मराठी शुद्धलेखनावर उपाय

१) कोणतीही भाषा ही बोलल्याप्रमाणे शंभर टक्के शुद्ध लिहीता येवु शकत नाही. हे भाषाशास्र मान्य करीत असतानाही शुद्धलेखनाचा आग्रह का धरला जातो?
२) बोलल्याप्रमाणे लिहीता येणे म्हणजेच शुद्धलेखन असेल तर,नेमक्या कुणाच्या बोलल्याप्रमाणे कुणाला लिहीता येणे अपेक्शित् आहे ?
३)पुण्यात (शहरात)बोलल्याप्रमाणे खेड्या-पाड्यात लिहायचे?
४)खेड्या-पाड्यात बोलल्याप्रमाणे पुण्यात(शहरात) लिहायचे?
५) शुद्धलेखन करीत असताना इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण...ही चारच मुळाक्शरे अडचण ठरत नाहीत काय?
६)हे जर खरे असेल तर इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण...ह्या मुळाक्शरांच्या जोड्यांचीच गरज काय?
७)केवळ इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण...ह्या मुळाक्शरांच्या जोड्यांमुळेच शुद्धलेखन करत असताना गोंधळ उडत असेल तर इ,उ,श,न
किंवा ई,ऊ,ण,ष ,यांपैकी कोणतीही एक जोडी वापरुन शुद्धलेखनाची पारंपारिक समस्या कायमची मिटवता येणार नाही काय?
८)इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण... यांच्याच दोन-दोन जोड्या कशासाठी?मग बाकीच्या मुळाक्शरांच्या दोन-दोन जोड्या का नाहीत?
९)ञ्,ड्,सारखी निरर्थक मुळाक्शरे(?) मुळाक्शरांच्या यादीत कशासाठी?
१०)प्रमाण भाषेचा आग्रह धरणे म्हणजे लोकांना बोलल्याप्रमाणे लिहु न देणे नाही काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

स्वागत

चर्चाप्रस्तावकाराचे लोकमित्र समुदायात स्वागत आहे.

हा समुदाय लोकशिक्षणात्मक लेखकांसाठी आहे. त्यांना विनानफा तत्त्वावर नियतकालिकांत आपले लेख छापून यावे असे वाटावे. सदस्यांनी असे लेख लिहावे. (सध्या मंडळ लेख जमा करत आहे. पुरेसे लेख जमले की पुढे कार्य करेल.)

* आपले काही लेख उपक्रमावर (किंवा आम्हाला बघता येतील अशा दुसर्‍या संकेतस्थळावर) प्रसिद्ध करावेत : मर्यादा (आदमासे) ५०० शब्द जास्तीत जास्त एक कृष्णधवल चित्र. (चित्राचा प्रत अधिकार लेखकाकडे असावा, किंवा मुक्त असावा.)
* विषय शिक्षणात्मक/माहितीपर असावा. शैली ललित असली तरी चालेल. पण मूळ आणि स्पष्ट उद्देश शिक्षणात्मक असावा.

समुदायाच्या सदस्याकडून लोकशिक्षणात्मक लेख येतील म्हणून शुभेच्छा.

आपला

आपुला परतिसाद् आव्डला. हितुन् फुडे आमच्या स्र्व परतिसादामधे सुद्दलेखणाचि भिनगड्च् मिट्लि म्हना किइ. कसाळा हिवे सुद्देलखण? जेला जशे हिवे तशे तिणे लिहावे अन वाचावे. ण रहेगा भाश, न बझेघि भाशुरी.
आजुण् येक् गम्मत. अशेच् विंग्रजि ल्हिले तर फार्र फार्र मज्जा यिते : फ्वार् हिंग्जांपळ् व्हाट् यायामशेयिंग इज्ज् व्हाट् युआर्र् रिडिंघ बट् व्हाटाय्याम रिडिंघ इज नाटाव्हाट युआर्र सेयिंघ.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

लेबरी

लेबारेलिलयस्रेददलोकौगचसारखशुधलेक्खनच्घ्यानावनाकाबोंबलततकलनन्हायनियमनकोभावनामहत्वहाचेनाहेकाप्न्लोकौगाचकाहेतरेविशयकाधताताअनिबिमबाअरतातउद्योगनाहेल्काच्यामनाअंगातदमसेलतरनसत्यास्म्केत्स्थलवर्जाउन





गुरू

गुरूमाणलेतुम्हालापरतिसादवाचल्यानंतरपाच्नमिणिटेफक्तहसतहोतो. :)

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

क्र्नार्काय?

च्र्चेचेविश्यचसेआल्यावर्कोण्कायक्र्नार्उगाचवेद्यसराखेप्र्तिसाद्कायशुध्लिहय्चे?

मरा ठीसे आम चीमा यबो ली. तुम् चीमा यबोल् ईको नते?





टवाळा आवडे विनोद....

समर्थांनी ......टवाळा आवडे विनोद....असे का लिहीले ते आत्ता कळाले.....विषयाचे प्रयोजन चर्चा आहे याचे भान का हरपले ?चर्चाकाराचे मुद्दे लक्शात न घेता अशी गम्मत शोभत नाही....उपक्रमच्या उपक्रमाला गालबोट लावण्यात अर्थ नाही...

विनोद कुठे?

आपला प्रतिसाद माझ्या प्रतिसादाला असेल तर माझा प्रतिसाद अजिबात विनोदी नव्हता. (यावर हसू आले असेल तर जबाबदारी आमची नाही.) शुद्धलेखन पाळले नाही तर काय होते याचे ते एक उदाहरण आहे. नंतरचे प्रतिसादही तसेच आहेत.

ताक. आपण नवीन सभासद दिसता. उपक्रमावर स्वागत. नवीन नसलात तरी स्वागत. :-)
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

बोबडी वळली.

वा. तुमच्या समर्पक प्रतिसादाने शुद्धलेखन हवे कशाला म्हणणा-या महाशयांची चांगलीच बोबडी वळली आहे. असो. शुद्धलेखनाचा अतिरेकी आग्रह जरी टाळला तरी अर्थाचा अनर्थ करणारे लेखन मान्य करता येणार नाहीच.

बओब्डी

हास्व्यीच्भागाअहेत्य्यत्तवघड्काहिनाहिएक्दसवय्झलिकिरंप्त्वच्तायेत्कनहिबघेअ. :)

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

माझ्यापरीने उत्तरे

मी शक्यतो, बोलतो ते नीट साठवता यावे म्हणून जसे बोलतो तसे लिहावे या मताचा आहे. जर आपण प्रमाण भाषा बोलत नसु तर प्रमाणभाषेचे नियम पाळायची गरज नाहि. मात्र त्या लिपीचे नियम पाळावे लागतील. आणि प्रमाणभाषेत लिहिताना भाषेचे + लिपीचे नियम पाळावे असे वाटते.

याचबरोबर शुद्धलेखनाचा बाऊ करू नये अथवा शुद्धलेखनावरून लेखनाची आणि/किंवा व्यक्तीची किंमत करू नये असे वाटते.
शुद्धलेखनाबरोबर चिकटलेला - दाखवला जाणारा "उच्च"तेचा माज डोक्यात जातो मात्र व्यावहारीक जगात विचार पोहोचवण्यासाठी शुद्धलेखन आवश्यक आहे हे पटते.

असो आता या चर्चाप्रस्तावाबद्दल

१) कोणतीही भाषा ही बोलल्याप्रमाणे शंभर टक्के शुद्ध लिहीता येवु शकत नाही. हे भाषाशास्र मान्य करीत असतानाही शुद्धलेखनाचा आग्रह का धरला जातो?

भाषा आणि लिपी यांचा संबंध एका मर्यादेपर्यंतच आहे. शुद्धलेखन हे (बहुतकरून) लिपीसाठी असते भाषेसाठी नाहि. तेव्हा प्रश्न गैरलागु

२) बोलल्याप्रमाणे लिहीता येणे म्हणजेच शुद्धलेखन असेल तर,नेमक्या कुणाच्या बोलल्याप्रमाणे कुणाला लिहीता येणे अपेक्शित् आहे ?

