मराठी समिक्षा मांड़णी

१)मराठी भाषेला स्वतःची समिक्षा आहे काय?
२)मराठी भाषेत वापरली जा़णारी समिक्षा ही इंग्रजी समिक्षेचा भावानुवाद आहे हे खरे आहे काय?
३)मराठी भाषेसाठी स्वतःची समिक्षा लिहीण्याचा कधी प्रयत्न झाला काय?
४)मराठी भाषेसाठी स्वतःची समिक्षा लिहीण्याचा कधी प्रयत्न केला तर काय अडचणी येवु शकतात?
५))मराठी भाषेसाठी स्वतःची समिक्षा नसल्यामुळे समिक्षेतील दोष मांडता येतील काय?
६)इंग्रजी ची समिक्षा स्वतःच्या भाषेला वापरणार्‍या जगातील इतर भाषा कोणत्या?
७)मराठी भाषेसाठी संस्क्रतची समिक्षा का उपयोगात आणली गेली नाही ?
-सूर्यकांत डोळसे

लेखनविषय: दुवे:

Comments

समजले नाही

"समीक्षा" म्हणजे सौंदर्यशास्त्र वगैरे अंगे असलेले साहित्यिक समीक्षणाचे शास्त्र म्हणायचे आहे काय?

त्या बाबत भालचंद्र नेमाडे यांचे अभ्यासपूर्ण निबंध वाचल्याचे आठवते. ("टीका स्वयंवर" असे संकलित निबंधांच्या पुस्तकाचे नाव आहे, असे वाटते.)

समीक्षा" म्हणजे सौंदर्यशास्त्र वगैरे

होय,समीक्षा म्हणजे सौंदर्यशास्त्र वगैरे अंगे असलेले साहित्यिक समीक्षणाचे शास्त्र असेच म्हणायचे आहे .समीक्षा शास्र मांड़णीवर मला सकारात्मक चर्चा अपेक्षित आहे.

हे पाहिलेत का?

मला वाटते की तुम्ही आधी विषयाची जएरा ओळख करून द्यायला हवी होती.
जसे,
१. समीक्षा म्हणजे काय? - गोषवारा - एक लेखनाचे उदाहरण
२. भाषेची समीक्षा म्हणजे काय? - गोषवारा - एक लेखनाचे उदाहरण
३. इंग्रजी भाषेची समीक्षा - गोषवारा - एक लेखनाचे उदाहरण
४. तुम्ही "मराठी भाषेत वापरली जा़णारी समिक्षा ही इंग्रजी समिक्षेचा भावानुवाद आहे हे खरे आहे काय?" असे का म्हणत आहात?

उरवरीत प्र्शनांसाठी लेख क्र. २ करावा.

मग हे प्रश्न काहीसे उत्तरले/विवेचले गेले असते.

असो,
शोध घेतल्यावर मला हे खालील साहित्य जालावर आढळले.
http://www.cfilt.iitb.ac.in/soundarya/sm1.html

या शिवाय 'पर्व' कादंबरीकार सुप्रसिद्ध कानडी लेखक एस. एल. भैरप्पा यांनी सौंदर्यशास्त्र व मीमांसेचा अत्यंत सखोल अभ्यास केला आहे.

आपला
गुंडोपंत

 
^ वर