उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
दहशदवादावर करावयाची उपाय योजना
अविनाश रायकर
November 28, 2008 - 10:31 am
मुम्बई वरील दहशदवादी हल्ल्या ची भयानकता आपण सर्व वाचतो आहोत.
हे वाचतना आपल्या मनात भरपूर शन्का आल्यात नाही का?
सूरक्षे बाबत अनेक त्रूटी आपल्या लक्षात आल्या.
अशा प्रसन्गी काय प्रकारची उपाय योजना यन्त्रणा असावी असे आपल्याला वाटते या विषयी आपण आपली मते जरुर मान्डावी.
या उपाय योजना अल्प कालीन व दीर्घ कालीन अशी मान्डणी लेखकानी करावी.
दुवे:
Comments
उपाय योजना
तसं तर करण्यासारख्या उपाय योजना खूप आहेत आणि अशा उपाय योजना सुचवणं हे खूपच सोपं काम असतं. इथे बसून अशा उपाय योजनांवर गप्पा मारणं म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यातल्याच प्रकार आहे असं मला वाटतं.
त्यामुळे मूळ प्रस्तावात थोडासा बदल करून 'दहशतवादावर आपण करू शकतो अशी उपाय योजना' असा प्रस्ताव ठेवावा असं माझं मत आहे. याचा अर्थ दहशतवाद थांबण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो यावर चर्चा व्हावी असं मला वाटतं. मी स्वतः अशा मताचा आहे की दहशतवादाला आपल्या देशात रुजायला आणि त्याला खत पाणी द्यायला आपल्या देशातला भ्रष्टाचार कारणीभूत आहे. आणि आपल्या देशातला भ्रष्टाचार आणि पर्यायानं दहशतवाद कमी करायला आपण नक्कीच हातभार लावू शकतो.
काही वर्षांपूर्वी एकदा बहारीनहून परत येताना विमानातून बाहेर पडून विमानतळावर माझ्या पुढे एक अरब महाशय चालत होते. त्यांनी हातात उघड डॉलरस् चा एक गठ्ठा पकडला होता आणि इमिग्रेशन अधिकारी, पोलिस, कस्टम अधिकारी सगळयांना त्यातल्या थोड्या थोड्या नोटा वाटत होते आणि हे सारे अधिकारी लाचार थोबड्यानं या नोटा स्विकारत होते. रांगेत मी या महाराजांच्या मागोमागच असल्यामुळे मी आणि इतर प्रवासीही हा सारा प्रकार उघड डोळ्यानी बघत होतो आणि सारेच अवाक् झालो होतो. आता हे अगदीच उघड होतं की हे अरब महाशय काही त्यांच्या मशिदींमधले कोणी मुल्ला मौलवी नव्हते तर नक्कीच कुठल्यातरी काळ्या धंद्यातले व्यापारी किंवा गुन्हेगार होते. या देशात येऊन काहीतरी काळाबेरा उद्योग करण्याचाही त्यांचा उद्देश असणार. इमिग्रेशन अधिकारी, पोलिस, कस्टम अधिकारी यांना हे सारं न कळण्याइतपत ते दूधखूळे होते का? या महोदयांना कोणताही त्रास न होता, त्यांच्या बॅगा उघडल्या न जाता (त्या काळी एक्सरे स्कॅनिंग नव्हतं), ते सही सलामत ग्रीन चॅनेल मधून बाहेर पडले. त्यांच्या बॅगांमधून जो माल भारतात आला कदाचित त्यात शस्त्रास्त्रंही असतील कदाचित आणखी काही...
