छायाचित्रण- माझे काही प्रयत्न २

मित्रांनो,
उपक्रम वर हा माझा २रा प्रयत्न.

चिऊताईचं पिल्लु..

सुर्यास्त...

सुर्यास्तानंतर...

------

रायगड...

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त

गडावरची चित्रे मस्त!.. आधीची काहि फोकसमधे थोडी गंडल्यासारखी वाटताहेत का?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

उत्तम चित्रे

उत्तम चित्रे.
एक एक चित्र टाकत जा म्हणजे चांगला अस्वाद् घेता येइल.
जाणकारांच्या सुचनापण मिळतील.
लहान पिलांची चित्रे काढताना फ्लॅश वापरु नये. उगाचच मुक्या जीवांना त्रास.

सहमत आहे...

---------

-सौरभ

==================

रायगड

गडाचा पहिला फोटो ऑसम आहे....रायगडाला उगीच नाही दुर्गराज म्हणत!

सुंदर!

पिलाचा फोटो पक्ष्यापेक्षा फोकसच्या दृष्टीने, आणि मांडणीच्या दृष्टीने उजवा वाटतो. पण तो पक्षी काय एका ठिकाणी पोझ देऊन बसणार आहे :-)

गडाचे फोटो फारच सुंदर - धबधबे, वळसे घेणारी तटबंदीचा जवळून फोटो...

देऊळ आणि वाटेवरून चाललेले गड चढणारे - दोन्ही चित्रांची मांडणी चांगली आहे, पण या फोटोंमध्ये हिरवा रंग उगाच लक्ष विचलित करतो, असे मला वाटते - हे फोटो काळे-पांढरे करावेत असे मला वाटते. धुक्याचे वातावरण आणखी गूढ होईल, असे वाटते.

खरे सांगावे तर समुद्रतटावरचे फोटो तितके आवडले नाही. (अपवाद : लाट आपटणारा सूर्यास्त - आवडला) रात्रीच्या निसर्गदृष्यांचे फोटो कसे काढावेत याबद्दल छायाचित्रकारांनी मलाही मार्गदर्शन करावे. (सूर्यास्ताचा फोटो "पॅनोरामा" कातरून आकाशाचा वरचा भाग काढून टाकला तर माझ्यासाठी तरी थोडा कमी रटाळ होईल.) फुलांच्या फोटोंमध्ये केंद्रण (फोकस) गंडले आहे, ऋषिकेशशी सहमत.

काळे-पांढरे

धनंजय
देऊळ आणि वाटेवरून चाललेले गड चढणारे हे दोन्ही फोटो काळे-पांढरे करून पाहिले.
खरचं दोन्ही फोटो काळे-पांढरेच छान दिसतात.
देऊळ ...

वाटेवरून चाललेले गड चढणारे ...

असेच

सर्व मुद्यांवर सहमत. फोकस गंडणे, एकच चित्र टाकणे आणि पिल्लांच्या चित्रामध्ये फ्लॅश वापरणे.
----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

रायगडाचे

रायगडाचे फोटो चांगले आले आहेत. पक्ष्याच्या फोटोमधे बॅकग्राऊंड खटकते.

- सूर्य.

मस्तच

फोटो छान आले आहेत.

पुढच्या वेळी जरा मोजके [अजुन् कमी] फोटो टाका. म्हणजे तुम्हाला, आम्हाला बघायला, शिकायला जरा बरे. :-)

सहमत

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

पक्षी: शिंपी

पक्षी: शिंपी आहे.
एकच फोटो टाकला म्हणजे सर्वांना त्याचा जास्त आनंद घेता येतो व इतर चित्रांवर अन्याय होत नाही.
पक्ष्यांच्या पिल्लांचा फोटो काढताना कधीही खूप जवळ जाऊ नये किमान ५-६ फुट अंतर ठेवावे म्हणजे पक्ष्यांचे नित्य कार्यक्रम बिघडत नाहीत, प़क्षी घाबरत नाहीत. तसेच फ्लॅश टाळावा हे परत एकदा :)
बाकी रायगडावरचे फोटो मस्त आहेत. समुद्रकिनार्‍यावरचे जरा हात हलल्यासारखे वाटत आहेत.

-
ध्रुव

 
^ वर