मराठी शुद्धलेखनावर उपाय

१) कोणतीही भाषा ही बोलल्याप्रमाणे शंभर टक्के शुद्ध लिहीता येवु शकत नाही. हे भाषाशास्र मान्य करीत असतानाही शुद्धलेखनाचा आग्रह का धरला जातो?
२) बोलल्याप्रमाणे लिहीता येणे म्हणजेच शुद्धलेखन असेल तर,नेमक्या कुणाच्या बोलल्याप्रमाणे कुणाला लिहीता येणे अपेक्शित् आहे ?
३)पुण्यात (शहरात)बोलल्याप्रमाणे खेड्या-पाड्यात लिहायचे?
४)खेड्या-पाड्यात बोलल्याप्रमाणे पुण्यात(शहरात) लिहायचे?
५) शुद्धलेखन करीत असताना इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण...ही चारच मुळाक्शरे अडचण ठरत नाहीत काय?
६)हे जर खरे असेल तर इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण...ह्या मुळाक्शरांच्या जोड्यांचीच गरज काय?
७)केवळ इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण...ह्या मुळाक्शरांच्या जोड्यांमुळेच शुद्धलेखन करत असताना गोंधळ उडत असेल तर इ,उ,श,न
किंवा ई,ऊ,ण,ष ,यांपैकी कोणतीही एक जोडी वापरुन शुद्धलेखनाची पारंपारिक समस्या कायमची मिटवता येणार नाही काय?
८)इ,ई...उ,ऊ...श,ष..न,ण... यांच्याच दोन-दोन जोड्या कशासाठी?मग बाकीच्या मुळाक्शरांच्या दोन-दोन जोड्या का नाहीत?
९)ञ्,ड्,सारखी निरर्थक मुळाक्शरे(?) मुळाक्शरांच्या यादीत कशासाठी?
१०)प्रमाण भाषेचा आग्रह धरणे म्हणजे लोकांना बोलल्याप्रमाणे लिहु न देणे नाही काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

माझे वयक्तिक मत

शुद्धलेखनावाल्यांनी जीव नुस्ता मेटाकुटीला आणलाय !

हे वयक्तिक मत आहे !!!

मराठीच्या प्राध्यापकांनाच शुद्धलेखन नको वाटावे हे आश्चर्यकारक आहे.

हम्म, सरसकट विधान नको. अपवाद सोडा आमच्यासारखे. धन्यवाद !

-प्रा.दिलीप बिरुटे

सरसकट

सरसकट विधान नको. अपवाद सोडा आमच्यासारखे. धन्यवाद !

सरसकट नाहीच. आम्हाला भेटलेले मराठीचे पहिले प्राध्यापक आपणच. धन्यवाद.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

पुन्हा तोच प्रश्न

बोलीभाषेत लिहिणे आणि अशुद्ध लिहिणे यांचा परस्परसंबंध काय?

आरं तू कोनाला इचारून ह्ये करतूस? हे ग्रामीण मराठीतील वाक्य बोली भाषेतील लिखाण आहे असं मला वाटतं.

याचा संबंध आर् तु कोन्ला इचरुन् हे करतुस्? या अशुद्ध लिहिण्याशी कसा लागतो?

.

माझ्या प्रतिसादात मी बोली भाषेचा उल्लेख केला कारण कधीकधी बोली भाषेतील शब्द वापरल्यास आवडत नाही. पण याचा अर्थ बोली भाषा लिहीणे म्हणजे अशुद्धलेखन असा काढणे योग्य नाही. असे होईल असे माहित असते तर बोली भाषेचा उल्लेख केला नसता. असो.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

लिहितांना

आर् तु कोन्ला इचरुन् हे करतुस्?

'र' 'न'' स'ची तंगडी मोडलेली दिसते. पेनाने लिहितांना अशी चूक होत नसावी. आर् तु कोन्ला इचरुन् हे करतुस्? भविष्यात मात्र संगणकावर मराठी लिहिणार्‍याचे असेही मराठी लेखन समजून घ्यावे लागेल, तेव्हाही हे अशुद्ध लेखन आहे. याच्याही चर्चा झडत राहतील. लिहिलेल्या ज्या-ज्या वाक्यांचा,शब्दांचा, अर्थ समजून घेता येतो ते शुद्ध. आमचे मुद्दे संपले !

समजून घ्यावे लागेल

>> आर् तु कोन्ला इचरुन् हे करतुस्? भविष्यात मात्र संगणकावर मराठी लिहिणार्‍याचे असेही मराठी लेखन समजून घ्यावे लागेल<<

म्हणजे आपोआप-सहजगत्या समजणार नाही. यातच सर्व आले. लिखाण प्रमाण भाषेत असेल तर ते आपसूकच समजेल. -वाचक्‍नवी

