलिकडील मजबूत इमारती बांधणे व्यावहारिक दृष्ट्या फारसे शहाणपणाचे नसावे.

आरपार वाट

वार्‍याला एका बाजूने दुसर्‍या बाजूला जाण्यासाठी आरपार जाणारी वाट लागते. खोलीच्या किंवा घराच्याही फक्त एकाच दिशेला हव्या तितक्या खिडक्या ठेवल्या तरी बाहेर सुटलेला वारा त्यातून फारसा आत येत नाही. पण दोन्ही बाजूंनी मोकळे असलेले घर खिशाला परवडत नाही. त्यामुळे खुराडी बांधली जातात. शिवाय आपण आपल्या घराच्या चारही बाजूंनी मोकळी जागा ठेवली तरी इतर लोक तिथे इमारती बांधून ती अडवतातच. भरपूर मोकळी हवा पाहिजे असेल तर खेड्यामध्ये कौलारू घर बांधणे हाच उत्तम उपाय आहे. नाही तर आजूबाजूच्या सर्व घरांपेक्षा उंच अशी टोलेजंग इमारत बांधावी आणि त्यात आरपार वारा जाण्यासाठी मोकळ्या जागा ठेवाव्यात. ही गोष्ट धनाढ्य लोकांनाच शक्य असते.

कुमार

पुण्यात कॅम्पात कुमारची एक इमारत आहे तशी बांधा. वर्णन करण्यापेक्षा छायाचित्र असते तर तुम्हाला चांगले समजावून सांगता आले असते.
असो, एक अवांतर शंका: हे आर्किटेक्ट लोक इमारतीचे चित्र का बनवतात? एक मस्त काही हजार शब्दांचा लेख का नाही लिहित? ग्राहकांना चित्रे, छायाचित्रे दाखवण्यापेक्षा आमची इमारत अशी आहे असा एखादा इमारत अंक काढावा. विना चित्र, छायाचित्र. अरे हो, आपण छायाचित्रेच का काढावीत? त्या त्यावेळचे प्रसंग सरळ लेखामध्ये लिहुन काढावेत. काय?






अपेक्षापुर्ती

हिच ती इमारत.

आणि हि त्या इमारतीची जागा

View Larger Map
चला पुढे लिहा. काहीतरी माहितीपूर्ण. उगाच फाटे फोडत बसु नका.





काही अनावश्यक मजकूर संपादित.


घसरगुंडी

घसरगुंडी असण्याची गरज नाही. लादी जमिनीला समांतर असल्याशी कारण, छप्पर कसे का असेना.

एम आय टी स्ट्रॅटा सेंटर

केंब्रिजच्या (बॉस्टन) मधील एम आय टी स्ट्रॅटासेंटर ची इमारत पण अशीच काहीशी आहे:

हवेशीर

खालील हवेशीर उदाहरण भारतीय आहे.

ही इमारत

नाविन्यपूर्ण आहे आणि हवेतील मोकळ्या जागेचा अधिकाधिक उपयोग केलेला दिसत आहे. कारण इमारतीचा तळमजला तुलनेने आकाराला कमी आहे. तसेच त्यांनी कुठलीही त्रिकोणी रचना अधिक भार पेलू शकते आणि अधिक टिकाऊ असते ह्या वैज्ञानिक गृहितकाचा छान वापर केलेला दिसत आहे.

सखोल माहितीबद्दल आणि छायाचित्राबद्दल धन्यवाद.

जाता जाता : हा विकास आम्ही करणार नसून विकासक करणार आहे मात्र वास्तुकाराला आम्ही आम्हाला पाहिजे तसे बदल सुचवू शकतो आणि ती इमारत बांधतानाच अपेक्षित बदल करून घेऊ शकतो म्हणून ही लेख-पृच्छा.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

त्रिकोण

हवेतील मोकळ्या जागेचा अधिकाधिक उपयोग केलेला दिसत आहे.
यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या असतील अशी आशा आहे.

तसेच त्यांनी कुठलीही त्रिकोणी रचना अधिक भार पेलू शकते आणि अधिक टिकाऊ असते ह्या वैज्ञानिक गृहितकाचा छान वापर केलेला दिसत आहे.

या (किंवा इतर) इमारतीचे संरचनाकार/निर्माते याशी सहमत असतीलच असे नाही. (किंबहुना नसतील असेच वाटते.)

इमारत नाविन्यपूर्ण आहे हे मान्य.

(उपयुक्तकेबद्दल साशंक) तो

सहमत!

मला तर त्रिकोण दिसला नाही. बिल्डिंगचा मागचा भाग फोटोत आलेला नाही. कदाचित तसे पाहिले की दिसत असेल.
इथे टिकाऊपणाचा काही संबंध नसावा.