माझ्या कामामुळे माझा सीमाशुल्क विभागाशी संबंध येतो. परदेशातून भारतात आयात केल्या जाणार्या मालाचं कस्टम क्लीअरन्स कसं करतात हे मी बर्याच वेळेस जवळनं बघितलंय. या आयात् कंटेनर्समधे काय भरलंय, कागद पत्रांमधे दाखवलेलाच माल कंटेनर्स मधे आहे का, याची शहानिशा करण्याचं काम सीमाशुल्क अधिकार्याचं असतं. ही सारी शहानिशा टेबलवर बसूनच केली जाते. या शहानिशेची जेवढी जास्त किंमत तुम्ही द्याल तेवढी पटकन शहानिशा आणि तेवढं कमी सीमा शुल्क. हे पुनःपुन्हा सिध्द झालंय की या कंटेनर्समधून शस्त्रास्त्रांची आयात होते. ही शस्त्रास्त्रं येऊन इथे दहशतवाद माजवतात, तरीही शहानिशेचा हा व्यवहार शहाजोगपणे आजही अव्याहत चालू आहे.
या कस्टम अधिकार्यांना, पोलिसांना, सरकारी लोकांना भ्र्ष्टाचारी बनवण्यात आपलाही वाटा असतो. रस्त्यात पोलिसानं थांबवलं तर लायसन्सच्या आधी पन्नासाची नोट आपण बाहेर काढतो. आपण निदान आपल्यापुरता असा संकल्प केला पाहिजे (आणि मी स्वतः तो केला आहे) की कधीही मी लाच देणार नाही (आणि घेणार नाही, जर तुम्ही तशा प्रकारच्या हुद्द्यावर असाल तर). जर भारतातला भ्रष्टाचार अशा पद्धतीनं निदान २५% जरी कमी झाला तरीही दहशतवाद कमी होण्यास काही प्रमाणात तरी नक्कीच मदत होईल असं मला वाटतं.
सहमत
१००% सहमत
खरं तर या बद्दल बरंच काहि लिहायचंय पण फारच खचल्यासारखं वाटतंय+रागाने मनात थैमान घातलंय + स्वतःचीच लाज वाटतेय.. काहि काहि सुचत नाहि आहे.. ना काहि करावंस वाटतं आहे :((((
तुमचंही असंच होतंय का?
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
हो
काहीसं असच वाटतयं. पण ही वेळ कृतीची आहे. म्हणजे उठा आणि कृती करा असं नाही. विचार करा. आपण कुठे चुकतोय याचा. मुख्य म्हणजे धर्मनिरपेक्ष तत्व खरच उपयोगी आहे की अवघड जागेचे गळू? याचा.
राजकिय चिखलफेक आणि स्वार्थाची समीकरणे हा आमचा इतिहास आहे. आता या पुढचा इतिहास कसा असावा हे ठरवायची वेळ आपली आहे. हेच जर आत्ता आघाडी सरकारे नसती तर बरेच निर्णय एका झटक्यात झाले असते. नवे कायदे आणि त्याची अंमलबजावणी ताबडतोप झाली असती. आघाडी सरकारे बनवून विवधतेत एकता दाखवायचा खोटा अभिमान कधी संपणार?
लोकशिक्षणाच्या कृतीची गरज आहे. आपले विचार हे देशाचे विचार कसे बनतात हे प्रत्येकाला कळण्यासाठी जे शिक्षण हवे ते देण्याची गरज आहे. बाकी काय लिहायचं म्हटल तर नेहमीचेच मुद्दे लिहिण्यात काय अर्थ आहे? जे आहे ते बदलायचं आहे आणि ते बदलायच कर्तव्य आजच्या तरुणांच आहे. हे समजून सुद्धा आजचे तरूण षंढासारखे बसून आहेत. याची मात्र खात्री दरवेळी जेंव्हा अशा घटना घडत जातात तेंव्हा पटत जाते.
डोके भडक ठेउन कुणाचे भले झाले नाही.
डोके भडक ठेउन कुणाचे भले झाले नाही.
आपली घटना घडून गेली की विसरण्याची पद्धत आहे.
शान्त व्हा , आणि लेखनी उचला. स्वारी ! की बोर्ड चालवा आणि जरूर काहीतरी लीहा.
धन्यवाद् !
