उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
विंडोज ७
वैद्य
January 8, 2009 - 5:28 pm
बरेच दिवस गाजत असलेली मायक्रोसॉफ्ट विंडोजची पुढची आवृत्ती (विंडोज ७) लास वेगास मधील तंत्रज्ञान परिषदेत सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आली. सध्यातरी बेटा आवृत्ती असणार्या विंडोज ७ मध्ये युजर इंटरफेस अधिक आकर्षक बनवण्यासाठी अनेक बदल करण्यात आलेले आहेत. बरीच हवा झालेल्या व्हिस्टाच्या अपयशासमोर विंडोज ७ आता काय गुण दाखवतो हे नजिकच्या काळात पाहुया. तोपर्यंत पाहा विंडोज ७ चे काही स्क्रीनशॉट्स्
सविस्तर बातमी इथे.
दुवे:
Comments
मासॉ
मासॉच्या उकळत्या दुधाने इतक्या वेळा भाजले आहे की आता त्यांचे ताकही डीपफ्रीज करून प्यावेसे वाटते. विनोदाचा भाग सोडला तर विंडोज सातबद्दल फारशी उत्सुकता वाटत नाही. कारण नव्या खिडक्यांसोबत त्यांच्या नवीन अडचणी आणि त्यावर नवीन उपाय शोधणे नको वाटते.
खरे तर ऑपरेटींग सिस्टीम एकदा सेट झाली की बदलण्याची गरज भासू नये. फक्त त्यात सुधारणा व्हाव्यात. (याच कारणासाठी लिनक्स आणि म्याक इतक्या दणकट बनल्या असाव्यात.) मासॉची दर वर्षाला नवीन ओएस ही कल्पना 'कॉन्ट्रॅडिक्शन इन टर्म्स' वाटते.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी
सहमत
अगदी योग्य मुद्दा!
विस्टापेक्षा काय वेगळे
मी विस्टा वापरलेली नाही. मित्राकडे पाहिली आहे. मात्र त्यापेक्षा वरील ओएसमध्ये काय वेगळे आहे हे समजले नाही. स्टार्ट मेनू मध्ये दिसणारे "सर्च प्रोग्रॅम अँड फाईल्स" हा पर्याय किंवा मागे डेस्कटॉपवर दिसणारे चंद्रसूर्य, हवामान, घड्याळ, कॅलेंडर वगैरे पायथॉनाधारित स्क्रीनलेटांचे प्रकार मॅक व लिनक्सच्या सिस्टमांमध्ये आधीच होते. (http://www.screenlets.org/index.php/Home)
या ऑपरेटिंग सिस्टममध्ये आधीच्या वर्जनांपेक्षा सुरक्षितता, स्थैर्य वगैरेंसाठी काही भयानक वेगळे केले आहे काय?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सहमत आहे
विस्टापेक्षा फारसे वेगळे कही दिसत नाही. बातमीमध्ये मात्र उपस्थीत प्रेक्षक नविन रुपाने भारावुन गेल्याचे दिले आहे. उपक्रमींपैकी कुणी ही उतरवुन घेतली असल्यास अधिक माहिती कळेल.
बातमीतील मजकुरावरुन तरी तसे वाटत नाही.
वेगळे
याची यादी इथे मिळाली. त्यावरून क्रांतीकारक असे काही वाटले नाही.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी
उबुंटुचे काही स्क्रीनशॉट
स्क्रीनलेट या कोजळावरुन घेतलेले उबुंटूचे काही स्क्रीनशॉटः
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
छान
उबंटू रॉक्स!
कोजळ म्हणजे काय? यावरून 'काजळरातीनं ओढून नेला' आठवले. :-)
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी
उबुंटु
उबुंटु वापरुन पाहीले पाहीजे.
स्क्रीन शॉट मस्त दिसतायत.
स्क्रीनशॉटस
असेचे (किंवा हेच) चित्र भिंतीवर डकवणे व गूगल ऍपस वापरणे विंडोज मध्येही शक्य असल्याने 'केवळ' स्क्रीनशॉटवरून उबन्टू (किंवा इतर लायनेक्स) कडे आकृष्ट होणे अवघड वाटते. (मॅक किंवा लायनक्सच्या थीम्स देखील विंडोजसाठी उपलब्ध असाव्यात.)
(तसेच विंडोजच्या नव्यारुपाबद्दलही केवळ स्क्रीनशॉटवरून कयास बांधणे कठीण ठरावे.)
(त्याला उबन्टूच्या तळपट्टीवर उड्यामारणार्या ऍप्लिकेशन्सचे मात्र कौतुक वाटते.)
का हो ?
तुम्ही हे स्क्रीलेट्स् वापरुन पाहीलेत का ? इतर कोणी वापरुन पाहीलेत का ?
सात क्रमांकाची सुधारणा
You can switch between Wi-Fi networks in one click from the system tray.
ही सुधारणा येण्यासाठी विंडोजकर्त्यांना २००९ ची वाट पाहावी लागली याचे वाईट वाटते. यापूर्वी कसे होते? सिस्टम पुन्हा चालू करावयास लागायची काय? :) वरील सोय इतर अनेक ऑपरेटिंग सिस्टमांमध्ये आधीच आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
वायफाय
मी व्हिस्टावर दोन वायफाय वापरलेली नाहीत. पण असे करायचे झाल्यास बहुधा एक डिसकनेक्ट करून मग दुसरे जोडावे लागेल. रीस्टार्ट करावे लागू नये पण ग्यारंटी नाही. :-)
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी
एक डिसकनेक्ट करुन दुसरे?
मी लॅपटॉपवर एक्सपी पर्यंत विंडोज वापरले. एक्सपीमध्येही नेटवर्क निवडता येत होते असे पुसटसे आठवते. (कदाचित आठवते ते चुकीचेही असू शकते). सध्या उबुंटूवर हवी तितकी वायरलेस नेटवर्कं दिसतात. त्यापैकी (अर्थातच) एक नेटवर्क टिचकीसरशी निवडता येते. त्यामुळे विंडोज ७.० नक्की काय देणार आहे हे समजले नाही.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
माझ्या
माहितीप्रमाणे विस्टामध्ये नेटवरर्क स्विच करण्यासाठी वेगळी सॉफ्ट्ववेअर उपलब्ध आहेत.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी
कर्णा
कर्णा उबंटुच्या वरच्या चित्रांबद्दल जरा सविस्तर माहिती दे ना रे.... आम्ही सुद्धा टाकतो असे...
गणकयंत्र
सूरज का सातवा घोडा (विंडोज ७) मधील गणकयंत्रामध्ये बर्याच सुधारणा करण्यात आल्याचे कळते.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी
फुकट
ज्यांच्याकडे विस्टा आहे त्यांना सूरज का सातवा घोडा अपग्रेड म्हणून फुकट मिळणार असल्याची बातमी आहे. बातमी ऐकून का कुणास ठाउक, विशेष आनंद झाला नाही. :)
----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?