नाहि शुद्धलेखन म्हणजे एखादा उच्चार लिखित रुपात दाखवण्यासाठी निर्माणकेलेल्या खुणा योग्य प्रकारे वापरणे. (बाळबोध पद्धतीत सांङायचं तर जर एखाद्या शब्दात एकार असेल तर मात्रा देणे इकार असेल तर वेलांटी देणे. )

३)पुण्यात (शहरात)बोलल्याप्रमाणे खेड्या-पाड्यात लिहायचे?

प्रश्न चुकीचा वाटला / मला कळला नाहि

४)खेड्या-पाड्यात बोलल्याप्रमाणे पुण्यात(शहरात) लिहायचे?

म्हणजे? हे ही कळले नाहि

५) शुद्धलेखन करीत असताना इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण...ही चारच मुळाक्शरे अडचण ठरत नाहीत काय?

नाहि.

६)हे जर खरे असेल तर इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण...ह्या मुळाक्शरांच्या जोड्यांचीच गरज काय?

प्रश्न ५ चे उत्तर "नाहि" दिल्याने हा प्रश्न गैरलागू

७)केवळ इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण...ह्या मुळाक्शरांच्या जोड्यांमुळेच शुद्धलेखन करत असताना गोंधळ उडत असेल तर इ,उ,श,न
किंवा ई,ऊ,ण,ष ,यांपैकी कोणतीही एक जोडी वापरुन शुद्धलेखनाची पारंपारिक समस्या कायमची मिटवता येणार नाही काय?

उत्तर ६ प्रमाणेच

८)इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण... यांच्याच दोन-दोन जोड्या कशासाठी?मग बाकीच्या मुळाक्शरांच्या दोन-दोन जोड्या का नाहीत?

बर्‍याचशा मुळाक्षराच्या दोन जोड्या करता येतील. च छ ज झ फ वगैरेचे दोन वेगळे उच्चार आणि लेखनखुणा प्रसिद्ध आहेतच

९)ञ्,ड्,सारखी निरर्थक मुळाक्शरे(?) मुळाक्शरांच्या यादीत कशासाठी?

मला "स""र""य""क""त" हि सारी अक्षरे-मुळाक्षरे एकटी असताना निरर्थक वाटतात जेव्हा त्यातून "सूर्यकांत" तयार होते तेव्हा त्याला अर्थ येतो.. काय?

१०)प्रमाण भाषेचा आग्रह धरणे म्हणजे लोकांना बोलल्याप्रमाणे लिहु न देणे नाही काय?

नाहि

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

सहमत

१००% सहमत
खास करुन..

मते काहीही असोत, ती मांडताना शब्द जपून वापरावेत हे सुचवावेसे वाटते.

या वाक्या करिता...





प्रतिशब्द

>>'डीसेन्सी ऑफ डिबेट'साठी मराठी प्रतिशब्द काय?
'विवादशुचिता' कसा वाटतो?

"भांडसफाई"

कसा वाट्टो ?
ह.घ्या !

वादविनय

हा अनुप्रासयुक्त शब्द न-भांडलेल्या वादातही सौजन्य दाखवण्यासाठी कसा वाटतो?

"वादात सभ्यपणा" असे म्हटल्यास पूर्णपणे मराठी वाटावा ("वादविनय" सामासिक शब्द म्हणून जरा संस्कृताळलेला वाटतो.)

वादविनय

वादविनय हा शब्द उचित वाटतो. [आता इथे मला योग्य वाटतो असं म्हणता आलं असतं. पण टंकुन गेलो] शुचिता शब्द मला उगीचच चावट वाटतो.
प्रकाश घाटपांडे

भांडकुदळ

आपल्याला त ब्वॉ भांडकुदळ वाटतो. म्हंजी अस पघा कि अदुगर भाण्ण् लाउन द्यायची आन नंतर मंग साळसूदपणे निरवानिरव करायची.
प्रकाश घाटपांडे

माजच

१. येथे "उच्च" म्हणजे नेमके कोण अभिप्रेत आहे?

येथे कोणी एक व्यक्ती अपेक्षित नसून एक प्रवृत्ती आहे. मी शुद्ध लिहितो म्हणजे मी तसे न लिहु शकणार्‍यांपेक्षा "उच्च" आहे असे समजणारी ती प्रवृत्ती

२. नेमका कोणाच्या डोक्यात "उच्चतेचा माज" गेला आहे असे म्हणणे आहे?

अश्या प्रवृत्ती ज्यांचा इतर कोणत्याहि व्यक्तीकडे पाहण्याचा दॄष्टीकोन त्याच्या व्याकरण/शुद्धलेखनावरून ठरते त्याच्या डोक्यात आपल्या शुद्धलेखनासकट प्रमाणभाषा वापरण्याच्या तथाकथित उच्चतेचा माज गेला आहे. आणि असे मला अजूनहि वाटते आणि तसे लिहिण्यात मी कोणतीहि शुचिता अव्हेरतो आहे असे वाटत नाहि. कारण "माज"हा शब्द इथे असलेल्या कोणाहि व्यक्तीस उद्देशुन नसून एका प्रवृत्तीस आहे.

३. "उच्चतेचा माज" हे केवळ गृहीतक असून त्या गृहीतकाचे भांडवल करून केवळ आपल्याला जमत नाही म्हणून / अनास्था आहे म्हणून / विरोधासाठी विरोध म्हणून / एखाद्या गटाला "उच्च" ठरवून टार्गेट करणे सोपे आहे म्हणून (ऐकून घेतले जाते म्हणून) "शुद्धलेखन धुडकावण्याचा (तुमच्याच शब्दांत) माज" होत असण्याची, डोक्यात जात असण्याची शक्यता काय?

शक्यता १००% आहे. अशीहि मंडळी आहेतच जी वरील कारणांने उगाच विरोधासाठी विरोध करतात.

मते काहीही असोत, ती मांडताना शब्द जपून वापरावेत हे सुचवावेसे वाटते.

संपूर्ण सहमत..
मात्र एखाद्या व्यक्तीच्या ("क्ष" व्यक्ती) शुद्धलेखनाच्या वाजवीपेक्षा अधिक (इथे वाजवी हे प्रमाण बर्‍यापकी सापेक्ष आहे) अहंगंडाला "अहंगंड" न म्हणता "माज"च म्हणायचे असेल तर वाद घालताना कोणता शब्द वापरावा?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

एक प्रयत्न...

मनोगताचा आस्वाद विवाद संवाद कसा वाटतो? :-)

-सौरभ.
==================

स्त्रीबद्दल आपल्याला धास्ती वाटते. कारण एकतर कोणत्याही स्त्रीला पुरुषाकडे खाऊ की गिळू असं रोखू़न पाहता येतं.

'न्यूनगंड आहे म्हणून' राहिलेच

"उच्चतेचा माज" हे केवळ गृहीतक असून त्या गृहीतकाचे भांडवल करून केवळ आपल्याला जमत नाही म्हणून / अनास्था आहे म्हणून / विरोधासाठी विरोध म्हणून / एखाद्या गटाला "उच्च" ठरवून टार्गेट करणे सोपे आहे म्हणून (ऐकून घेतले जाते म्हणून),
शुद्धलेखनाच्याबाबतीत (एकंदरीत नाही हं) न्यूनगंड आहे म्हणून "शुद्धलेखन धुडकावण्याचा (तुमच्याच शब्दांत) माज" होत असण्याची, डोक्यात जात असण्याची शक्यता काय?

ऋषिकेश म्हणजे काय नक्की ? ऋषीचा केश काय?

() धम्मकलाडू
आयुष्य काही हृषिकेश मुखर्जीचा चित्रपट नाही...