मराठी आणि तंजावूर

आपण सर्वच जाणता की तंजावूर शहरावर पूर्वी शिवाजीराज्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे राज्य करीत असत. त्यामुळे तंजावूर मध्ये अजूनही मराठी जाणणारे अनेक लोक आहेत असे म्हणतात. माझा एक मित्र त्या भागातील कन्नड भाषिक पण मूळचा मराठी आहे. त्याच्या सांगण्यानुसार तंजावूर मधील मराठी जन मराठीच बोलतात. पण त्या भाषेला आपण महाराष्ट्रातील आजचे मराठी जन मराठी म्हणणार नाही एव्ह्ढी ती भाषा वेगळी आहे. पण ते तंजावूरी मराठी जन त्या भाषेला मराठीच समजतात.
मला त्याचे एक कारण जाणवते ते की व्यंकोजीराजांनंतर अनेक वर्षे त्या लोकांना महाराष्ट्रातील बदललेली मराठी माहितच नाही. कारण ते मूळ मराठीपासून तुटलेल्या एका वेगळ्याच बेटावर वावरल्यासारखे मराठी बोलतात. ते आजही शिवाजीराजांच्या काळातील मराठी बोलत असावेत. त्यांच्या दृष्टीने त्यांची भाषाच शुध्द आहे.
आता सांगा शुध्द व अशुध्द मधील फरक.

नितीन

कर्नाटकातील मराठी

कर्नाटकातील एका गावाविषयीची(तंजावर नाही, संबंधित गाव कर्नाटकाच्या उत्तर भागात असल्याचा उल्लेख् होता.) माहिती एकदा वाचनात आली होती.(कुठे ते आठवत नाही, पण मागील २-३ महिन्यात.) शिवाजी महाराजांच्या काळात कर्नाटक मोहीमेवर गेलेल्यांपैकी काही सरदार मंडळी तेथील एका गावात स्थायेक झाली होती. तेथील परस्पर-संवादाची भाषा मराठीच आहे, पण ती सुमारे ३५० वर्षांपूर्वीची! कारण महाराष्ट्रात मराठी भाषेमध्ये वेळोवेळी झालेली स्थित्यंतरे आणि बदल तेथे न पोहचल्याने ती आहे तशीच राहिली.(किंवा तेथील भाषिक बदल हे त्यांच्या परीने झाले असतील.) आता दोन्हीमधील कोणती भाषा शुद्ध मानावी आणि कोणती अशुद्ध हे आपण ठरवू शकत नाही. कारण शुद्धता ही प्रदेश आणि संस्कृती सापेक्ष आहे, असे मला वाटते. त्यामुळेच तर बोली-भाषा तयार होतात.

सावरकरी शब्द

सावरकरांनी इंग्रजी शब्दांसाठी जे प्रतिशब्द दिले त्यातील बहुतेक सर्व लेखी भाषेत रूढ झाले. उदाहरणार्थ : प्रशाला(सावरकरांचा प्रशाळा), महाविद्यालय(महाशाळा लोकांनी स्वीकारला नाही.!), ज्ञानशाखा, प्रबोधिनी(सावरकरांचा प्रबोधिका!), मुख्याध्यापक, आचार्य, प्राचार्य, प्राध्यापक, प्रपाठक, अध्यासन, विद्यासन, वगैरे. लेक्चररसाठी सावरकरी शब्द,प्रवाचक. हा कधी वापरलेला आठवत नाही. कदाचित शिक्षणक्षेत्रापुरता मर्यादित वापर असावा.
रूढ न झालेले शब्द: विधिज्ञकी(वकिली), परीटगृह(लॉन्ड्री), शिवणकलागृह(टेलरिंग शॉप)उपसंधी(ट्‌रूस), उपयुद्ध(कॅम्पेन),
ग्रंथ टपाल(बुक पोस्ट),उपमुद्रित(प्रुफ़), पटांकित(रजिस्टर्ड), धनटपाल(मनी ऑर्डर), वस्तुटपाल(पार्सल), परिचयपट(ट्रेलर),
कालदर्श/मितिपट(कॅलेन्डर), संयत वात/समशीतोष्ण/सुखशीतोष्ण/शीतल(एअर कन्डिशन्ड) वगैरे. डिस्पेन्सरीसाठी सुचवलेला औषधालय हा फक्त आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधांच्या दुकानासाठी जनमान्य झाला. डॉक्टर जिथे दुकान काढून बसतात त्या खोलीला आणि युनानी औषधे मिळतात त्या दुकानाला अजूनही सावरकरांना मान्य नसलेला दवाखाना हा शब्दच वापरला जातो.

इंग्रजी शब्दांसाठी सावरकरांनी दिलेले आणि लेखी-तोंडी रूढ झालेले शब्द अनेक आहेत. पण त्यांनी काढून टाकायला सांगितलेले अरबी-फारशी शब्द मात्र निघून न जाता तसेच राहिले, आणि या उपर सावरकरांचे संस्कृत शब्दही बोलण्या-लिखाणात येऊ लागले. या बाबतीत सावरकरांना यश मिळाले नाही.
टीप:-सावरकरांनी लिहिलेल्या मराठी भाषेचे शुद्धीकरण(१९२६) या पुस्तिकेच्या शेवटी 'त्याज्य विदेशी शब्दांचे टांचण' ह्या नावाचा एक लघुकोश दिला आहे . त्यात दिलेल्या शब्दांवर आधारित वरील लिखाण आहे.
अवांतर:'बस स्टॉप'साठी 'थांबा' हा शब्द आचार्य अत्र्यांनी सुचवला असे वर आले आहे. पण सावरकरप्रणीत शब्दांत हा शब्दही आहे.-वाचक्‍नवी

 
^ वर