गर्भधारणा सन्स्कार

हिन्दू धर्मातील सोळा सन्स्कार गर्भधारणा सन्स्कार हा एक सन्स्कार आहे.

बर्‍याच ठिकाणी ह्याचा उल्लेख आढळतो मात्र सखोल माहिती मिळत नाही.

ह्याबद्ल जाणकार माहिती देऊ शकतील काय ?

धन्यवाद !

लेखनविषय: दुवे:

Comments

वेदवाणी प्रकाशन

"शास्त्र असे सांगते " हे वेदवाणी प्रकाशन चे पुस्तक अशा विषयांवर वाहिलेले आहे. त्यात ही माहिती मिळू शकते. पुस्तक सहज उपलब्ध आहे.
अजुन काही माहिती इथे पहा
प्रकाश घाटपांडे

संस्कारधन

संस्कारधन* नावाचे एक पुस्तक मागे वाचले होते त्यात संस्कारांबाबत बरीच वैज्ञानिक(!) माहिती होती. बरेच माहितीपूर्ण पुस्तक होते.

सन्स्कार हा शब्द संस्कार असा लिहिता येईल सं साठी (saM)

*मात्र त्यातील अनेक संस्कार हे काही कळत नसताना (उदा. आमचे बारसे करण्यात आले तेव्हा) झाले त्यामुळे नक्की काय असते ते काही समजले नाही. नंतर कळत्या वयात आल्यावर मुंज वगैरे संस्कार करण्यास आम्हाला परवानगी नसल्याने ते करता आले नाहीत. बाकीचे अनेक संस्कार (विवाह, दहन वगैरे) होणे बाकी आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दहन

बाकीचे अनेक संस्कार (विवाह, दहन वगैरे) होणे बाकी आहे.

बारशाप्रमाणेच दहनसंस्कारही आपल्या नकळत होण्याची शक्यता अधिक वाटते. ;-) बाकी चालू दे!!

गर्भसंस्कार

आणि मुंजी सारखीच गर्भ धारणा संस्काराची देखिल तुम्हाला परवानगी नाही असे वाटते ;-) बाकी चालू दे!!

म्हणजे हा देखील

हे इतक्या ठाम पणे कसे काय म्हणू शकता ? विज्ञानाने बरीच प्रगती केलेली आहे हल्ली !

म्हणजे हा संस्कार देखील वैज्ञानिक मानावा लागेल. ;)

आपला
(संस्कारधनी) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

:-)

बारशाप्रमाणेच दहनसंस्कारही आपल्या नकळत होण्याची शक्यता अधिक वाटते. ;-)

यावरून एक वाक्य आठवले.
"If you don't go to other peoples funerals, they won't come to yours." :-)

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

म्लेच्छांची भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.म्लेच्छांची भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.म्लेच्छांची भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.म्लेच्छांची भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.म्लेच्छांची भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.म्लेच्छांची भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.म्लेच्छांची भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.म्लेच्छांची भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.म्लेच्छांची भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.म्लेच्छांची भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.म्लेच्छांची भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.म्लेच्छांची भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.म्लेच्छांची भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.म्लेच्छांची भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.

भाषांतर...

तुमी कोणाच्या मयतीला गेला नाय तर तुमालाबी खांदा द्येला कुनी येनार नाय....
मयत शब्द मराठीत कसा आला असावा?
मृत्यू----मर्तिक----मर्तिकाचे सामान?

मौत----मऊत----मयत? ;-)

(जिता)सौरभदा

==================

सर्व आयांनी जर आपापल्या मुलांना लहानपणीच योग्य शिकवण दिली, तर जगात युद्धं कशाला होतील? सर्व संस्कृती आयांच्याच हातात नसते काय?

 
^ वर