अविनाश रायकर
दूर्जनांच्या दुष्कृत्यांपेक्षा सज्जनांची निष्क्रीयता जास्त भयावह
जसा रोग तसा उपाय
पहिला मुद्दा-
१) भ्रष्टाचार वगैरे सर्व मुद्दे बरोबर आहेत. फक्त राज्यकर्तेच भ्रष्टाचारी आहेत असे नाही. ही कीड समाजात सर्व थरांत पसरली आहे. सर्वसामान्य माणूसही भ्रष्टाचाराचा मोह टाळू शकत नाही. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे. राजेशाहीत 'यथा राजा तथा प्रजा' हे जसे खरे, तसे लोकशाहीत 'जसे लोक तसे त्यांचे नेते' हेही खरे. एखादा मंत्री कोट्यवधी रुपये खात असेल आणि एखादा सरकारी कारकून दिवसाला फक्त शंभर रुपये खात असेल, पण दोघांची 'दानत' एकच आहे.
या आपल्यामधील- शासनव्यवस्था, राज्यकर्ते, आपल्यासारखे नागरिक यांतील- दोष, त्रुटी, अवगुण आहेत. म्हणजे आपल्या समाजाचे स्वतःचे दोष. हा एक अंतर्गत मुद्दा.
पण दुसरा मुद्दा-
२) हे एका देशाचे दुसर्या देशावरील सरळ सरळ, दहशतवादाच्या बुरख्याआडचे सैनिकी आक्रमण आहे. आज ना उद्या या गोष्टीला तोंड दिलेच पाहिजे. अशा परिस्थितीत आक्रमक देशाविरुद्ध, आक्रमण झालेल्या देशाने कोणती भूमिका घ्यायला हवी ? ती का घेतली जात नाही ? या मागची कारणे कोणती ? शस्त्राने निर्माण झालेले प्रश्न शस्त्रानेच सुटू शकतात. 'जशास तसे' या न्यायाने आपल्या राज्यकर्त्यांनी- ज्यांच्या हातात सत्ता, सैन्य, गुप्तचर यंत्रणा आहे त्यांनी - व्यवहारी आणि कठोर भूमिका घेतली तरच हा प्रश्न सुटू शकेल.
या प्रश्नांची तात्विक उत्तरे मिळाली तरी जो पर्यंत ती अमंलात आणून त्यानुसार समाजात- राज्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक दोघांमध्येही- सुधारणा होत नाही तो पर्यंत हे प्रश्न कायमच राहणार.
त्यामुळे राज्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक दोघांची नीतिमत्ता सुधारुन, त्यांना आपल्या सामाजिक कर्तव्यांविषयी योग्य ती जाण उत्पन्न झाली तरच ... काही आशा आहे.
एका वा काही व्यक्तीनी सुधारून या प्रश्नांवर तोडगा निघणार नाही. आपण फक्त आपल्या शक्तीनुसार प्रामाणिक प्रयत्न करू शकतो इतकेच.
.
--------------------------------------------------------
अवांतर :
एक अत्यंत दरिद्री परंतु नीतिमान असा मनुष्य होता. दोन वेळचे पोटभर अन्नही दिवसभर कष्ट करून त्याच्या व त्याच्या कुटुंबियांच्या नशिबी नसे. अशा परिस्थितीत त्याने आपल्या मित्राला या बाबतीत सल्ला विचारला. मित्र म्हणाला, 'या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे. तू राजा झालास म्हणजे तुझे सर्व कष्ट संपतील !' त्याला वाटले, छान उपाय सापडला ! उत्साहात तसाच घरी येऊन आपल्या बायकोला तो म्हणाला, 'आता या पुढे आपल्याला कधी उपाशी राहावे लागणार नाही. मी राजा झालो म्हणजे आपल्या सर्व समस्या दूर होतील.' साळसूद चेहर्याने आपल्या नवर्याकडे पाहत ती म्हणाली, 'हो..., पण तुम्ही राजा होणार कसे ?'
