उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मानवातील गुप्त शक्ति............
सचिन खुटवड
November 24, 2008 - 8:51 am
मानवात खरेच गुप्त् शाक्ति आसतात का?
उ. दा. -
१) समोरिल् व्यक्ति च्या मनातिल विचार् ओळ्खने.
२) समोरिल् व्यक्ति चे आजार दुर करने.
३) समोरिल व्यक्ति ला येनार्या सन्कटाचि जानिव करुन देणे , ईत्यादि.
क्रुपया या विशयि काहि मार्गद्श्र्न् करावे.
दुवे:
Comments
काय लिहावे?
कळत नाही. सर्व २० ओव्हर फ्री हिट! .
----
जीवनात येणारे चमत्कारीक आनुभव ( आतिद्रिय शक्तिना निगडित् )
आपल्या प्रतेकाच्या जिवनात कधि ना कधि अशा काहि गोश्टि घड्ताना दिसतात , कि त्या कल्पनेच्या पलिकडिल असतात.
आपनास आलेले आनुभवावर आपन चर्चा करुयात. याचा गुप्त् शाक्तिशि काहि सम्बध्न आहे का?
क्रुपया मार्गद्र्शन करावे. तसेच आपनास आलेले आनुभव पटवावेत.
याला आपान सन्शोधित् विद्न्यान म्हानु शकतो का?
समोरील व्यक्तीच्या मनातील विचार ओळखणे
लहान मुलांमध्ये ही शक्ति असते. किंबहुना लहानपणी प्रत्येक माणसात ही शक्ति असते कारण संवेदनाशीलता अधिक असते. लहान मुले मोठ्या माणसांच्या मनांतले ओळखू शकतात. विचार हे केवळ शब्दांतून व्यक्त होतात असे नाही तर चेहर्यावरचे हावभाव, काही सूक्ष्म शारीरिक हालचाली यांतूनही व्यक्त होतात. लहान मुले या सर्व गोष्टी टिपू शकतात. इतकी संवेदनशीलता मोठेपणी त्रासदायक वाटते म्हणून माणसे ती दडपून टाकतात. याचे माझ्या माहितीतले एक उदाहरण म्हणजे एका दोन अडीच वर्षाच्या मुलीची आई शेजारणी बरोबर त्या मुलीबद्दल इंग्रजीत बोलत होती. मुलीची मातृभाषा मराठी होती व तिला इंग्रजी येत नव्हते तरी देखील तिला तिच्या आईने शेजारणीला काय सांगितले ते कळले होते हे तिने आईला नंतर विचारलेल्या प्रश्नावरून लक्षांत आले.
सहमत पण ...
या शक्तीला मानसशास्त्रीय इंट्यूशन म्हणता येईल. यात अतींद्रीय भाग कितपत येतो याबद्दल शंका आहे. एरिक बर्न यांच्या मते एखादे लहान मूल ज्या कुशलरीतीने माणसाच्या मनातील विचार ओळखते ते भल्या भल्या मानसोपचार तज्ञांना वीस-वीस वर्षे अभ्यास करूनही जमत नाही. अर्थात मोठे झाल्यावर ही शक्ती लुप्त पावते/कमी होते. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे लहान मूल स्पर्श चटकन ओळखते. ज्याला/जिला मूल घ्यायची सवय नसते त्याच्याकडे/तिच्याकडे जाण्यास नाखूष असते.
----
अर्थात मोठे झाल्यावर ही शक्ती लुप्त पावते/कमी होते.
अर्थात मोठे झाल्यावर ही शक्ती लुप्त पावते/कमी होते. कारण लहान मुला मध्ये जी निरागसता / निष्पाप
पणा आसतो तो कदाचित मोटे झाल्यावर लोप पावत असेल म्हनुन बर्याचदा मोठे झाल्यावर ही शक्ती लुप्त /कमी होत असावि. आणि हिच
निरागसता / निष्पापपणा टिकवुन ठेऊन ठेवता आला तर हि शक्ती देखिल टिकुन राहते. तसेच लाहान मुलान मध्ये जी विश्वास ठेवन्यचि व्रुत्ति असते त्या मुळे देखिल त्याना हि शक्ति साध्य होत असेल.
