छायाचित्र - ऑर्कीड

कर्दळीच्या रंगाचे ऑर्कीड

एक्सिफ माहिती :
कॅमेरा : कॅनन पावरशॉट एस.एक्स. ५९० आय.एस
एक्स्पोझर : १/६०
छिद्रमान : f/५.५
केंद्रीभवन लांबी : २३ मिमि
आय.एस.ओ. : २००

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त

अत्यंत वेगळे फुल!
आणि अगदी ताजे, फुलावरच्या पाण्याने ताजेपणाचा अनुभव येतोय असे वाटते.
शिवाय फ्रेमपण अगदी योग्य रीतीने पकडली गेली आहे.

कॅमेरा भारी दिसतो आहे तुमचा!

आपला
गुंडोपंत

गुलमोहोर

या फुलाची पाकळी पाहून
गुलमोहोराच्या फुलाची आठवण झाली...

जणू काही या दोन प्रकारांचे फ्युजनच झाले आहे.

आपला
गुंडोपंत

बरोबर

मला देखील गुलमोहर, कर्दळ या नेहमीच्या फुलांचे रंग वाटले. :-)

गुलमोहर

मला सुद्धा गुलमोहोराच्या फुलाची आठवण झाली...!!!

सहजा, मस्त रे !!!

आठवण

मलाही. म्हणून शोध घेतला.

ऑर्किडवरच्या पाण्याच्या थेंबांनी चित्र एकदम सजिव झाले आहे.

सुंदर!!

सुंदर!!

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

सहमत

फारच सुंदर. :-)

छिद्रमान?

ऍपर्चर साठीचा शब्द आहे का? मजा आली. ;-)
पण मग कॅमेरा, एक्स्पोजर, आयएसओ ला काय म्हणावे? काही सुचवण्या?

-सौरभ

==================

'उलट ही लेणीबिणी, ताजमहाल लवकर फुटून जाईल तर बरं. काहीही कायम करायला बघणं म्हणजे मूर्खपणा आहे.'

ते शब्द

छिद्रमान - F-stop

किमान २५ शब्द लिहल्याशिवाय "नवे लेखन" बनत नाही त्यामुळे एक्सिफ माहिती मी काढलेल्या फोटोची असली तरी ते शब्द मित्रवर्य धनंजयसाहेब यांच्या लेखातुन उधार. :-)

चित्र्

चित्र छान आले आहे.

अवांतर : संध्याकाळी काढले आहे का? फ्लॅश वापरला आहे का? आयएस्ओ वाढवुन फ्लॅश न वापरता काढले तर अजुन छान वाटेल असे वाटते.

- सूर्य.

धन्यवाद

दुपारची वेळ, ढगाळ वातावरण, किंचीत् रिपरिप.

ऑटोफ्लॅश् होता, सर्वच सेटिंग "ऑटो" होती. :-)

पुढच्या वेळी फ्लॅश बंद करुन, आयएस्ओ वाढवुन काढायचा प्रयत्न करीन. :-) धन्यवाद.

सुंदर

पूर्ण नैसर्गिक उजेड असताना एकदा परत फोटो काढा. फ्लॅशसह आणि फ्लॅशविना. अभ्यासाला अजून एक नमुना मिळेल.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

रंगसंगती

ऑर्किड फुलांची रंगसंगती मोठी चित्रविचित्र असते - फोटोत छानच दाखवली आहे. (अशा फोटोत अवांतर रंगीत तपशील नाहीत, हे चांगले. फुलांचे फोटो काढताना माझी ही चूक फारच वेळा होते...)

चित्रातल्या घटकांची मांडणीही अगदी "शास्त्रशुद्ध" आहे.

फ्लॅशबद्दल सूर्य यांच्याशी सहमत. (तुमच्यापाशी तिपाई [स्टँड] आहे काय - स्वस्त आणि मस्त अवजार आहे.)

 
^ वर