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

डीसेन्सी ऑफ डिबेट

वाद शालीनता

शुद्धलेखन

१) कोणतीही भाषा ही बोलल्याप्रमाणे शंभर टक्के शुद्ध लिहीता येवु शकत नाही. हे भाषाशास्र मान्य करीत असतानाही शुद्धलेखनाचा आग्रह का धरला जातो?

मला वाटते, वरील प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत.

२) बोलल्याप्रमाणे लिहीता येणे म्हणजेच शुद्धलेखन असेल तर,नेमक्या कुणाच्या बोलल्याप्रमाणे कुणाला लिहीता येणे अपेक्शित् आहे ?

जे बोलणे सर्वांना कळेल, त्याचा अपेक्षित अर्थ सर्वांपर्यंत पोहचेल, अशी भाषा बोलल्याप्रमाणे लिहीणे म्हणजे शुद्धलेखन.

३)पुण्यात (शहरात)बोलल्याप्रमाणे खेड्या-पाड्यात लिहायचे?

जर ते सर्वांना कळत असेल तर काय हरकत आहे?

४)खेड्या-पाड्यात बोलल्याप्रमाणे पुण्यात(शहरात) लिहायचे?

पुण्याच्या खेड्यातील बोलणे जळगावच्या खेड्यात कोणाला कळणार आहे का? की रत्नागिरीच्या खेड्यातले बोलणे चन्द्रपुरात कळणार आहे?

५) शुद्धलेखन करीत असताना इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण...ही चारच मुळाक्शरे अडचण ठरत नाहीत काय?

नाही. उलट त्यामूळे अर्थ अधिक स्पष्ट होतो.(पाणि/पाणी यात काहीच फरक नाही क?)

६)हे जर खरे असेल तर इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण...ह्या मुळाक्शरांच्या जोड्यांचीच गरज काय?

वरीलप्रमाणे

७)केवळ इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण...ह्या मुळाक्शरांच्या जोड्यांमुळेच शुद्धलेखन करत असताना गोंधळ उडत असेल तर इ,उ,श,न
किंवा ई,ऊ,ण,ष ,यांपैकी कोणतीही एक जोडी वापरुन शुद्धलेखनाची पारंपारिक समस्या कायमची मिटवता येणार नाही काय?

वरीलप्रमाणे

८)इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण... यांच्याच दोन-दोन जोड्या कशासाठी?मग बाकीच्या मुळाक्शरांच्या दोन-दोन जोड्या का नाहीत?

सहाजिकच त्यांची आवश्यकता नव्हती. विनाकारण वर्णाक्षरे कशाला वाढवायची?

९)ञ्,ड्,सारखी निरर्थक मुळाक्शरे(?) मुळाक्शरांच्या यादीत कशासाठी?

कोण म्हणते ही निरक्षर मूळाक्षरे आहेत? 'चंचूपात्र'मधील अनुस्वार काय आहे? 'अंग'मधील अनुस्वार काय आहे?

१०)प्रमाण भाषेचा आग्रह धरणे म्हणजे लोकांना बोलल्याप्रमाणे लिहु न देणे नाही काय?

प्रत्येकजण आपण बोलू तसे लिहायला लागला तर माझे बोलणे परभणीच्या वाचकांना १००% नाही कळणार. मग माझे बोलणे माझ्यापर्यंत ठेवल्यासारखेच नाही का होणार?
(त्याशिवाय, लेखकाने स्वतः ज्या (प्रमाण)भाषेत लेख लिहीला आहे, लेखक घरात तशा भाषेत बोलतात का?)

विश्लेषक विचारसरणी

चर्चाप्रस्तावकाराची विश्लेषक विचारसरणी मला आवडली. सर्व मुद्दे पटले नसले, तरी हे रोखठोक कुतूहल आवडले.

१) कोणतीही भाषा ही बोलल्याप्रमाणे शंभर टक्के शुद्ध लिहीता येवु शकत नाही.
हे भाषाशास्र मान्य करीत असतानाही शुद्धलेखनाचा आग्रह का धरला जातो?

हा वाद योग्य दिशेने जातो पण परिपूर्ण नाही. जर भाषा उच्चारानुसारी लिहिणे हे शुद्धलेखनाचे ध्येय असते, तर वरील वाद सिद्ध करतो की ते ध्येय साध्य नाही. शुद्धलेखनाचे ध्येय "प्रमाणीकरण" आहे, असे मला वाटते - अनेक लोकांच्या बोलण्यात उच्चाराचा थोडाथोडा फरक असला, पण संदेश तोच असला, तर थोडाथोडा फरक असलेल्या चिह्नांचा बुजबुजाट न व्हावा. उलट शाळेत काही थोडीच चिह्ने शिकून अनेक लेखकांचे लेखन वापरण्यात शैक्षणिक सोय आहे. पण भाषासमाजाला अशी सोय होण्यासाठी, लेखकांनी स्वतःवर हे बंधन घातलेले बरे असते - एखाद्या शब्दासाठी आपला उच्चार थोडा वेगळा का असेना, महाराष्ट्रभर लाखो विद्यार्थ्यांनी जे चिह्न त्या शब्दासाठी शिकले आहे, ते वापरावे. यात वाचकांची जशी सोय आहे, तशी लेखकाचीही सोय आहे. लेखकाला आपले विचार खूप वाचकांपुढे पोचवता येतात. (जर लेखकाला विचार खूप लोकांपर्यंत पोचवायचे नसतील... - मला फक्त माझ्या आईसाठीच पत्र लिहायचे असेल - तर शुद्धलेखनाचे संकेत फक्त मी व आईने ठरवलेले पुरे असतात.)

२) बोलल्याप्रमाणे लिहीता येणे म्हणजेच शुद्धलेखन असेल तर,नेमक्या कुणाच्या बोलल्याप्रमाणे कुणाला लिहीता येणे अपेक्शित् आहे ?

ही व्याख्या मला पटत नाही. उच्चारानुसारी लेखन हे शुद्धलेखनाचे ध्येय नसावे, हे तुम्ही मुद्दा १ मध्ये सिद्ध केलेले आहे. पण तुमचा प्रश्न बदलून विचारण्यासारखा आहे - "अनेक उच्चारांपैकी कुठलाच उच्चार पूर्णपणे लिहिता येत नाही. पण सोयीसाठी शाळेत जे एक चिह्न शिकवले जाईल, ते कोण्या एकाच्या उच्चाराला सर्वात जवळचे असेल. तो 'कोणा एक' नेमका कोण आहे?" हा प्रश्न मला योग्य वाटतो. बहुधा 'नेमका कोण' हा ऐतिहासिक अपघात असतो. जर इतिहासात काही थोडे लोकच एकमेकांना लिहून-वाचून संदेशन करत होते, तर त्या लोकांचे उच्चार (म्हणजे त्यांच्यापैकी कोण्या एकाचे उच्चार) निकटतम चिह्नामधून मुलांना शिकवले जात असतील.

३)पुण्यात (शहरात)बोलल्याप्रमाणे खेड्या-पाड्यात लिहायचे?

खेड्या-पाड्यात लिहिलेल्याचे लेखन जर महाराष्ट्रभर कुठेही वाचण्यासाठी लिहिले गेले असेल, तर महाराष्ट्रभरातल्या शाळांमध्ये जे काय शिकवले जाते, त्याचा संदर्भ घ्यावा. वाचकांच्या सोयीने लिहावे. (मी आईला पत्र लिहीत असेल तर आईच्या सोयीने लिहावे. पुण्याच्या उच्चारांचा संबंध लागत नाही.)

५) शुद्धलेखन करीत असताना इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण...ही चारच मुळाक्शरे अडचण ठरत नाहीत काय?

