छायाचित्र : घर थकलेले सन्यासी..

बरेच दिवस ह्या १९व्या शतकातल्या व्हिक्टोरीयन शैलीत बांधलेल्या घराचा फोटो काढायचे मनात होते.

शेवटी आज जाऊन काढून आलो...

कसा वाटला ते जरूर कळवा.

लेखनविषय: दुवे:

Comments

फारच सुंदर

फारच सुंदर. नकळत गाणे गुणगुणले गेले...
दिव्याचा तारा मस्तच वाटतोय. त्यासाठी काही विषेश प्रयत्न? फोटो संध्याकाळ होताना काढला आहे का?





हो संध्याकाळीच

हो फोटो सुर्यास्तानंतर काढला आहे.

एक्स्पोजर थोडे लांबले की दिव्याचे आपोआप तारे होतात.

विशेष काही करायला लागत नाही फक्त स्लो शटर स्पीड ठेवायचा.

माहिती

माहिती बद्दल धन्यवाद.





फोटो सुरेख

थंडीतील संध्याकाळ चांगली पकडली गेली आहे.

घर थकलेले संन्यासी या शीर्षकाचा अर्थ काय?

शीर्षक

असेच खूप जुने आणि भव्य घर आहे म्हणून ती ओळ टाकली.. विशेष काही नाही

कविता

ओह..मला वाटलं तुम्हाला कविता माहित आहे, पण मी त्या ओळी का वापरल्या असं विचारत आहात..
स्वारी!

ही घ्या पूर्ण कविता :

घर थकलेले संन्यासी, हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी, आभाळ घसरले होते

पक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळी मागे, असतेच झऱ्याचे पाणी

मी भीऊन अंधाराला, अडगळीत लपुनी जाई
ये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई

गीत - ग्रेस
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट - निवडुंग (१९८९)

धन्यवाद! :-)

ओह..मला वाटलं तुम्हाला कविता माहित आहे, पण मी त्या ओळी का वापरल्या असं विचारत आहात..

किती गैरसमज असतात लोकांचे!!! ;-) ह. घ्या. (मला वाटतं आता तरी विश्वास ठेवावा सर्वांनी की कवितेशी दूर दूर संबंध नसणारे लोक अस्तित्वात असतात.:-))

संपूर्ण कविता इथे दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. (साधे धन्यवाद म्हणायलाही याआधी वेळ झाला नाही त्याबद्दल क्षमस्व!)

रसग्रहण

विषयांतराबद्दल क्षमस्व. पण या निमित्ताने 'घर थकलेले सन्यासी'चे रसग्रहण झाले तर फारच छान.
'थकलेले सन्यासी' हे शब्द ग्रेसांना का वापरावेसे वाटले असतील? आणी शेवटच्या ओळीतील 'आईच्या डोळ्यामधले नक्षत्र' अंगावर काटा आणते.

----

अगदी

थंडीतील संध्याकाळ चांगली पकडली गेली आहे.

अगदी. फोटो सुरेख. हे विक्टोरियन घर सन्यस्त दिसते आहे खरे; पण थकलेले वाटत नाही.

सुंदर

फारच छान फोटो. आतला दिवा जास्त चमकत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

छान

नेहमीप्रमाणे चित्र छान. ताराही छान आला आहे. दोन घरे एकत्र घेण्याचे काही खास कारण? अर्थात ते एक बरे आहे. मोठ्या घराचाच फोटो घेतला तर एकदम एकाकीपणाचा भास होईल. दोन घरे एकत्र असल्याने मोठ्या घरातल्यांना कधीच्याकाळी थोडाफार शेजार असू शकेल असे वाटते.

मोठ्या घराचा समोरचा मनोरा दडपण आणणारा आहे. अशा घरात रहायचे तर चिक्कार लोक पाहिजेत. हॅलोवीनच्या रात्री इथे जाऊन चॉकलेटे आणायची म्हणजे कठीण आहे.

असेच

म्हणतो. चित्र छान आले आहे.
अवांतर : मला हे चित्र पाहून 'पथ्थर की हवेली को, शीशे के घरोंदों में' हे गाणे आठवले.
----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

चित्र छान आहे

मूळ चित्रात काही बदल केले का? रंगसंगती बदलली वगैरे का की जसेच्या तसे आहे?

मस्तच!

झक्कास फोटो आहे!
मला तर त्या दिव्याबरोबरच उजवीकडची पाटीसुध्दा मस्त वाटली!

भालचंद्र

http://bspujari.googlepages.com/

सुरेख

फोटो अप्रतिम आलाय. आता सरत्या हिवाळ्याच्या दिवसांत, सूर्यास्तानंतरच्या प्रकाशाची वेळही अचूक टिपलेली आहे.

[अवांतर - मेम्फिसमधल्या इतर ऐतिहासिक घरांबद्दल गूगलल्यावर ही माहिती मिळाली.]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुरेख चित्र

लांब उघडकाळामुळे एका प्रकारचा मुलायमपणा आलेला आहे. खिडक्यांच्या तावदानावर परावर्तित झालेले संध्यारंग विशेष आहेत.

हे चित्र मॅसी हाऊसने त्यांच्या पर्यटक-पत्रिकेसाठी वापरावे! झाडांनी नैसर्गिक चौकट दिली आहे, नावाचा फलकही दिसतो आहे.

मी स्वतः (आणि वर दिलेल्या काही दुव्यांवरच्या छायाचित्रकारांनी सुद्धा) जवळ जाऊन वाईड अँगल भिंग वापरून घर "अंगावर आणले" असते, नाट्यमय केले असते. पण इथे घर चौकटीच्या अर्ध्याच भागात ठेवून, झाडाच्या मानाने लहान करून उत्कृष्ट संयम दाखवला आहे.

ग्रेस यांच्या कवितेच्या ओळी सांगितल्याबद्दल सर्किट यांचे आभार.

आभारी आहे!

आवर्जुन मत नोंदवणार्‍या सर्वांचे अनेक आभार!

मस्त

मस्त चित्र आहे. कोलबेरपंतांच्या इतर चित्रांसारखेच.

- सूर्य.

आवडले

सुंदर प्रकाशचित्र आहे.. खूप आवडले.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

अहाहा

कोलबेरा,
काय सुंदर फोटो आलाय !

अवांतर : कोलबेरा कॅमेरा पाठव मला सेकंड हँड ( गीफ्ट म्हणून )

दश्त को देख के घर याद आया!

फ्लिकरवर फिरता-फिरता लागलेली काही घरे..

घर थकलेले संन्यासी
कैसी वीरानीसी वीरानी है
दश्त को देख के घर याद आया!

हळुहळू भिंतही खचते
ये हम जो हिज्र में दीवारो-दर को देखते हैं
कभी सबा को, कभी नामाबर को देखते हैं

कैसी वीरानीसी वीरानी है
हमारे घर की दीवारों पे "नासिर"
उदासी बाल खोले सो रही है

गिरीया

दुसर्‍या क्रमांकाचे घर पाहून हा शेर आठवला

गिरिया चाहे है ख़राबी मेरे काशाने की
दर-ओ-दीवार से टपके है बयाबां होना
----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

 
^ वर