या प्रश्नांची उत्तरे म्हटली तर फार सोपी आहेत. माझ्या मते आपल्याजवळ या प्रश्नांवर उपाय नाहीत हा प्रश्न नाही. ते असूनही अमलात येत नाहीत हा प्रश्न आहे.
प्रश्न
प्रश्न चांगले आहेत पण आत्ता काही लिहीणे शक्य नाही. भावनांचा अतिरेक होणे म्हणजे नेमके काय याचा सध्या अनुभव येतो आहे.
----
प्रश्न
२) हे एका देशाचे दुसर्या देशावरील सरळ सरळ, दहशतवादाच्या बुरख्याआडचे सैनिकी आक्रमण आहे. आज ना उद्या या गोष्टीला तोंड दिलेच पाहिजे. अशा परिस्थितीत आक्रमक देशाविरुद्ध, आक्रमण झालेल्या देशाने कोणती भूमिका घ्यायला हवी ? ती का घेतली जात नाही ? या मागची कारणे कोणती ? शस्त्राने निर्माण झालेले प्रश्न शस्त्रानेच सुटू शकतात. 'जशास तसे' या न्यायाने आपल्या राज्यकर्त्यांनी- ज्यांच्या हातात सत्ता, सैन्य, गुप्तचर यंत्रणा आहे त्यांनी - व्यवहारी आणि कठोर भूमिका घेतली तरच हा प्रश्न सुटू शकेल.
उममन्यु, म्हणजे तुम्हाला म्हणायचे काय आहे. दुसर्या देशावर आक्रमण करायच? आणी जरि असं केलं तरी दहशतवाद थांबेल काय?
कळत नाही
सुरूवात कुठून करायची? आकाश फाटले असल्याची भावना गेल्या दोनतीन दिवसांत झाली. कुठे भावना व्यक्त कराव्यात हे कळेना.
हताश व्हायला झाले.
तरी मला वाटते स्वतःपासून सुरूवात करावी. मला सुचलेले काही-
१. बातम्या वाचून कितीही त्रास झाला तरी आजूबाजूच्या जगात, काय घडते आहे हे समजून घ्यावे. मग ते तुमची राहती इमारत असो, सोसायटी, गाव किंवा राज्य. सुरूवात लहान करावी.
२. प्रत्येक गोष्टीला "चलता है" असे म्हणू नये.
३. समविचारी लोक शोधणे, आणि गरज पडेल तेव्हा राजकारणी लोकांपर्यंत आपल्या भावना पोचवू शकण्यासाठी आधी पासून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करणे (त्यासाठी आधी मतदान करणे).
४. प्रसारमाध्यमांना जमेल तेव्हा शिक्षित करणे.
५. आपल्या माहितीतील शाळा-कॉलेजातील मुलांना याबद्दल विचार करायला लावणे (पुढची पिढी म्हणून. हे विचार नुसते संताप व्यक्त करण्यासाठी नाहीत तर नक्की कोठे चुकते आहे ह्याबद्दल विचार करण्यासाठी).
६. आपल्या जवळ राहणार्या इतरधर्मियांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे (वेळ पडल्यास मुद्दाम/ठरवून).
चित्रा
उत्तम
उत्तम कसदार सुचना
३,६ व मुख्यतत्त्वे ५वा हे मुद्दे खूपच पटले
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
सहमत
सहमत आहे. जोपर्यंत हा धोका भाषा, प्रांत, धर्म यांच्या पलिकडे जाऊन सर्वांना जाणवत नाही तोपर्यंत मुळापासून बदल होणे शक्य नाही.
----
चलता है
'चलता है' चे एक उदाहरण इथे पहा.
----
खरच!
परवाच्या शुक्रवारी, आमच्या जवळच एका मंडपात चक्क फटाके फोडले गेले.. बँडवर नाच होता..
मला तर आधी गोळीवबार की फटाके हेच कळेना
ताजमधे गोळीबार चालु असताना बँडवर मनसोक्त नाचणे लोकांना जमते हे बघून माझ्या गोंधळात प्रचंड भर पडली आणि खचण्याच्या प्रक्रियेत अजून एक पायरी उतरलो :((
(सुपातला)ऋषिकेश
माणुसकी???