हा प्रश्न आकडे शास्त्राचा आहे. म्हणजे १-२-४-८-१६-३२% (असा कुठला आकडा) अडचणीचे शब्द इ-ई/उ-ऊ/श-ष/न-ण पैकी असू शकतील. तो प्रश्न "होय-की-नाही" स्वरूपात विचारल्यामुळे तुमच्या विचारप्रवाहाला आडथळा येतो, असे मला वाटते. पण तुमची चर्चा पुढे नेण्यासाठी मान्य करू - या जोड्यांमुळे जी अडचण लोकांना वाटते, ती कितीका टक्के शब्दांच्या बाबत असो, कितीका टक्के लोकांना असो, ते त्रासदायक आहे...

७)केवळ इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण...ह्या मुळाक्शरांच्या जोड्यांमुळेच शुद्धलेखन करत असताना गोंधळ उडत असेल तर इ,उ,श,न
किंवा ई,ऊ,ण,ष ,यांपैकी कोणतीही एक जोडी वापरुन शुद्धलेखनाची पारंपारिक समस्या कायमची मिटवता येणार नाही काय?

असे थेट म्हणता येत नाही. फायदा-तोट्याचा विचार करावा लागेल. याचे अतिरेकी उदाहरण असे - "औषधाची छोटी गोळी [ऍस्पिरिन-८१] घ्यायची की मोठी गोळी [ऍस्पिरिन-३२५] घ्यायची याबाबत रुग्णांचा कधीकधी घोटाळा होतो, तो त्रासदायक आहे. मग छोटी किंवा मोठी एकच कुठलीतरी गोळी औषधालयात उपलब्ध करून समस्या कायमची मिटवता येणार नाही का?" जर वेगवेगळ्या लहान-मोठ्या गोळ्या असल्याचा काही सदुपयोगही असेल तर फायदा/तोटा कुठले पारडे जड? असा विचार करावा. त्याच प्रकारे इ-ई बद्दल. (माझे वैयक्तिक मत : ह्रस्व-दीर्घ जोडीपैकी एक निवडली तरी चालेल. काही थोडा तोटा होईल, पण फार नाही.)

८)इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण... यांच्याच दोन-दोन जोड्या कशासाठी?मग बाकीच्या मुळाक्शरांच्या दोन-दोन जोड्या का नाहीत?

प्रश्न समजला नाही. ए-ऐ ही जोडी आहे का? का नाही? "ओंगळ/वंगाळ" हे एका शब्दाचे दोन उच्चार आहेत - ओ/व ही जोडी आहे का? का नाही?
तुमचा हा प्रश्न वेगळ्या तर्‍हेने मी समजून घेतो - दोन जवळजवळच्या उच्चारांसाठी दोन वेगवेगळी चिह्ने असावीत का? ती शाळेत मुलांना शिकवून काय फायदा होतो? फायदा-तोटा पारड्यात अधिक भारी कुठले? उदाहरणार्थ कोकणी-देवनागरी लेखनपद्धतीत केवळ एक "श" तेवढाच आहे, "ष" नाहीच. तमिळ मध्ये क-ग-ह सर्वांच्या साठी एकच க चिह्न वापरले जाते. संदर्भाने उच्चार स्पष्ट असतो. असो फायदा-तोटा तुलना करताना तुम्हाला अपेक्षित "हो"/"नाही" अशी उत्तरे देता येत नाही. कोकणीत लेखकांनी श/ष पैकी एकच चिह्न निवडले तरी इ-ई दोन्ही चिह्ने निवडलीत. मराठीत ज-ज़ पैकी एक ज तेवढेच निवडले. प्रत्येक भाषेत प्रत्येक जोडीबद्दल वेगवेगळे फायदा/तोटा गुणोत्तर येणार. अर्थात प्रश्न विचारण्यासारखा आहे.

९)ञ्,ङ्,सारखी निरर्थक मुळाक्शरे(?) मुळाक्शरांच्या यादीत कशासाठी?

चांगला प्रश्न आहे. "निरर्थक"चा अर्थ "ङ-ङा-ङि बाराखडीतली चिह्ने मराठीत कधी वापरात दिसत नाहीत" असा घेतला आहे. ऋषिकेश उदाहरण देतात, की परसवर्णांमध्ये हे ध्वनी येतात. गंगा = गङ्गा. पण ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर नव्हे. कारण संयम = सय्ंयम असा परसवर्ण उच्चार आहे, पण आनुनासिक "य्ं" साठी मराठीत कुठले वेगळे चिह्न नाही. एके ठिकाणी जी सोय (आनुनासिक य्ं वाचक खास चिह्नाशिवाय समजून घेईल) ती दुसर्‍या ठिकाणी सोय का नाही (आनुनासिक ङ् सुद्धा वाचक खास चिह्नाशिवाय समजून घेईलच की...)
मला वाटते ऐतिहासिक कारणासाठी या ध्वनींची चिह्ने अजून हयात असावीत. माझ्या कल्पनाविलासात तालबद्ध मुळाक्षर शिक्षणाच्या सोयीमुळे ही चिह्ने शिकवत असावेत!
१ - । २ - । + - ॥
कख । गघ । ङऽ ॥
चछ । जझ । ञऽ॥
टठ । डढ । णऽ ॥
तथ । दध । नऽ ॥
पफ । बभ । मऽ ॥
र (।)लव । (०)शष(॥)
सह । क्ष । (+)ज्ञऽ!
(एक बाळबोध तिहाई!)

पहिल्या ५ ओळींमध्ये प्रत्येक आवर्तनात आनुनासिकावरती तालाची सम येते, आणि मस्त ठेका धरता येतो. लहान मुलांना ठेकेबद्ध घोकंपट्टी अधिक सोपी जात असावी, म्हणून ञ्, ङ्, वगैरे शिक्षणात इतक्या चिवटपणे शिल्लक असावेत. किमानपक्षी मला तरी वैयक्तिक मताने, हे ठेकेबद्ध मुळाक्षर-गीत आवडते.

१०)प्रमाण भाषेचा आग्रह धरणे म्हणजे लोकांना बोलल्याप्रमाणे लिहु न देणे नाही काय?

मला वाटते स्वतंत्र मनुष्याला कोणीही अशा प्रकारची बळजबरी करू शकत नाही. शिक्षकाने धोरण म्हणून प्रत्येक शब्दासाठी कुठलेतरी एकच शब्दचिह्न शिकवावे. यामुळे विद्यार्थाला महाराष्ट्रभर पत्रव्यवहार, लेखनव्यवहार करता येईल. महाराष्ट्रभरातील सर्व शिक्षकांनी ठरावीक चिह्ने निवडावीत, मगच हा फायदा मिळू शकेल. सर्व शिक्षकांनी काय चिह्ने निवडावीत, याबद्दल विचारविनिमय करण्यास राज्य सरकारने काही सोय करावी - आणि महाराष्ट्र राज्य सरकार तशी चर्चासमिती नेमून सोय करते, हे चांगले करते.

चूक झाली असावी

मराठी शुद्धलेखनावर उपाय असा लेख लिहिण्यात लेखकाची बहुधा चूक झाली असावी. अहो पण म्हणून त्याला इतकी मोठी शिक्षा? वाचता वाचता दमून गेलो, डोक्याचा भुगा झाला. - हलकेच घ्या हं धनंजयकाका.

कसली चूक?

सूर्यकान्त डोळसे......मराठी शुद्धलेखनावर उपाय असा लेख लिहिण्यात लेखकाची बहुधा चूक झाली असावी हा आपला अंदाज चूकीचा आहे.डोक्याचा भुगा झाला?.....शुद्धलेखनाच्या नसत्या बागुलबुवाने आत्तापर्यंत किती पिढ्या गर्भातच गाभडल्या गेल्या आहेत याचा हिशोब कुनी मांडला आहे काय?पानी .... पाणी अशा प्रकारच्या अनेक शब्दाच्या कल्पोकल्पित उत्पत्त्या मांडून शुद्धलेखनाच्या जाळ्यात अडकविलेले आहे ...हे मायाजाळ हटविण्याठी नव्या अंगाने चर्चा केली तर काय बिघडले?