अतिंद्रिय शक्ती वगैरे
माणसाला अतिंद्रिय शक्ती असणे नसणे हा सर्व श्रद्धेचा भाग आहे. "देव आहे किंवा नाही याप्रमाणेच." अशा अतिंद्रिय शक्तींचा बडेजाव माजवून भोळ्या श्रद्धा़ळूंना (खरेतर ग्राहकांना) नाडण्याचे उद्योग होत नसतील तर अतिंद्रिय शक्तींवर विश्वास असणे/ नसणे हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे.
अन्यथा, एखाद्याची प्रकर्षाने आठवण होणे आणि ती व्यक्ती दत्त म्हणून समोर उभी ठाकणे, सूचक स्वप्ने पडणे, बोल खरे ठरणे इ. इ. गोष्टींचा अर्थ प्रत्येकाने आपल्या मकदुराप्रमाणे लावावा. त्यातून काही सिद्ध होईलच असे नाही.
बाकी, आजार दूर करणारे बाबा-बुवा अनेक पाहिले आहेत. माझा त्यांच्यावर विश्वास नाही. कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आपले कार्यक्रम ते संमोहन शास्त्र म्हणून विकतानाही पाहिले आहे.
चमत्कार
याला मि चम्त्कार म्हनत नाहि. हि मानवातिल शक्ति आहे.
या शक्ती असतात खर्या पण त्या "गुप्त" का?
बहुतेक लोक "समोरच्या व्यक्तीच्या मनातील विचार" ढोबळमानाने ओळखू शकतात. (काही दुर्दैवी बालके या बाबतीत अधू असतात, पण ही फार थोडी.)
कित्येक लोक समोरील व्यक्तीचे आजार दूर करू शकतात. आईने आजारपणात फिरवलेला मायेचा हात वेदना कमी करतो, हा अनुभव कित्येक लोकांना आला असेल. इतकेच काय, "दुखर्या अंगाचा पापा [मुका] घेऊन, किंवा गोंजारून" दुखणे दूर करता येते, मूल रडायचे थांबते, हसू लागते, याचा अनुभव आपल्यापैकी जे आई-वडील झालेले आहेत, त्यांना स्वतःहून आला असेल. म्हणजे अशा प्रकारे बरे झाल्याचा, आणि अशा प्रकारे कोणाला बरे केल्याचा अनुभव सार्वत्रिक असावा.
लोक एकामेकाना धोक्याची पूर्वसूचना सहजासहजी देतात. लोकांनी मला दिलेली आहे, मी लोकांना दिलेली आहे. अन्य लोकांना एकमेकांना सूचना देताना मी ऐकले आहे.
हे सर्व सामान्य अनुभव असताना चर्चालेखकाने "गुप्त" शक्ती असे का बरे म्हटले असावे? कोणी आई-वडील मुलामुलींवर माया असतानाही ती गुप्त ठेवतात, तेहा ती "गुप्त" शक्ती म्हणावी काय?
"गुप्त" शक्ती
"गुप्त" शक्ती या साटि की त्यावर आजुन सन्शोधन होणे आहे.
योगायोग
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.टग्या यांनी योगायोगाचे उत्तम विवेचन केले आहे.बहुसंख्य माणसांना संख्याशास्त्र, संभवनीयता, लॉ ऑफ रॅण्डमनेस इ.विषयी काहीच माहिती नसते."तुला मुलगा होईल" असा आशीर्वाद एखाद्या गरोदर बाईला कुण्या बुवाने दिला, नंतर तिला मुलगा झाला तर त्या बुवाकडे दैवी शक्ती आहे यावर त्या स्त्रीचा विश्वास बसतो.इथे ५०% संभवनीयता आहे हे तिला समजत नाही.किंबहुना गणिताचे ज्ञान असलेल्या अनेकांना हे समजत नाही.
धन्यवाद ..!
