रोजसारखी एक नवी पहाट: सुर्योदय छायाचित्र टीका

नमस्कार मंडळी,

सुर्योदयाचे व सुर्यास्ताचे फोटो आपल्याला सगळ्यांनाच काढायला व बघायला आवडतात. विषयच तसा आहे तो.
सुर्योदयाबरोबर व सुर्यास्ताबरोबर नेहमी काही ना काही भावना, आठवणी जोडलेल्या असतात.
हे बघा एका सुर्योदयाचे चित्र.

एक्सिफः
Camera: Nikon D40
Lens: Sigma 70-300 Manual focus
Exposure: 0.003 sec (1/400)
Aperture: f/5.6
Focal Length: 120 mm
ISO Speed: 200
Exposure Bias: 0 EV
Flash: No Flash

तुमची मते नक्की कळवा. डाव्या बाजुला दिसणारे तारांचे खांब मुद्दाम घेतले आहेत. हा प्रयोग आवडतो का ते सांगा व सुधारणाही कळवा.

ध्रुव

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त!

मला तरी तुमचा प्रयोग भारी आवडला बुवा!
त्या तारा नसत्या तर कदाचित एकसुरी वाटले असते, आणि ते खांब एकदम रुल-ऑफ-थर्डला येउन थबकतात! मस्त वाटले! (मुद्दाम तसा कॉप केलाय का?)

आकाशात ढग असते तर आणखी मजा आली असती का? पण ते आपल्या हातात थोडीच आहे? :)

-भालचंद्र
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
http://bspujari.googlepages.com/

शतशतकांचे पायलन्स

पायलन्सचे चित्र सुंदर.

या फोटोत सूर्योदय मुद्दाम घेतलात, हा तुमचा निर्णय कल्पक आणि कथाकथक आहे. तप्त लाल-पिवळी रंगसंगती आयतीच मिळाली, हे उत्तम.

पायलन्सचे चित्र

सूर्योदयापेक्षा हे पायलन्सचे चित्र आहे या धनंजय यांच्या निरीक्षणाशी मी सहमत आहे. फारच छान चित्र.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मस्त

चित्र छान आले आहे. पाहून का कुणास ठाउक, काला पथ्थर मधील सुरूवातीचा सीन आठवला.

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? फोटो काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे काय म्हणवते तुम्हाला?

प्रयोग आवडला

प्रयोग आवडला. खरे तर निसर्गदृष्यामधे मनुष्यनिर्मीत गोष्टी/वस्तु आल्यानंतर त्या निसर्गदृष्याची मजा थोडी कमी होते. परंतु हा फोटो एकदम मस्त आलाय.

- सूर्य.

------------------------------------------------------
छायाचित्र टिका लेख माहितीपुर्ण आहेत असे माझे मत आहे ;)

+१

छायाचित्र टिका लेख माहितीपुर्ण आहेत असे माझे मत आहे ;)

हिअर हिअर! ;)
----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

ह्म्...

काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

हिअर हिअर! ;)

==================

बर...!

-
ध्रुव

यावरुन

एका संकेतस्थळाने सर्व सदस्यांना शिवीगाळ करण्याची सोय दिली आहे. ती इथे करुन उगाच उपक्रमाची नासाडी करुन उपक्रमी कसे म्हणवते तुम्हाला.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हममम...

उपक्रमी म्हणवण्यासाठी 'सर्किटिफिकेट'ची गरज नाही. तुम्हाला नाही आवडत छायचित्र टीका तर पाहू नका. इथे येऊन भंपक सल्ले नाही दिले तरी चालतील. तुमची काळजी वाटली म्हणून सांगितले.

-- You cannot fool all the people all the time.

हा इशारा

उपक्रमी म्हणवण्यासाठी 'सर्किटिफिकेट'ची गरज नाही. तुम्हाला नाही आवडत छायचित्र टीका तर पाहू नका. इथे येऊन भंपक सल्ले नाही दिले तरी चालतील. तुमची काळजी वाटली म्हणून सांगितले.

+१००.