वादविनय इ.

वर वादविनय आणि इतर शब्द पाहून एक शंका आली. नवीन शब्द तयार करताना त्यावरून अर्थाचा बोध व्हावा अशी काळजी घेतली जाते.
किंबहुना त्यासाठीच संस्कृतमधून शब्द घेतले जातात. पण प्रचलित असलेले सर्वच शब्द असे असतात का? उदा. दगड, वीट, आनंद,
दु:ख, भावना. चूभूद्याध्या. यांच्या व्युत्पत्तीमध्ये अर्थ असल्यास कल्पना नाही, पण यावरून मुद्दा स्पष्ट व्हावा. आणि जरी समजा व्युत्पत्तीमध्ये इतर भाषेत
त्या गोष्टीसाठी तसा शब्द वापरला असेल तर त्या भाषेत त्याची व्युत्पत्ती पहावी. असे करत गेल्यास कुठल्यातरी भाषेत तो शब्द रँडम रीतीने तयार झाला आहे
असे सापडण्यास हरकत नसावी.

बरेचसे शब्द असे असतात की सवयीने आपण त्यांचा संबंध त्या त्या गोष्टींशी लावतो. कारण भाषांची निर्मिती झाली तेव्हा प्रत्येक वस्तूसाठी शब्द शोधताना बरेचदा कोर्‍या पाटीवरून शब्द तयार करावे लागले असतील. अशा वेळी या वस्तूला मी दगड म्हणतो इतकेच कारण पुरेसे ठरावे. आणि नंतर सर्व लोक दगड म्हणायला लागल्यावर तो शब्द रूढ झाला असेल. कारण शेवटी शब्द म्हणजे पॉइंटर्स आहेत. (सी भाषा माहीत असणार्‍यांना यातील अर्थ अधिक स्पष्ट व्हावा.) अमुक शब्द म्हणजे अमुक गोष्ट/भावना/परिस्थिती इ.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

देश्य (किंवा अव्युत्पन्न) शब्द

असे असतात. खरेच आहे. "आई" शब्द आला असेल कन्नडमधून, पण त्याची अधिक अर्थपूर्ण साधित (फोड करून) व्युत्पत्ती सांगता येत नाही.

सर्वच धातू (म्हणजे एक- किंवा दोन-अक्षरी जोड्या) अ-साधित असतात (म्हणजे त्याचे अर्थपूर्ण अवयव नसतात). उदा : "म्हण" चे अर्थपूर्ण तुकडे करता येत नाहीत. (हा "अव्युत्पन्न" नाही, हे लक्षात असावे, संस्कृत धातू "भण्"शी याचा संबंध लागतो.) पण लपण्यासारखा "दड" मराठी धातू बहुधा मूळ मराठी आहे.

पण असे शब्द कसे रूढ करायचे, याबद्दल मात्र शास्त्र सांगता येत नाही.

आता "कीख", "लोठ" असे कित्येक ध्वनी नवे अर्थ भरण्यासाठी मला उपलब्ध आहेत, आणि हे उच्चार सहज "मराठी" मानले जाऊ शकतील. आणि आजकाल बहुतेक मराठी इंग्रजी शब्द जाणतात हे बाजूला सारले तर आनखीनच. (क्रमवार द्व्यक्षरी निवड-जोड [काँबिनेशन] करून ..."अक", "अख",..., लोब, लोय, लोर,... कितीतरी नवे ध्वनी अर्थ भरण्यासाठी रिकामे आहेत!)

पण या ध्वनीला लोकांनी माझा जोडलेला अर्थ का म्हणून मानावा, हा मोठा प्रश्नच आहे. इतका मूलभूत शब्द-अर्थ संबंध कोणी चर्चासमिती लादू शकेल असे वाटत नाही. कदाचित कट्टा-वजा एखादा छोटा गट स्वतःपुरते असे काही करू शकेल. पण अगदी संगणक "गीक" गटाने "फू" "फूबार" "?गीक?"... फारफारतर २०-३० अव्युत्पन्न मूळ शब्द निर्माण केले असतील. पण त्यापैकी रूढ किती होणार आहेत, त्याबद्दल शंका वाटते.

त्यामुळे असा कुठला शब्द तयार होण्यासाठी इतिहासाच्या अपघातांची वाट बघण्याशिवाय गत्यंतर नाही. (संगणक क्रांती हा भाषेच्या दृष्टीने "ऐतिहासिक अपघात"च मानावा.)

संस्कृतातील अनेक कृदंत-तद्धिते वापरलेली उदाहरणे मराठीत दिसतात. म्हणूनच तर "थैलर्य" म्हणायची स्फूर्ती काही जणांना होते. बहुसंख्य नव्या शब्दांची स्फूर्ती संस्कृतसदृश मराठीतून येईल, हे नैसर्गिक आहे असे मला वाटते.

फक्त संस्कृतातूनच स्फूर्ती घेतली पाहिजे अशी कल्पनाशक्तीला मर्यादा घालून घेऊ नये - सहमत. परंतु नवीन शब्दाची स्फूर्ती शब्द बनवणार्‍याला पटली पाहिजे, तशी अनेक अन्य लोकांनाही पटली पाहिजे. म्हणूनच आजूबाजूच्या बर्‍याच लोकांनी शिकलेल्या भाषांमधून स्फुरलेले शब्द रूढ होण्याची शक्यता अधिक आहे.

आजकाल अरबी तद्धिते आणि कृदंते आपल्याला कुठे कळतात? "सनद" आणि "मसनद" शब्दांचा संबंध आधुनिक मराठीत तुटला आहे. ("मसनद" शब्द रामशास्त्री प्रभुण्यांनी वापरला नसता तर मला माहीतही नसता!) शिवशाहीत, मराठीशाहीत अरबी-फारसी साधित शब्द मराठीत येऊ शकत कारण त्यावेळी अनेक मराठी लोक फारसी शिकत. नव्या शब्दांसाठी आता हा स्रोत व्यवहार्य राहिलेला नाही. आता इंग्रजीचे तेच स्थान आहे - अनेक सुशिक्षितांना ठाऊक असलेली परभाषा.

माहितीपूर्ण

माहितीपूर्ण प्रतिसाद. मराठी भाषाशुद्धी करणार्‍यांचे ध्येय बहुधा मराठीतील जवळपास सर्व इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द रूढ झाले पाहिजेत असे असावे. (इंग्रजीवरच इतका राग का याचे उत्तर अजून मिळालेले नाही. तसेच संस्कृतवर प्रेम का याचेही नाही पण संस्कृतमधून आलेले शब्द चालतात हे मात्र खरे.) इतक्या प्रचंड प्रमाणात शद्ब रूढ करणे याचा अर्थ एका तर्‍हेने समाजाचे मन, एका छोट्या बाबतीत का होईना, वळवणे. हे कितपत व्यवहार्य/शक्य आहे? इतरत्र म्हटल्याप्रमाणे लता-आशा यांनी गाण्यात शब्द वापरले तर एकवेळ रूढ होऊही शकतील पण त्याची शक्यता कमीच आहे. भाषांच्या इतिहासात मुद्दामहून प्रयत्न करून एखाद्या भाषेला एखादे वळण देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असल्याचे वाचण्यात नाही.

दुसरा मुद्दा. समजा काही जादू झाली आणि सर्व प्रतिशब्द रूढ झाले तर त्या मराठीचे स्वरूप कसे असेल? यावर आधीही प्रतिसाद दिले आहेत. अशी मराठी फारच औपचारिक असेल. भाषेचे सौंदर्य तिच्यामधील अपवाद, वेगवेगळ्या संस्कृतींमधून, विचारांमधून आलेले शब्द यांच्यामुळेच वाढते. एकगठ्ठा कारखान्यात तयार करतो तसे शब्द तयार करून रूढ केले तर भाषेला असणारी नजाकत, लहजा नष्ट होईल असे वाटते.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

शुद्धलेखनाचा माज

अहो, ज्यांना शुद्धलेखन येतं त्यांचा माज मी समजू शकतो एकवेळ. त्यांना काहीतरी येत असतं. - तो बरोबर असतो असे म्हणत नाही हं - पण ज्यांना शुद्धलेखन येत नाही ते शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याचा माज कोणत्या आधारे करतात?

