बोली भाषेतील शब्द

मला एक प्रसंग रंगवायचा आहे. त्यात मला एकाच वस्तूचा वापर करुन त्यातील पात्र त्या वस्तूचा कसा वापर करत आहे हे दाखवायचे आहे. काय योग्य आहे आणि काय नाही हे वाचकांनी ठरवावे.

१. नर्मदाबाईने बुट्टी घेतली व त्यात गोवर भरुन घेतली.

२. सख्याने टोकरी सायबाला दाखवली आणि साहेब काय समजायचे ते समजला.

३. माधवीने २ सफरचंद, ३ संत्री आणि ३ हापूस त्या वेताच्या नाजूक घडणीच्या सुंदरशा टोपलीत ठेवली

४. रीटाला तीची ती चायनीज बाउलची खरेदी फारच महागात गेली.

वरील वाक्यातील वस्तूंची आदलाबदल शक्य नाही कारण, त्या वस्तू जरी एकाच कामासाठी वापरल्या जात असतील तरी [काही घेउन, त्यात ठेवण्यासाठी], त्या शब्दांच्या निश्चित अशा काही छटा आहेत. त्या छटा प्रसंगाच्या प्रभावामुळे निर्माण झाल्या आहेत. तो प्रसंग घडवतांना त्याच शब्दांचा वापर अनिवार्य आहे. जे लिहिले आहे ते बोली भाषेत नाहीए, तरी काही शब्द “प्रचलित” समजल्याजाणाऱ्या भाषेत आणले नाही तर प्रचलित भाषा तोकडी पडेल हेच त्यातून दिसते आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

समजले नाही

यात बोली भाषेतला (आणि लेखीमध्ये चालणार नाही असा) कुठला शब्द आला आहे?

फारतर एकाच वाक्यात "सायबाला" आणि "साहेब" शब्द घेतले, ते शैलीच्या दृष्टीने विचित्र वाटते. थोडेसे, खूप नाही. "साहेबाला" असे म्हटले असते, तर त्याच वाक्यातील "साहेब"बरोबर शैली जुळली असती.

(बोलीमध्ये आहेत पण लेखीमध्ये नाहीत, अशी शब्दांची उदाहरणे तुम्ही दिलेली पटत नाहीत. प्रादेशिक बोलींमध्ये काही शब्द आहेत ते बाकीच्या महाराष्ट्रात फारसे ओळखीचे नाहीत, असे काही तुम्हाला म्हणायचे आहे काय? किंवा काही विशिष्ट जातींच्या आपापसात बोलण्यात काही शब्द वापरतात, ते बाकीच्या मराठी लोकांना फारसे ओळखीचे नाहीत, असे काही तुम्हाला म्हणायचे आहे काय? तर अर्थातच उत्तर "होय" असेच आहे. पण तो वेगवेगळ्या बोल्यांमधला फरक झाला, बोली विरुद्ध लेखी असा कुठला फरक वाटत नाही.)

- - - -

त्या अनुषंगाने - वर तुम्ही "नाहीए" असे (उच्चारानुसारी योग्यच) लिहिले. त्याच प्रमाणे
"सख्यान् सायबाल् टोक्री दाखव्ली न् साय्ब् काय् समजाय्च्ते समज्ला."
असा वरील लिहिलेल्या एका वाक्याचा भराभर केलेला उच्चार ठीक वाटतो - सामान्य संधीनियमांप्रमाणे ध्वनींमध्ये बदल झाले आहेत. मराठीत संधी करून बदल झालेले ध्वनी लेखनात लिहायची प्रथा नाही. (संस्कृतात तसे बदल करून लिहिण्याची प्रथा आहे.)
त्यामुळे बोली आणि लेखीमध्ये काही फरक दिसतो - पण तो केवळ भासमान आहे, खरा नाही.

तुम्ही लिहिलेले "नाहीए"बाबत
"नाही आहे" असे लिहिण्याची पद्धत आहे, पण "नाहीए/नैये" असाच काही उच्चार होतो - हे तर सामान्य संधीनियमांप्रमाणे.
(= "नाही आहे" अस्लिह्ण्याची पद्धते, पण्"णाहीए/नैये" असाच्कईयुच्चारोतो - असे लिहिण्याची प्रथा [संस्कृतासारखी] पाडून मराठीभाषकांच्या साक्षरतेबाबत विशेष फायदा होईल असे तुम्हाला वाटते का?)

 
^ वर