छायाचित्र - माझे काही प्रयत्न

छायाचित्रण - माझे काही प्रयत्न

जाणकारानी मार्गदर्शन करावे

रानफुल . . .

Raan Phul

एका कोळीयाने...

सुरवन्ट

खन्ड्या ( किन्ग फिशर )

लेखनविषय: दुवे:

Comments

तृप्त नयानानुभव

प्रणित,
पेस्ट केलेली छायाचित्रे डोळ्यांना तृप्त करून गेली. चित्रांसोबत काही लिहिले नाहीत किंबहूना असे काही लिहावे लागावे याची गरजच नव्हती हे ओळखून घेतले त्याबद्दल अभिनंदन. मार्गदर्शन करा असे म्हणत असाल तर माझ्याकडे अतिशय हळवे मन आणि डोळे आहेत मेंदू त्या मानाने जरा कमीच.
तुमचा चित्रांकीत,
बाबासाहेब जगताप.

मस्त

कोळ्याचा जाळीदार फोटो आवडला. गवताच्या पात्याप्रमाणे दिसणारा फोटोही हिरवागार आहे.

बाबासाहेबांचा प्रतिसादही मस्त. मलाही मेंदू कमी आहे आणि सोबत हळवे मनही नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

स्वागत स्वागत स्वागत!

माझ्याकडून उपक्रमावर आपले स्वागत.
ते गोल निळे फूल कोणते आहे? कृष्णकमळ, विष्णूकमळ?
फोकस अजून नीट साधायला हवा असे वाटते. तसेच काही ठिकाणी पार्श्वभूमी लक्ष विचलित करणारी वाटली. चित्रांच्या चौकटींवर मेहनत घेता येईल.
मात्र कोळ्यांची चित्रे फार आवडली.
तसेच कॅमेरा कोणता वगैरे माहितीही द्या! शुभेच्छा!

-सौरभ.

==================

सर्व आयांनी जर आपापल्या मुलांना लहानपणीच योग्य शिकवण दिली, तर जगात युद्धं कशाला होतील? सर्व संस्कृती आयांच्याच हातात नसते काय?

फोटो

सही आहेत!

स्वागत

छायाचित्रकार प्रणित यांचे स्वागत.

सूक्ष्म वस्तूंमध्ये सौंदर्य बघण्याची तुमची दृष्टी आहे. वा! कोळ्यांचे फोटो कल्पक आहेत.

(प्रकाशकेंद्रण [फोकस] आणखी तीक्ष्ण असणे, चौकटीतून लक्ष विचलित करणारे तपशील टाळणे, वगैरे सूचनांबाबत सौरभ यांच्याशी सहमत आहे.)

मनमोहक

छान छायाचित्रे! आवडली.

रंगसंगती छान

स्वागत !
छायाचित्रे आवडली. फोकस आणखी तीक्ष्ण असायला पाहिजे होता आणि लक्ष विचलित करणारे तपशील टाळणे या मतांशी मी पण सहमत. विशेषतः खन्ड्या उठून दिसत नाही.
तांत्रिक माहीती दिल्यास आवडेल.

मस्तच!

चित्रे आवडली.

लहानपणी किडे खाणारे फूल म्हणून -मांसाहारी वनस्पती म्हणून- घटपर्णी नावाच्या फुलाचे रेखाचित्र पाहिले होते ते पहिल्या चित्रासारखेच होते. पहिले चित्र 'त्या' घटपर्णीचे आहे का?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

आभार

सर्वान्चे प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार!
तुम्हा सर्वान्च्या प्रतिसादामुळे नवीन फोटो टाकण्यास धीर आला.
बाकीचे फोटो लवकरच अपलोड करतो.

@ सौरभदा
ते गोल निळे फूल कृष्णकमळ आहे!

@ ऋषिकेश
ते फुल घटपर्णी नाही आहे. पावसाळ्यात फुलणारे रानटी फुल आहे.

कॅमेरा : कोडॅक ६.३ मे.पि.

या पुढे फोकस आणि लक्ष विचलित करणारे तपशील टाळणे या बाबीन्वर नक्की भर देईन.

पुन्हा एकदा सर्वान्चे मनापासुन आभार!

मस्त

सर्वच छायाचित्रे अप्रतिम!
अशी छायाचित्रे दाखविल्याबद्दल धन्यवाद!

माझ्या महितीप्रमाणे त्या रानफुलांची नावे अशी:
पहिला फोटो : रानतीळ (Sesamum orientale)
दुसरा फोटो : दुपारी (कारण हे फुल दुपारच्या वेळेस फुलते!) (Hibiscus hirtus)
तिसरा फोटो : कर्दळी (इंग्रजी नाव कोणाला माहित आहे का?)
चौथा फोटो : दसमुळी (Eranthenun roseum)
आणि खालच्या फोटोमध्ये बहुदा कृष्णकमळच आहे!

संदर्भः अर्थातच श्रीकांत इंगळहळ्ळीकर!

- भालचंद्र
http://bspujari.googlepages.com/

फुलांची नावे

भालचंद्र

फुलांच्या नावांसाठी धन्यवाद!

कारण मला कृष्णकमळ व कर्दळी सोडून बाकी एकाही फुलाचे नाव माहीत नव्हते.

प्रणित

+१

फारच छान माहिती..
अवांतरः मला शास्त्रीय नावांपेक्षा हि अस्सल स्थानिक नावे आवडतात आणि त्या फुलाचे/पक्ष्याचे नेमके वर्णन करतात.
सदाफुली, कर्णटोप, गोकर्ण आदि फुले काय, अथवा नाचरा, लालगा (लालबुड्या) काय नेमकी नावे आनंद देतात हेच खरे

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

+१

असेच म्हणतो. मस्त छायाचित्रे.

अवांतर : पुजारीसाहेब तुम्ही बॉटनीत पीएचडी करताय का? :-)

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

 
^ वर