उपयुक्ततेपेक्षा लक्ष वेधून घेण्यासाठी केले आहे असे दिसते. आर्किटेक्टचे कौशल्य नक्कीच आहे.

शिवाय पावसाचे प्रमाण अधिक नाही अशा ठिकाणी वरील उदाहरण ठीक वाटेल. वरील रचनेत जास्त क्षेत्रफळ (surface area) हे पावसाला खुले (expose) झाले आहे असे वरकरणी दिसते आहे. शिवाय जागेचा वापर त्यामानाने कमी झालेला दिसतो आहे.

थोडे त्रिकोणी आकाराविषयी

उपयुक्ततेविषयी शंका व्यक्त करण्यापूर्वी जरा गुगलून पाहिले असते तर कदाचित् त्रिकोणी आकार ह्या विषयावर अनेक लेख मिळाले असते. असो. सर्वांच्या सोयीसाठी काही दुवे देत आहे ते पहावेत ही वि. वि.

महत्त्वाचा दुवा १

दुवा २

दुवा ३

_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

अंडे का फंडा

त्रिकोण म्हणजे अंडे नव्हे किंवा ही इमारत पिरॅमिड नव्हे. ही इमारत व डोमस् किंवा आर्च ब्रिजेस् ची तुलना चुकीची आहे. उलट्या त्रिकोणाच्या स्थैर्याबद्दल आपले काय मत आहे.? उलट्या त्रिकोणाच्या गुरुत्वमध्याबद्दल अधिक माहिती द्यावी.

आपले विकासक/वास्तुकार यांचेही मत घ्यावे.

(या इमारतीच्या स्ट्रक्चरल डिसाईनर्सनी/निर्मात्यांनी वास्तुकाराला शिव्यांची लाखोली वाहिली असेल हे नक्की ;) )

अवांतर :
काही ठराविक विषयावरील मतांसाठी अजूनतरी तो गूगलकडे जात नाही.

आता ही आणखी एक भारतीय इमारत पाहा.

रोलरकोस्टरवर फ़िरणारी इमारत

मला तर या विषयावर १००० ओळींचे महाकाव्य लिहावेसे वाटते. ग्रेस यांची शिकवणी मिळाली तर सहज शक्य आहे !
[नव काव्यप्रेमी] शरद

अवांतर

महाकाव्य लिहायचे तर मोरोपंतांसारखी शब्दांना वाकविण्याची किमया हवी. त्यासाठी अतोनात अभ्यास हवा. पण विजिगिषु / युयुत्सु वृत्ती असेल तर काही कठिण नाही.

आपल्याला ह्या कामासाठी मनापासून शुभेच्छा.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

वायुवीजन!!!

वरील लेखात आणि प्रतिसादांत वायुवीजन हा शब्द सातदा वाचला, सातही वेळा चुकीचा लिहिलेला. हा काहीतरी टेलिविजन सारखा नवा शोध असावा असे प्रारंभी वाटले. शेवटी तो शब्द आला की गाळून पुढे वाचायचे ठरवले, तेव्हा कुठे पुढचे प्रतिसाद वाचता आले.. --वाचक्‍नवी

हा हा

या कवितेची आठवण झाली :

अजुनि या विजनातही
प्रीतीचे स्तूप खडे
कललेले उंच माड
तुटलेले उंच कडे .

- विंदा करंदीकर

अरे!

न जाणो काही लेखनाच्या चुका असल्या किंवा प्राज्ञ मराठी कळले नाही तर म्हणून तर सर्वांना कळेल असे शुद्ध मराठीत "ventilation" लिहीले होते..
मागचा अनुभव ताजा होता. :)

वायुवीजन

वायुवीजन म्हणजे व्हेंटिलेशन की एअर सर्क्युलेशन? असे असल्यास दोन्ही शब्दांतला फरक काय?

फरक

वेंटिलेशन म्हणजे जुनी, शिळी हवा घालवून तेथे नवीन, ताजी हवा आणणे/येणे. एअर सर्क्युलेशन म्हणजे हवेचे (वर्तुळाकृती) अभिसरण, ह्यात जुनी, शिळी हवा जाऊन नवीन, ताजी हवा येईलच असे नाही, आहे तीच शिळी हवा फिरती ठेवली तरी ते एअर सर्क्युलेशन होईल, मात्र ते वेंटिलेशन होणार नाही.

बरं.

मुद्दा कळला. आता वायुविजन / वायुवीजन ह्या विषयावर पण काहीतरी महत्त्वाची माहिती येऊ द्या.

_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

 
^ वर