शुद्ध्लेखन २.०

संगणकावर बोटण्यासाठी (टाईप) (लेखणीने लिखाण, बोटांनी बोटतो) मराठी ज्याप्रमाणे लेखणीने लिहीली जाते तशी बोटतांना दम लागतो. पहीली वेलांटी अशी लीहीली तरी चालू शकते. उकाराचेही तेच. ड्र्यू - हे जे लिहीले आहे त्याचे अक्षर आत्ताच्या फॉन्ट मधे नीट लिहिता येत नाही व लिहायलाही वेळ लागतो.
पुढील काही वर्षात जास्तीत जास्त लिखाण संगणकावर होईल त्यासाठी मराठीला तयार करायला हवं.

काय करता येईल?

संगणकासाठी एक नवी बाराखडी तयार करावी लागेल. त्यास सध्या आपण शुद्ध्लेखन २.० म्हणूयात.

कशी असावी शुद्ध्लेखन २.० ची बाराखडी?

लेखनविषय: दुवे:

Comments

टंकावली

चला सगळे टंकावली तयार करण्याच्या मागे लागा.
प्रकाश घाटपांडे

सध्याची चांगली वाटते.

'गमभन' द्वारे वर मराठी लिहिणे सोपे वाटते. पूर्वी आम्ही 'गोदरेजच्या' मशिनवर शिकलेली सर्व टंकणे विसरुन गेलो. आता गमभनची सवय झाली आहे आणि हीच उत्तम आहे असे वाटते.

अवांतर : उपक्रमच्या मालकासाठी : वाचलेले सर्वच प्रतिसाद पुन्हा नवे प्रतिसाद म्हणून दिसत आहेत. काही तरी तांत्रिक गडबड दिसत आहे. जरा लक्ष द्या राव !

-दिलीप बिरुटे

संगणकावर टंकणे

ज्याला संगणकावर मराठी टंकावे लागते त्याला इंग्रजीही. अधिक भाषा येत असतील तर त्याही टंकाव्या लागतात. त्यामुळे सर्वांना सामाईक असा कळफलक असणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी सध्याचा क्वेर्टी कळफलक पुरेसा आहे. 'लिहिता'नतली हस्व लि टंकताना जर अजिबात मेहनत पडत नाही, तर मग पहिली वेलांटी मुद्दाम दुसरी का लिहायची, कारण समजले नाही. ड्र्यू हा ड्‍र्यू असाही टंकता येईल. आपल्या फ़ॉन्ट्समध्ये पाऊण य साठी स्वतंत्र कळ असेल तर ड्यू तल्या ड ला खालच्या बाजूला र जोडता येतो. तसा मी अन्यत्र टंकून पाहिला, पण तो इथे चिकटवता आला नाही. --वाचक्‍नवी

शुद्ध्लेखन ?

शुद्धलेखन असे टंकता येत असताना मुद्दाम 'शुद्ध्लेखन' असे अशुद्ध लेखन करण्याचे कारण?-- शुद्‌धलेखन आणि शुद्धलेखन या दोन लिखाणांचे उच्चार भिन्न आहेत.पहिल्या शब्दाचा उच्चार शुद्‌- धलेखन असा चुकीचा होतो.वाचक्‍नवी

शुद्ध्लेखन २.० : काही कल्पना

आम्हीही याच मताचे आहोत.
१)उ,ऊ,....इ,ई....श.ष,...ण,न....पैकी कुणालाही एकालाच संगणकासाठी एक नवी बाराखडी तयार करताना स्थान द्यावे.
२)वेलांट्या बदलल्या की शब्दांचे अर्थ बदलतात .
३)ण,न बदलले की शब्दांचे अर्थ बदलतात .ह्या प्रचलित समजांना थारा नसावा.
४)कमीत कमी मुळाक्षरे बाराखडीत अस्तील याची काळजी घ्यावी.

उलटी गंगा

१)उ,ऊ,....इ,ई....श.ष,...ण,न....पैकी कुणालाही एकालाच संगणकासाठी एक नवी बाराखडी तयार करताना स्थान द्यावे.

जेव्हा माणसाच्या नरड्यातून वर दिलेल्या दोनापैकी एकच उच्चार बाहेर पडण्याची काही व्यवस्था होईल तेव्हा या सूचनेचा जरूर विचार व्हावा. जरूर पडल्यास सर्व मराठी लोकांच्या स्वरयंत्रांच्या शस्त्रक्रिया कराव्यात.

