छायाचित्रण - प्रकाशचित्रण - लेन्सवरिल बुरशी

लेन्सवर बुरशी येऊ नये म्हणून हमखास उपाय सांगा. मी सावंतवाडी या शहरात रहाते आणि इथे भरपूर पाऊस असतो तेव्हा लेन्सला बुरशी लागणं हे दरवर्षीचं दुखणं आहे. तरी कृपया उपाय सांगा.

लेखनविषय: दुवे:

Comments

सिलिका जेलची पुडी

औषधाच्या, तसेच इलेक्ट्रॉनिक्सच्या खोक्यांमध्ये कोरड राहावी म्हणून छोट्या छोट्या पुड्या वापरतात. त्या वापरून बघाव्यात. (सिलिका जेल आर्द्रताशोषक विकी दुवा.)

(माझा या बाबतीत वैयक्तिक अनुभव नाही. गोव्यात कॅमेर्‍याला बुरशी आल्याचे आठवत नाही. काही खास काळजी घेतल्याचे आठवत नाही.)

बुरशी

लेन्सवरील बुरशी [फन्गस्] पावसाळ्यात जास्त येते. पुण्यातही त्याचा त्रास होतो. श्री. धनंजय यांनी लिहल्याप्रमाणे सिलिका जेलचा
उपयोग करणे हा सवोत्तम उपाय. जेलच्या दोन-तीन ग्रामच्या कापडातील पिशव्या मिळतात. जेथे कॅमेरा ठेवता त्या कपाटात या
पिशव्या ठेवाव्यात. त्या आर्द्रता शोषून घेतात. बुरशी फ़क्त दमट जागीच निर्माण होते/टिकून रहाते. त्यामुळे सिलिका जेलच्या वापराने
ती टाळता येते. पावसाळ्यात कॅमेरा कातडी किंवा प्लास्टिकच्या पिशवीत न ठेवता बाहेरच ठेवावा. दर ४-५ दिवसांनी लेन्स काढून
कोरड्या फ़डक्याने साफ़ करावी. शक्य तो कॅमेरा लाकडी कपाटात ठेवू नये. कॅमेरा केसमध्ये असेल तर केसही आतून बाहेरून कोरडी
ठेवावी.
सावंतवाडीला सिलिका जेल मिळाली नाही तर मला कळवा.माझ्याकडे भरपूर आहे. पाठवावयाची व्यवस्था करता येईल.
शरद

सिलीका जेल

नक्की कळवीन!! आभार !! :)
सिलीका जेल च्या पुड्या पुन्हा वापरता येतात का?

उपाय...

मागे बेटर फोटोग्राफिच्या मासिकात या समस्येवर एक उपाय वाचला होता.
आपल्या लेन्सच्या उंचीपेक्षा जरा जास्त उंची असलेली प्लॅस्टिकची हवाबंद बाटली/कंटेनर आणावा. या बाटलीत खालून आणि वरुन थर्माकोलच्या चकत्या बसवाव्यात. या चकत्यांचा मध्यभाग कापून लेन्स त्यात घट्ट बसेल आणि बाटलीत हलणार नाही अशी सोय करावी. नंतर सिलिका जेलची एखाददुसरी पुडी त्या बाटलीत ठेऊन घट्ट झाकण लावून बाटली उघड्यावरच ठेवावी. किंवा मग लेन्स ठेवण्यासाठी निर्वात पोकळी करण्याची सोय असलेले डबेही बाजारात मिळतात. असे डबे मुंबईत मिळू शकतात.
व्यावसायिक फोटोग्राफर आपल्या अशा अनेक वस्तू ठेवण्यासाठी आर्द्रता नियंत्रित करता येईल अशा कॅबिनेट वापरतात. अशा कॅबिनेट मुंबईत कालाभाई ऍन्ड सन्स यांच्याकडे मिळू शकतात.

वरचा बाटलीचा उपाय तर करायला खूपच सोपा आहे. आणि आपल्या पाच ते पन्नास हजारापर्यंतच्या लेन्ससाठी सगळ्यांनी जरुर करावा. कारण एकदा बुरशी आली तर महागड्या लेन्स नीट चालत नाहीत आणि मग मातीमोल किंमतीला विकाव्या लागतात.

याबरोबरच (निदान पावसाळ्यात तरी) दर आठवड्याला सगळ्या लेन्स कॅमेर्‍याला बसवणे आणि त्या पूर्ण झूम रेंजमध्ये वापरुन काही फोटो काढणे असाही उपाय जरुर करावा. (मी हेच करतो) लेन्स सतत वापरल्या तर बुरशी येत नसावी बहुधा.

बाकी माझ्या लेन्सेससाठी मी बरेच दिवस हवाबंद कंटेनर आणून ठेवले आहेत पण अजून करणं झालेलं नाही.;-)
माझं झालं तर मी काही फोटो टाकेन.

शरद, सिलिका जेल पुण्यात कुठे मिळेल? मला हवे आहे.

-सौरभदा.

==================

'उलट ही लेणीबिणी, ताजमहाल लवकर फुटून जाईल तर बरं. काहीही कायम करायला बघणं म्हणजे मूर्खपणा आहे.'

उपाय

[१] बुरशी आलेल्या लेन्सेस साफ़ करून मिळतात. माझ्या कित्येक लेन्सेस मी किमान ४-५ वेळा साफ़ करून घेतल्या
आहेत. चांगला, खात्रीलायक माणूस चार दिवसात बुरशी काढून देतो. पूर्वी १००-१५० रुपयात काम होत असे. हल्ली किती
घेतात माहित नाही.
[२] लॅबोरेटरी चेमिकल्स विकणाऱ्या दुकानात सिलिका जेल मिळते. नाहीतर माझ्याकडे.
शरद

आभार

सर्वांनि दिलेल्या माहितीबद्दल शतशः आभार.

माहिती

या संबंधात आंतरजालावरही माहिती उपलब्ध आहे.

----

आभार

माहिती डोळे उघडणारी होती.

 
^ वर