अशी उदाहरणे पाहिल्यावर माणुसकी या शब्दाला कितपत अर्थ आहे असे वाटायला लागले आहे.
शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की हत्ती, चिंपाझी, सिंह हे सर्व या ना त्या प्रकारे त्यांच्या मृत साथीदारांसाठी शोक व्यक्त करतात. याचा अर्थ हे सर्व प्राणी आपल्याहून अधिक सुसंकृत आहेत.
----
सहमत
उपाय पटण्यासारखे व जमण्यासारखे आहेत.
सहमत
उपाय पटण्यासारखे आहेत, फक्त सहाव्या मताबद्दल मी तितकासा सहमत नाही.
६. आपल्या जवळ राहणार्या इतरधर्मियांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे (वेळ पडल्यास मुद्दाम/ठरवून).
इतरधर्मियामधे कोणीतरी भविष्यात अपवाद सोडावे लागतील ? ( समजदार को इशारा काफी है )
-दिलीप बिरुटे
नाही
नाही, अपवाद करून चालणार नाही.
काही विचार - दहशदवाद दूर करण्यासाठी
सबळ राजकीय ईछ्छा असेल तर काहीच अशक्य नाही पण-----
अल्प कालीन :
१) अशा प्रसन्गान्चे " लाईव प्रक्षेपण तात्पुरते थाम्बवावे.
२) सर्व अति महत्वाच्या व्यक्ति यान्च्या भेटी टाळाव्यात.
३) फक्त कामासाठी लागणार्या लोक तीथे थाम्बवावेत.
४) ताबडतोब १४४ कलम लावावे.
६) आपत्कालीन कामासाठी लागणारी शस्त्रे , वहाने यान्चा पुरेसा साठा सम्बधितान्कडे असावा.
७) अशी एक सरकारी वाहीनी असावी की त्यावरुन दिली जाणारी सूचनेला कायदेशीर स्वरूप असेल. या वाहीनीवरुन साधरणपने , शाळा, महाविद्यालये, रेल्वे, रक्ताची गरज, वैद्यकीय मदत , फक्त अशा प्रकारच्या सूचना द्याव्या.
दीर्घ कालीन उपाय योजना
१) देशात एकाच प्रकारचे ओलखपत्र , सर्व नागरीकाना देउन, अनेक ओलख पत्र वेगळ्या कारणासाठी हा प्रकार बन्द व्हावा.
हे ओलख पत्र ऐछ्छिक ठेवावे. परन्तु हे ज्याच्याकदे असेल त्यालाच त्यावर " फायदे " द्यावेत.
२) १२वी नन्तर सर्व विद्यार्थ्र्याना मिलीटरी शिक्षण ऐछ्छिक ठेवावे पण ते पूर्ण करणार त्यालाच ,शिक्षणात, नोकरीत , धन्द्या मधे सूट द्यावी.
३) वरील ऐछ्छिक हा पर्याय ' कम्पलसरी' मधे बदलु शकतो.
४) पोलीस, शिक्षक यान्चे पगार एवढे वाढवा की आय् टी मधिल जाणारा विद्यार्थि , या क्षेत्राकडे स्वेछेने वळेल. म्हणजे या क्षेत्रान्कडे करीअर म्हणुन पाहीले जाइल.
हे विचार मी वानगी दाखल लिहिले आहेत.
आपण जाणकार अजून छान भर घालाल अशी अपेक्षा आहे.अपेक्षा आहे की आता थोडे तरी थन्ड झाला असाल.
धन्यवाद् !
दूर्जनांच्या दुष्कृत्यांपेक्षा सज्जनांची निष्क्रीयता जास्त भयावह
काल
एक चर्चा बघताना एका गृहस्थांनी असेच मुद्दे मांडले.
१. पाकिस्तानातील सर्व अतिरेकी क्यांप नष्ट करावेत.