२)वेलांट्या बदलल्या की शब्दांचे अर्थ बदलतात .३)ण,न बदलले की शब्दांचे अर्थ बदलतात .ह्या प्रचलित समजांना थारा नसावा.

हे समज की वस्तुस्थिती? म्हणजे न-ण कडे काना की काणा(?) डोळा करायचा. सकल चे शकल, सकृत्‌ चे शकृत‌ आणि स्वजन चे श्वजन. पीसचे पिस, पिनचे पीन आणि दिनचे दीन. दोन्ही शब्दांचे अर्थ एकच करायचे? पण कोणता अर्थ ठेवायचा? हे कोण ठरवणार?

४)कमीत कमी मुळाक्षरे बाराखडीत अस्तील याची काळजी घ्यावी.

आम्हांला लहानपणी वाटले होते की संगणक आला की मानवाला अशक्य अशा गोष्टी तो करून दाखवील. आता संगणकाला साधे मराठी टंकलेखन जमत नाहीसे दिसते आहे. तमिऴमध्ये ख, ग, घ, छ, ज, झ, ठ, ड, ढ, थ, द, ध,फ, ब, भ, श, ष, स, ह, क्ष नाहीत. त्यामुळे तमिऴ किती सोपी झाली आहे. मराठी माणसांना शिकायला अगदी सोप्पी. जरूर शिकावी आणि अक्षरे कमी केल्याने कायकाय फायदा होतो ते आम्हांला समजवावे. (इतके असून तमिऴला इ-ई, उ-ऊ, ऎ-ए, ऒ-ओ, न-ऩ, र-ऱ, ळ-ऴ, ङ् -ञ यांतले एकएक अक्षर गाळता आले नाही ! आपण सुचवायला हवे.)
अवांतर:- मलयाळम्‌ने लिपी सुधारणेचा प्रयत्‍न करून पाहिला. परिणाम असा की, आता तरुण पिढीला जुनी मलयाळम्‌‍ येत नाही की नवी! मराठी मुलां-तरुणांना हा धोका नाही. त्यांना मुळी मराठी येतच माही. त्यामुळे खुशाल लिपीची तोडमोड करावी. इतके असून संस्कृतमध्ये नसलेला पण मराठीत असलेला दीर्घ ॡकार मलयाळम्‌मध्ये अजूनही आहे. आहे की नाही वेडेपणा?--वाचक्‍नवी

प्रेरणा

कमीत कमी मुळाक्षरे बाराखडीत अस्तील याची काळजी घ्यावी.

मूळाक्षरे कमी करण्याच्या हेतूने प्रेरीत होऊन आम्ही हे वाक्य लिहीले आहे.
म अ आ मा अ कु म्ह कु ठा प आ म्ह वा बु.
टंकताना पूर्ण वाक्य टंकण्यापेक्षा फारच सोपे गेले. ही सोपी पद्धत सुचवल्याबद्दल अनेक आभार.

असे करताना शुद्द्लेखनालाही फाट्यावर मारले तर सांकेतिक लिपी तयार होते.
म्हण्जे बह् कि मी ह्य्स्न्फ

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

चिनी लिपी

चिनी लिपीत ४०००० मुळाक्षरे आहेत. त्यातली दहा टक्के जरी संगणकावर टंकता येत असतील तर त्यांची संख्या ४००० होते. मराठीला बावन मुळाक्षरांसाठी वेगळे शुद्धलेखन लागावे? हिंदीत, कानडीत, तेलुगूत मराठीपेक्षा जास्त अक्षरे आहेत. त्यांना असले पळपुटे मार्ग शोधावेसे वाटत नाहीत. कारण एकच! मराठी लोकांना मराठी येत नाही, आणि म्हणून ती आवडत नाही. म्हणून तिची मोडतोड करायला त्यांचाच पुढाकार असतो. उर्दूत ५ ज, ३ स २ त २ ग २ ह, २ ड २ फ-ख आहेत. त्यांना लिपीतली मुळाक्षरे कमी करावीसे वाटत नाही, कारण उर्दू भाषकांचे त्यांच्या लिपीवर प्रेम असते. लिपीद्वारे भाषेची संस्कृती जपली जाते हे त्यांना माहीत आहे.--वाचक्‍नवी

प्रकाटाआ

चु च्या जा प ने प्रकाटाआ

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

 
^ वर