श्री. टगोजीपंत यांनी श्रेयअव्हेर हा नवीन प्रतिशब्द(त्याचा इंग्रजी मूळ शब्द कळला म्हणजे हा शब्द कोणत्या शब्दासाठी प्रतिशब्द आहे त्याची आम्हाला नोंद करता येईल ) आम्हाला दिला आहे, त्याचे आम्ही आनंदाने 'स्वीकृतीकरण' करून घेतो.
(का हो टगोजीराव, आमच्याबरोबर वाद घालून आमचा 'क्लिष्ट आणि विकृत शब्दनिर्मितीचा रोग' आपल्यालाही जडला काय ?
आपला 'मराठीकरणीकृत' शब्द श्रेयअव्हेर हा अर्धा संस्कृतप्रचुर ( ??? संस्कृतप्रचुर/संस्कृतनिष्ठ मराठी, संस्कृतप्रचुर/संस्कृतनिष्ठ हिंदी हे ठीक आहे, पण संस्कृतप्रचुर शब्द म्हणजे काय बुवा ? (बॉ नव्हे !)) आणि अर्धा मराठमोळा वाटतो, त्याला पूर्ण मराठमोळा बनविला तर... ''इट इज अ नॉट-सो-बॅड आयडिया''?)
(आपला लाटू-इच्छी) उपमन्यू
काही मजकूर संपादित. प्रतिसाद लिहिताना आपल्याकडून व्यक्तिंना विशेषणे बहाल होणार नाहीत याची कृपया काळजी घ्यावी. - संपादन मंडळ
श्रेयअव्हेर
श्रेयअव्हेर = शुद्ध मराठीत "डिस्क्लेमर"
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
खुलासा
मागे आपणच डिस्क्लेमर ला (टग्यांच्या) खुलासा हा शुद्ध मराठी प्रतिशब्द सुचवला नव्हता ना?
अवांतर - डिस्क्लेमर प्रत्येकवेळी श्रेयअव्हेरच असेल असे नाही. निर्दाव / दावातीत असा शब्द सुचल्यास पाहावे.
पुन्हा धन्यवाद !
-------------------------
त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम् ॥
नमस्ते !
-------------------------
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ॥
डोकेदुखीचे (गुप्त) विश्लेषण
समोर आल्यावर अनेकांचे डोके गुप्तपणे दुखते का तुम्ही गुप्तपणे समोर येता? (म्हणजे नेमके काय घडते?)
चूक. तुम्ही आज निघून गेलात तरी उद्या येऊन आणखी काय गोंधळ माजवणार या चिंतेमुळे लोकांची डोकेदुखी आणखीच वाढत असावी.
मी टग्या नाही.
यांत काहीच गुप्त नाही.
एकंदरीत आपला गुप्त राहणे, गुप्त विचार करणे, गुप्तता पाळणे वगैरे गोष्टींशी दूरान्वये संबंध नाही हे जाणून घ्यावे. जमल्यास बॉबी देओलचा आणि विजु शहाचे टुकार संगीत असणारा गुप्त हा चित्रपट गुप्तपणे पहावा आणि पाहिला किंवा नाही ही माहिती देखील गुप्त ठेवावी.
वरील चर्चेत कोणाला तरी गुप्त रुची असू शकते परंतु वात्रट प्रतिसादांनी त्यांना गुप्तता पाळून मनातील सुप्त इच्छा गुप्त ठेवावी लागते हे जाणून विषयांतर टाळावे. नाहीतर गुप्त संपादकांकडून या पुढील प्रतिसाद गुप्त व्हायचे.
असो, आता मी गुप्त होते.
फक्त श्री. सचिन खुटवड यांच्यासाठी...
आपल्याला या विषयाबाबत खरी जिज्ञासा आहे असे दिसते.
आंतरजालावरील चर्चेतून आपल्याला निश्चित काही सापडेल असे वाटत नाही. (आडात नाही तिथे पोहर्यात कुठून येणार ?) या विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
मी फक्त तीनच पुस्तकांचा उल्लेख करतो.
१) ‘Autobiography of A Yogi'- परमहंस योगानंद (मराठीत ‘योगीकथामृत’ म्हणून या ग्रंथाचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे.)