नवीन शब्द

अरबी-फारसीचा अभ्यास करणे बंद झाल्यापासून मराठीत त्या मार्गाने येणारे शब्द येण्याचे थांबले. मराठी लोकांना हिंदी -इंग्रजीशिवाय
दुसर्‍या भारतीय भाषा येतच नाहीत, तेव्हा मराठीत नवीन शब्द या दोनच भाषांमधून येणार. फारतर गुजराथीमधून.कारण महाराष्ट्रातली गुजराथी माणसे अधूनमधून गुजराथी शब्द वापरून उत्तम मराठी बोलतात. त्यांच्याशी सतत संपर्क असेल मराठीत त्यांचेकडून नवीन शब्द घेता येतील. बाकी काय, संस्कृतच्या मदतीने नवीन शब्द बनतच असतात, आणि त्यातले काही रुळतातही. परभाषिक शब्दांना त्याज्य मानणे ही सावरकरी कल्पना आता कालबाह्य झाली आहे. मराठीच्या बोलीभाषेत अनेक शब्द आहेत, ते घेता येतीलच. पण त्या अर्थाचे प्रमाण भाषेतील शब्द साधारणपणे मराठीत असतातच, त्यामुळे नवीन कल्पनांसाठी असे शब्द निरुपयोगी.
पंडित नेहरूंच्या काळात झालेल्या बांडुंग परिषदेनंतर द.पां खाबेट्यांनी लिहिलेल्या एका विनोदी लेखात बांडुंग हा शब्द अनेक अर्थांनी वापरून मजा आणली होती. त्या काळातले काही तरुण, त्यांच्या सध्याच्या म्हातारपणी हा शब्द क्वचित वापरतही असतील. थोडक्यात काय, सावरकर, खांबेटे, अत्रे किंवा पु.ल. ह्यांच्या तोडीचे काही लेखक पूर्णपणे अव्युत्पन्न असलेला शब्द रूढ करू शकतात. आता तशी प्रतिभा आणि लोकप्रियता कुणा लेखकात आहे की नाही कुणास ठाऊक? --वाचक्‍नवी

सहमत आहे !

संस्कृतच्या मदतीने नवीन शब्द बनतच असतात
ही एकच अशी भाषा आहे, जी मराठीला समृद्ध करु शकते. हिंदी, गुजराथी, इंग्रजी, किंवा बोलीभाषेतील शब्द मराठीत रुढ होणार नाही, पण संस्कृतच्या काही जुन्या शब्दावरुन नवीन शब्द नक्की रुढ होतील यावर माझा विश्वास आहे ! :)

प्रतिसाद चुकला की काय लिहिता-लिहिता ?

-दिलीप बिरुटे
(गोंधळलेला )

चर्चा

परभाषिक शब्दांना त्याज्य मानणे ही सावरकरी कल्पना आता कालबाह्य झाली आहे.
हे खरे असेल तर स्वागतच आहे. पण नेहेमी घडणार्‍या 'बदलती मराठी', 'मराठी प्रतिशब्द हवेत - भाग १५७१' अशा चर्चांवरून तरी असे असेल असे वाटत नाही.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

हे मान्य होत आहे...

परभाषिक शब्दांना त्याज्य मानणे ही सावरकरी कल्पना आता कालबाह्य झाली आहे.

हे मान्य होऊ लागले आहे हेच खूप आहे.

मराठी लोकांना हिंदी -इंग्रजीशिवाय दुसर्‍या भारतीय भाषा येतच नाहीत, तेव्हा मराठीत नवीन शब्द या दोनच भाषांमधून येणार. फारतर गुजराथीमधून.कारण महाराष्ट्रातली गुजराथी माणसे अधूनमधून गुजराथी शब्द वापरून उत्तम मराठी बोलतात. त्यांच्याशी सतत संपर्क असेल मराठीत त्यांचेकडून नवीन शब्द घेता येतील.

खरे आहे. काही वाईट नाही. गुजराथीतून एक आवडता शब्द आम्ही (म्हणजे घरचे, मित्रमंडळ इ.) कधीच घेतला होता. मगजमारी (काथ्याकूट, डोक्याला कटकट अशा अर्थी) तो आता इथेही वापरायला सुरुवात करणार आहे. :-) बरी आठवण झाली.

मगजमारी

काथ्याकूटला मगजमारी हा शब्द चांगला आहे. :)

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

सिंहासन

'मगजमारी' हा शब्द बोलीभाषेत (विशेषतः मुंबईच्या बोलीभाषेत) तसा बर्‍यापैकी प्रचलित - खरे तर रूढ म्हणायलाही हरकत नसावी - आहे असे वाटते.

यावरून आठवले. सिंहासनमध्ये विजय तेंडुलकरांनी हा शब्द वापरला आहे. विश्वासराव दाभाडे-डिकास्टा भेटीमध्ये विश्वासराव म्हणतात, "तुमची मारामारी आणि आमची मगजमारी."
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

रुळलेला नाही पण रुळवूच

शब्द वापरला जातो पण मराठीत सर्रास रुळलेला नाही. नेटावरील मराठीत तर नाहीच. शिवाय मुंबईत वापरला गेला म्हणजे मराठी झालेला नाही. जसे खांदेशी, वर्‍हाडी, कोकणी शब्द सामावून घ्या असे सांगितले जाते तसा हा शब्द संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या मराठीत सामावून घ्यावा लागेल आणि त्याला आजपासून मी सुरुवात करत आहे.

यापेक्षा जास्त मगजमारी मी या शब्दावर करणार नाही. ;-)

भेजाफ्राय

यापेक्षा जास्त मगजमारी मी या शब्दावर करणार नाही.

मंग यखांदी भेजाफ्रायची पाककृती करा.
प्रकाश घाटपांडे

तारीख

सिंहासनच्या प्रदर्शनाचे साल १९७९ असे सापडले.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

मगजमारी

मगजमारी गुजराथी आहे, हे इथे कळले. इतके दिवस ह शब्द मराठी असावा असे वाटत होते.
(इतर भाषेतील...मग ती इंग्रजी का असेना...शब्द आयात करून मराठी समृद्ध होत असेल तर् त्यांचे स्वागत केले पाहिजे.)

जोडीची अक्षरे

८)इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण... यांच्याच दोन-दोन जोड्या कशासाठी?मग बाकीच्या मुळाक्शरांच्या दोन-दोन जोड्या का नाहीत?

आहेत.
१. इ आणि य. (बाई आणि बाय, आई आणि आय, माई आणि माय).
२. उ आणि व. (भाऊ आणि भाव), ए-ऍ-ऐ, ओ-ऑ-औ वगैरे वगैरे.
३. क-ख, च-छ, ...प-फ, ब-भ.
४. ल-ळ.
५. च़-च, झ़-झ, ज़-ज, प-फ़.
पण असले प्रश्न इंग्रजीच्या बाबतीत कुणाला पडत नाहीत. एका 'श'च्या उच्चारासाठी इंग्रजीत ch, s, ss, sh, sch, tio यातले कोणतेतरी एक वापरले जाते. साध्या ' x ' चे, इंग्रजीत क्स, झ़ ,ग्झ़ असे तीन उच्चार होतात. तर क च्या उच्चारासाठी सी, सीएच्‌, के, आणि क्यू पण चालतो.