२. १८ च्या वरील सर्व तरूणांना एक वर्ष मिलीटरी शिक्षण द्यावे.
२. मध्ये मला मिलीटरी किंवा सामाजिक कार्य असा बदल करावासा वाटतो. बर्याच पाश्चात्य देशात अशी पद्धत आहे.
यावर अर्थातच चर्चा होऊ शकते.
----
दहशतवादाचे आव्हान
महाराष्ट्र टाइम्स ने "ओपन हाऊस" साठी "दहशतवादाचे आव्हान" हा विषय दिला आहे. त्यावर लोकांचे प्रतिसाद येत्या रविवारच्या अंकांत येतीलच. मी त्यासाठी पाठवलेल्या मजकुराचा गोषवारा:
"....नागरिकांची वैयक्तिक सुरक्षा हे काम सरकारने पूर्णपणे स्वतःच्या अंगावर घेतल्यामुळे स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र बाळगणे म्हणजे बेकायदा कृत्य करण्यासारखे आहे. त्यामुळे आपल्यावर होणार्या सशस्त्र ह्ल्ल्यांत वैयक्तिक सुरक्षेसाठी ना आपण स्वतः काही करू शकत ना आपले सरकार काही करू शकत! ...... नुसत्या उपदेशापेक्षा व आश्वासनांपेक्षा इच्छुकांना पिस्तुल बाळगण्याचा परवाना व प्रशिक्षणही मिळाले तर ते अधिक उपयोगी ठरेल. त्यामुळे स्थानिक गुन्हेगारीही काही प्रमाणांत कमी होईल. शिवाय एखाद्या ठिकाणी रस्त्यावरून जाणार्या येणार्या सामान्य लोकांकडेही शस्त्रे असतात हे माहीत झाल्यावर दहशतवादीही त्या ठिकाणी जाण्यापूर्वी दहा वेळा विचार करतील. छत्रपति शिवाजी टर्मिनस मध्ये दहशतवादी गोळीबार करीत असतांना गर्दींतील दहाजणांकडे जरी पिस्तुले असती व त्यांना थोडेफार प्रशिक्षण असते तरी बराच अनर्थ टळला असता."
आजच्या टाइम्स् ऑफ् इंडिया च्या नवव्या पानावर The right to be armed या बातमींत म्हंटल्याप्रमाणे Members of Indians for Guns या संस्थेच्या सभासदांचा असा विश्वास आहे की शस्त्रसज्ज नागरिक दहशतवाद्यांच्या हल्ल्याची तीव्रता कमी करू शकले असते. (भाषांतराची चूकभूल द्यावी घ्यावी).
यावर कदाचित अशी शंका उपस्थित होईल की दहशतवाद्यांजवळ असलेल्या मशीनगन पुढे पिस्तुलाचा काय पाड लागणार? याबाबतीत आमेरिकेचे व्हिएतनाममध्ये बाँम्बहल्ले चालू असण्याच्या काळात प्रचलित असलेला एक किस्सा विचार करण्यासारखा आहे. प्रत्येक व्हिएतनामी बंदूकधारी होता. त्याबाबत एका वार्ताहराने एका व्हिएतनामी नागरिकाला विचारले "बंदुकीच्या गोळीने बाँम्बर विमान पडण्याची शक्यता किती आहे?" "हजारांत एक" व्हिएतनामी उत्तरला व पुढे म्हणाला, "पण विमान पाहिल्यावर एकच बंदूक उडते असं नाही. हजारो बंदुका एकाच वेळी उडतात." अमेरिकेला व्हिएतनाममधून गाशा गुंडाळावा लागला हे सर्वज्ञात आहे.
सहमत पण...
पूर्णपणे सहमत आहे. लोकांकडे शस्त्रे असती तर काही प्रमाणात प्रतिकार नक्कीच झाला असता. व्हिटीवर दोन कॉन्स्टेबलनी ३०३ वापरून अतिरेक्यांना मागे जाण्यास भाग पाडले.
