शिक्षा ठोका

शिक्षा ठोका
सकाळी शाळेत एक मुलगा उशीरा आला. म्हणून रागे भरत गुरुजींनी विचारले " का रे, का उशीर झाला " पोराने उत्तर दिले

" हराच्या हाराच्या आहाराच्या पुत्राच्या मित्राच्या शत्रुच्या भावाच्या प्रेयसीने गळ्याला घट्ट मिठी मारली म्हणून उशीर झाला ".
गुरुजींनी काय शिक्षा केली ते सोडा. तुम्ही काय शिक्षा ठोकणार ते सांगा.

[सगळ्यांना विचार करावयास वेळ मिळावा म्हणून कारण दोन दिवसांनी सांगावे ही नम्र विनंती.]

[शाळकरू] शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

हराच्या हाराच्या

हराच्या हाराच्या
हर म्हणजे शंकर. शंकराच्या गळ्याभोवती साप (नाग?) असतो, तोच हार समजावा.

पुढे काय?

अंदाज

शंकर-नाग-उंदिर-उंदिर-उंदिर-बोका-बोका-मांजरी
एक आपला अंदाज ठोकून दिला.

पटते आहे

उत्तर पटण्यासारखे आहे जर
{
मध्ये एखादा गुगली सुटला नसेल तर.
}
----

माझा अंदाज वेगळा

पण अजून दोन दिवसांची मुदत पूर्ण झालेली नाही.

शंकर-नाग-(उंदिर-उंदिर-उंदिर-बोका-बोका-मांजरी)-गरुड-...

प्रासानुप्रासाच्या चमत्कृतीसाठी एक बहुव्रीही तत्पुरुषासारखा सोडवला आहे, असे माझे मत आहे.

हराच्या हाराच्या

आज उलगडा करावयास हरकत नाही. श्री. धनंजय यांनी व्य,नि,ने उत्तर पाठविले होतेच.
हर ----- शंकर
त्याचा हार ---नाग
त्याचा आहार --- वायु[ हा एक संकेत आहे,नाग वायुवर जगतो अशी समजुत]
त्याचा पुत्र ---- हनुमान
त्याचा मित्र ---राम
त्याचा शत्रु ----रावण
त्याचा भाऊ --- कुंभकर्ण
त्याची प्रेयसी --- निद्रा
तीने गळ्यास घट्ट मिठी मारली तर सकाळी शाळॆस येण्यास उशीर होणारच.
ह्या " अर्क " मुलाच्या पाठीवर एक शाबासकीची थापटी मारावी एवढे पुरे.
शरद

गुगली

त्याचा आहार --- वायु[ हा एक संकेत आहे,नाग वायुवर जगतो अशी समजुत]

वाटलेच की कुठेतरी गुगली असणार म्हणून. अर्थात विसुनाना, धनंजय यांची उत्तरेही बरोबर धरायला हरकत नसावी.
----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

पटत नाही

हनुमान हा स्वतःला रामाचा दास म्हणवून घेण्यात धन्यता मानीत असे. म्हणूनच, हनुमान हा रामाच मित्र हे काही पटत नाही.

बाकी, नागाचा आहार वायु, हा माहिती नव्यानेच कळली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहमत

हनुमान हा स्वतःला रामाचा दास म्हणवून घेण्यात धन्यता मानीत असे. म्हणूनच, हनुमान हा रामाच मित्र हे काही पटत नाही.

सहमत आहे. त्यामुळे तर्काची दिशाच बदलते.
प्रकाश घाटपांडे

हनुमान

हनुमान हा स्वतःला रामाचा दास म्हणवून घेण्यात धन्यता मानीत असे. म्हणूनच, हनुमान हा रामाचा मित्र हे काही पटत नाही.

सहमत आहे !