आंतरजालावरील दुवा : Autobiography of A Yogi
२) ‘थोडे अद्भुत, थोडे गूढ’ या पुस्तकाचा दुवा : Directory
पुस्तकाचे भाग- भाग १ भाग २ भाग ३
२) ‘ॐकार रहस्य’- शांताराम आठवले (प्रकाशक : अंजली पब्लिशिंग हाऊस, पुणे.)
जुन्या आणि नव्या दोन्ही अंधश्रद्धा दूर ठेवून, चिकित्सक दृष्टीने या पुस्तकांचे वाचन करावे व नंतर स्वतःचे मत बनवावे.
(आपल्या अवस्थेतून गेलेला)
उपमन्यू
मी स्वतः काही पिशाच्चांचे फोटॉ पाहिले आहेत
कुठले कट्ट्यांचे का? पिशाच्च सुद्धा कट्टे वगैरे करतात वाटतं? त्यांच्या संकेतस्थळांचे ट्राफिक कसे आहे?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
कॉटन कँडी
काय बाळबोध चित्र दाखवता! बाळाची कॉटन कँडी हातातून निसटून बाबागाडीत पडते आहे असे वाटले.
खालील मुलगी बघा. हॉस्पिटलात मृत्यू झाला होता आणि मग बाहुलीसकट रात्रीबेरात्री कॉरिडॉरमध्ये तरंगत असते म्हणतात. इथे बघा -> ही निव्वळ भाकड कथा आहे.
बालकांतील गुप्त शक्ती
कदाचित निसटली नसेल बाळाने ती टाकून दिली असेल. त्यावेळेस डावीकडे असणारा त्याचा हात हलला असेल आणि समोर आला असेल. बाळं हातातील गोष्टी टाकून देण्याचे गुप्त उद्योग अनेकदा करतात.
आमच्या लहानपणी घरातील गोष्टी तळमजल्यावरील अंगणात सापडल्याचे दाखले दिले जातात.
दाखले
हा भुतांच्या अस्तित्वाचा पुरावा मानावा. हाच उलट दाखला देणारे लोक भुतांवर विश्वास बसू नये म्हणून किती खोटे बोलतात याचा हद्दच नाही. लहान मुलांवर असे भलतेसलते आरोप!
यो यो
आता मी घुमजाव करत आहे.
ती कॉटन कँडी नसून टेडी बेअर सदृश खेळणे असावे आणि त्याची दोरी बाळाच्या हातात. :))))))
बाळ यो म्यान असावं.
(तर्कदुष्ट) प्रियाली.
अवांतर(?)
अद्याप नाही.
इथे काहीही अवांतर नाही किंवा आपण म्हणालात म्हणून अवांतर होत नाही.
चर्चा गुप्त शक्तींवर सुरू आहे आणि ज्याला आपण गुप्त शक्ती म्हणताय त्या गुप्त नाहीत यावर माझा उहापोह सुरू आहे. काळजी नसावी. चर्चा लायनीत आहे आणि मानवात गुप्त शक्ती आहे की नाही हे जाणून घेण्यास मी अतिशय गंभीर आणि उत्सुक आहे.
बाळ आणि आई हे दोघेही मला जिवंत दिसतात म्हणून मानवी आहेत आणि ते जे काही लटकते आहे ;-) ते गूढ आहे असे तुमचेच म्हणणे हे विषयाशी अतिशय सुसंगत आहे.
पुढचा तर्क,
बाळ आणि आई शांत उभे आहेत. कोणीतरी बाजूने टेडी बेअर फेकले आहे.
आईचा स्कर्ट
आईचा स्कर्ट बाबागाडीसमोर नाही. शक्ती बेअरात नसून फेकणार्यात आहे.
आणि मला वाटत होतं की भुतं दिसत नाहीत. आभासी असतात. :-(
वाच्ले. म्हणुन् तर तर्क्बुद्दि वाप्रुन लिखान् करण्याचा प्रयत्न् करते आहे.
तुम्हीही दिसत नाही
सर्केश्वर, तुम्हीही आम्हाला दिसत नाही पण बरेचदा अनेकांच्या मेंदूतील विशिष्ट शक्ती उद्दिपित करता. पर्यायाने, आपण मानवी का अमानवी?
