प्रशिक्षण आणि केंद्रांचे महत्व!

प्रशिक्षण आणि केंद्रांचे महत्व!
शिक्षण आणि प्रशिक्षण या निरंतर चालणार्या वैयक्तिक / सामाजिक प्रक्रिया आहेत असेच मला वाटते.
या दोन्ही प्रक्रियांमधील एक फ़रक म्हणजे दोन्ही प्रक्रियांच्या फ़लनिष्पत्तींसाठी लागणारा कालावधी. शिक्षणाच्या फ़लनिष्पत्ती चा काळ हा आजिवन आणि जिवनाच्या नंतर सुद्धा दुसर्या जिवनाच्या प्रवेशा पर्यंत असा काहिसा असावा. तर प्रशिक्षणाच्या फ़लनिष्पत्तीसाठी लागणारा काळ हा अल्पावधी असतो. म्हणजे एखादे कौशल्य, आत्मसात करणे आणि त्याचा उपयोग [ सदुपयोग किंवा दुरुपयोग ] सत्वर करता यावा यासाठी सातत्याने वापर आणि पुनःआवृत्ती ने ते सिद्ध करणे. जेणे करुन "लघुत्तम पण निर्णायक, अपेक्षीत परिणाम" हे साध्य ठेवून, साधन आणि कृतिं चा विशेष आवृत्तीत्मक अभ्यास करणे.शिक्षणामधे, विषयाच्या तत्वांचा,संकल्पनांचा, तर्कांचा, कार्यकारण भावाचा, कल्पनाविस्ताराचा, साध्य आणि साधन निवडी मागील तत्वांचा, साध्य प्राप्ततेसाठी उपलब्ध मार्गांच्या निवडींचा असा, ३६० अंशात्मक अभ्यासाचा अंतर्भाव असतो. शिक्षणाने, सर्वद्न्य [ GENERALIST ] तर प्रशिक्षणाने, विशेषद्न्य [SPECIALIST ]तयार होतात.
सारांश म्हणजे प्रशिक्षण हा शिक्षणाचा एक उपसंच आहे.प्रशिक्षीत मेन्दू हा अशिक्षीत आणि अप्रशिक्षीत मेन्दूंपेक्षा जास्त आणि गुणात्मक परिणामकारक असतो हे त्रिवार सत्य / तत्व कोणत्याही प्रशिक्षणात आणि प्रशिक्षकात अंतर्भुत असते. याचे उदाहरणच घ्यायचे झाले, तर सर्वत्र प्रशिक्षीत मेंदूच अप्रशिक्षीत मेन्दूं वर चांगला किंवा वाईट परिणाम घडवून आणताना दिसतात. याला प्राणिमात्र सुद्धा अपवाद आहेत असे मला जाणवत नाही.
वैद्यकशास्त्र याच तत्वांचा वापर करुन विषाणूंच्या सर्वनाशासाठी, प्रतिजैवकांचा वापर करताना दिसते.
तंत्रद्न्य, संशोधक, विश्लेषक हे प्रशिक्षीत द्न्यानाचा वापर करूनच अनेक यंत्रामधले अनेक दोष निवारण करतात.
देशाच्या संरक्षणासाठी तत्पर सैनिक सुद्धा विशेष प्रशिक्षीतच असतात.
देशाचा राज्यकारभार चालवणारे प्रशासकिय अधीकारी सुद्धा प्रशिक्षीतच असतात. यात मुख्यत्वे प्रशासन सेवा, पोलिस सेवा, आणि विदेश सेवेचा अंतर्भाव असतो.
इतकेच काय, आपले शाळे मधले सर, मास्तर, मैडम, बाई सुद्धा विशेष प्रशिक्षीत असतात.
अर्थतद्न्य मंडळी अर्थविषयक कारभाराचा गाडा विशेष प्रशिक्षणा विना हाकूच शकणार नाहित.प्रशिक्षणाचे आणि केंद्रांचे महत्व जाणण्यासाठी, उपरोक्त प्रशिक्षीत व्यक्तिंचे आणि संस्थांचे योगदान लक्षात आले तरी पुरेसे आहे.मग खरा मुद्दा असा कि इतके प्रशिक्षीत आणि शिस्तबद्ध मेन्दू ज्या देशात आहेत, त्यांना प्रशिक्षीत विध्वंसक मेन्दूंचा समाजातला "दोष" निवारण का करता येवू नये?
तर,मला असे वाटते की याच देशात, उपरोक्त "प्रशिक्षीत सर्वद्न्य आणि विशेषद्न्यांचे समन्वयक," असे " प्रशिक्षीत राजनितीद्न्य " यांची फ़ार फ़ार, न भुतो न भविष्यती अशी आवश्यकता आहे.आपणाला काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

स्वागत!

उपक्रमावर स्वागत!
लेख संज्ञांमधे/शब्दांमधे अडकल्यासारखा वाटला. फारसा कळला नाहि (कदाचित प्रशिक्षण नसल्याने असेल.. ह. घ्या. :) )
आपले विचार उदाहरणांत गुंफून सांगितले तर जास्त कळतील असे वाटते.

लिहिते रहा हि शुभेच्छा!

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

कळला नाही

उपक्रमावर स्वागत आहे.
लेख नीट कळला नाही. शिक्षण आणि प्रशिक्षण यांची नेमकी व्याख्या काय? लेखाचा मूळ हेतू प्रशिक्षण चांगले आहे असे दाखवणे आहे काय? बरीच वाक्ये समजली नाहीत. उदा.

शिक्षणामधे, विषयाच्या तत्वांचा,संकल्पनांचा, तर्कांचा, कार्यकारण भावाचा, कल्पनाविस्ताराचा, साध्य आणि साधन निवडी मागील तत्वांचा, साध्य प्राप्ततेसाठी उपलब्ध मार्गांच्या निवडींचा असा, ३६० अंशात्मक अभ्यासाचा अंतर्भाव असतो.
वाक्य संपेपर्यंत दम लागला. (ह. घ्या.) :)

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

बर्‍यापैकी कळला.

शिक्षण आणि प्रशिक्षण यांच्या व्याख्या जरी लेखात दिल्या नसल्या तरी त्यांतला फरक सांगायचा छान प्रयत्‍न केला आहे. अर्थात हे दोन्ही शब्द आपल्या परिचयाचे असल्याने त्यांचा उचित वापर आपण रोजच्या जीवनात करतच असतो.
लेख शब्दबंबाळ झाला आहे तरी बर्‍यापैकी कळला.--वाचक्‍नवी

 
^ वर