फायरफॉक्स एक्सटेंशने

उपक्रमावर फायरफॉक्स ब्राऊजरच्या वापराबाबत अनेक सदस्यांनी वेगवेगळी माहिती दिलेली आहे. इंटरनेट एक्स्प्लोरर, ऑपेरा, क्रोम यांच्या तुलनेत फायरफॉक्सचे वैशिष्ट्य म्हणजे फायरफॉक्समध्ये वेगवेगळे अनेक ऍडऑन्स वापरुन तुम्हाला एक बहुपयोगी ब्राऊजर तयार करता येतो.

मला आवडणारे काही ऍडऑन असे.

१. जी-स्पेसः प्रत्येक जीमेल खात्यासोबत खूप मेगाबाईट्ची जागा मिळते. (आताच पाहिले तर प्रत्येक खात्याला ७२०० मेगाबाईट्स इतकी जागा उपलब्ध आहे.) मात्र ही संपूर्ण जागा फक्त इमेलींसाठी वापरली जात नाही. जी-स्पेसचा वापर करुन तुम्हाला ही जागा एखाद्या नेटवर्क डिस्कप्रमाणे वापरता येईल. जी-स्पेसवर साठवलेल्या फायली या नेटवर्कवर उपलब्ध असल्याने कोणत्याही संगणकावरून त्या फायली उपलब्ध होतील. थोडक्यात तुम्हाला तुमच्या जीमेल खात्याचा एफटीपी खाते म्हणून वापर करता येईल. हे ऍडऑन इन्स्टॉल करुन वापरणे अतिशय सोपे आहे. मोझिलाच्या संकेतस्थळावरुन हे ऍडऑन इनस्टॉल करुन घेतले की खाली दाखवल्याप्रमाणे टूल्स मधून जीस्पेस सुरु करता येईल.

जीस्पेस सुरु झाल्यावर तुमच्या जीमेल खात्याचे नाव आणि पासवर्ड वापरुन लॉगिन केले की कोणत्याही एफटीपी क्लायंटप्रमाणे फायली चढवता किंवा उतरवता येतील. अनेक फायलींचा असा बॅकप करुन ठेवल्यास इंटरनेटची उपलब्ध असणार्‍या कोणत्याही संगणकावरुन त्या फायली वापरणे शक्य आहे.

२. नो-स्क्रिप्टः हे एक्सटेंशन फायरफॉक्सच्या सर्वाधिक लोकप्रिय ऍडऑनपैकी एक आहे. संकेतस्थळांवरील जावा, जावास्क्रिप्ट, फ्लॅश, जाहिराती वगैरे पाहण्याची इच्छा नसेल तर हे ऍडऑन वापरा. अनेकदा फ्लॅश प्लगिनमुळे ब्राऊजरमध्ये पान दिसण्यास बराच वेळ लागतो. मात्र नो-स्क्रिप्ट लावल्यास फक्त अक्षरे दिसतील. ह्या प्लगिनमध्ये तुमच्या आवडीच्या डोमेनवरील फ्लॅश व तत्सम प्लगिनांना परवानगी देता येते. (उदा यू-ट्यूब). मोझिला संकेतस्थळावरुन हे ऍडऑन इन्स्टॉल करुन घेतले ब्राऊजर खिडकीच्या तळाशी एक S दिसू लागेल. त्यावर टिचकी मारुन तुम्हाला त्या सायटीवरच्या पाहिजे त्या स्क्रिप्ट/फ्लॅश प्लगिनला परवानगी किंवा बंदी घालणे शक्य आहे.

हे एक्स्टेंशन वापरुन अनेक व्हायरस/स्पायवेअरांपासून संगणकाचा बचाव करता येईल.

या ऍडऑनची एक कटकट म्हणजे याचे अपडेट अगदी आठवड्याला येत असतात त्यामुळे अनेकदा त्याचा वैताग येतो. मात्र संगणकाच्या सुरक्षिततेसाठी हे सहन करावे. :)

३. स्क्रीन ग्रॅबः एखाद्या सायटीवरील पान/पानाचा दर्शनी भाग/किंवा संपूर्ण पानाचे चित्र तयार करण्यासाठी या एक्स्टेंशनचा वापर करता येईल. मोझिला संकेतस्थळावरून हे एक्स्टेंशन इन्स्टॉल करुन घेतले की ब्राऊजरच्या तळाशी स्क्रीनग्रॅब मेन्यू उपलब्ध होईल. त्यावर टिचकी मारून त्या पानाचे चित्र घेता येईल.

तुमच्या आवडीचे असे उपयुक्त ऍडऑन कोणते आहेत ते सांगा.

Comments

ऍडब्लॉक आणि नोस्क्रिप्ट

नोस्क्रिप्टमध्ये अनेक जाहिराती आपोआपच ब्लाक होतात.

ह्या निमित्ताने माहिती नसलेली पूरके (एक्स्टेन्शने) कळतील. -- हाच उद्देश आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मस्त!

फार छान माहिती.

जी स्पेस हे प्लगीन फारच उपयोगी वाटत आहे. पण जीमेलची अश्या प्रकारे वापरासाठी परवानगी आहे का? की हे त्यांच्या एखाद्या लूपहोलमुळे शक्य झाले आहे हे कळू शकेल का? कारण आज भरपूर डेटा इथे चढवला आणि उद्या त्यांनी हे लूपहोल बुजवल्यावर सगळाच डेटा नष्ट व्ह्यायचा म्हणून विचारत आहे.

बाकिची प्लगिन्स देखिल आवडली.

इतर फाफॉप्रेमींनी सुद्धा भर घालवी!

