छायाचित्र् - पोकर्

छायाचित्रणाचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. कसा वाटतो, ते कृपया सांगावे.

छायाचित्र विषय - पोकर आणि संबंधित साहित्य

छायाचित्र सोनी डब्ल्यू-१५० कॅमेरा वापरून काढले आहे आणि नंतर त्यावर गिंप (की जिंप?) वापरून थोड्या सुधारणा केल्या आहेत.
तांत्रिक माहिती पुढीलप्रमाणे -
आयएसओ - ४००
छिद्रमान् - फ/३.३
अनावृतकाल (एक्स्पोजरला प्रतिशब्द!!!) - १/२० सेकंद.

धन्यवाद.

लेखनविषय: दुवे:

Comments

!!!!

अ प्र ति म!!!!!!!!

अगदी व्यावसायिक चायाचित्रकाराने काढल्यासारखे वाटले

अ प्र ति म

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

सहमत

ऋषिकेश यांच्याशी सहमत. एकदम व्यावसायिक वाटते आहे.

- सूर्य.

चांगला प्रयत्न

सुचवण्या:

छायाचित्र पिवळ्या दिव्याखाली काढल्याने पिवळट कास्ट चित्रावर आली आहे. चित्र काढण्यापुर्वी 'व्हाईट बॅलन्स' सेटिंग्स् मध्ये जाउन 'टंगस्टन लँप' हा पर्याय निवडायला हवा होता. अधिक माहिती इथे

चित्राचा शार्पनेस देखिल कमी वाटला.

उजवी कडच्या वरच्या कोपर्‍यामध्ये कार्पेटचा काही भाग आला आहे, तो कंपोज करताना टाळायला हवा होता.

चित्रातील वस्तुंची मांडणी अधिक कल्पक करता आली असता का ह्यावर विचार करावा.

(पोकर फॅन) कोलबेर

पिवळसर झाक आवडली

मला बाकी विशेष कळत नाही, मात्र पिवळ्या (पिवळसर) झाकेमुळे कसिनोत असणारा धुंदपणा जाणवतो आहे असे मला वाटले. स्वच्छ/शुभ्र प्रकाशातले कसिनो कसे दिसतील याचा विचार करतोय :)

बाकी आपल्या इतर सुचवण्या या तज्ज्ञांच्या कक्षेतील असल्याने नो कमेंटस :प्

(द्युतधुंद)ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

सहमत्

माझी अवस्था ॠषिकेश प्रमाणे आहे. पण

चित्राचा शार्पनेस देखिल कमी वाटला.

या मताशी मी सहमत आहे. अजुन शार्प जमले असते असे वाटते. कशाने बरे असे झाले असेल? काही उपाय?

धन्यवाद

सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.

>>चित्राचा शार्पनेस देखिल कमी वाटला.

शार्पनेस मीच कमी केलाय. मला सॉफ्ट फोकस परिणाम हवा असल्याने चित्रावर प्रोसेसिंग केले आहे. थोडा मिस्टी इफेक्ट हवा होता. नुसता फोटो अगदीच रटाळ वाटत होता.

>>उजवी कडच्या वरच्या कोपर्‍यामध्ये कार्पेटचा काही भाग आला आहे, तो कंपोज करताना टाळायला हवा होता.
यस सर.

>>चित्र काढण्यापुर्वी 'व्हाईट बॅलन्स' सेटिंग्स् मध्ये जाउन 'टंगस्टन लँप' हा पर्याय निवडायला हवा होता.
व्हाईट बॅलन्स टंगस्टन लँपच होता. मला मॅन्युअल सेटींग करायला जास्त आवडले असते, पण ती सोय या कॅमेर्‍यात नाही.

>>चित्रातील वस्तुंची मांडणी अधिक कल्पक करता आली असता का ह्यावर विचार करावा.
नक्कीच. अजून प्रयोग करून पाहीन.

झकास

प्रकाशचित्र आवडले. 'पोकर' विषयाला साजेसा पिवळसर प्रकाश आणि धूसरपणा. गडद काळ्या पार्श्वभूमीमुळे चित्राला गूढगंभीर पाया लाभला आहे.
मागे कुठेतरी ऍशट्रे वरती अर्धवट जळका चिरुट आणि तळाशी दोन थेंब ज्याक ड्यानियल उरलेला बसका काचपेला असता तर जास्त व्यावसायिक झाले असते.

छान

सुंदर चित्र.

पोकर आणि ब्रिज हे खेळ कसे खेळतात बॉ? साईनफेल्ड मध्ये क्रेमर बऱ्याच वेळा पोकर खेळताना दिसतो. (आयम गॉना किक योर बट वेरी हार्ड वगैरे डायलॉग).

विकिवर माहिती आहे पण ती वाचताना शालेय अभ्यास केल्यासारखे वाटत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पोकर चित्र

पोकर विषयाशी निगडीत हे माझे आवडते चित्र. (आंतरजालावरुन साभार) डेप्थ ऑफ फिल्ड चा अतिशय कल्पक वापर करुन काढलेले चित्र. डेप्थ ऑफ फिल्ड अतीशय उथळ ठेवल्याने एक एक्का कमालीचा शार्प तर दुसरा धुसर आला आहे.

मस्त...

पिवळसर छटेने त्या कॅसिनोतच असल्यासारखे वाटले. सॉफ्ट फोकस ही आवडला. काहीतरी वेगळ्या वाटेच्या या प्रयोगाचे स्वागत करावे वाटते. कोलबेर यांनी दिलेले चित्रही आवडले.
ब्रिज आणि पोकर खेळ जाणून घेण्याबाबत आजानुकर्णांशी सहमत.
कॉम्पॅक्ट किंवा प्रोझ्युमर कॅमेर्‍यात डिएसएलआर लेन्सच्या तुलनेत बरेच जास्त छिद्रमान (कमी एफ नंबर) मिळू शकतो. असे का?
गुणी कार्टं, सोनी डब्ल्यू १५० कितीला बसला?

-सौरभ.

==================

'उलट ही लेणीबिणी, ताजमहाल लवकर फुटून जाईल तर बरं. काहीही कायम करायला बघणं म्हणजे मूर्खपणा आहे.'

कितीला बसला

गुणी कार्टं, सोनी डब्ल्यू १५० कितीला बसला?

कितीला बसला की कितीला पडला?

हा भाषाप्रयोग धमाल आहे. आमच्या गावातले मुसलमान हिंदी बोलायची वेळ आली की 'वो टायर कितनेमें गिरा?' असे बोलायचे. शहरात काही दिवस राहून टीव्हीवरची हिंदी शिकल्यावर त्या वाक्प्रयोगाचे हसू येत असे. आता तुमच्या पद्धतीने बोलायचे म्हटल्यावर "कितनेमें बैठा" असे म्हणावे लागेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ठाऊक नाही

गुणी कार्टं, सोनी डब्ल्यू १५० कितीला बसला?

ठाऊक नाही. रूममेटचा आहे. माझ्याकडे कॅमेराच नाहीये.

चित्र आवडले

धुरकट पिवळी छटा, उष्ण रंगसंगतीला गडद निळ्याची साथ देताना तो निळा जवळजवळ काळसर करणे, हे छानच.

(इतक्या सुंदर चित्राच्या उजवीकडच्या वरच्या कोपर्‍याने गालबोट लावले आहे, ते एक सोडले तर उत्तम "व्यावसायिक" वाटते आहे. कोपर्‍याबाबत कोलबेर यांच्याशी सहमत.)

 
^ वर