हनुमत्सखा

हनुमत्सखा
प्रथम हे मान्य की मित्र हा शब्द पुत्र व शत्रु यांना जुळावा म्हणून निवडला आहे.पण रामाचे व हनुमानाचे नाते केवळ प्रभु-दास असे नाही. त्यांच्यात सख्यत्व आहेच.रांमायणातील एक उदाहरण देतो, इतर सापडतील. हनुमान रामाला म्हणतो " स्नेहो मे परमो राजंस्त्वयि तिष्टतु नित्यदा " उत्तरकांड ४०.१६-१७
हनुमानच कशाला सर्व मराठी संत विठ्ठलाचे भक्त आहेत व त्याच वेळी त्याचे सखे आहेत. तेंव्हा हनुमानाचा मित्र राम हे ठीकच.
अवांतर : ही गोष्ट मी रचलेली नव्हे, ऐकलेली. पण ही नक्कीच संस्कृत सुभाषिताची छाया आहे. कोण शोधणार हे सुभाषित ?
शरद

माझे काही दुवे वेगळे होते

पण शरद यांचे अधिक पटण्यासारखे आहेत. गंमत म्हणून माझे दुवे देत आहे. सुरुवात आणि शेवट शरद यांनी सांगितलेलाच आहे, पण साखळीच्या दोन कड्या वेगळ्या आहेत :

हर ----- शंकर
त्याचा हार ---नाग
तो आहार ज्याचा --- गरुड [इथे "नागाहार" = नागाचा आहार/नाग आहार ज्याचा असा श्लेष गृहीत धरला आहे]
त्याचा पुत्र ---- जटायू
त्याचा मित्र ---राम
त्याचा शत्रु ----रावण
त्याचा भाऊ --- कुंभकर्ण
त्याची प्रेयसी --- निद्रा

हे जास्त योग्य् आहे

धनंजय यांचे उत्तर् जास्त् योग्य् आहे असे माझे मत् आहे.

अजुन येउ दे

कोडे, प्रतिसाद वाचुन मजा आली. अजुन येउ दे. धनंजय यांचे उत्तर जास्त पटते.

अवांतर - शंकर भगवान यांचा नाग म्हणजे मामुली नसावा "नागाधिराज" असावा म्हणजेच किंग कोब्रा. पूर्ण वाढ झालेल्या किंग कोब्राचा आहार हा बहुतांशी इतर साप असतात. पूर्ण वाढ झालेल्या किंग कोब्राचा शत्रु माणूस सोडला तर दुसरा किंग कोब्राच.

यनावालाजी आजकाल कोडी घालत नाहीत :-(

प्रकाटाआ

प्रकाटाआ
----

नाग हवेवर जगतो.

ही माहिती चांगलीच् आहे. नाग, भुजंग, अजगर इत्यादी प्राणी खुपच काळापर्यंत उपाशी राहु शकतात असे ऐकले होते. ते प्राणायम करतात आणि अशा स्थितीत त्यांना अत्यल्प आहारावर जगता येते असेही ऐकले होते.

:)

ते प्राणायम करतात आणि अशा स्थितीत त्यांना अत्यल्प आहारावर जगता येते असेही ऐकले होते.

आता सगळ्यांना त्रास यांच्या लेखनाचे महत्त्व कळेल. प्राणायाम वगैरे देणग्या भारतीयांनी जगातील इतर जमातींनाच नव्हे तर प्राण्यांनाहि दिल्या आहेत ;)

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

प्राणायाम इ.

प्राणायाम वगैरे देणग्या भारतीयांनी जगातील इतर जमातींनाच नव्हे तर प्राण्यांनाहि दिल्या आहेत ;)
हहपुवा.

प्राणायाम् वगैरे काही नाही कलंत्रीजी, साप आदि सरपटणारे प्राणी हिवाळ्यात दीर्घ झोपेत जातात (हायबरनेशन).

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

देणे आणि घेणे

नाग, घोणस वगैरे मातब्बर सापांनी कित्येक लोकांना शवासन शिकवलेले आहे. पैकी काही शिष्य इतके कुशल होतात, की आगीचे चटके बसले तरीही हालचाल करत नाहीत.

हा हा

मस्त तिरकस विनोद.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अमेरिकेत त चा ज

अमेरिकेत त चा ज
पुण्यात आनंदीबाईने ध चा मा केला हे सर्वांना माहित आहे. पण अमेरिकेत आचार्य धनंजय यांनी त चा ज केला हे आमच्या लक्षात जरा उशिराच आले.
सुरवात अशी आहे....... हराच्या हाराच्या आहाराच्या.... हर ..शंकर, त्याचा हार .... नाग, त्याचा आहार...वायू आचार्यांनी त चा ज करून नाग ..ज्याचा आहार [तो] गरूड
असा दुवा जुळवला.. वाहवा.
[इतिहासात वर्तमान पहाणारा] शरद

वा!

वा! खूपच माहितीपूर्ण धागा! :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर