व्ही एल् सी सी व वजन नियंत्रण

VLCC तसेच इतर संस्था ज्या दावा करतात की आपले वजन कमी करून देतो, त्यांचे दावे खरे असतात काय? मला स्वतःला वजन कमी करावयाचे आहे. पण खाण्यावर नियंत्रण नाही व व्यायामाचा कंटाळा यामुळे वजन कमी करणे हे अजूनही माझ्यासाठी स्वप्न आहे. दरवर्षी वजन कमी करावयाचा संकल्प करतो पण प्रत्यक्षात काही होत नाही.
सध्या मी VLCC तसेच अन्य संस्था ज्या दावा करतात की आपले वजन कमी करून देतो, अशांच्या जाहिराती वाचल्या व त्यावरील लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या की मला वाटले की मी ही या संस्थेचे सभासदत्व घ्यावे.

त्यामुळे माझ्या मनत काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
१) अशा संस्था खरच वजन कमी करायला मदत करतात काय्?
२) वजन कमी करताना या संस्था योग्य, मान्यताप्राप्त मार्ग वापरतात काय्?
३) एकदा कमी केलेले वजन परत वाढते काय? (सामान्य जीवनशैलीचे अनुकरण करताना)
४) याखेरीज अन्य कोणते मार्ग उपलब्ध आहेत काय?

ज्या सदस्यांना अनुभव वा विशेष माहीति आहे त्यांनी क्रुपया मार्गदर्शन करावे.

लेखनविषय: दुवे:

Comments

आहार नियंत्रण

आहार नियंत्रणाबद्दल पण जर आधिक माहिती मिळाली तर उत्तम!

'वजन'दार व्यक्तिमत्व रंगासेठ

माझा साक्षात्कारी हृदयरोग

रंगासेठ,

डॉ. अभय बंग यांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक घ्या. व्हीयलसीसीच्या तुलनेत बरेच स्वस्त पडेल. त्यात सुचवलेले मार्ग अमलात आणा. वर्षभरात वजन कमी होईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माझं निरीक्षण

VLCC तसेच इतर संस्था ज्या दावा करतात की आपले वजन कमी करून देतो, त्यांचे दावे खरे असतात काय?

या संस्थेबद्दल माहित नाही परंतु अशा काही संस्था पाहिलेल्या आहेत. त्या वजन कमी करून देण्याचे दावे करतात त्यात तथ्य असते. ते १००% असते असे नाही, म्हणजे प्रत्येक व्यक्तिला समान अनुभव येईल किंवा प्रत्येक व्यक्तिला अनुभव येईलच असे नाही पण बहुतेकांना येतो.

२) वजन कमी करताना या संस्था योग्य, मान्यताप्राप्त मार्ग वापरतात काय्?

या संस्थेबद्दल माहित नाही पण अशा संस्था ज्या मान्यताप्राप्त मार्ग अवलंबतात त्या अस्तित्त्वात आहेत. भारताबद्दल माहित नाही पण अमेरिकेत आहेत असे वाटते.

३) एकदा कमी केलेले वजन परत वाढते काय? (सामान्य जीवनशैलीचे अनुकरण करताना)

मला वाटते वाढते. कारण वजन हे नियंत्रणावर अवलंबून असते. ते नियंत्रण सोडले की तुमचे शरीर पूर्ववत होणारच.

४) याखेरीज अन्य कोणते मार्ग उपलब्ध आहेत काय?

मार्ग साधेच आहेत आणि सर्वात सोपा आणि कठिण मार्ग म्हणजे नियंत्रण आणि शिस्त.

वजन कमी करण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध आयुष्याची गरज असते. केवळ खाण्यावर नियंत्रण ठेवून वजन कमी होईलच असे नाही. वयोमानानुसार शरीराच्या जडण-घडणीत होणार्‍या बदलांवरही वजन अवलंबून असते. राहणीमान, आनुवांशिकता, शारिरीक हालचाल, पाचनक्षमता असे अनेक मुद्दे वजनवाढीशी संबंधीत आहेत. मरेस्तोवर काम करण्याने, उपवासाने किंवा विशिष्ट अन्न खाऊन वजन घटणे नैसर्गिक नाही. त्याचे तोटेच अधिक असू शकतील.

जिभेवर ताबा, व्यायामाची सवय आणि सुयोग्य अन्न खाण्याची सवय यामुळे वजन नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

डिश्क्लेमरः वरील विवेचन खरे आहे असे मला वाटते पण ते मला लागू आहे असे वाटत नाही. ;-) कळतं पण वळत नाही अशी गत आहे.

सहमत

प्रियाली यांच्याशी सहमत. वजन खरंच कमी करायचं असेल तर नियमीत व्यायामाला शॉर्ट कट नाही.

सर्वात सोपा आणि कठिण मार्ग म्हणजे नियंत्रण आणि शिस्त.

ही शिस्त आणि नियंत्रण अंगी बाणवे पर्यंत कठीण आणि नंतर अतिशय सोपं...

मिलिंद

तुमच्या प्रश्नांची उत्तरे वरती प्रियाली यांनी दिली आहेतच.

सामान्यपणे वजन हे नेहेमीच हळूहळू वाढते त्यामुळे घटवायचे असल्यास ते हळूहळूच घटते आणि तसेच घटवणे योग्य आणि निरोगी व्यवस्थेत बसते.
नियमित व्यायाम आणि आहारावर नियंत्रण ही द्विसूत्री कळीची ठरते! (मला कळतंय तुम्ही कदाचित आठ्या घातल्या असतील पण हाच राजमार्ग आहे हे लक्षात घ्या! :))
आहार -
संपूर्ण दिवसात नेहेमी घेत असाल त्याच्या ७५ ते ८०% आहार घ्यायला सुरुवात करा. थोडेसेच जेवण कमी करण्याने उपासमार होत नाही.
आपले पोट भरलेले आहे हे प्रत्यक्ष पोट भरल्यापासून आपल्याच मेंदूला कळायला साधारण १० ते १५ मिनिटे लागतात! त्यामुळे "अजून थोडेसेच घेतो" असे जिथे वाटेल तिथे पानावरुन उठणे श्रेयस्कर. तळलेले, मसालेदार, अतिगोड कमी करावे लागेल. रात्रीचे जेवण संध्याकाळच्या सुमारास घेत चला. ते जेवण आणि झोप ह्यात साधारण दीड ते दोन तास असावेत.

व्यायाम -
ह्याला पर्याय नाही! साधा चालण्याचा व्यायाम सुरु करु शकता. पहाटेच उठून जायला हवे असे नाही. दिवसभरात कधीही तुमच्या सोयीने जमणे महत्त्वाचे.साधारण २०-२५ मिनिटे सावकाश पासून सुरुवात करु शकता. जसे जमेल तसे १ तास भरभर चालण्यापर्यंत हळूहळू वाढवत न्यावे. व्यायाम कोणताही असूदे सातत्य, शिस्त, चिकाटी महत्त्वाची.
तुम्हाला शुभेच्छा!

चतुरंग

(डिसक्लेमर् : - वरचे दोन्ही उपाय मी सध्या करतो आहे (फरक फक्त एक चालण्याऐवजी स्पिनिंगचा व्यायाम पण तो नियमित) आणि मला उपयोग होतो आहे.

४०,०००

४०,०००

मी स्वतः एकदा वी.एल्.सी.सी. येथे स्वत:चे ओझे (१० किग्रा.) उतरवण्यासाठी विचारले असता मला 'त्रैमासिक वर्गणी केवळ ४०,००० रु. भारतीय चलनामध्ये' असे कळविण्यात आले. तेंव्हा मी घाबरून लागलीच पळून गेलो. पण माझ्या एका मित्राने (माझ्याकडे बघून काळजीने!) वी.एल्.सी.सी.ला माझा दूरध्वनि क्रमांक पुरविला, आणि आता त्या वी.एल्.सी.सी.वाल्या सारख्या सारख्या वेगळ्या-वेगळ्या क्रमाकांवरून दूरध्वनि वाजवून त्यांच्या मधाळ आवाजात वी.एल्.सी.सी. ज्वाईन् करण्याची विनंती करतात... मी बधत नाही ते सोडा! हाहाहा!

हैयो हैयैयो!

:)

तेंव्हा मी घाबरून लागलीच पळून गेलो.

पण मग पळून वजन कमी झाले असेल.. :)
तेव्हा तात्पर्य वीएल् सी सी ज्वाईन करा अगर करू नका केवळ किंमतीची चौकशी करा..... वजन कमी होईल ;)

(पीजेवीर) ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

 
^ वर