भिंगरी

भिंगरी अर्थात Wire tailed swallow!

ह्याच पक्ष्याचे एक फारच सुरेख छायाचित्र धृव ह्यांनी पुर्वी टाकले होते!
तरिही हा पक्षीच इतका लोभस आहे की ह्याचे अजुन एक छायाचित्र टाकल्याशिवाय राहवले नाही!

Wire-tailed swallow
भिंगरी

स्थळ : (श्री क्षेत्र!) कवडी
कॅमेरा : कॅनन रेबेल एक्स टी (३५० डी)
भिंग! : कॅनन इएफ-एस ५५-२५० एफ ४-५.६ (आय.एस)
एपर्चर : एफ्/८.०
आयएसओ : ४००

तसा बराच लांबुन काढलेला फोटो आहे; नंतर क्रॉप केलाय!

आपल्या प्रतिक्रीया जरुर कळवा!

-भालचंद्र

लेखनविषय: दुवे:

Comments

भिंगरी

छान !
शरद

सुरेख चित्र !

फारच लोभसवाणे चित्र !

अत्यंत मनोहारी!

त्याची टोपी काय सुंदर मखमली आहे!! सुंदर् चित्र.
(आता असलेल्या कडकाक्याच्या थंडीत अशा किरमिजी रंगाची टोपी घालायला मला फार आवडेल! :))

चतुरंग

फ्लिकर

ज्यांना विद्यापीठाची साईट उघडण्यात अडचणी आहेत त्यांच्यासाठी हा फ्लिकर दुवा

धन्यवाद

-भालचंद्र!

सुंदर

पाय घेता आले असते का? या विचारात पडलो होतो. पण तुमचा (पाय चौकटीत न घेण्याचा) निर्णय सुयोग्य आहे, असे मनाला पटते आहे.

पक्ष्याचे डोके-मान-पाठ-शेपूट एक सुरेख वक्र रेषा बनवतात (पलटलेला C आकार), आणि त्या कमानीत पक्ष्याचे आकाश समावते. आणि पक्षीसुद्धा त्या आकाशाला निरखतो आहे.

डोळ्याचे (प्रकाश)केंद्रण फारच सुंदर साधले आहे.

भिंगरी इतकी भराभर उडते, की तिचे हे गडद लोभस रंग सामान्यपणे माझ्या नजरेत भरतच नाहीत.

सुंदर चित्र दाखवल्याबाबत धन्यवाद.

**आमच्या मनामध्ये हेवेचे पातक घडवून तुम्हाला काय साधते हो ;-)**

मस्त

मस्त रे!
बाय द वे, साधारण किती अंतरावरून फोटू काढलास? आणि क्रॉप न केलेला फोटू टाकू शकशील का?
इतका स्पष्ट फोटू ५५-२५० ने किती अंतरावरून घेता येतो याबद्दल उत्सुकता आहे.

----

मुळ चित्र

हो! हे पहा मुळ छायाचित्र

हे अगदिच बिना-प्रोसेस आहे. फक्त रॉ वरुन जेपेग केलंय.
ह्या पक्ष्यापासुन मी बहुदा १२-१५ फुट अंतरावर उभा होतो, पुर्ण २५०मिमी झुम टाकला.

साधारण एफ्/७-८ ही रेंज माझ्या लेन्सचा 'स्वीट स्पॉट' आहे, त्यामुळे स्पष्टता अधिक जाणवते.

http://bspujari.googlepages.com/

मला

हे ही आवडले. सौरभशी सहमत आहे, पार्श्वभूमी मस्त!
----

व्वा व्वा व्वा!

८ इतके ऍपर्चर देऊनही मागची पार्श्वभूमी :-) झकास धूसर आली आहे. काहीच अंदाज करता येत नाही.
निळ्या, लाल आणि पांढर्‍या रंगाचा इतका मनोहर पक्षी बनवणार्‍या निसर्गाला सप्रेम नमस्कार/दंडवत!
धन्यवाद भालचंद्र पुजारी....

-सौरभ.

==================

८ एपर्चर

खरेतर मलाही हाच प्रश्न पडला होता, मी १०-१० वेळ एक्झीफ तपासुन पाहिला! पण नो युस!:)

मला असे वाटते की कदाचित थोडे तिरका उभा राहिल्याने खर्‍या डेफ्थ ऑफ फिल्डची कल्पना येत नसावी!