+१

हेच म्हणतो. उपयुक्त माहिती !

+२

फार छान माहिती.

असेच म्हणतो.

मधे एक दुवा मिळाला होता ज्यात टॉप ४० एडऑन्सची माहीती आहे. उदा. स्पीड डायल - ज्यात न्याहळकाला मोबाईल सदृश्य रुप मिळते व आपल्या आवडीची/ जास्तवेळा पाहीलेली संकेतस्थळ नंबर दाबुन पटकन लोड करता येतात. मी वापरले नाही आहे पण वाचुन रोचक वाटले. स्पीड डायल.

स्पीड डायल

हे ओपेरा (न्याहाळक) मध्ये मुलभूत होते/आहे. गूगलच्या नव्या टूलबारमुळे फा.फॉ. त ही सोय आपसूक येते.

शंका योग्य आहे मात्र लूपहोल नसावे.

एक तर ही सेवा हे लूपहोल नसावे. जीस्पेस हे ज्या एफ ओ एन कंपनीच्या मालकीचे आहे. त्या कंपनीमध्ये गूगलची गुंतवणूक आहे असे दिसते. त्याचबरोबर, जीस्पेस गूगल डिस्कची सोय देणारी एकमेव सेवा नाही. कदाचित गूगलच अशी सेवा पुढेमागे देऊ शकेल. किंवा एफ ओ एनला आपल्या पंखांखाली घेईल.

जीस्पेस द्वारे गूगलखात्यावर चढवलेला डेटा हा तुमच्या मेलबॉक्समध्येही उपलब्ध असतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

जीबुकमार्क्स

एका संगणकावर साठवलेले बुकमार्क दुसर्‍या संगणकावर वापरण्यासाठी डेलिशियस (delicious.com), गूगल बुकमार्क वगैरे सोयी उपलब्ध आहेत. या सोयींना सोप्या रीतीने वापरण्यासाठी फायरफॉक्सने त्यांचे ऍडऑन्स दिले आहेत. फायरफॉक्समधील बुकमार्कांसाठी फॉक्समार्कचाही पर्याय उपलब्ध आहे. मात्र या सर्वांमध्ये जीबुकमार्क हे मला फार सोयीस्कर वाटते.

ब्राऊजरच्या खिडकीतच असलेला जीबुकमार्कचा मेन्यू, आणि फोल्डर तयार करुन त्यात साठवण्याची सोय. हे अगदी ब्राऊजरच्या बुकमार्कइतकेच सोपे आहे. त्यामानाने डेलिशियस किंवा फॉक्समार्क वापरणे हे तुलनेने थोडे गैरसोयीचे आहे. (कारण ते थेट मेन्यूमध्ये दिसत नाही)

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/2448

यात साठवलेले बुकमार्क हे गूगल बुकमार्कमध्ये साठवले जातात त्यामुळे एखाद्यावेळी फायरफॉक्स उपलब्ध नसेल तरी गूगल बुकमार्कच्या सायटीवरुन हवे ती लिंक मिळू शकते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गूगल बुकमार्क

गूगलच्या टूलबारवर देखील एका क्लिक मध्ये दुवे साठवण्याची सोय आहे. पण गूगलच्या इतर सोयींच्या तुलनेत यात (बुकमार्क्स) मध्ये फारश्या सोयी नाहीत (लेबल्स, टॅग्स) याचेच आश्चर्य वाटते.

गूगल टूलबार आणि जीबुकमार्क

जी बुकमार्कमध्ये लेबल/ट्याग ह्या सोयी आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

स्क्रीन ग्रॅबः

स्क्रीन ग्रॅबः खूप् उपयोगी. टेस्टींगसाथी खूप् चांगले टूल् आहे.

स्क्रीन ग्रॅब सोबतच

स्क्रीन ग्रॅब फार सोयीचे आहे. विंडोज वापरकर्त्यांसाठी फायरफॉक्सव्यतिरिक्त इतर ठिकाणची चित्रे घेण्यासाठी फास्ट स्टोन कॅप्चर (http://www.faststone.org/download.htm) हे अतिशय उपयुक्त साधन आहे. यामध्ये स्क्रोलिंग विंडो, संपूर्ण डेस्कटॉप, निवडक भाग किंवा फ्रीहँड सिलेक्शन असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कीबोर्डावरील हवे ते काँबिनेशन सेट करता येते. विशेष म्हणजे यातील बहुतेक उपयुक्त सोयी या मोफत मिळणार्‍या शेअरवेअरमध्ये उपलब्ध आहेत. हा प्रोग्रॅम स्क्रीनसेवरप्रमाणे टर्मिनेट अँड स्टे रेसिडेंट प्रकारचा असल्याने विंडोजच्या स्टार्टअपमध्ये टाकून द्यावा. विशिष्ट बटणे दाबली की तो आपोआप चालू होईल. (अन्यथा पुढील बटणांची वाट पाहत झोपून राहील)

फायरफॉक्सच्या चर्चेतील विषयांतराबद्दल क्षमस्व.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

नोस्क्रिप्ट

नोस्क्रिप्ट अतिशय उपयोगी आहे.
माहितीबद्दल धन्यवाद!

अमित

इतर काही उपयुक्त एक्स्टेन्शने

इतर काही उपयुक्त एक्स्टेन्शने :
१) डाऊन देम ऑल
२) बेटर गीमेल२
३) गीमेल मॅनेजर
४) कस्टमाईझ् गूगल

फॉक्स क्लॉक्स

फॉक्सक्लॉक्स सुद्धा बरे पडते जागतिक वेळेसाठी.


 
^ वर