पण याची दुसरी बाजू म्हणजे अमेरिकेतील हत्यारे बाळगण्याविषयीचा सैल कायदा आणि शस्त्रांचा वापर. याबद्दल बरेचदा लिहीले गेले आहे.
----
प्रत्येक व्यक्ती कडे शस्त्रे नको
प्रत्येक व्यक्तिकडे शस्त्रे नको.. मात्र प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी काहि पदाकडे (व्यक्तीनिरपेक्ष)शस्त्रे असावीत असे वाटते. जसे स्टेशनात तिकीट तपासनीसांकडे, शाळेत शिक्षकांकडे, बँकेत स्टाफकडे वगैरे.
शिवाय कायदाहि कडक हवाच
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
यासंबंधी
सध्याचा (भारतीय) कायदा काय म्हणतो? मला पिस्तुल बाळगायचा परवाना हवा असेल तर काय करावे लागते? काही अटी वगैरे?
यासंबंधी कुणाला माहिती असल्यास कृपया द्यावी.
----
नागरीकानी घेण्याची काळजी
सर्व नागरीक खाली लिहील्याप्रमाने काळजी घेउ शकतात.
१) घर मालकानी भाडेकरु ठेवताना , त्याचे ओळख पत्र , इलेक्शन् कार्ड, रेशन कार्ड, कम्पनी पत्ता, बन्क अकौनट क्रमान्क जरूर मागावे. जशा हल्ली बन्का नो युवर कस्टमर , धोरण जरूर स्विकारतात. शन्का आल्यास पोलिसाना कळवणे.
२) आपल्या भागात कोणी नवीन आल्यास त्याची घर मालकाकडे चौकशी आवर्जुन करावी.
धन्यवाद् !
अविनाश रायकर
दूर्जनांच्या दुष्कृत्यांपेक्षा सज्जनांची निष्क्रीयता जास्त भयावह
काहि तुलना आणि वस्तुस्थिती - दहशदवाद
काय उपाय असावे आणि असु नये हे खालिल लिखाणावरुन सहज समजून येइल. एक मेल् सगळीकडे फिरत आहे त्याचा हे स्वैर भाषांतर आहे.
१) बोटीतुन येणा-या दहशदवाद्यान्वर कारवाई करता येइल, पण मतदानाने निवडून आलेल्या नेत्यावर काय करता येईल
२) एन् एस् जी च्या कमान्डो बेस्ट च्या बस मधुन प्रवास करतात , आणि आमचे क्रिकेटर लक्झ्ररी बस मधुन जातत.
३) क्रिकेटरान्चे मानधन पहा व आमच्या सैनिकान्चे
४) आमचे मन्त्री स्पेशल हेलिकोपटर मधुन , आणि आरमी, एन् एस् जी याना मात्र कायम स्वरुपी एअर क्राफ्ट नाही.
५) आमच्या नेवी कडे २५ शस्त्र भरलेली जहाजे तर आमच्या छत्तीसगड एवढे असणार-या कोरया सुद्धा २५० जहाजे पूर्ण शस्त्राने भरलेलि असतात.
६) ऑलीम्पीकच्या बक्षीसाची रक्कम पहा व देशासाठी मरना-या सैनिकाना मिळणारी रक्कम , केवढी ही तफावत !
या निमित्ताने तरी या सर्व बाबीन्चा प्रामाणिक पणे विचार व्हावा नाही का?
धन्यवाद् !
अविनाश रायकर
दूर्जनांच्या दुष्कृत्यांपेक्षा सज्जनांची निष्क्रीयता जास्त भयावह
महाराष्ट्र टाईम्स - चर्चा
महाराष्ट्र टाईम्स मधील चर्चा आपण सर्वानी वाचली का?
त्यातील काही मुद्दे, जे या चर्चेत आले नाहीत ते आपण येथे सामील करु या.
धन्यवाद् !
अविनाश रायकर
दूर्जनांच्या दुष्कृत्यांपेक्षा सज्जनांची निष्क्रीयता जास्त भयावह