हो! ह्या आणि अश्या बहुविध मनोहरी पक्षांची निर्मिती करणार्‍या निसर्गाला खरोखरच सलाम! :)

भालचंद्र
----------------------------------------------
http://bspujari.googlepages.com/

वाह!

वाह!

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

जबरदस्त

सुं द र.

सॉफ्टटॉयच समोर आहे असे वाटते. प्रत्यक्षात पाहील्यावर इतके रंग, सौदर्य दिसणार नाही जितके कॅमेरात बंद झाले आहे असे वाटतेय.

अप्रतिम!

"तारवाली"

भालचन्द्र, तुम्ही इतके क्लोझप् कसे घेता? तुमची लेन्स् तर जेमतेम २५० पर्यन्त आहे.
मी नवीन सदस्य आहे, आणि माझे टोपण नाव "खत्रूड" आहे! म्हणून जरा लिहितोय्...
थोडी वातावरण-निर्मिती असेल तर अधिक चान्गले! म्हणजे, 'हबिटाट' जर घेता आला तर बरे!

क्लोझप्

धन्यवाद!

तसा हा पक्षीच मुळी खुप धीट होता. कवडीतल्या ह्या 'तारवाली' पक्ष्यांना बहुदा माणसांच्या वर्दळीची खुप सवय आहे! त्यामुळे ते बरेच जवळ येउन देतात (दुसरी अटकळ अशीही आहे की, त्या पुलाखाली (जिथे हा फोटो घेतलाय तिथेच) त्यांची घरटी असावीत, आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी ह्या पटकन जागा सोडत नसाव्यात). त्यामुळे हा फोटो बराच जवळुन घेता आला!

आणि राहिला प्रश्न वातावरण-निर्मीतीचा तर ते फार बिकट होउन बसले असते. म्हणजे एकतर हे पक्षी उडत असतात, तेही अती वेगात आणि वेडेवाकडे त्यामुळे त्यांना टिपणे अवघड होते [माझे शेकडो प्रयत्न वाया गेले पण हवा तसा फोटो नाही मिळाला :(] . आणि जेव्हा ते बसलेले असतात, जसे की ह्या फोटोमध्ये, त्या फोटोमध्ये पुलाचा कठडा आणि पाणी इतकेच दिसते! (जसे की मुळच्या फोटोत दिसतय), आणि सगळा हॅबिटॅट घेण्याच्या नादात कुठेतरी त्या पक्षाचे बारकावे सुटले असते असे मला वाटले! (आणि क्रॉप केलेला फोटो मला तरी जास्त सुंदर वाटला!)

सर्वांचे परत एकदा मनःपुर्वक धन्यवाद!

-भालचंद्र

http://bspujari.googlepages.com/

अप्रतिम...

अप्रतिम फोटो. या पक्ष्याचे फोटो बर्‍याच वेळा काढणे अवघड असते, पण कवडीच्या तारवाल्या फारच धीट आहेत. अगदी जवळ बसतात. मी तर हल्ली कवडीला गेलो की या पक्ष्याचे फोटो घेणे टाळतो. इतके फोटो घेता येतात की मेमरी कार्ड भरुन जाते.
पुढच्या वेळी याच्या डोळ्याचे मॅक्रो नक्की टाका.

हे बघा अजून काही फोटो:

a

-
ध्रुव

सही

>मी तर हल्ली कवडीला गेलो की या पक्ष्याचे फोटो घेणे टाळतो. इतके फोटो घेता येतात की मेमरी कार्ड भरुन जाते.

अगदी खरयं, माझ्याकडे आणि आमच्या मित्रगणांत तर आता ह्याचे इतके फोटु झालेत की एक छोटेखानी हार्डडिस्क भरुन जावी!

आणि मी लेखाच्या सुरवातीला जे फोटो म्हणत होतो ते हेच ! २ नंबरचा फोटो १ नंबर आहे:):) !!! ऑल टाईम ग्रेट!
आणि तिसर्या फोटोइतकी जिवंत तारवाली कुठे सापडणार! मस्तच!

http://bspujari.googlepages.com/

सहमत

२ नंबरचा फोटो १ नंबर आहे:):) !!! ऑल टाईम ग्रेट!
सहमत आहे. हा माझाही फेवरिट आहे.
----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? फोटो काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

 
^ वर