इंग्रजी-हिंदीत कधी बोलीभाषेत लिहिलेले सापडणार नाही, ती फक्त मराठीची मिरासदारी. चांगली मराठी भाषा लोक का लिहू शकत नाहीत याचे हे मुख्य कारण. बोलीभाषा ही फक्त बोलण्यासाठी असते, त्या भाषेत लिहिताना अवतरण चिन्हे वापरलीच पाहिजेत हे लेखकांना कुणी समजवावे?
त्यातून जाहिरातदारांनी इंग्रजीच्या धर्तीवर केलेल्या वाक्यरचनांचा मारा. कर्ता-कर्म-क्रियापद या क्रमाऐवजी क्रियापद-कर्ता-कर्म किंवा कर्ता-क्रियापद-कर्म.
चांगले मराठी वाचायला मिळणे कठीण होते आहे, आता ऐकायलाही होणार.--वाचक्‍नवी

विषांतराची मेख मारु नका

१)पण असले प्रश्न इंग्रजीच्या बाबतीत कुणाला पडत नाहीत. एका 'श'च्या उच्चारासाठी इंग्रजीत ch, s, ss, sh, sch, tio यातले कोणतेतरी एक वापरले जाते. साध्या ' x ' चे, इंग्रजीत क्स, झ़ ,ग्झ़ असे तीन उच्चार होतात. तर क च्या उच्चारासाठी सी, सीएच्‌, के, आणि क्यू पण चालतो.
महाशय,
@चर्चा करीत असताना विषांतराची मेख मारुन चर्चा दुसरीकडे भरकटत नेण्याचा केविलवाणा प्रत्न करु नका.
@मी मराठी भाषेपुरता विषय मांडलेला आहे.
@१. इ आणि य. (बाई आणि बाय, आई आणि आय, माई आणि माय).
२. उ आणि व. (भाऊ आणि भाव), ए-ऍ-ऐ, ओ-ऑ-औ वगैरे वगैरे.
३. क-ख, च-छ, ...प-फ, ब-भ.
४. ल-ळ.
५. च़-च, झ़-झ, ज़-ज, प-फ़.
ही तर चक्क् थापालॉजी झाली.याला भाषाशास्र व्यंजन मांडणीची व्यवस्था म्हणते.

विषांतर?

>>ही तर चक्क् थापालॉजी झाली.याला भाषाशास्र व्यंजन मांडणीची व्यवस्था म्हणते. <<
समजले नाही. थापालॉजी असेल तर भाषाशास्त्रीय मांडणी कशी होईल? म्हणजे अशी मांडणी म्हणजे थापा? आणि कुठल्या भाषाशास्त्रात(लिंग्विस्टिक्स्) अशी मांडणी असणे म्हणजे थापालॉजी असे म्हटले आहे?
मी मराठी भाषेपुरता विषय मांडलेला आहे.<<
मराठी काही आकाशातून पडलेली भाषा नाही. तिच्या लिपीची तुलना इतर लिप्यांशी होणारच. --वाचक्‍नवी

शुद्धलेखनाचे नियम जेव्हा नव्हते

वरील चर्चेच्या जोडीला अशीही चर्चा करता येईल-

मराठी शुद्धलेखनाचे नियम काही वर्षापुर्वी प्रसिद्ध केले गेले. [त्याचा इतिहासही रंजक आहे]. आपल्याला मराठी लेखन हे ह्या दोन काळात विभागता येईल.
जुन्या बखरी, पोथ्या, दप्तरी ऐवज, दासबोध व इतर संतसाहित्य ह्यांचा [त्याकाळात प्रमाणित-बोली वाद होता की नाही? ] आणि सध्याचे लिखाण यांची तुलना करुन काही निश्कर्ष काढता आले तर बरे.

-शुद्धलेखनाचे नियम जेव्हा नव्हते तेव्हा मराठी लिखाण करणाऱ्यांना/वाचता येणाऱ्यांना काय अडचणी येत असत?
-शुद्धलेखनाचे नियम जेव्हा नव्हते त्याकाळातील मराठी लिखाण आता वाचतांना काय अडचणी येतात?

शुद्धलेखनाचे नियम जेव्हा नव्हते

जुन्या बखरींबाबत फारशी कल्पना नाही मात्र पोथ्या, दासबोध आणि इतर संतसाहित्य हे लिखित म्हणण्यापेक्षा बोली स्वरुपात अधिक उपलब्ध असावे. (उदा. तुकारामाचे अभंग हे तुकाराम गेल्यानंतर अनेक वर्षांनी गावागावात भेटून व तोंडी ऐकून गोळा करण्यात आले व छापण्यात आले.) ह्या पोथ्या-संतसाहित्याचे मागणीनुसार वारंवार छपाई करण्यात येते. प्रत्येक छपाईत शुद्धलेखनाच्या चुका काढून टाकण्याचे प्रयत्न केले जातात. (अशा अनेक पुस्त्या, पुरवण्या या ग्रंथांमध्ये पाहायला मिळतील.) शिवाय अशा पोथ्यांच्या वेगवेगळ्या आवृत्त्याही आहेत. (उदा. तुकाराम गाथेची शासकीय आवृत्ती व पडवळबुवांची आवृत्ती वगैरे. या आवृत्त्यांमध्ये जसा ओव्यांचा क्रम वेगळा असतो तसेच शब्दही अनेकदा वेगळे असतात. (उदा. वाचकांच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून "भले तर देऊ गांडीची लंगोटी" ऐवजी "भले तर देऊ कासेची लंगोटी" ही सुधारणा वगैरे))

शुद्धलेखनाचे नियम जेव्हा नव्हते तेव्हा मराठी लिखाण करणाऱ्यांना/वाचता येणाऱ्यांना काय अडचणी येत असत?-
शुद्धलेखनाचे नियम जेव्हा नव्हते त्याकाळातील मराठी लिखाण आता वाचतांना काय अडचणी येतात?
या प्रश्नांचे अगदी दुरुन जाणारे उत्तर (किंवा उत्तराच्या जवळपास जाण्याचा फार दुरुन केलेला प्रयत्न असा की)

जुन्या बखरींची मूळ प्रत मी कधीही पाहिलेली नाही मात्र मूळ प्रती व शालेय पाठ्यपुस्तकात वाचायला मिळणारे त्यातील उतारे यातही फरक असण्याची शक्यता आहे. (जुन्या बखरी मोडीमध्ये लिहिल्या होत्या की देवनागरीत याचीही मला कल्पना नाही. मात्र मोडी लिपीला असलेला ढिसाळपणा पाहता अनेक बखरी, शिलालेख यांचे अर्थ लावताना इतिहासरारांना त्रास झाला आहे (व वेगळाच अर्थ निघाला आहे) असे वाचले आहे.)

धनंजय यांनी मागे कुठेतरी असे मत मांडले होते की शुद्धलेखनाचे नियम हे भाषा कशी असावी हे ठरवणारे नसून भाषा कशी आहे हे समजावणारे असावेत. हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.

त्यामुळे तुमच्या प्रतिसादाचा विषय शुद्धलेखनाचे नियम जेव्हा नव्हते असा असण्याऐवजी आता आहेत ते शुद्धलेखनाचे नियम जेव्हा नव्हते (तेव्हा थोडे वेगळे नियम असण्याची शक्यता नक्कीच आहे) ते लेखन कसे समजावून घ्यावे असा असावा असे मला वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

शुद्धलेखनाचे नियम- भाषा कशी आहे हे समजावणे

तुमचे उत्तर बरेच जवळ आहे. मला विषेशतः आवडला तो "धनंजय यांनी मागे कुठेतरी असे मत मांडले होते की शुद्धलेखनाचे नियम हे भाषा कशी असावी हे ठरवणारे नसून भाषा कशी आहे हे समजावणारे असावेत." हा तुम्ही दिलेला संदर्भ.

मला वाटते की, शुद्धलेखन ही जर "रित" (प्रोसेस) मानली तर "लेखन शुद्ध का करायचे" ह्या समजाला (परसेप्शन) मुल्ये (value) म्हणता येईल. लोक शुद्धलेखनाला नाक मुरडतात तेव्हा त्याचा विरोध कशामुळे असतो- रित न कळल्यामुळे की, मुल्ये न कळल्यामुळे?