अर्धमानवी
कसं वाटतं?
प्लॅस्टीकची पिशवी
ही तर झाडात आडकलेली प्लॅस्टीकची पिशवी वाटते
ऋषिकेश
------------------
जगात .... प्रकारचे लोक असतात गुप्तशक्ती असणारे आणि नसणारे
दुपटं?
बरं! दुपटं असेल :प्
ऋषिकेश
फुगा
हेलिअम गॅसने भरलेला फुगा असावा. थोडा जुना झाल्याने गॅस कमी झाला असावा आणि फुगा हवेत उंच न जाता थोडा खाली आपोआप उडत असावा. आता वारा नको, दोरी नको, स्कर्ट नको, बाळ नको आणि आईही नको.
फुगाच आहे आणि इथे उगीच गुप्त शक्तींचा फुगा निर्माण केला जात आहे.
हितले
येकाहून येक टेरर प्रतिसाद पाहून आम्हालाही येकाहून येक टेरर शिणेमे आठवले. (हा शिणेमा बर्याच बाबतीत टेरर आहे)
----
अरेच्चा
बघा, म्हटले होते ना ? ह्याला म्हणतात अतींद्रीय शक्ती !
आम्ही पुरावा देतो आणि आम्हालाच पत्ता नाही? कमाल आहे! :)
----
बर्याच बाबतीत भयानक
त्या सालस रस्तपिपासू प्रेताला त्या भयंकर अभिनेत्र्यांशी संग करण्यास बळजबरी केली जाते - अंगावर काटा आला. नाही. अंगावर काटा गाण्यांमुळे आला.
सहमत
रक्तपिपासू प्रेत सर्वात सुसह्य आहे. त्याच्या चेहेर्यावर मुखवटा असल्याने त्याचा अभिनय बघावा तरी लागत नाही.
----
सामरी
हाच तो सुप्रसिद्ध सामरी का?
म्हणजे व्लाद टेपेस उर्फ ड्रॅक्युलाचा असा सामरी का व्हावा या कोड्याचं उत्तर अद्याप गुप्त आहे.
नाही
म्हणजे व्लाद टेपेस उर्फ ड्रॅक्युलाचा असा सामरी का व्हावा या कोड्याचं उत्तर अद्याप गुप्त आहे.
हा संपूर्णपणे १००% स्वदेशी शिणेमा आहे. यावर कुठल्याही भ्रष्ट विदेशी शिणेमाचा कुठलाही प्रभाव नाही हे सांगताना आमचा प्रखर देशाभिमान गाईच्या डोळ्यात दिसणार्या काकडआरतीप्रमाणे झळाळून निघतो आहे.
----
आतिद्रिय शक्ति
मी ह्या वि़शयि अनुभव् घेतले आहेत, योग साधनेने आपन हे अनुभवु शकता. येथे श्रधे चा सम्बध् येत् नाहि. हे एक खनखनित् नाणे आहे.
माला आसे वाटते कि मानवि शाक्ति वर आजुन हि हवे तेवधे सन्शोधन झालेले नाहि. आपण फक्त ते आनुभवु शकतो.
परन्तु मि सन्शोधकतेने या कडे पाहतो आणि त्या वर प्रयोग देखिल् करित आहे.
आणि मला यात बर्या पेकि यश येत आहे. तरी या शक्तिचा सखोल आभ्यास करुन मघच या वर मते मान्डने योग्य टरेल.
एखाद्या विशयावर सन्शोधन न करता फक्त तर्क वापरुन आपले विचार मान्डने योग्य नाहि. (तर्क बुद्दि असनार्या साटि),किव्ना काहि लोक मनाला पटुन सुद्दा ते मान्य करित् नहित.
जीवनात येणारे चमत्कारीक आनुभव ( आतिद्रिय शक्तिना निगडित् )
बहुतेक कोणाला आसे आनुभव आलेले दिसत नाहित असे दिसुन येते.
