उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्र टीका: सांयकाळच्या रंगछटा
ध्रुव
December 8, 2008 - 3:03 pm
नमस्कार मंडळी,
औरंगाबद शहराजवळच्या म्हैसमाळ या ठिकाणाला काही दिवसापुर्वी भेट दिली. मस्त जागा आहे. शहराच्या गजबाटापसुन लांब व सुरेख अशी जागा. येथे एक बालाजी मंदिर आहे. सुर्यास्ताच्या वेळी येथे काढलेला हा फोटो.
Camera: Nikon D40
Exposure: 0.025 sec (1/40)
Aperture: f/3.5
Focal Length: 18 mm
ISO Speed: 400
Exposure Program: Shutter priority
थोडासा कमी एक्स्पोज मुद्दामच केलेला आहे. तुमच्या समोर टीकेला दिलेला आहे. आवडला नसल्यास जरूर सांगा, का आवडला नाही हे ही सांगा, काय सुधारणा अथवा तुमच्या कल्पना (या फोटोला चांगला करण्याच्या) असतील तर त्यापण कृपया सांगा.
धन्यवाद,
ध्रुव
दुवे:
Comments
उत्तम
ध्रुव, उत्तम आहे हा फोटो. असंच सुचलं म्हणून विचारतो, आयएसओ स्पीड जर एक स्टॉप खाली ठेवला असता तर मंदिराचं silhouette जास्त चांगलं येउ शकलं असतं काय?
तितकासा नाही आवडला
१) मॉनीटरचा दोष असु शकेल् पण जरा जास्त काळसर आहे फोटो. [१५ मिनिटे, अर्धातास आधी घेतला असता तर सुर्यप्रकाश-संध्याकाळ फोटोभर दिसली असती.]
२) कठड्यालगतचे बांधकाम रसभंग करते.
३) मंदीराचा कळस पुर्ण दिसला असता तर आवडले असते.
४) निदान मंदीराचे काही कोरीवकाम स्पष्ट दिसु शकले असते तर नक्की फरक पडू शकला असता.
अर्थात सार्वजनीक जागी अगदी हवा तस्सा व हवा त्या वेळी फोटो येणे कठीणच.
सांगण्याची गरज नाही पण तुमचे फोटो तसे भारीच असतात, हा बहुदा माझी पसंद वेगळी म्हणून नावडला असेल.
हाच
हाच/ असाच प्रतिसाद अपेक्षित होता....धन्यवाद.
१. फोटो काळसरच आहे, मॉनीटरचा दोष नसावा.
२. नाईलज.
३. मंदिराचा कळस बराच दूर आहे. वरती गेलेला जो भाग फोटोमध्ये दिसत् आहे तो कळस नसून दुसरा कुठलातरी खांब आहे.
४. मंदिर तसे नव्या काळातले असल्याने तितकेसे आवडले नाही (मला) त्यामुळे फोटोमध्ये फक्त मंदिराची किनारच घ्यायची होती.
ISO auto होते. पण २०० ठेवले असते तर मला हवा तसा फोटो कदाचित मिळाला असता.
धन्यवाद,
ध्रुव
आवडला
तुमचे फोटो तसे भारीच असतात, यात शंकाच नाही.
पण फोटो आमच्या औरंगाबादजवळील म्हैसमाळचा असल्यामुळे जास्तच आवडला :)
बाकी, मंदिराचा फोटो जरा स्पष्ट पाहिजे होता असे वाटते.