रित न कळल्यामुळे असेल् तर शिकवणे सोपे आहे पण तरी सुद्धा रित वापरलीच जाईल ह्याची शाश्वती नसेल. रित येथे नाही पाळली तर रुग्णाचा जीव जाण्याइतपत आणीबाणी येथे नसते म्हणुन.
मुल्ये न कळल्यामुळे असेल तर्? कसे शिकवणार? मुळात मुल्ये काय आहेत्? मुल्ये जर "आदर्श" म्हणुन शिकवली जात् असतील् तर अवघड आहे.

मुल्ये आपल्याला सरळ आणि अरुंद रस्त्यावरुन जातांना क्षणिक मोहापासुन दूर ठेवतात. ती जर शिकवली, अख्ख्या महाराष्ट्रात मानली गेली तर ठिक आहे. त्यामुळे शुद्धलेखन किती धरायचे आणि किती सोडायचे ह्याचे एक "प्रक्टीकल" सुत्र असावे असे वाटते.

किंचित सुधारणा - माझे मत

धनंजय यांनी मागे कुठेतरी असे मत मांडले होते की शुद्धलेखनाचे नियम हे भाषा कशी असावी हे ठरवणारे नसून भाषा कशी आहे हे समजावणारे असावेत. हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.

शुद्धलेखनाचे नव्हे, पण व्याकरणाचे नियम हे माझ्या मते स्वयंभू असतात. त्यामुळे ते शोधण्याची, सांगण्याची जेव्हा अभ्यासक खटपट करतात, ते भाषा कशी असावी हे ठरवणारे नसून भाषा कशी आहे हे वर्णन करणारे असतात.

पतंजली असे काही म्हणतात :
"मडके वापरायचे असेल तर आपल्याला कुंभाराकडे जाऊन म्हणावे लागते - मला मडके बनवून दे. पण भाषा वापरायची असते तेव्हा आपल्याला व्याकरणकाराकडे जाऊन असे म्हणायची काहीच गरज नसते की मला शब्द बनवून दे."

लेखन मात्र तितके नैसर्गिक नाही. ते मुद्दामून घटवून-घटवून शिकावे लागते. शिक्षकाला (कुंभाराला) सांगावे लागते - "गाय"/"घोडा", वगैरे चिह्नांचा पांढर्‍यावर काळा आकार मला सांग... कुंठ मुका असल्याशिवाय नि:शब्द माणूस दिसणार नाही, पण निरक्षर माणूस आपण सर्वांनीच बघितला आहे.

बोलणे हे सहज-नैसर्गिक आहे, लेखन मात्र एक शिकवलेले तंत्र आहे. पायांनी चालायचे तंत्र सहज-नैसर्गिक आहे, पण वाहन चालवायचे तंत्र आपण व्यवहारासाठी शिकतो. तसे लेखनही व्यवहारासाठी शिकतो. या-त्या देशात वाहन असे चालवायचे, ते नियम मला सरकार किंवा शिक्षक सांगतो. सरकारने नियम बदलला (मुंबई-पुणे जलदमार्गावर म्हणे काही विशेष नियम पाळावे लागतात...) तर मग ते पाळायचे. त्रासदायक नियमांबद्दल तक्रार करून ते बदलून घ्यायचे (हेल्मेट!)

शुद्धलेखनही व्यवहारोपयोगी आहे. शिक्षक सांगतात म्हणून तसे लिहिणार. त्रासदायक नियमांबद्दल तक्रार करून ते बदलून घ्यायचे ("तसें"ऐवजी "तसे").

मराठी एकटाच जगसफरीला

ह्या चर्चेतील मते वाचता वाचता हे विचार मनात येत होते-

एक मराठी एकटाच जगसफरीला जात असता समुद्रात भरकटून एका बेटावर येऊन थडकतो. त्याला प्रचंड भूक लागलेली असते, तो थकलेला असतो.
तेव्हढ्यात त्याला मनुष्य वस्तीच्या खाणाखूणा दिसु लागतात; तो तिथे जातो व मराठीत संवाद घालू लागतो. अर्थातच कोणालाही ते कळत नाही. तेव्हढ्यात एक जण पुढे येतो व मराठी माणसाचा हात धरुन ओढू लागतो.
ते दोघे एका जख्ख म्हाताऱ्याकडे पोहोचतात. "एक जण" मराठीला खाणाखूणा करुन त्या म्हाताऱ्याशी बोल असे सांगतो. मराठी त्याला सगळे सांगतो व त्याची मदत मागतो. सुदैवाने त्या म्हाताऱ्याला मराठी येत असते पण दुर्दैवाने त्या म्हाताऱ्याला [आता- वयोमानाप्रमाणे] बोलता येत नसते. तरी तो म्हातारा थरथरत्या हाताने अत्यंत अशुद्ध मराठीत काहीतरी लिहून त्याला देतो.
प्रश्न-
१. मराठी ते लिखाण पाहून ती चिठ्ठी फेकून देईन?
२. मराठी ती चिठ्ठी वाचून न कळलेले पुन्हा पुन्हा विचारुन समजावुन घेईन?
३. अशा संकटकाळात मराठी त्या म्हाताऱ्याला देवाने पाठवलेली मदत असे मानून त्याच्या अशुद्धलेखनाकडे पुर्णपणे दुर्लक्ष करेल?

विश्वभ्रमण

भरकटलेला, भुकेला व थकलेला 'मराठी', अर्वाच्य किंवा अशुद्ध देवनागरीच काय तर मोडी किंवा एखादी सांकेतिक लिपी देखील वाचण्याचा प्रयत्न करेल.

अर्थात, ही परिस्थिती व त्यावरील 'मराठी'ची प्रतिक्रिया शुद्धलेखनाच्या अट्टहासास अनाठायी ठरवण्यास पुरेशी नाही.

(या उलट भ्रमणकर्त्याचे लेखन अशुद्ध व निर्णय वृद्धाच्या पारड्यात असेल तर स्थिती रोचक बनेल. अर्थातच याने ही दोहोंतील एक बाजू सिद्ध होईलच असे नाही.)

शुद्धलेखन

शुद्धलेखन ही रोजच्या व्यवहारातील संवाद सुलभ व्हावेत यासाठी असलेले एक हत्यार (टूल या अर्थी) आहे. याचा अर्थ एखाद्याने बोली भाषेत* काही लिहीले तर ते निकृष्ट असा अजिबात नाही. समजा, संगणक, गणित किंवा कुठल्याही विषयावर चर्चा चालू आहे तर सर्वांनी एकाच भाषेत प्रतिसाद दिले तर समजायला सोपे होईल. इतकाच हेतू.

*व्यक्तिशः मला बोली भाषा ऐकायला, वाचायला खूप आवडते. कोकणी, मालवणी किंवा दादांच्या चित्रपटातील रांगडी मराठी इ.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

करेक्ट

शुद्धलेखन ही रोजच्या व्यवहारातील संवाद सुलभ व्हावेत यासाठी असलेले एक हत्यार (टूल या अर्थी) आहे. याचा अर्थ एखाद्याने बोली भाषेत* काही लिहीले तर ते निकृष्ट असा अजिबात नाही.

सहमत आहे ! अरे हेच सांगतोय आम्ही किती दिवसापासून. पण या शुद्धलेखनावाल्यांनी जीव नुस्ता मेटाकुटीला आणलाय !

विपर्यास

पण या शुद्धलेखनावाल्यांनी जीव नुस्ता मेटाकुटीला आणलाय !

हा माझ्या प्रतिसादाचा विपर्यास आहे असे वाटते. हे माझे मत नाही.
बाकी मराठीच्या प्राध्यापकांनाच शुद्धलेखन नको वाटावे हे आश्चर्यकारक आहे. (हे म्हणजे अदनान सामी जिम इन्स्ट्रक्टर असल्यासारखे आहे.)

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

 
^ वर