मि माझे काहि आनुभव सान्गतो......पहा काही सुचले तर,
१) मि तसा लहान पना पासुन नास्तिक होतो. मी कधिहि मन्दिरात जात नसे , जरी कधि आई - वडीलान बरोबर गेलोच तरि मि मन्दिरा बाहेर उभा राहत आसे. तरि माला लहान पना पासुन बालाजी , शिरडि, गानगापुर या सारखि आनेक मन्दिरे स्वप्नात दिसत होती पण जेव्हा मि ति मन्दिरे प्रत्यक्श पाहिलि तेव्हा मला ति स्वप्नातिल मि पाहिलेलि तिच मन्दिरे आहेत हे जानवले, आगदि मन्दिराचे प्रतेक दालन माला दिसत होते, आणि विशेश म्हनजे आमच्या घरातिल कोनहि व्यक्ति त्या आधि त्या मन्दिरात गेलेलि नव्हति.
तरि पण मला तसे का दिसत असावे ?
क्रुपया मार्गदर्शन करावे...........
असे अनेक अनुभव सान्गन्या सारखे आहेत आणि मि ते जरुर सान्गेन.........
लवकरच .............
गुप्त शक्ती
आपले अजुन सांगण्यासारखे अनुभव लिहा. मी प्रयोग करत आहे की आमचे आभासी जगातले मित्र कसा प्रतिसाद देतील. ह्या भागात तर ते ताडले.
अजुन काही चाचण्या होउन् जाउ दे मग कळेल की मला ती गुप्त शक्ति अवगत् आहे की काय् समोरचा नक्की काय प्रतिसाद देणार आहे.
कृपया या विषयातील अजुन चाचण्या होण्यास आपले इतर अनुभव लवकर सांगावे, ही विनंती.
लवकरच आनुभव येतिल.....
लवकरच आनुभव येतिल.....
किम्बहुना त्याचि सुरवात झाली आहे.............................
लवकरच आनुभव येतिल.....
लवकरच आनुभव येतिल.....
किम्बहुना त्याचि सुरवात झाली आहे.............................
विज्ञान
या चर्चेत जे कांही चालले आहे त्याचा विज्ञानाशी कितपत संबंध आहे?
महामहिम दिव्यज्योति आचार्य विद्युतमंडलजी
महामहिम दिव्यज्योति आचार्य विद्युतमंडलजी,
आपल्यातील दिव्य विद्युतशक्ती वापरून आपण विद्युत नियंत्रित शिंग (यावनी भाषा - हॉर्न) वाजवून मलिन वस्त्रे प्रावरणे स्वच्छ करण्याचा प्रयोग कधी केला आहे काय?
नसेल तर प्रयत्न करून पहा. इतःपर चर्चा वाचताना माझ्यातील 'गुप्त' दिव्यशक्ती जागृत होत्साते मलाही आपल्याप्रमाणेच विविध अतींद्रिय अनुभव येऊ लागले आहेत.
त्यांपैकीच हाही एक आहे. मी अभियंता असलो म्हणून काय झाले? मानवात गुप्तशक्ती असतात यावर माझा पूर्ण विश्वास बसू लागला आहे.
चर्चा?
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या प्रतिसादांच्या गाठोड्याला श्री. आनंद घारे चर्चा म्हणतात याचे आश्चर्य वाटते. बरे. प्रतिसाद लिहिणार्यांची नांवे वाचली तर त्यांतील प्रत्येकाच्या ठायी कोणत्याही विषयावर अगदी बिंदुगामी(टु द पॉइंट),तर्कशुद्ध, सुसंगत असे लेखन करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी वेळोवेळी केलेल्या लेखनावरून दिसून येते. पण सध्या हे असे चालले आहे. असो.
या अतिरथी महारथींवर असा अनिष्ट परिणाम करणारी अतींद्रिय गुप्तशक्ती मूळ चर्चाप्रस्तावातच असावी.
हाहाहा!
प्रतिसाद आवडला. :)) तुम्हाला उत्तम विनोद करता येतो हे देखील मला आताच जाणवले. कोणजाणे हा देखील चर्चेचा गुप्त प्रभाव असावा. ;-)