अशाच प्रकारचा इशारा उपक्रमपंतांकडूनही आला तर संकेतस्थळावर गोंधळ घालण्याचे उद्योग कमी होतील असं वाटतं.

-राजीव.

छान फोटो

गडद रंग छान आले आहेत. नेहेमी खटकणारे विजेचे खांब इथे उलट शोभा वाढवत आहेत.

सुर्याच्या बाजूला उजवीकडील जागा मला थोडी अनावशयक वाटली. क्रॉप करुन इथे पुन्हा देत आहे. कसं वाटतय ते बघा..

हे जास्त

क्रॉप करुन जास्त छान वाटतय.

क्रॉप आवडले

उभा फोटोही काढला होता पण तो तितकासा नाही आवडला. चौरस क्रॉप करायचे लक्षात नाही आले.
-
ध्रुव

मानलं

कोलबेर पंत, मानलं तुम्हाला.

- सूर्य.

व्वा व्वा व्वा!

आवडले. सूर्याकडे जरा नीट लक्ष देऊन बघा बरे. एका केशरी टरफलात पिवळा चेंडू ठेवल्यासारखे वाटते का नाही?
आणि सूर्याखालीच थोडंसं डावीकडे विजेचा एक टॉवर देखील आला आहे. बहुधा हीच रांग पुढे जाऊन वळली आहे. सूर्याच्या उजवीकडेही दोन अगदीच अस्पष्ट खांबही दिसत आहेत.
आणि पक्षी तर कुणालाच दिसले नाहीत वाटतं. नीट बघा. सूर्याच्या वर जरा उजव्या बाजूला मोजून सहा पक्षी उडताना दिसत आहेत.
अहो, छायाचित्राकडे एवढे लक्ष द्यावेच लागते. त्याशिवाय का हा छायाचित्रकारांचा समुदाय एवढा लोकप्रिय झाला आहे, भरभरुन चालतो आहे? सांगा बरे?

कोलबेर यांची सूचनाही विचारात घेण्यासारखी आहे.

(छायाक्रमी) सौरभदा.

==================

अरेरे

सूर्याच्या वर जरा उजव्या बाजूला मोजून सहा पक्षी उडताना दिसत आहेत.

मी चित्र पाहायला विलंब (उशीर) केला. पक्षी सैबेरियाला उडून गेले. "दैव देते आणि कर्म नेते" असे म्हणतात ते ह्यालाच वाटते...
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

अरेच्चा

पक्षी मी पण बघीतले नव्हते. तुम्ही संगीतल्यानंतर बघीतले व दिसले.

अहो, छायाचित्राकडे एवढे लक्ष द्यावेच लागते. त्याशिवाय का हा छायाचित्रकारांचा समुदाय एवढा लोकप्रिय झाला आहे, भरभरुन चालतो आहे? सांगा बरे?
खरय... नाहीतर फ्लिकर वर हे कळलेच नव्हते :)
-
ध्रुव

भले

नीट बघा. सूर्याच्या वर जरा उजव्या बाजूला मोजून सहा पक्षी उडताना दिसत आहेत.
याला म्हणतात, "ताडनेवाले भी कयामत की नजर रखते है" ;-)

त्याशिवाय का हा छायाचित्रकारांचा समुदाय एवढा लोकप्रिय झाला आहे, भरभरुन चालतो आहे? सांगा बरे?
सहमत आहे. :)

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

जबरदस्त आहे

चित्र जबरदस्त आहे..आवडले. तारांमुळेच खास उठाव आला आहे.

मूळ फोटो, क्रॉप सर्व आवडले.

.

सुर्योदय

मी अस्साच सुर्योदय रोज टेकडीवरुन पहातो. अगदी असेच खांब. फक्त तो सुर्य अगदी मोठे संत्र वाटावे असा नारिंगी असतो.
हनुमानाला ते खावेसे वाटले तर नवल नाही. आम्हालाही उडत जाउन ते संत्र पकडावेसे वाटते.
धन्यवाद ध्रुव!
प्रकाश घाटपांडे

 
^ वर